मॅनर्स

आजकालच्या मुलांना मॅनर्सचा ओवरडोस पाजला जातोय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2018 - 12:55

कालचा किस्सा - बसस्टॉपवर गर्लफ्रेंडची वाट बघत उभा होतो. शेजारी एक अख्खे मराठी कुटुंब उभे होते. बसची वाट बघत होते की शेजारच्या गार्डनमध्ये खेळून दमून नुसते विसाव्यासाठी तिथे थांबले होते कल्पना नाही. एक चार वर्षांचा मुलगा, त्याचे आई-बाबा आणि आज्जी होती. मुलगा बसस्टॉपभोवती नुसता पळत होता. मग दमला. तहान लागली. आईकडे पाणी मागितले. तसे त्याच्या आजीने तत्परतेने त्याला पाणी दिले. दमलेला मुलगा ती छोटीशी बाटली तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायला. बाटली आजीला परत करून पुन्हा मस्ती करायला पळणार तोच त्याची आई म्हणाली, "रोहू, आजीला थॅन्क्स म्हणालास का?" .... मी शॉकड् !

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मॅनर्स