मायबोलीवर आवडत्या लेखकाचे चाहते (Followers/Following) होण्याची सोय

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीवर आवडत्या लेखकाचे/लेखिकेचे चाहते (Followers/Following) होण्याची नवीन सुविधा सुरु झाली आहे.

चाहते कसे व्हायचे?
मायबोलीवर प्रत्येक पानावर खाली लेखकाचे नाव, प्रोफाईल चित्र आणि लेखकाने दिले असल्यास छोटा मजकूर असतो. त्या खाली "यांचे चाहते व्हा" असे बटन असेल ते वापरून कुठल्याही लेखकाचे चाहते होता येईल. चाह्ते झाल्यावर ते बटन त्या ठिकाणी दिसणार नाही. चुकून मोबाईलवर unfollow होऊ नये म्हणून हे केले आहे. Follow/Unfollow ही सुविधा एकाच Toggle होणार्‍या बटनाने प्रत्येक व्यक्तिच्या प्रोफाईलमधेही आहे. तिथूनही Follow/Unfollow करता येईल.

तुम्ही एखाद्या लेखकाचे चाहते झाल्यावर तिथेच त्या व्यक्तीचे किती चाहते आहेत त्याचा आकडा दिसू लागेल. ज्याना ० चाहते आहेत तिथे काहीच दिसणार नाही. म्हणजे यांचे ० चाहते आहेत असे नविन लेखकांच्या प्रोफाईलवर दिसणार नाही.

तुम्ही चाहते झाल्यावर तुमच्या प्रोफाईलमधे "आवडते" अशी टॅब आहे तिथे तुम्हाला आवडणार्‍या सगळ्या लेखकांची (तुम्ही ज्यांचे चाहते आहात त्यांची) यादी दिसेल. ती वापरूनही तुम्ही एखाद्या लेखकाला आवडत्या यादीतून काढू शकाल.

तुमच्या प्रोफाईलमधे "चाहते" अशी टॅब आहे तिथे तुम्हाला तुमचे एकूण चाहते आणि त्यांची यादी दिसेल.


मी कुणाचा चाहता /चाहती झाल्याचा मला काय फायदा?

१. तुमच्या आवडत्या लेखक्/लेखिकेला प्रोत्साहन हा सगळ्यात मोठा उघड फायदा आहे. इथे मायबोलीवर तुम्हाला विनामूल्य चांगलं वाचायला मिळतं, ते आवडतंय हे त्या लेखक / लेखिकेला आपण प्रतिसादातून सांगतोच, पण मी तुमचा/तुमची अगदी पंखा आहे हे कळाल्यावर त्याला/तिला नवीन लेखनाला अजून उत्साह येईल. या बरोबर आणखी फायदे आहेत.
२. सध्या तुम्ही ज्या ग्रूपचे सभासद आहात, त्यातलेच नवीन लेखन "अजून वाचायचंय" मधे दिसते. पण तुमच्या आवडत्या लेखकाने , तुम्ही ज्याचे सभासद नाही अशा ग्रूपमधे लेखन केले तर ते "अजून वाचायचंय" मधे दिसत नाही. पण या नवीन सुविधेमुळे तुमच्या आवडत्या लेखकाचे लेखन ७ दिवस (किंवा तुम्ही वाचेपर्यंत) "अजून वाचायचंय" मधे वर दिसत राहील. उदा. तुम्हाला राजकारणाच्या ग्रूपमधे सामील होण्याची इच्छा नाही पण तिथे "लोकमान्य " हि आयडी खूप छान लिहिते तर फक्त त्याच आयडीचे चाहते होऊन त्यांचे नवीन लेखन तुम्हाला कळू शकेल.
३. मायबोलीवरंच सगळंच वाचायला आपल्याला नेहमीच वेळ नसतो. आणि असला तरी सगळं सगळ्याना वाचायला आवडतं अस नाही. या सोयीमूळे "जो जे वांछिल तो ते लाहो" च्या थोडे जवळ आपण जातो आहोत.

मला आवडीच्या लेखकाचं नवीन ते वाचायचंय. जुनं मुद्दाम वर काढलेले नको.

"कालीदास" ही आयडी खूप छान कविता करते /करायची. तुम्ही त्यांचे चाहते झालात. पण बर्‍याच वर्षात त्यांनी मायबोलीवर काही लिहले नाही. अचानक काही नवीन मायबोलीकरांना त्यांच्या कविता सापडल्या आणि त्यांनी भराभर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. किंवा स्वतः कालीदासांनीच प्रतिभा आटल्यामुळे नुसत्या प्रतिक्रिया देऊन ते लेखन वर आणायचा प्रयत्न केला. तर ते लेखन वर येईल का?
नाही. लेखन केल्यावर फक्त ७ दिवसच ते "अजून वाचायचंय" मधे वर दिसेल. आणि तुम्ही त्या पानाला भेट दिली की त्याची लिंक "अजून वाचायचंय" टॅबवर दिसायची बंद होईल. मूळ ग्रूपमधे लेखकाचा मूळ धागा पूर्वीप्रमाणेच कायमचा दिसत राहिल.

