मायबोलीवर आवडत्या लेखकाचे चाहते (Followers/Following) होण्याची सोय

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

मायबोलीवर आवडत्या लेखकाचे/लेखिकेचे चाहते (Followers/Following) होण्याची नवीन सुविधा सुरु झाली आहे.

चाहते कसे व्हायचे?
मायबोलीवर प्रत्येक पानावर खाली लेखकाचे नाव, प्रोफाईल चित्र आणि लेखकाने दिले असल्यास छोटा मजकूर असतो. त्या खाली "यांचे चाहते व्हा" असे बटन असेल ते वापरून कुठल्याही लेखकाचे चाहते होता येईल. चाह्ते झाल्यावर ते बटन त्या ठिकाणी दिसणार नाही. चुकून मोबाईलवर unfollow होऊ नये म्हणून हे केले आहे. Follow/Unfollow ही सुविधा एकाच Toggle होणार्‍या बटनाने प्रत्येक व्यक्तिच्या प्रोफाईलमधेही आहे. तिथूनही Follow/Unfollow करता येईल.

तुम्ही एखाद्या लेखकाचे चाहते झाल्यावर तिथेच त्या व्यक्तीचे किती चाहते आहेत त्याचा आकडा दिसू लागेल. ज्याना ० चाहते आहेत तिथे काहीच दिसणार नाही. म्हणजे यांचे ० चाहते आहेत असे नविन लेखकांच्या प्रोफाईलवर दिसणार नाही.

तुम्ही चाहते झाल्यावर तुमच्या प्रोफाईलमधे "आवडते" अशी टॅब आहे तिथे तुम्हाला आवडणार्‍या सगळ्या लेखकांची (तुम्ही ज्यांचे चाहते आहात त्यांची) यादी दिसेल. ती वापरूनही तुम्ही एखाद्या लेखकाला आवडत्या यादीतून काढू शकाल.

तुमच्या प्रोफाईलमधे "चाहते" अशी टॅब आहे तिथे तुम्हाला तुमचे एकूण चाहते आणि त्यांची यादी दिसेल.


मी कुणाचा चाहता /चाहती झाल्याचा मला काय फायदा?

१. तुमच्या आवडत्या लेखक्/लेखिकेला प्रोत्साहन हा सगळ्यात मोठा उघड फायदा आहे. इथे मायबोलीवर तुम्हाला विनामूल्य चांगलं वाचायला मिळतं, ते आवडतंय हे त्या लेखक / लेखिकेला आपण प्रतिसादातून सांगतोच, पण मी तुमचा/तुमची अगदी पंखा आहे हे कळाल्यावर त्याला/तिला नवीन लेखनाला अजून उत्साह येईल. या बरोबर आणखी फायदे आहेत.
२. सध्या तुम्ही ज्या ग्रूपचे सभासद आहात, त्यातलेच नवीन लेखन "अजून वाचायचंय" मधे दिसते. पण तुमच्या आवडत्या लेखकाने , तुम्ही ज्याचे सभासद नाही अशा ग्रूपमधे लेखन केले तर ते "अजून वाचायचंय" मधे दिसत नाही. पण या नवीन सुविधेमुळे तुमच्या आवडत्या लेखकाचे लेखन ७ दिवस (किंवा तुम्ही वाचेपर्यंत) "अजून वाचायचंय" मधे वर दिसत राहील. उदा. तुम्हाला राजकारणाच्या ग्रूपमधे सामील होण्याची इच्छा नाही पण तिथे "लोकमान्य " हि आयडी खूप छान लिहिते तर फक्त त्याच आयडीचे चाहते होऊन त्यांचे नवीन लेखन तुम्हाला कळू शकेल.
३. मायबोलीवरंच सगळंच वाचायला आपल्याला नेहमीच वेळ नसतो. आणि असला तरी सगळं सगळ्याना वाचायला आवडतं अस नाही. या सोयीमूळे "जो जे वांछिल तो ते लाहो" च्या थोडे जवळ आपण जातो आहोत.

मला आवडीच्या लेखकाचं नवीन ते वाचायचंय. जुनं मुद्दाम वर काढलेले नको.

