मायबोलीवरील वर्षपूर्तीनिमित्त मायबोली सदस्य होण्यामागची कहाणी

Submitted by आरू on 26 November, 2017 - 01:15

२५ नोव्हेंबर, २०१७ मला मायबोलीचं सदस्यत्व घेऊन एक वर्ष झालं. आतापर्यंत काही लिहिलं नाही, पण इथलं वाचत असते आणि कधी- कधी प्रतिसाद देत असते.

वर्षभरापूर्वी गुगलवर वेल यांची आधुनिक सीता या कथा/कादंबरीचा एक भाग दिसला उत्सुकता वाटून वाचला छान वाटला. मग बाकी भाग वाचतच गेले. त्यानंतर आठवणीतलं कपाट ही कथा वाचली, दोन्ही कथा आवडल्या होत्या पण सदस्य नसल्याने प्रतिसाद देता येत नव्हता. तोपर्यंत सदस्य व्हायचा अजिबात विचार नव्हता. मायबोलीवरचं लेखन मात्र वाचतच होते. बेफिकीर यांच्या कथा-कादंबर्या वाचण्यात आल्या. उत्कृष्ट लेखनशैली. पण अन्या आणि सनम वाचून खूप वाईट वाटलं, अर्धवट होतं म्हणून.

एके दिवशी मनात विचार आला, आपणही मायबोलीचे सदस्य व्हायला काय हरकत आहे? मी लगेच नवीन सदस्य होण्यासाठी नोंदणी केली आणि सदस्य झाले पण हा माझा गैरसमज होता. मला माहीत नव्हतं की सदस्य प्रवेश करण्यासाठी लागणारा पासवर्ड ई-मेलने दिला जातो. खरंतर मी ई-मेलचा पासवर्ड विसरले होते, आणि मायबोलीवरती औपचारिकता म्हणून ई-मेल आयडी द्यायची असते असा माझा समज होता. सदस्य होऊन एक आठवडा झाला पण मला येण्याची नोंद करता येत नव्हती. एक दिवस मी सहज म्हणून ई-मेल अकाऊंटचा पासवर्ड चेंज करून बघायचं असं ठरवलं. अगदी सुरुवातीला ठेवलेला पासवर्ड टाकला आणि चेंज पासवर्डवर टिचकी मारली. मोबाईलवर ई-मेल व्हेरीफिकेशन कोड आला. नवीन पासवर्ड टाकून लाॅगइन केलं, इनबाॅक्समध्ये मायबोलीचा पासवर्ड(OTP) मेल होता. तो पासवर्ड वापरून मला एकदा मायबोलीवर प्रवेश करायचा होता लगेच पासवर्ड चेंज करायचा होता. तिथे वेळ मर्यादा ८ मिनिटे इतकी होती. मी पटकन सदस्य प्रवेश केला आणि पासवर्ड चेंज केला. ती वेळ मर्यादा तितकीच होती की अजून वाढवली गेली असती माहीत नाही. काही असो, पण हुश्श! मी एकदाची मायबोलीकर झाले होते.

नकळत वेल यांच्यामुळे मायबोलीची ओळख झाली म्हणून त्यांचे मनापासुन आभार. Happy

Group content visibility: 
Use group defaults

धागाकर्तीची हरकत नसेन तर या धाग्यावर प्रत्येकाला 'आपण मायबोलीवर का आलो' याची संक्षिप्त कहाणी लिहीता येईल! Happy

धन्यवाद साधनाताई Happy जमेल तसं लिहायचा प्रयत्न करेन.
धन्यवाद राहुल Happy
माझी काहीच हरकत नाही, तुम्ही आणि ज्यांची इच्छा असेल ते मायबोलीवर का आणि कसे आले ते लिहू शकता. Happy

एक वर्ष एक लेख Happy

गेल्या एकदोन वर्षात मायबोलीवर आलेले आणि टिकून राहिलेले नवीन वाचक हेच खरे मायबोलीचे यश आणि ताकद Happy

प्रत्येकाला 'आपण मायबोलीवर का आलो' याची संक्षिप्त कहाणी लिहीता येईल
>>>

आपण मायबोलीवर का आलो आणि कसे आलो यावर आधी कुठला धागा नाहीये का.. म्हणजे कुठल्याही संकेतस्थळावर सहसा असा धागा असतोच.

माझे बोलाल तर एका ओळीचे कारण आहे.
ऑर्कुट सोबत ऑर्कुट समूह बंद झाले आणि मी माझी नवनवीन धागे काढायची तसेच चर्चा वादविवादाची भूक भागवायला मायबोलीवर आलो.

धन्यवाद ऋन्मेष Happy
एक वर्षाने का असेना पण काहीतरी लिहिलं याचं समाधान आहे. Happy

मराठी वाचनाची भुक भागवण्याठी मायबोलीकर झालो. वाचनालयातून पुस्तके आणून वाचायला वेळ मिळत नाही. जमेल तसे माबोवर वाचतो.