या सोयीत आवडीच्या लेखकाचे नवीन लेखन असेल तरच दिसते. ज्या पानावर लेखकाच्या नुसत्या नवीन प्रतिक्रिया आहे ती पाने या सोयीत दिसत नाहीत. प्रतिक्रिया मायबोलीवरच्या इतर सोयीत पूर्वीसारख्याच दिसतील. त्यात बदल नाही.

"माझ्यासाठी नवीन" मधे कधी दोन तर कधी एक भाग दिसतो. थोडे स्प्ष्ट कराल का?

वरचा भाग
आवडत्या लेखकांचं कुठल्याही ग्रूपमधलं (तुम्ही ग्रूप सभासद असा वा नसा) , न वाचलेले, सार्वजनिक लेखन
खालचा भाग
तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलं (लेखक तुमचा आवडता असो वा नसो), न वाचलेले, सार्वजनिक+खाजगी लेखन
(यात बदल नाही. सध्याची सुविधा. तुम्ही अजून कुणाचे चाहते नसाल तर पूर्वीप्रमाणे फक्त हाच भाग दिसत राहील)

ही सुविधा वाचकाला "माझ्यासाठी नवीन" टॅब अधिक उपयोगाची व्हावी म्हणून आहे. "मायबोलीवर नवीन" या टॅबवर सगळे लेखन पूर्वीप्रमाणेच कालमानानुसार दिसत राहील. त्यात काही बदल नाही.

लेखकांसाठी आपले कुणीतरी नुसते वाचकच नाहीत तर चाहते आहेत ही एक सुखावह भावना असते. या सुविधेमुळे त्या चाहत्यांपर्यत पोहोचायची आणखी एक सुविधा आपण लेखकांना देतो आहोत. या सुविधेला येणारा प्रतिसाद पाहून भविष्यात चाहत्यांना नोटीफिकेशन मिळेल असे करायचा मानस आहे. त्यामुळे जे नियमीत मायबोलीवर येऊ शकत नाहीत अशा चाहत्यानाही आवडत्या लेखकाचे नवीन लेखन कळू शकेल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

नविन submitted by र।हुल

अतरंगी, +७८६
चला सुरूवात केली. Lol
विशेष सुचना-ऋन्मेष लवकरात लवकर शिकून घेणे. Wink
सुचना संपली.

मी हे अगदी सुरुवातीलाच दोनेक पोस्टना केले होते. जेव्हा नाव खाली गेल्याचा बदल झालेला तेव्हा. माझे नाव लिहून मग पुढे माझा प्रतिसाद लिहिलेला. पण नंतर जाणवले की आपल्याला हे करायची गरज नाही. आपली पोस्ट वाचता वाचताच लोकांना समजते ही ऋन्मेषची आहे. मग म्हटले जाऊ दे कश्याला , उगाच लोकांना वाटायचे हा शायनिंग मारतोय.

पर्सनली मला माझे नाव झळकलेले बघायला आवडते. त्यामुळे मलाही नाव वरती, मोठ्य फॉन्टमध्ये, आणि सोबत डिपी असे हवे आहे... फोटोने तर आणखी मजा येईल Happy

अडमिंन राव असा काहीतरी करा की एखाद्या लेखकाचा चाहता झालो की त्याच्या ड्यु आयडी चा ही चाहता होऊन जाऊ दे..
उगाच दोन दोन वेळा जाऊन क्लिक करायचा त्रास वाचेल.

च्रप्स Proud

मागे मी कुठल्याश्या संकेतस्थळावर वाचनसंख्या पाहिली होती. ईथे तशी सोय करणे शक्य आहे का? लेखकांना समजेल की त्याचा लेख किती जणांनी वाचला आहे. नावे नाही फोडली तरी चालेन.

ऋन्मेषला अनुमोदन.. वाचकसंख्या द्याच..
पण त्यात एक घोटाळा असा आहे,(म्हणजे मी बघितलेला) धागाकर्ता किंवा प्रतिसाद देणारा पुन्हा धाग्यावर गेला तर वाचनसंख्या एक ने वाढत जाते.. तसं व्हायला नको.. एक आयडी एकदा धाग्यावर गेला तर पुन्हा गेल्यानंतर तो डबल काऊंट व्हायला नको. ्

कोणकोणते लेखक most followed आहेत कळू शकेल का कुठून? सगळ्यात जास्त चाहते असलेल्यांची यादी.

