मेक्सिकन थाळी

Submitted by टवणे सर on 26 November, 2017 - 09:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

भातः २ कप शिजवलेला भात, मीठ, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस

बीन्स (राजमा): १ कॅन राजमा beans (कॅन वापरत नसाल तर राजमा शिजवून घ्या ), मीठ, ३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, २ चमचे तेल

अवाकाडो सलाड: २ अवाकाडोचा गर, १/२ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ, १ टीस्पून Chili sauce, मीरपूड

सा(व)र क्रीम

फहिता
फहितासाठी चटणी: १ कप कोथिंबीर, ३-४ लसूण पाकळ्या, २ टीस्पून जिरे, २ हिरव्या मिरच्या, मीठ, २ टीस्पून ऑलिव्ह ऑइल
ग्रिल्ड भाज्या: २ समर स्क्वॅश, १ कांदा, २ झुकिनी, १ टोमॅटो, १/२ भोपळी मिरची, १०-१२ चमचे ऑलिव्ह ऑइल

क्रमवार पाककृती: 

१. भात

कृती
क्र.१ मधील सर्व साहित्य एकत्र मिसळावे
भात तयार

२. beans

एका भांड्यात/पातेल्यात तेल तापवून घ्या. मग त्यामध्ये लसूण परतून घ्या .
beans mash करून घ्या. Mashed beans घालून परता. Beans तयार.

३. अवाकाडो सलाड

अवाकाडो चांगला mash करून घ्यावा आणि त्या मध्ये उरलेले सगळे जिन्नस घालावेत. चमच्याने एकत्र करावे. सलाड तयार.

४. सा(व)र क्रीम
काही कृती नाही. प्लेन सार क्रीम. यानी एकूण थाळीला मस्त चव येते.

५.
५अ. फहिता चटणी
या आयटम ला जास्त वेळ लागतो.
फहिता चटणीचे सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सर ला ब्लेंड करून पेस्ट करून घ्यावी.

५ब. Grilled भाज्या
समर स्क्वॅश, कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची आणि झुकिनी चे काप करून घ्या.
जाड बुडाचा तवा/ग्रिल गरम करून २-३ चमचे ऑलिव्ह ऑइल एका वेळेस घालून ते काप खरपूस भाजून घ्या.
प्रत्येक भाजी वेगवेगळी भाजावी. तवा/ग्रिल एकदम गरम पाहिजे. फहिता पॅन/ग्रिल असेल तर उत्तम पण आपला नेहमीच तवा/ग्रिल पण चालतो.

५क. गरम तव्यावर ५अमध्ये केलेली चटणी आणि ५बमध्ये ग्रिल केलेल्या भाज्या परतून घ्या.

६. Assemble
१-५ मध्ये केलेले पदार्थ ताटात वाढा. Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
बायको
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

परतलेल्या/ग्रिल केलेल्या भाज्या

IMG_20170402_111614.jpg

थाळी तयार
IMG_20170402_113204.jpg

हे सगळं टॉर्टियात घालून रॅप करत नाहीस का?
>>

हो ते पण चालेल. पण मग थाळी नाही ना होणार!

हे आमचं रविवार जेवण आहे. एव्हडे सगळे करायला तेव्हाच (बायकोला) वेळ मिळतो.

मी इथे एका पर्टिक्युलर मेक्सिकन रेस्टॉ.मध्ये फहिता ऑर्डर करते त्यात सिझलरच्या तव्यात ह्या सगळ्या ग्रील्ड भाज्या येतात. बाकी प्लेटमध्ये सावर क्रीम, ग्वाकामोली, सालसा आणि एक केशरट रंगाचा मेक्सिकन भात येतो. टॉर्टियाही देतात पण मला तेवढं खाता येत नाही.

छान.

आम्ही भाज्या ग्रील करायला एवढे तेल नाही वापरत. राईस बोल ऐवजी कमी भात वाला थाळी प्रकार आवडला आहे.

छानच! Happy

ग्रील्ड भाज्यांच्या लिस्ट मध्ये टोमॅटो लिहीला आहे पण नंतर फोटोत दिसत नाही. प्रामाणिकपणे टोमॅटो वापरणं ट्रिकी असेल कारण तो मुशी व्हायचे चान्सेस असतात. न वापरणं इष्ट Happy

तसंच अव्हाकाडो सॅलॅड मध्ये हॅलापिन्यो किंवा कुठली हिरवी मिरची वापरली चिली सॉस ऐवजी तर जास्त चांगलं लागेल आणि रंगही चांगला दिसेल Happy

भारी दिसतंय एकदम. उचलून खावंसं वाटतंय.

पण कठीण वाटतंय आणि बरेच प्रकार इथे मिळणार पण नाहीत यातले.

पोस्ट वाचून बनवायची इछ्छा झाली खूप. उद्या बन्वणार नक्की. मी मागे हे असे बन्वले होते. तयार बोट्स मिळाल्या होत्या. Happy

18268236_1572558062818163_5071932766610408268_n.jpg18222331_1572558059484830_8962031626781523683_n.jpg

मस्त आहे लो कार्ब थाळी.
अव्हाकाडो मधे बारीक चिरलेली हिरबी मिरची आणि एक पाकळी लसूण ठेचून घालून पहा पुढच्या वेळेस

मस्त दिसते आहे.

मी थाळी ऐवजी वाटी करते Happy
मोठ्या बाऊल मध्ये आधी भात, त्यावर बीन्स, मग भाज्या, लेट्युस, साल्सा, चीज ....आहाहा!!!
आता नवरा खरेच त्याला कार्ब जेवण म्हणतो.

थाळी म्हणायला धजत नाही कारण ही फक्त एकच डीश दिसते आहे.

थाळी म्हणजे निदान दोन - तीन मुख्य पदार्थ, एक - दोन साईड डीश , मग सुप , सॅलड, स्वीट असे भरगच्च अपेक्षित होते.

या रेसिपीत थोडे बदल करून burrito bowl केलं होतं ते आमच्याघरी हिट झालं! भारी रेसिपी आहे ही, धन्यवाद टवणे सर!