मायबोलीवरील वर्षपूर्तीनिमित्त मायबोली सदस्य होण्यामागची कहाणी

Submitted by आरू on 26 November, 2017 - 01:15

२५ नोव्हेंबर, २०१७ मला मायबोलीचं सदस्यत्व घेऊन एक वर्ष झालं. आतापर्यंत काही लिहिलं नाही, पण इथलं वाचत असते आणि कधी- कधी प्रतिसाद देत असते.

वर्षभरापूर्वी गुगलवर वेल यांची आधुनिक सीता या कथा/कादंबरीचा एक भाग दिसला उत्सुकता वाटून वाचला छान वाटला. मग बाकी भाग वाचतच गेले. त्यानंतर आठवणीतलं कपाट ही कथा वाचली, दोन्ही कथा आवडल्या होत्या पण सदस्य नसल्याने प्रतिसाद देता येत नव्हता. तोपर्यंत सदस्य व्हायचा अजिबात विचार नव्हता. मायबोलीवरचं लेखन मात्र वाचतच होते. बेफिकीर यांच्या कथा-कादंबर्या वाचण्यात आल्या. उत्कृष्ट लेखनशैली. पण अन्या आणि सनम वाचून खूप वाईट वाटलं, अर्धवट होतं म्हणून.

एके दिवशी मनात विचार आला, आपणही मायबोलीचे सदस्य व्हायला काय हरकत आहे? मी लगेच नवीन सदस्य होण्यासाठी नोंदणी केली आणि सदस्य झाले पण हा माझा गैरसमज होता. मला माहीत नव्हतं की सदस्य प्रवेश करण्यासाठी लागणारा पासवर्ड ई-मेलने दिला जातो. खरंतर मी ई-मेलचा पासवर्ड विसरले होते, आणि मायबोलीवरती औपचारिकता म्हणून ई-मेल आयडी द्यायची असते असा माझा समज होता. सदस्य होऊन एक आठवडा झाला पण मला येण्याची नोंद करता येत नव्हती. एक दिवस मी सहज म्हणून ई-मेल अकाऊंटचा पासवर्ड चेंज करून बघायचं असं ठरवलं. अगदी सुरुवातीला ठेवलेला पासवर्ड टाकला आणि चेंज पासवर्डवर टिचकी मारली. मोबाईलवर ई-मेल व्हेरीफिकेशन कोड आला. नवीन पासवर्ड टाकून लाॅगइन केलं, इनबाॅक्समध्ये मायबोलीचा पासवर्ड(OTP) मेल होता. तो पासवर्ड वापरून मला एकदा मायबोलीवर प्रवेश करायचा होता लगेच पासवर्ड चेंज करायचा होता. तिथे वेळ मर्यादा ८ मिनिटे इतकी होती. मी पटकन सदस्य प्रवेश केला आणि पासवर्ड चेंज केला. ती वेळ मर्यादा तितकीच होती की अजून वाढवली गेली असती माहीत नाही. काही असो, पण हुश्श! मी एकदाची मायबोलीकर झाले होते.

नकळत वेल यांच्यामुळे मायबोलीची ओळख झाली म्हणून त्यांचे मनापासुन आभार. Happy

Group content visibility: 
Use group defaults

मी आत्ताच चेक केलम मा झा सदस्य कालाबधी ६ वर्ष ८ महिने आहे. Happy
मी अजुनही पडीक असल्यासारखीच आहे माबोवर.
काम करताना बाजुला माबो मिनीमाइझ केलेली असतेच. Happy

मी २००८ मधे दिवाळीच्या आधी आकाशकंदील बनवण्यासाठी डिझाईन शोधत होते. त्यात माबोवरची एक लिंक आली आणि मायबोलीचा शोध लागला. तेव्हा कौतुक शिरोडकर खूप कथा लिहायचे. त्या कथा वाचून त्यांची आणि माबोची फॅन झाले. सदस्यत्व नंतर कधीतरी घेतलं असावं. बहुतेक ' आख्यान : झबी' या ( बासुरीची होती का ही झबी? ) अतिशय सुंदर कथामालिकेला प्रतिसाद देण्यासाठी घेतलं असावं.

सो मला माय्बोलीवर आणण्याचे पूर्ण श्रेय श्री नरेंद्र मोदी यांचे,Lol

पवनपरी छान लिहीता. लिहत रहा. एक वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा.

मी मिसळपाव ची रेसिपी शोधत असताना चुकून मिपा ला भेट दिली आणि मिपा वाचत गेले नंतर एकदा तिथे एका धाग्यावर धुंद रवी यांची माझी लुंगी खरेदीची कुणी तरी लिंक दिली होती .तो लेख वाचला आणि हळूहळू माबो वाचत गेले मग लक्षात आले की सदस्य झाले की मगच सगळ्या लेखकांचे पुर्ण लिखाण वांचू शकतो..
नंतर कवटी चाफा कौतुक शिरोडकर विशाल कुलकर्णी दिनेशदादा स्वीट टॉकर दाद बेफ़िकीर विद्या भूतकर या दिग्गजांचे लेख वाचले आणि मायबोलीचा पंखा झाले
म्हणजे खरे तर मी फक्त या सगळ्यांचे संपूर्ण लेखन वाचायला मिळावे म्हणूनच सदस्यत्व घेतले होते पण मग इथल्या एकूणच चलणाऱ्या सर्व चर्चा, वाद विवाद ,आपला मुद्दा हिरीरी ने मांडण्यासाठी दिलेली उदाहरणे ,स्वतःची वेगळी भाषा (उदा.साबा साबू राच्याकने हघ्या )आणि थोडीशी कंपुबाजीसुद्धा या मायबोलीच्या अष्टपैलुची ओळख झाली विचारांना नवा दृष्टिकोन देण्याचे सामर्थ्य मायबोलीमधे नक्कीच आहे हे सुद्धा पटले.आता एकदिवस कायप्पा शिवाय राहु शकते पण मायबोली शिवाय नाही

धन्यवाद सस्मित, वावे, जागू, आदू Happy
थोडक्यात सगळेच माबोच्या व्यसनाधीन झाले आहेत. Lol

Pages