नको !!! असली आकडेवारी टाकून नवीन लेखकांना नाउमेद करू नका अडमीन राजे. >> नवीन लेखक नाउमेद होतील का यादी दिसली तर? Uhoh कुणाला माहिती?...होतीलही कदाचित!

कोणाकोणाला follow करावं ते एकाच ठिकाणी कळण्याचा साधारण सोप्पा मार्ग वाटल्याने मी ते सुचवलं/विचारलं.

===
भरत Lol

ऋन्मेष ५१ पेक्षा चैतन्य रासकर पुढेआहे ५६.

मला या लेखकांच्या लिस्टमध्ये घेऊ नका. मी धागाकर्ता आहे. लोकं माझ्या धाग्यांवरच्या चर्चा वाचण्यात ईण्टरेस्ट राखतात आणि त्या चुकू नये म्हणून त्यांनी मला टॅग केलेय. अन्यथा माझ्या लिखाणात ईतकी ताकद नाही की कोणी फॉलोअर जमवावेत. माझ्यापेक्षा चांगले लिहिणारे असतील ज्यांना माझ्यापेक्षा कमी फॉलोअर असतील. तर कोणी असा विचार करून नाऊमेद होऊ नये की ऋन्मेषसारख्याला पन्नास फॉलोअर मिळतात पण मला पंधरावीसच आहेत. मुळात पाच लोकं जरी तुमचे लिखाण आवर्जून वाचायला तुम्हाला टॅग करत असतील तर ती फार मोठी गोष्ट आहे.

ओके, मी कथांच्या वाटेला जात नाही, त्यामुळे पाहिलं नव्हतं.

वाचकसंख्येलाही काही अर्थ नाही.

समजा मला वाचायचा नसलेला एखादा धागा "माझ्यासाठी नवीन" मध्ये दिसत असेल, तर मी त्याच्यावर क्लिक करून पुढच्याच क्षणी बाहेर येतो. मग तो धागा आणखी प्रतिसाद येईतो, "माझ्यासाठी नवीन" मध्ये दिसत नाही.
आणखीही काही जण असं करतात असं वाचलं.

यावरून एक सुचलं (हावरटपणा, बोट दिलं तर हात धरला, इ.इ. आहे खरं) प्रतिसाद निरपेक्ष नावीन्यासाठी काही सोय करता येईल का? म्हणजे धाग्यावर नवीन प्रतिसाद आले तरी तो माझ्यासाठी नवीन लेखनात दिसायला नको. मायबोलीवर नवीन मध्ये दिसेलच.

खरं पण मायबोलीच्या नवीन लेखनाचा ट्री हा प्रतिसादावर भर देणारा आहे.

हे उगाच लिहिलंय. असं काही करायला फार खटपट करावी लागणार असेल, तर राहूच द्या.

या नव्या सोयी आल्यापासून आपल्याला काय वाचायचंय, यापेक्षा आपल्याल काय दिसू नये, याचाच जास्त आटापिटा होतोय की काय असं वाटू लागलेय. आणि हे खरं तर बरं नाही.

यानिमित्ताने एक सुचवावेसे वाटते की आपल्या लेखनावर प्रतिसाद आला रे आला की धावत येऊन आभार मानले नाहीत, तर प्रतिसादक रागावणार नाहीत काही. Happy

कोणी असा विचार करून नाऊमेद होऊ नये की ऋन्मेषसारख्याला पन्नास फॉलोअर मिळतात पण मला पंधरावीसच आहेत. मुळात पाच लोकं जरी तुमचे लिखाण आवर्जून वाचायला तुम्हाला टॅग करत असतील तर ती फार मोठी गोष्ट आहे.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November
>>>>>

पन्नास नाही हो एक्कावन... मीच होतो तो 51. मला काऊंट न केल्याचा निषेध म्हणून मी तुम्हाला अनफॉलो करतोय..

