महाभारत सैन्य रचना
कौरव आणि पांडव यांच्या झालेल्या महायुद्धात कौरवांची अकरा अक्षौहिणी तर पांडवांची सात अक्षौहिणी अशी एकंदर आठरा अक्षौहिणी सेना होती. अक्षोहिणीची रचना खालील प्रमाणे असायची..
सगळ्यात छोटा भाग पट्टी म्हणून ओळखला जायचा. एका पट्टीत एक हत्ती, एक रथ, तीन घोडे आणि पाच पायदळाचे सैनिक असायचे. हत्तीचा माहूत आणि योद्धा, रथाचा सारथी आणि योद्धा , तीन घोडेस्वार योद्ध्ये आणि पाच पायदळाचे योध्ये असे एका पट्टीत १२ जण असायचे.
सेनामुख = ३ पट्टी
गुल्म = ३ सेनामुख
गण = ३ गुल्म
वाहिनी = ३ गण
पृथना = ३ वाहिनी
चमू = ३ पृथना
अनीकिनी = ३ चमू
अक्षौहिणी = १० अनीकिनी
अशा तऱ्हेने एका अक्षौहिणीत २१,८७० हत्ती, २१,८७० रथ, ६५,६१० घोडे, आणि १०९३५० पायदळाचे सैनिक असे एकूण सैनिक २,६२,४४० असतील.
थोडक्यात कौरवांकडे २८,८६,८४० सैन्य असेल.
तर पांडवांकडे १८,३७,०८० एवढे सैन्य असेल.
या तुलनेत सध्याची भारतीय सैन्याची रचना बघितली तर ती खालील प्रमाणे असते...
सगळ्यात छोटे युनिट Section आहे.
Section = १० ते १२ माणसं = १ पट्टी
प्लाटून = ४ Sections
कंपनी = ४ प्लॅटून्स
बटालियन = ४ कंपनी
ब्रिगेड = बटालियन (वेगवेगळ्या बटालियन पण अंदाजे ३००० सैनिक + सपोर्ट संख्या)
डिव्हिजन = ३ ते ४ ब्रिगेड
कॉर्पस = ३ ते ४ डिव्हिजन
अर्थातच हि रचना सोपी नाही कारण सध्याच्या सैन्यात असलेल्या बऱ्याच पैलूमुळे संख्या आणि रचना बऱ्याच गुंतागुंतीची होते.
सध्या भारतीय सैन्याची संख्या १२,२०,०१० खडे सैन्य आणि ९, ९०,९६० एवढे राखीव सैन्य आहे. याशिवाय वेगवेगळी चिलखती वाहने, वाहतूक वाहने आणि १३६ विमाने पायदळाकडे आहेत
महाभारत दृष्ट्या विचार करता हे सैन्य जवळ जवळ पांडवाच्या सैन्य एवढे आहे.
महाभारत सैन्य रचना
Submitted by अविनाश जोशी on 3 November, 2017 - 02:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे, तुम लोग जीओटी देखता नै
अरे, तुम लोग जीओटी देखता नै क्या? (१:३५ च्या पुढे) आपले लोक डोथ्राकिज पेक्षा खुप अॅडवांस होते...
बुद्धिबळाच्या अगोदर चतुरंग
बुद्धिबळाच्या अगोदर चतुरंग नावाचा खेळ होता. त्यात राजा, सेनापती, घोडा,रथ ,हत्ती आणि पडती असायचर.असायचे
त्याशिवाय चतुरजी हा ४ जणांनी खेळायचा होता. बहुधा हा फासे टाकून खेळाला जाई तास उल्लेख महाभारतात आहे.