@ ऋ ,
या विषयावर धागा काढायची संधी हुकली तुझी. Proud

@ ऋ ,
या विषयावर धागा काढायची संधी हुकली तुझी. Proud>>> पाथफाईंडर Lol
काल माझापण १ला माबो वाढदिवस होता. Blush>>> अभिनंदन Happy

अर्रे ह्यावरचा धागा मीच काढणार होतो मागे पण ते बैशिंगवालं प्रकरण झालं न् विसरलो... मला माबोवर एक्टीव ऋ ने केलं. निवांत लिहीतो. Happy

अर्रे ह्यावरचा धागा मीच काढणार होतो मागे पण ते बैशिंगवालं प्रकरण झालं न् विसरलो...>>> हा माझ्या नशीबात होता. Happy
धन्यवाद मानव सर Happy

अभिनंदन परी
मायबोलीवर यायचं कारण म्हणजे शशांकजींचा एक धागा आहे वन लायनर वाचलेले. आणि मग ठरवलं सदस्यत्व घ्यायचे ते लॉग इन चा प्रकार तुमच्या बाबतीत झाला तसाच झालेला. मी पण नंतर तो पासवर्ड बदलून घेतला. अद्याक्षरावरून गाणी ओळखा हा माझा आवडता धागा ते खेळण्यासाठीच मी लॉग इन ला धडपडत होतो. मलाही तीन दिवसांपूर्वीच मायबोलीवर येऊन एक वर्ष पूर्ण झालं.

चांगला धागा.. मी सुद्धा माबो वर आलो याचे कारण एक कथा मला इतकी आवडली की सदस्यत्व घ्यायची इकचा झाली..
ती कथा म्हणजे कौतुक शिरोडकर यांची याला म्हणतात नशीब।आजपण इतक्या कथा , कादंबऱ्या वाचल्या पण आजूनपन ही पुन्हा पुन्हा वाचायला आवडते..

https://www.maayboli.com/node/6778

धन्यवाद अक्षय दादा Happy थोडक्यात पासवर्डचा घोळ माझ्यापुरता मर्यादित नाहीय. तुमचंही अभिनंदन Happy
धन्यवाद च्रप्स, मीही कौतुक शिरोडकरांच्या अनेक कथा वाचल्या आहेत भन्नाट आहेत ही पण नक्की वाचेन. Happy

मी बेफिकीर यांच्या कथा वाचायला माबोवर आलो आणि इथलाच झालो. तरी आता गप्पांची पाने खूप कमी झालीत नैतर दिवस दिवस माबोवर पडीक असायचो.

मायबोलीचा लळा बेफींच्या कथा वाचून लागला. वाचनमात्र असताना बेफींच्या अनेक कथा सलग रात्ररात्र जागून संपवलेल्या. Happy अकाऊंट बनवलं तेव्हा नक्की काय उद्देश होता माझा ते आता आठवत नाही. अकाऊंट बनवून ते नंतर कधी लॉगिन करून वापरात आणलंच नाही. वर्षभरापूर्वी एक रिप्लाय देण्यासाठी मी लॉगिन केलेलं आठवतं. पण २०१२-१३ पासून मी मायबोलीवरील कथाकादंबर्या न् ललितलेखनाचा नियमित वाचक होतो/आहे. एका एफबी पेजवर मयुरी चवाथे यांच्या हलक्याफुलक्या स्टोरीज /लेख वाचून आपण काहीतरी लिहायला हवं असं वाटलं पण कधीच काही लिहीलं नाही. त्यानंतर अस्मादिकांच्या जिवनात 'कोणी' आलं न् अस्मादिक लिहीते झाले. Proud दोन तिन वर्षांपूर्वी बरंच काही लिहीलं पण कुठे कधी पोस्टलं नाही. त्यापैकीच एक, माझा पहीला धागा 'प्रपोज' जूनमध्ये पोस्टायचा निर्णय घेतला न् मी परत माबोवर लॉगिन केलं. अर्थात् कोण कशा प्रतिक्रिया देईन हे माहीती नव्हतं. माझ्या सुदैवाने सगळ्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. मयुरीताईंचा प्रतिसाद माझ्यासाठी विशेष होता.
वाचनमात्र असताना ऋ चे लेख वाचायचो ते टाईमपास असल्यानं तो एक मस्त विरंगुळा होता. त्या धाग्यांतून आणि त्यावरील प्रतिसादांमधून भरपूर मनोरंजन व्हायचं आणि शिकायलाही मिळायचं. त्याच्यावर बाकीच्यांनी तुटून पडणं, त्त्याने प्रत्येकाला फेस करणं, डॉ. सातींनी कुऋ ची बाजू घेणं याची गंमत वाटायची. येथे सक्रिय होऊन रूळताना ऋच्या धाग्यांचा, त्यावरील प्रतिसादांतील त्याच्या संवादकौशल्याचा(!) उपयोग झालाय हे प्रांजळपणे कबुल करायला हवं!
बाकी साईट्स पेक्षा माबो नव्यानं लिहीणार्यांसाठी चांगली आहे.. येथे एखाद्या कुटुंबात असल्यासारखं वाटतं. नविन आलेल्यांच्या वस्सक्कन अंगावर येणारे कमी आहेत किंवा नाहीतच.