"कालीदास" ही आयडी खूप छान कविता करते /करायची. तुम्ही त्यांचे चाहते झालात. पण बर्‍याच वर्षात त्यांनी मायबोलीवर काही लिहले नाही. अचानक काही नवीन मायबोलीकरांना त्यांच्या कविता सापडल्या आणि त्यांनी भराभर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. किंवा स्वतः कालीदासांनीच प्रतिभा आटल्यामुळे नुसत्या प्रतिक्रिया देऊन ते लेखन वर आणायचा प्रयत्न केला. तर ते लेखन वर येईल का?
नाही. लेखन केल्यावर फक्त ७ दिवसच ते "अजून वाचायचंय" मधे वर दिसेल. आणि तुम्ही त्या पानाला भेट दिली की त्याची लिंक "अजून वाचायचंय" टॅबवर दिसायची बंद होईल. मूळ ग्रूपमधे लेखकाचा मूळ धागा पूर्वीप्रमाणेच कायमचा दिसत राहिल.

या सोयीत आवडीच्या लेखकाचे नवीन लेखन असेल तरच दिसते. ज्या पानावर लेखकाच्या नुसत्या नवीन प्रतिक्रिया आहे ती पाने या सोयीत दिसत नाहीत. प्रतिक्रिया मायबोलीवरच्या इतर सोयीत पूर्वीसारख्याच दिसतील. त्यात बदल नाही.

"माझ्यासाठी नवीन" मधे कधी दोन तर कधी एक भाग दिसतो. थोडे स्प्ष्ट कराल का?

वरचा भाग
आवडत्या लेखकांचं कुठल्याही ग्रूपमधलं (तुम्ही ग्रूप सभासद असा वा नसा) , न वाचलेले, सार्वजनिक लेखन
खालचा भाग
तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलं (लेखक तुमचा आवडता असो वा नसो), न वाचलेले, सार्वजनिक+खाजगी लेखन
(यात बदल नाही. सध्याची सुविधा. तुम्ही अजून कुणाचे चाहते नसाल तर पूर्वीप्रमाणे फक्त हाच भाग दिसत राहील)

ही सुविधा वाचकाला "माझ्यासाठी नवीन" टॅब अधिक उपयोगाची व्हावी म्हणून आहे. "मायबोलीवर नवीन" या टॅबवर सगळे लेखन पूर्वीप्रमाणेच कालमानानुसार दिसत राहील. त्यात काही बदल नाही.

लेखकांसाठी आपले कुणीतरी नुसते वाचकच नाहीत तर चाहते आहेत ही एक सुखावह भावना असते. या सुविधेमुळे त्या चाहत्यांपर्यत पोहोचायची आणखी एक सुविधा आपण लेखकांना देतो आहोत. या सुविधेला येणारा प्रतिसाद पाहून भविष्यात चाहत्यांना नोटीफिकेशन मिळेल असे करायचा मानस आहे. त्यामुळे जे नियमीत मायबोलीवर येऊ शकत नाहीत अशा चाहत्यानाही आवडत्या लेखकाचे नवीन लेखन कळू शकेल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मायबोलीचे नवीन युजर फ्रेंडली रूप अंगवळणी पडलेय आणि जुने पार विसरून गेलोय. अश्यात ही आणखी एक छान सुविधा ... लगे रहो !!

आता स्वतःच स्वतःचा चाहता होता येते का हे जाऊन पहिला चेक करायला हवे Happy

वेमा, मस्त सुविधा .माबो खूपच युजर फ्रेंडली होतेय आणि ते आवडतंय ही.
ऋ , अरे आपण आपले स्वतःचे चाहते असतोच. पण तरी ही माबोवर स्वतः च स्वतः चा चाहता होता येत नसेल कारण तुझं लिखाण तुला लेखन मध्ये दिसतच ना.

वा!! छान सुविधा.
1) कमाल किती लेखकांना फॉलो करता येईल?
2) फॉलो केलेल्या लेखकांचे प्रकाशित झालेले केवळ लेख दिसतील की प्रकाशित झालेला प्रत्येक प्रतिसाद दिसेल? --- sorry , wr ullekh aahe, fakt lekh dusari, mazya wachanatun nisatale hote.

अरे व्वा!! हे भारी केलंत! धन्यवाद टिम एडमिन..

ऋन्मेष मायबोलीचा सर्वाधिक फॉलोअर्स असणारा स्टार लेखक ठरणार तर...