३ जणांनी खेळाचा हि होता त्याचे भारतीय नाव माहित नाही
(No subject)
(No subject)
(No subject)
भैरप्पा यांच्या पर्व कादंबरीत
भैरप्पा यांच्या पर्व कादंबरीत वर उल्लेखलेल्या खूप मुद्द्यांचा उल्लेख आहे. दोन्ही बाजू कुठले पेच लढवून राजांना आपल्या बाजूने वळवतात आणि ते येणारे राजेही काय विचार करून सामील होतात ते छान उतरलेय. युद्धाच्या 18 दिवसात राजवाड्यात दिवा लावायला तेल व खायला अन्न शिल्लक राहत नाही मग सामान्यांचे काय..
पर्व वाचली नाही अजून. वाचतो
पर्व वाचली नाही अजून. वाचतो आता.
नक्की वाचा,
नक्की वाचा,
फक्त वाचून तेव्हाचे सगळे पुरुष ठरकी आणि खादाड होते असा समज करून घेऊ नका
मी बाहूबलीची डीव्हीडी
मी बाहूबलीची डीव्हीडी व्यवस्थित पॅकीग करून जमिनीत खोलवर पुरून ठेवतो म्हणजे 1000-2000 वर्षांनी कोणी उत्खनन केले की ते सापडेल मग बाहूबली खराच होता की नाही वगैरे चर्चासत्र होतील..अमरेद्र बाहूबली, देवसेना, शिवगामी हे नविन दैवत निर्माण होतील.
पण मी पहीलाच पार्ट पुरणार आहे.. त्यांचे पण डोक फिरू द्या ' आखिर कट्टप्पाने बाहूबली को क्यो मारा?"
फक्त वाचून तेव्हाचे सगळे
फक्त वाचून तेव्हाचे सगळे पुरुष ठरकी आणि खादाड होते असा समज करून घेऊ नका
>>>>
पर्व ही भैरपांनी लिहिलेली सर्वात भंपक कादंबरी आहे असे माझे प्रांजळ मत आहे
मी कुरुक्षेत्राचा काही भाग
मी कुरुक्षेत्राचा काही भाग म्हणजे भीष्मपतनाची जागा, गीतोपदेश जिथे केला गेला असे म्हणतात ती जागा, युधिष्ठीराने युद्धानंतर जिथे कौरवांसकट सर्व मृत राजांचे आणि सैनिकांचे श्राद्ध केले ती जागा पाहिली आहे. कुरुक्षेत्र हा एक विस्तीर्ण प्रदेश आहे. तिथे ४० लाख सैन्य (प्राण्यांसकट) मावणे मला तरी अशक्य वाटले नाही. कुरुक्षेत्रात अनेक सरोवरे आहेत.
मी https://www.maayboli.com/node/62520 या धाग्यावरती कुरुंचं (कौरव आणि पांडवांचं मिळून) राज्य साधारणपणे कुठल्या भागात विस्तारलेलं होतं, याची माहिती दिली होती. जिज्ञासूंनी अवश्य वाचावी. त्यापैकी कुरुक्षेत्राची माहिती इथे पुन्हा देत आहे.
कुरुक्षेत्र - कुरुक्षेत्र हा सपाट मैदानी प्रदेश होता. ह्यात स्थानेश्वर - आजचे थानेसर, कपिस्थल - आजचे कैथल आणि करनाल यांचा समावेश होता. कुरुक्षेत्रात सरस्वती, ओघवती, अपगा, हिरण्वती आणि दृषद्वती या नद्या वाहत असल्याने तिथे प्राचीन काळीही अनेक पुण्यतीर्थे होती. ह्या प्रदेशात मोठमोठी सरोवरे आहेत. मात्र तेव्हा कुरुक्षेत्रात निवासी वस्ती फारशी नव्हती.