या नव्या सोयी आल्यापासून आपल्याला काय वाचायचंय, यापेक्षा आपल्याल काय दिसू नये, याचाच जास्त आटापिटा होतोय की काय असं वाटू लागलेय. >> Lol

एक सुचवावेसे वाटते की आपल्या लेखनावर प्रतिसाद आला रे आला की धावत येऊन आभार मानले नाहीत, तर प्रतिसादक रागावणार नाहीत काही. >>>>>>
हे बाकी खरे,
प्रतिसाद: धन्यवाद प्रमाण 1:1 झाले की फसगत होते

आश्चर्य म्हणजे ज्यांनी अजून काहीही लेखन केलं नाहीये त्यांचे सुद्धा चाहते आहेत इथे. हे म्हणजे अगदी फेसबुक सारखं वाटत.
तू माझ्या पोस्ट ला लाईक केलंस कि मी पण तुझ्या पोस्ट ला लाईक करणार या धर्ती वर .
तू माझा चाहता झालास कि मग मी पण तुझा होणार Lol

आम्ही आपले बरे सगळ्यांचेच चाहते. इतके वर्ष मायबोली वाचतेय पण कधी कोणाचं लेखन शोधायला अडल नाही.
निवडक दहाची सोय आहे ना . त्यातच सगळं भागत Happy

(मी स्वतः काही ० लेखकर्ते आणि विपुल प्रतीसादकांना चाहते व्हा मध्ये अ‍ॅड केलेय असे कालच मला कळले Happy त्यामुळे हा माझ्यातर्फे 'तू मला लाईक मी तुला लाईक' वाला गटबाजीचा प्रकार नाही हे इथे माझ्यापुरते एक्स्प्लेन करणे गरजेचे वाटते.)

यात काही प्रकार आहेत.
१. जे चांगले लिहीतात आणि भरपूर सातत्याने लिहीतात
२. जे चांगले आणि कधीकधी लिहीतात
३. जे चांगले लिहीतात पण ते ज्या विषयावर लिहीतात त्यातलं आपल्याला एक अणूमात्रही कळत नाही Happy
४. जे प्रतीसाद चांगले लिहीतात पण लेख लिहीत नाहीत
५. जे काहीच लिहीत नाहीत

यात क्र.१ ला आवडते मध्ये टाकून टेक्निकल फायदा नाही कारण ते खूप फ्रिक्वेन्सीने लिहीत असल्याने त्यांचे लेख वर असतातच.
क्र. २ ला लिस्ट मध्ये टाकणे फायद्याचे कारण ते कधीकधी लिहून राजकारणीय टॉपिक मध्ये हरवून जाऊ शकतात
३ ला सेफली वगळलं तरी चालेल Happy कारण त्यांचे लेख पहिल्या पानावर दिसूनही कळत नाहीत म्हणून आपण वाचले नाही तर फायदा नाही.
४ ला मी 'आयडी लक्षात ठेवणे' म्हणून लिस्ट मध्ये टाकू इच्छेन (बंगाली वाक्य वाटतंय Happy )
५ हे भविष्यात लिहीते होण्याची गॅरंटी असेल तर त्यांना टाकायला हरकत नाही.सध्या टेक्निकली त्यांना टाकण्याचा फायदा व तोटा दोन्ही नाही.

बाकी माबो ने रिसेंटली केलेले पूर्ण नवे, माझ्या साठी नवे वगैरे पण पुरेसे उपयोगी आहे.हे चाहते वाले चेरी ऑन टॉप.वापरायचे तर वापरा असे.

आश्चर्य म्हणजे ज्यांनी अजून काहीही लेखन केलं नाहीये त्यांचे सुद्धा चाहते आहेत इथे.
>>>>

हे कसे समजले?
म्हणजे कोणाचे लिखाण आले तरच त्यात समजते ना किती चाहते आहेत?

@ ऋ , म्हणजे कोणाचे लिखाण आले तरच त्यात समजते ना किती चाहते आहेत? >> हो त्यांचे चाहते कोण आहेत ते समजत आणि ते कोणाचे चाहते आहेत ते पण समजत . ते ज्या कोणाचे चाहते असतात . त्यात काही जणांनी अजून लेखनच केलेलं नसत . ज्यांनी लेखनच केलेलं नाहीये ते दुसऱ्या कोणाचे तरी चाहते कसे ? त्यामुळेच इथे काही वेळा तू माझा चाहता झालास तर मी तुझा चाहता होणार असा प्रकार दिसतोय असं मी म्हटलंय . "काही वेळा" हे अधोरेखित . सरसकट नाहीच Happy

खरं तर ही सुधारणा आली तेव्हा एखाद्या व्यक्तीचे चाहते आणि त्या व्यक्तीने अ‍ॅड केलेले चाहते ही लिस्ट फक्त स्वतःला बघता यावी(इतरांना फक्त नंबर दिसावा) असे काही सुचवणार होते.पण ड्रुपल मध्ये हा बदल किती मोठा आहे, अडमिन ना आता आहे तसेच हवे आहे का याचा तपास लागल्या शिवाय ताजमहालाला विटा लावायला नको असे वाटून गप्प बसले.

