मायबोली सुलभीकरणासाठी काही सूचना

Submitted by शंतनू on 26 December, 2017 - 20:08

माझ्यासारख्या नवख्या लेखकाला मायबोलीवर लेखन करण्यासाठी अतिशय क्लिष्ट अश्या प्रक्रियेतून इक्डून तिकडे उड्या मारल्यावर देखिल 'नवीन लेखन कसे करावे' हे सापडायला खूपच वेळ लागला. मी पूर्वी १-२ लेख लिहिले अस्ल्यामुळे हट्टाने ती सुविधा शोधून काढली (ह्यात काही कर्तृत्व गाजवले असे नसले तरी), नवीन लोक एव्ढे सगळे दुवे वाचत बसतील आणि त्यात लाखो दुवे आणि प्रतिसादांच्या जंजाळातून पाहिजे ती माहिती शोधून काढतील ही अपेक्षा करणे चूक आहे. तरी कृपया खालील सूचनांचा विचार करावा ही विनंती:

१. 'नवीन लेखन करा' हे पान उघडल्यावर तिथे नवीन लेखन कसे करावे ह्याच्या सूचना असाव्यात. आत्ता केवळ विषयांची यादी आहे, पण त्यापुढे काय करायचे ते दिलेच नाही आहे.
२. एखादी व्यक्ती एखाद्या ग्रूपची सभासद नसल्यास मुख्य पानावरच मोठ्या अक्षरात 'सभासद व्हा' ही सोय हवी. सध्या बाजूला कोपर्‍यात ही सोय आहे, पण तिथे नव्या माणसाचे लक्ष जात नाही.
३. एखादे पान त्या ग्रूपचे सदस्य नसल्यामुळे ती व्यक्ती पाहू शकत नाही, तेव्हा त्या सूचनेखाली ते पान कोणत्या ग्रूपच्या अखत्यारीत येते त्याचा दुवा हवा. सध्या जुने सभासद देखिल काही प्रतिसादांवर 'अमुक अमुक हा नोड पाहू शकत नाही, तो कुठल्या ग्रूपमह्ये येतो' वगैरे प्रश्न विचारत आहेत. म्हणजे हा अखिल मायबोलीय प्रश्न असावा!
४. नवीन लेखन सुरू केल्यावर शीर्षक लिहिल्यावर विषय निवडायला गेल्यास प्रचंड मोठी यादी आहे. बरं त्यात काही विषयांना एक आडवी रेघ, काहींना २ आडव्या रेघा असं काहीतरी विचित्र आहे. त्या ऐवजी शक्यतो ४ किंवा ५ मुख्य विषय ठेवून त्यावर कळ दाबल्यास प्रत्येकाखाली ४-५ उपविषय आणि अगदीच नाईलाज झाल्यास त्यांना उपोपविषय असावेत. एकदम २५-३० विषय पाहून काही कळत नाही.

कुणाला आणखी बदल सुचवायचे असतील तर कृपया सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ संबंधी - याच पानावर उजवीकडे नवीन लेखन करा, असं दोनसा दिसतं.
अ. या ग्रूपमध्ये नवीन लेखन करा
ब. नुसतंच "नवीन लेखन करा" जे माझे सदस्यत्वच्या वर दिसतं. ही लिंक आता तशी निरुपयोगी झाली आहे.
त्यातल्या मजकुरात १ ऑगस्ट (वर्ष २०१२ हेही हवं. हे बदल होऊन पाच वर्षं झाली सुद्धा) पासुन नवीन लेखन करण्याच्या, म्हणजे बेसिकली नवा धागा उघडण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांच्या घोषणेची लिंक आहे.)
तर नुसत्या नवीन लेखन करायची लिंक इथे
जोडायला हवी.
नवीन लेखन करा ऐवजी "नवीन लेखन करायचं आहे?" सयुक्तिक ठरेल.

वेबमास्टर, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

भरत, अधिक सूचनांबद्दल धन्यवाद. वेमा नक्की विचार करतील असं दिसतंय.

१. यात थोडे बदल केले आहेत. इथे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सभासदांसाठी सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. जे नवीन आहेत त्यांना जास्त तपशीलात माहीती हवी असते. त्यांच्यासाठी मदत पुस्तीकेचा दुवा दिला आहे. तिथे टप्प्याटप्प्याने माहिती आहे. पण हीच माहीती "नवीन लेखन करा" या पानावर देता येत नाही कारण जे नविन नाहीत त्यांना पटकन मायबोलीवरचे विभाग शोधण्याचा आड ही माहिती येते.
>नवीन लेखन करा ऐवजी "नवीन लेखन करायचं आहे?" सयुक्तिक ठरेल.
हा बदल केला आहे.
३. हा बदल या अगोदरच्या दृपलच्या वर्जन मधे सोपा होता. नवीन वर्जनमधे कसा करता येईल ते शोधत आहे.
बाकी बदलांवर काम सुरू आहे.

आपण केलेले बदल पाहिले. मदतपुस्तिकेचा दुवा उपयुक्त वाटतो आहे. नवीन लोकांना त्याची मदत होईल.
आपला आभारी आहे.

हे इथे संयुक्तिक आहे का माहिती नाही पण जुन्या मायबोली वरच्या कितीतरी चांगल्या रेसिपीज फाँट मुळे वाचता येत नाहीत त्या कश्या वाचाव्यात?

कुठल्याही लेखनाखाली प्रतिसाद एकापेक्षा जास्त पानांवर असतील, तर पुढ्च्या पानावर गेल्यावर लगेच प्रतिसाद न दिसता मूळ लेखन आधी दिसते. आता पहिल्या पानावर (साधारणपणे) ते आधीच वाचून झाले असल्यामुळे पुन्हा पुढच्या पानांवर ते तिथे का यावे, ह्याचे प्रयोजन कळले नाही. प्रतिसादांना दुवा म्हणून असेल तर बाजूला/ खाली बरे पडेल. किंवा लेखन आहे तसेच दिसले तरी ठीक, पण नवीन पान उघडल्यावर प्रथम त्या पानावरचे प्रतिसादच दृष्टीस पडले तर उत्तम. ज्याला गरज आहे तो आणखी वरती स्क्रोल करून मूळ लेखन बघेल. लेखन फारच लांबलचक असेल तर प्रतिसादांकरिता दर पानावर खूप वेळ स्क्रोल करत बसावे लागते. हा पहिल्यापासूनच काही किडा (बग) राहून गेला आहे की ते सहेतुक आहे?

शंतनु, +१११११
ही सूचना मी पूर्वी देखिल केली होती. मात्र त्यावेळी ते शक्य नाही असं वेमा म्हणाल्याचं अंधुक आठवतंय.
आता अॅप स्वरूपातल्या मायबोलीवर ही सोय देता येणं शक्य असेल तर फारच छान होईल!