कौरव पांडवांचे युद्ध झाले, त्याकाळी कुरुक्षेत्रात भरपूर पाण्याची उपलब्धता असल्याने तिथे जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असावा असे अनुमान बांधता येते. तसेच युद्धासाठी आलेले सैन्य हे फक्त कौरव पांडवांचे सैन्य नसून इतर अनेक राजांचे सैन्य त्यात समाविष्ट होते. ह्या सर्व राजांची राज्ये ही आजच्या पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिसा, मणिपूर, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र इत्यादी अनेक भारतीय राज्ये तसेच पाकिस्तानचा भाग, अफगाणिस्तानचा भाग, नेपाळ अशा विस्तीर्ण भागातून पसरलेली असल्याने युद्धासाठी ह्या सर्व राजांचे मिळून इतके प्रचंड सैन्य एकत्र येणे शक्य होते. (मध्यप्रदेशचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग यात दंडकारण्य असल्याने तिथून सैन्य येण्याची शक्यता नव्हती. तसेच विदर्भाचा राजा रुक्मी याची युद्धात भाग घेण्याची इच्छा असली, तरी दोन्ही पक्ष त्याच्या युद्धातल्या सहभागाबद्दल उदासीन राहिल्याने त्याने युद्धात भाग घेतला नाही. दक्षिणेत मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने तिथल्या राज्यांचा युद्धातला सहभाग कमी दिसतो.) यातले काही राजे इतर मुख्य राजांचे मांडलिक राजे असल्याने मुख्य राजांच्या सैन्यातच त्यांचा समावेश होता. त्यामुळे १८ अक्षौहिणी सैन्याची विभागणी दाखवतांना मोजक्याच राजांची नावे समोर येतात, प्रत्यक्षात हे सैन्य त्यांच्या राज्यासकट त्यांचे मांडलिक असलेल्या इतर राजांचेही होते.
त्याकाळात युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्मच मानला गेलेला असल्याने बरेचसे क्षत्रिय, तसेच सूत (मिश्रवर्ण), निषाद, म्लेच्छ, नाग, राक्षस इत्यादी लोक मोठ्या प्रमाणात या युद्धात सहभागी होते.
या युद्धासाठी आधी सैन्याची जमवाजमव सुरू झाली, मग दोन्ही पक्षांची बोलणी होऊन युद्धासाठी भरपूर पाण्याची उपलब्धता असलेली कुरुक्षेत्राची मोकळी, गवताळ, मैदानी जागा निश्चित झाली. युद्धाचा दिवसही निश्चित झाला. मग मधल्या काळत तिथे सर्व राजांची सैन्ये येऊ लागली. युद्धाच्या वर्णनानुसार प्रत्येक मुख्य राजाचे शिबिर हे एखादे खेडेगाव मावेल, एवढ्या आकाराचे तरी निश्चित असेल आणि कुरुक्षेत्राचा परिसर तेवढा मोठाही आहे. शिबिरात प्राण्यांच्या शेणामुताची स्वच्छता राखली जात असावी, पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर कोणतीही साफसफाई करणे शक्य नव्हते. तिथे खराब झालेली जागा सोडून बाजूच्या जागेवर युद्ध लढले जात होते.
प्रत्यक्ष युद्ध एकाच जागेवर झाले नाही. रोजच्या युद्धात मृत सैनिक आणि प्राण्यांची शरीरे जिथे कोसळलेली असतील, तिथून थोड्या अंतरावर पुढचे युद्ध लढले जात होते, अशाप्रकारे युद्धाची जागा रोज बदलत राहिली. अभिमन्यूला मारले गेले, तेव्हा अर्जुन त्या जागेपासून लांब असलेल्या दुसर्या जागेवर युद्ध करत असल्याने त्याला अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी लगेच कळली नाही. तो सूर्यास्ताला युद्ध थांबल्यावर शिबिरात परत आला, तेव्हा त्याला अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी कळली. कर्णवधाच्या वेळीही युद्धाची जागा बदललेली असल्याने अर्जुनाला चांगल्या जागेचा फायदा मिळाला, तर कर्णाच्या रथाचे चाक दलदलीत रुतले, ह्या दलदलीत चिखलाबरोबरच मृत आणि जखमी सैनिकांच्या रक्तामासाचे पाट वाहिलेले होते.