छान सोय! मी कालच याच अनुषंगाने विचार करत होते. म्हणजे मला उपग्रह वाहिनी - मराठी या ग्रुपमधले इतर धागे बघायचे नाहीत पण संथ चालती या मालिका हा वाहता धागा माझ्या फीडमध्ये दिसायला हवा आहे. तर तशी काही सोय करता येईल का? आता उपलब्ध करून दिलेली सोय याच्या थोडी जवळपास जाणारी आहे.
याच धर्तीवर अमुक व्यक्तीचे धागे दिसणार नाहीत अशी सोय होऊ शकते का? अर्थात हे कुठे दिसले नाही तरी चालेल.

ओह ग्रेट!
सहज माझी चाहत्यांच्या लिस्टवर नजर पडली. ईतक्यात 15 नावे त्यात जमा झाली. मायबोलीवरचे जे चांगले कथालेखक आहेत त्यांच्याबाबतीत हा आकडा आणखी फुगेल. पण ईथे विशेष सांगायचे म्हणजे काही नावे त्यात कमी परिचयाची आहेत. जे बहुधा माझ्या वा ईतर धाग्यांवरही फारसे प्रतिसाद देताना आढळत नाहीत. पण असे लोकं एकूणच मायबोलीवरचे धागे आणि प्रतिसाद वाचतात. वर एडमिन यांनी म्हटल्याप्रमाणे ही खरेच लेखकांसाठी हुरुप वाढवणारी गोष्ट आहे. मनापासून धन्यवाद Happy तसेच यामुळे आपल्या धाग्यांचा लेखांचा दर्जा चांगला राहावा अशीही माझ्यासारख्यांकडून काळजी घेतली जाईल.

'माझ्यासाठी नवीन' मध्ये 'रंगबिरंगी'करांचे धागे दिसत नाहीत, याविषयी उपाययोजना कधी करणार आहात?

ignore user अशी नवीन सुविधा देण्याबद्दल ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्या सगळ्या या ध्याग्यावर हलवल्या आहेत. त्याबद्दल चर्चा असेल तर तिथे करावी. या ध्याग्यावर नको.

Jar ekhaya id che chahate jhalo tar Fakt nava dhaga kadhun kelele lekhan disel ka pratikriya pan aadhi distil.

Jar konalach follow kela nahi tar kahich vachata yenar nahi ka?

Right now, I am able to see only bb headers but no comments are visible.

ज्यांचे आपण चाहते आहोत त्यांनी नवीन काही पोस्ट केले तर त्याचे नोटिफिकेशन मिळणे शक्य आहे का?
म्हणजे विपु मध्ये लिहिल्यावर मेल येते तसे.

>ज्यांचे आपण चाहते आहोत त्यांनी नवीन काही पोस्ट केले तर त्याचे नोटिफिकेशन मिळणे शक्य आहे का?
हो असा विचार आहे. आणि या सुविधेवर लवकरच काम सुरू होईल. नोटीफिकेशनची सुविधा देण्याआधी मुळात चाहते/आवडते सुविधा देणे आवश्यक होते. आता सभासद ती कशी वापरतात यावर कुठल्या सुविधेला कसे प्राधान्य देता येईल ते ठरवता येईल.

ज्यांचे आपण चाहते आहोत त्यांना दिसतेय का की हे हे आपले चाहते आहेत?

'चाहते' शब्द लिहितांना वेगळंच वाटतंय Happy टु मच मराठी फीलिंग Happy

ज्यांचे आपण चाहते आहोत त्यांना दिसतेय का की हे हे आपले चाहते आहेत?>>> दिसतात. Lol
चाहते' शब्द लिहितांना वेगळंच वाटतंय Happy टु मच मराठी फीलिंग Happy>>> Lol

ही सोय छान आहेच.
पण तो दुसरा unfollow वाला धागा बंद केलाय म्हणून इथेच विचारत आहे - पोस्टवर लेखकाचं नाव आधी दिसेल अशी सोय पुन्हा देणार आहात का? अनेकांना हा बदल हवा आहे.

मायबाप माबो सरकार जोपर्यंत ही सोय देत नाही तोपर्यंत आपण सगळेजण स्वतःच स्वतःच्या पोस्टवर

"नवीन Submitted by (तुमचे नाव)"

अशी सुरुवात करून पुढे पोस्ट लिहू या का ? Lol

म्हणजे त्यांचा नेमस्तकांचा त्रास पण वाचेल आणि पोस्ट वाचणाऱ्यांचा पण.

Pages