जिथे लाईक्सचे फिचर आले तिथे थोडेफार कंपूबाजीचे प्रकार होतातच.आमच्या हपिसात एका इनोव्हेशन स्पर्धेचा निकाल त्या त्या एन्ट्रिज ना मिळालेल्या लाइक्स वर ठरणार होता, त्यामुळे एका टिम ने जागोजागी जाऊन लोकांना स्वतःच्या नजरेसमोर पोस्ट उघडून लाईक करायला लावले (अत्यंत जड टेक्निकल विषय वाल्या पोस्ट न वाचता न समजता लाईक). अश्या लोकाना 'खड्ड्यात गेलास जा नाही लाईक करत' असे न म्हणण्याचे सोशल कॉन्ट्रॅक्ट असते कारण हपिसात आयुष्यात कधीतरी आपल्याला त्याची टेक्निकल गरज पडणार असते. Happy

आणि तसही ज्यांचं लेखन मला आवडत त्यांचा एखादा आवडलेला लेख मी "निवडक दहात " टाकते. अशाने त्यामुळे त्यांच्या प्रोफाइल वर जाणं सुलभ होत आणि त्यांनी लिहिलेले रिसेन्ट ( नवीन ) लेख पण वाचता येतात. त्याकरता मला स्वतःला चाहते ची सोय असावी असं वाटत नाही. त्यातूनही ऍडमिन ने म्हटल्याप्रमाणे ज्यांना कोणाला आपले चाहते कोण कोण आहेत हे समजून आणखीन जास्त काही लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळत असेल तर त्याच पद्धतीने एखाद्याने लेखन केलाय पण त्याचा एकही चाहता नाहीये त्यांना वाईट पण वाटू शकत. कदाचित औदासिन्य पण येऊ शकेल "अरे मी एवढे लेख लिहिले आणि माझा एकही चाहता नाही "हि गोष्ट एखाद्याच्या मनाला पण लागू शकते . कोण कसा विचार करेल काय माहिती .

ती लोक मग मायबोलीवर लिहिणारच नाहीत आणि मायबोलीच नुकसानच होईल कारण नवीन लोकांना लिहावसचं वाटणार नाही .आणि वाचकांना नवीन लेखकांचे लेख वाचायला मिळणार नाहीत . हे आपलं माझं वैयक्तिक मत Happy

"अरे मी एवढे लेख लिहिले आणि माझा एकही चाहता नाही "हि गोष्ट एखाद्याच्या मनाला पण लागू शकते . कोण कसा विचार करेल काय माहिती .

हो याच्याशी सहमत.म्हणूनच लिस्ट प्रायव्हेट असावी असे काहीसे वाटले.
लाईक्स प्रचंड फसवा प्रकार आहे.थोडं पेज ३ सारखं पण होतं कधीकधी.तुम्हाला जास्त लाईक्स पाहिजेत तर सतत सगळ्या पार्ट्यांमध्ये दिसत रहा/फोटोत येत रहा.

सुजा, मला मगाशी म्हणायचे होते की एखाद्याने लेखनच न करता त्याचे अमुकतमुक चाहते आहेत हे तुम्हाला कुठे दिसले.
मला आधी वाटायचे की लेखन प्रकाशित केल्यावरच त्याखाली ते दिसते. आता लक्षात आले की एखाद्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊनही हे समजते Happy

"अरे मी एवढे लेख लिहिले आणि माझा एकही चाहता नाही "हि गोष्ट एखाद्याच्या मनाला पण लागू शकते . कोण कसा विचार करेल काय माहिती
>>>>>>
जे ईतरांशी तुलना करतात ते आयुष्यात तसेही कधी सुखी होत नाही. मग तुम्ही त्यांच्या सुखासमाधानासाठी लाख नियम बनवा.
तुम्ही एकही चाहता नाही अश्यांचे म्हणत आहात, पण एखादा तीस चाहते असलेलाही पन्नास चाहते असलेल्याकडे बघून उसासे सोडू शकतोच. शेवटी ज्याचा त्याचा स्वभाव आहे Happy
लवकरच मायबोलीला फॉलो करत हा चाहते प्रकार ईतर मराठी संकेतस्थळावर देखील बघायला मिळेल असे वाटते.

तुम्ही एकही चाहता नाही अश्यांचे म्हणत आहात, पण एखादा तीस चाहते असलेलाही पन्नास चाहते असलेल्याकडे बघून उसासे सोडू शकतोच. शेवटी ज्याचा त्याचा स्वभाव आहे >> म्हणूनच हि सोय नकोच Happy

Pages