युद्धात मरण पावलेल्या अभिमन्यूसारख्या काही मुख्य योद्ध्यांना अग्नी दिला गेला, पण सर्वच मृत सैनिकांना उचलून त्यांना अग्नी देणे शक्य नव्हते. त्यामुळे मृत सैनिकांची आणि प्राण्यांची कलेवरे युद्धाच्या दिवसात तशीच जमिनीवर पडलेली होती. त्यांच्या सडक्या शरीरांची दुर्गंधी त्या भागात पसरलेली असल्याचा उल्लेख महाभारतात आहे, तसेच मृत सैनिकांची आणि प्राण्यांची शरीरे खाण्यासाठी कोल्हे, लांडगे इत्यादी हिंस्र प्राण्यांचा संचार युद्धभूमीवर होत असल्याचा उल्लेखही त्यात आहे. म्हणूनच भीष्मपतनानंतर भीष्म जिथे पडला होता, त्या जागेभोवती भीष्माचे संरक्षण करणारे सैनिक दुर्योधनाने नेमले होते. युद्धानंतर या सर्व सैनिकांचे मृतावशेष गोळा करून त्यांचे रीतसर अंत्यसंस्कार करून युधिष्ठीराने त्यांचे श्राद्ध केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे हाडे सापडणे शक्य झाले नसावे.
युद्धकाळात संजय इतर काही दूतांसह युद्धभूमीवर प्रत्यक्ष वावरत होता. भीष्मपतनानंतर तो धृतराष्ट्राला युद्धाचा वृत्तांत सांगायला पहिल्यांदा गेला. युद्धाच्या शेवटाच्या काळात जेव्हा दुर्योधन पळून गेला, तेव्हा तो कसाबसा जीव वाचवून धृतराष्ट्राला युद्धाचा वृत्तांत सांगायला आला, असा उल्लेख त्याच्या तोंडी आहे.
अचाट आहे हे सव॔.
अचाट आहे हे सव॔.
दीपगृह, छान माहिती
दीपगृह, छान माहिती
धन्यवाद !
धन्यवाद !
इथे अजून काही मुद्दे मांडायचे राहिले होते, ते आता लिहित आहे.
अक्षौहिणी व्यतिरिक्त इतरही प्रकारे उपलब्धतेनुसार सैन्यातील समूहांची रचना केली जात होती.
मी सहज आंतरजालावर उपलब्ध असलेल्या महाभारताची प्रत चाळली, तर तिथे उद्योगपर्वात दिलेल्या वर्णनानुसार, पांडवांचे सैन्य कुरुक्षेत्राकडे जात असतांना, पांडवांचे सैन्यबळ पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे. अर्थात हे त्यांच्या पूर्ण सैन्याचे वर्णन नसून फक्त सैन्याच्या थोड्या भागाचे वर्णन आहे.
"त्या सैन्यात चाळीस हजार रथ, त्याच्या पाचपट अश्व, दसपट पायदळ आणि साठ हजार गज होते."
सैन्याच्या अन्नपाण्याच्या, आरोग्याच्या व्यवस्थापनाची सोय कशी असू शकेल, त्याकाळचे नियोजन कसे असेल, याचा अंदाज पुढील ओळींवरून करता यावा.
"त्या सैन्याबरोबर शकट, विक्रेयद्रव्यांसह व्यापारी, त्यांचे तंबु व विविध वाहने होती. द्रव्याचा कोश, यंन्त्रायुधे, शस्त्रवैद्य व रुग्णचिकित्सकही होते. त्याचप्रमाणे कृश, दुर्बल व ज्यांचे बल अल्प आहे असेही लोक होते."
कुरुक्षेत्रात जाणार्या पांडवसैन्याचे आणि त्यांच्या शिबिराचे अजून वर्णन पुढच्या अध्यायात आले आहे.
