डिजिटल करन्सी रिटर्न्स -- अबबब!!

Submitted by कूटस्थ on 11 December, 2017 - 18:02

गेल्या काही दिवसात बिटकॉइन चे नाव न ऐकलेला मनुष्य विरळाच. वर्षभरातील त्याच्या वाढलेल्या किमतीमुळे बिटकॉइन बरेच चर्चेत आहे. वर्षभरात त्याची झालेली वाढ पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु बिटकॉईन ही डिजिटल करन्सी जगतातील केवळ एक करन्सी आहे आणि त्याच्यासारख्या अजून १०००+ करंसीस अस्तिस्त्वात आहेत. आपण बिटकॉइन आणि इतर प्रमुख ५-६ करन्सी चे गेल्या वर्षातील रिटर्न्स पाहुयात. खालील रिटर्न्स हे % मध्ये न देता पटीमध्ये दिलेले आहेत. का ते वाचून कळेलच.

Currency Name 11 Dec 2016 Price 11 Dec 2017 Price Returns (Multiplication)
Bitcoin $768 $17100 22.27 times
Ethereum $8 $475 59.3 times
Ripple $0.006791 $0.2502 36.84 times
Litecoin $3.65 $216 59.18 times
Monero $7.83 $272 34.75 times
Dash $9 $751 83.44 times (बापरे!!)
Ethereum Classic $0.908 $27.58 30.38 times

(Source: https://coinmarketcap.com/)

वर दिलेल्या करंसीस मागच्या वर्षीही टॉप १० मध्ये होत्या आणि आजही आहेत (ब्लू चिप स्टॉक प्रमाणे या ब्लू चिप करंसीस आहेत)
वर पाहिल्यास दिसून येईल कि प्रमुख ६-७ करन्सीमध्ये बिटकॉइन ने सर्वात कमी रिटर्न्स दिलेले आहेत एका वर्षात!!! परंतु बिचारा वलयांकित असल्यामुळे बळीचा बकरा झालाय. असो.

जर वरील करन्सी मध्ये वर्षांपूर्वी प्रत्येकी केवळ १००० रुपये गुंतवले असते तर ७००० रुपये गुंतवणुकीचे आज साधारण ३,२६,६०० रुपये झाले असते!!!!!! ( avg return 32 times). आज सर्व डिजिटल करन्सी मध्ये वित्तीय जगतातील सुमारे ४५७ बिलियन डॉलर इतका पैसा आहे!!!
काय हा एक मोठा फुगा आहे जो केंव्हाही फुटू शकतो? फुटल्यास थोडीफार २००८ सारखी रिसेशन ची परिस्थिती ओढवण्याची शक्यता अंधुकशी असली तरी नाकारता येत नाही. हा फुगा नसेल तर केवळ ही एक सुरुवात आहे एका मोठ्या वित्तीय क्रांतीची? हे मात्र येणार काळच सांगेल.... बघुयात...

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Today's my first day on maayboli.
Good night.

>>काय हा एक मोठा फुगा आहे जो केंव्हाही फुटू शकतो?
हिंदीतले वाक्य मराठीत भाषांतर केल्यासारखे वाटते.
असो, काय आहे हा प्रकार नक्की ?
कोणी याचा अनुभव घेतला असेल तर कृपया सामान्य अज्ञ लोकांसाठी एक मार्गदर्शनपर लेख लिहावा ही विनंती.

भारतात अनधिकृत असलेल्या चलनाचा कुटस्थ यांच्याकडून इतका प्रचार का केला जात आहे ? एकाच विषयावर तब्बल 6-7 धागे काढून काय साध्य करायचे आहे.

कूटस्थ यांचे प्रोफाईल पहाता येत नाहीये, त्यामुळे त्यांचे लेखन पण पहाता येत नाहीये.
जरा त्यांच्या धाग्यांचे क्रमांक टन्काल का ??

अहो बराच काळ झाला मी अगदीच कमी येतो आहे माबोवर, त्यामुळे चटकन लक्षात आले नाही.
पण कूटस्थ का उडाले बुवा ? वैध नसलेल्या चलनाचा प्रचार केला म्हणुन की काय ? Uhoh

पण कूटस्थ का उडाले बुवा ? वैध नसलेल्या चलनाचा प्रचार केला म्हणुन की काय ? Uhoh>>>> नाही. भारतीय संस्कृतीवरून सुरु झालेल्या अहमहमिकेत ते नानाकळांना घेऊन उडाले.

नाही. भारतीय संस्कृतीवरून सुरु झालेल्या अहमहमिकेत ते नानाकळांना घेऊन उडाले.>>>>

माबोने केलेल्या नव्या फॉर्मटमूळे ह्या असल्या धुमश्चक्री त्यांच्या त्यांच्या कोपऱ्यात होतात. आधी जसे इच्छा असो वा नसो, हे सगळे पाहात बसावे लागायचे ते आता टाळता येते. अडमीनचे आभार.

https://goo.gl/zGnYpP
बिटकॉईन व्हर्च्युअल करन्सी : नांदेडमध्ये शेकडो जणांची फसवणूक

बिटकोईन चा प्रचार करणे त्याला फायदेशीर सांगून दिशाभूल करणे हे सरकार तर्फे कडकपणे थांबवले गेले पाहिजे. नागरिकांना आवाहन करून देखील काही जणांच्या अतिउत्साहामुळे इतर गोत्यात येतात.