धन्यवाद आशुचँप , मनीमोहोर Happy
मनीमोहोर, वाचतेय तो धागा. रोचक आहेत सगळ्यांची कारणं. Lol २००९ मधला आहे तो धागा, आणि नवीन माबोकरांना जुन्या धाग्यांची माहिती नसते. म्हणजे प्रत्येक लेखक/लेखिकेचं लेखन बघणं सहज शक्य नाही इतका मायबोलीचा व्याप आहे, जी चांगलीच गोष्ट आहे. Happy

राहुल भारी लिहिलंय. Happy
बाकी मी कधी दुसर्या साईट्सवर जात नाही. दोन वेळा मिपावरती गेले पण तिथे सदस्य व्हावं असं कधी वाटलं नाही.
एक गोष्ट, राहुल आणि ऋन्मेष तुम्ही दोघे लहानपणी बिछडलेले जुळे भाऊ ऊ तर नाही ना? Lol आवडता अभिनेता एक, दोघे प्रपोज-प्रपोज काय करता आणि रात्र-रात्र काय जागता. Lol

एक गोष्ट, राहुल आणि ऋन्मेष तुम्ही दोघे लहानपणी बिछडलेले जुळे भाऊ ऊ तर नाही ना? आवडता अभिनेता एक, दोघे प्रपोज-प्रपोज काय करता आणि रात्र-रात्र काय जागता. >>>>
हायला खरंच की! भारी गोष्ट लिहीता येईल. आमचं दोघांचं मायबोलीवरचं वय सारखंच आहे. फक्त पंधरा विस दिवस मी लहान आहे. (आणखी बरंच साम्य आहे पण ते येथे अवांतर होईल म्हणून कट्ट्यावर तो काथ्याकूट करू. Happy )
बादवे, मी ते वरचं 'बिघडलेले' असं वाचलं. Proud

तशी maayboli मी पार २००१ पासून वाचतोय,
तेव्हा मी पहिल्या जॉब साठी कोलकात्याला होतो, शनिवार रविवार अक्षरश: पडीक असायचो माबो वर.
तेव्हा कधीतरी एक id काढला होता पण तो कधीच सुरु केला नाही, आता तर id काय होता ते पण आठवत नाही.

सभासदांसाठी काही वेगळे प्रीविलेज असतात हे खूप उशिरा कळले
२०१४ ला हवा तापायला लागली, तशी माबो पण तापायला लागली, साती, भरत यांच्या पोस्ट आवडत होत्या , लोकांच्या बोलण्यात अड्डा अड्डा असे सारखे यायचे, हे happening पान आहे कुठे हे शोधायला माबो पालथी घालून झाली मग गुजरात ग्रुप चा पत्ता कळला,
शेवटी ते पान वाचण्यासाठी परत एकदा सदस्य बनलो,

सो मला माय्बोलीवर आणण्याचे पूर्ण श्रेय श्री नरेंद्र मोदी यांचे, त्यातून काही १ -२ % शिल्लक राहिले असतील तर भरत , साती, इब्लीस अशा अभ्यासू id चे Happy

मी नंदिनीची हाफमर्डर आनि दिनेशदा चा मल्टीपर्पज मसाला वाचुन माबो वर आले.कित्येक दिवस माबो वर पडीक घालवले.आता उलट बर्यापैकी कंट्रोल मधे आहे.व्यसन लागायच बाकी होत माबोच त्या काळी Wink

तरी आता गप्पांची पाने खूप कमी झालीत नैतर दिवस दिवस माबोवर पडीक असायचो.
कित्येक दिवस माबो वर पडीक घालवले.आता उलट बर्यापैकी कंट्रोल मधे आहे.व्यसन लागायच बाकी होत माबोच त्या काळी
>>>
चला म्हणजे मी एकटाच नाही असा.. Happy

सो मला माय्बोलीवर आणण्याचे पूर्ण श्रेय श्री नरेंद्र मोदी यांचे,>>> Lol
व्यसन लागायच बाकी होत माबोच त्या काळी Wink>>> हे व्यसन असलं तरी वाईट नाहीये. Happy
धन्यवाद मेघा Happy

Pages