"वैशंपायन - राजा (जनमेजयाला उद्देशून) नंतर युधिष्ठीराने जेथे विपुल धान्य, जल, तृण व इंधन आहे, अशा सम व स्निग्ध प्रदेशात आपल्या सैन्याचा मुक्काम करविला. त्या कुंतीपुत्र युधिष्ठीराने स्मशाने, देवालये, महर्षींचे आश्रम, तीर्थे व अन्य देवस्थाने यांना वर्ज करून मनोरम वनश्रीने युक्त शुभ व पवित्र प्रदेशात सैन्याचा निवास करविला. तेथे अश्वादी वहानांनी विश्रांती घेतल्यानंतर सहस्रावधी नृपतींनी परिवेष्टीत असलेला तो पांडव मोठ्या सुखाने पुढे निघाला.
पार्थासह केशवाने कौरवांच्या शेकडो सेनानायकांचा पराभव करून आसमंतातील प्रदेशाचे आक्रमण केले. पार्षत धृष्टद्युम्न, सात्यकी व युयुधान यांनी शिबिराच्या भूमीचे माप घेतले. नंतर केशवाने कुरुक्षेत्रातील पवित्र हिरण्वती नदीच्या तीरावरील सुंदर घाटासमीप येऊन रेती व चिखल यांनी रहित, निर्मल व अगाध जलाने युक्त अशा प्रदेशाच्या सभोवार सैन्याच्या संरक्षणार्थ खंदक खणविला आणि तेथे सैन्याचा तळ देवविला.
नंतर श्रीकृष्णाने महात्म्या पांडवांच्या शिबिरासारखीच इतर नृपालांचीही शिबिरे निर्माण करविली. त्या शिबिरांचे काष्ठादि साहित्य अतिशय दृढ असल्यामुळे, तेथे शत्रूचा प्रवेश होणे दुष्कर झाले होते. ती शिबिरे सहस्रावधी भक्ष्य भोज्य पदार्थ व विपुल अन्नपान यांनी युक्त होती. याप्रमाणे भूतलावर निर्माण केलेली ती राजांची मूल्यवान शिबिरें जणुकाय साक्षात विमानेच भासत होती. (माझी टीप -इथे विमानांचा अर्थ शिखरं असलेल्या वास्तु असा घ्यावा.) हे राजेंद्रा, तेथे शेकडो तज्ज्ञ शिल्पी वेतन देऊन ठेविले होते. सर्व उपकरणांसह शास्त्रविशारद व शल्यादि चिकित्सक असे अनेक वैद्य नियुक्त केले होते. असंख्य धनुष्ये, प्रत्यंचा, कवचे व शस्त्रे यांचा संग्रह केला होता. त्याचप्रमाणे मध, तूप व राळ यांच्या पर्वतप्राय राशी पडल्या होत्या. (माझी टीप - हे साहित्य बहुधा जखमा, भाजणे याच्यावर उपचाराकरता ठेवलेले असावे.) प्रत्येक शिबिरात राजा युधिष्ठीराने विपुल जल, तृण, काष्ठे व लोखंडी इंधनपात्रे (शेगड्या) यांचा पुरवठा करविला होता.
त्या सैन्यात महायंत्रे (तोफा), बाण, तोमर, कुर्हाडी, धनुष्ये, कवचे, खङ्ग व भाते इत्यादी आयुधांचा विपुल साठा होता. शत्रूच्या हत्तींना स्पर्शानेच वेध करणार्या पोलादाच्या काटेरी झुली हत्तींच्या अंगावर घातलेल्या होत्या. अशा पर्वतप्राय गजावर आरुढ झालेले सहस्रावधी योद्धे तेथे दिसत होते. पांडवांनी सैन्यासह तेथे तळ दिलेला ऐकून त्यांच्या विजयासाठी विविधदेशातून त्यांचे अनेक मित्र आले. ते सर्व पांडुपुत्रांचे सृह्द आपापले सैन्य व वहाने यासह तेथे एकत्र जमले."
तसेच पुढे युद्धाच्या तयारीसाठी आदेश देतांना दुर्योधन म्हणतो,
"हे नरश्रेष्ठांनो, कुरुक्षेत्रात विस्तृत व शत्रूंना दुरासद अशी शिबिरे निर्माण करा. तेथे आहारादी सामग्री आणण्या-नेण्याच्या मार्गात शत्रूकडून उपसर्ग पोचणार नाही, जेथे जल समीप आहे व जेथे भिन्न भिन्न प्रतीच्या लोकांस राहण्यास योग्य असे विभाग केले आहेत, अशी शिबिरे स्थापन करा. विविध आयुधे, पताका, ध्वज यांनी ती शिबिरे युक्त करा. शिबिरांचे नगराच्या बाहेरील मार्ग सम करावा."
या उल्लेखांव्यतिरिक्त इतरत्र असलेल्या उल्लेखांनुसार कौरवसैन्याच्या शिबिरांनी पाच योजनांचा प्रदेश व्यापला होता, तसेच सैन्यातल्या व्यक्तींच्या श्रेणी आणि योग्यतेप्रमाणे त्यांच्या अन्न पानाची वेगवेगळी व्यवस्था केल्याचा उल्लेख आहे. तसेच पांडवांच्या सैन्यात सैन्यामागून येणारे व्यापारी, शकट (गाडे), वेश्या, युद्धोपयोगी वाहने, धान्यकोष आणि द्रव्यकोष वाहून नेणारे हत्ती इत्यादींचाही उल्लेख आहे.
युद्धाच्या शेवटच्या दिवशी दुर्योधन तळ्यात लपला आहे, याची माहिती भीमाला पशुपक्ष्यांचे मांस आणून देणार्या शिकार्यांनी पांडवांना दिली असाही उल्लेख आहे.
वर आलेल्या उल्लेखांनुसार अतिशयोक्तिचा काही भाग वगळला, तरी दोन्ही पक्षांनी शस्त्रांसहीत अन्नधान्य, लाकूडफाटा इत्यादीचा मोठ्या प्रमाणावर संग्रह केला होता, तसेच सैन्याला लागणार्या उपयोगी वस्तू पुरवणारे व्यापारीही तिथे होते.
भैरप्पांच्या पर्व कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे युद्धाच्या शेवटच्या दिवसात खायला अन्नाचा दाणाही उरला नाही, अशी दारूण परिस्थिती महाभारतात तरी निश्चितच ओढवलेली दिसत नाही. उलट अनेक गोष्टींचं उत्कृष्ट नियोजन केलेलं असावं अशी वर्णनं वाचायला मिळतात. इतकं उत्कृष्ट नियोजन असूनही युद्धात लढतांना जखमी झालेल्या सैनिकांना पाणी देणारेही कोणी नव्हते, याचं कारण पाणी पुरवणारे नव्हते असे नव्हे, तर युद्धाची भीषणता पाहून युद्धभूमीवर वावरण्याची त्यांची हिंमत झाली नाही, हे असावे. युद्धात लढणारे सैनिक समोरच्याला तो कोणत्या पक्षात आहे, हे विचारून मग लढत होते. त्यांच्यासाठी विशिष्ट वेष असल्याचा महाभारतात तरी उल्लेख नाही. मात्र युद्धाचे भीषण स्वरूप पाहून पहिल्याच दिवशी काही सैनिक भीतीने पळून गेल्याचा उल्लेख आहे. पळून गेलेले सैनिक आणि मारले गेलेले सैनिक आणि प्राणी यांच्यामुळे युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच स्वयंपाकाचे प्रमाण कमी कमी होत गेले.
सैनिकांच्या प्रातर्विधीसाठी काय व्यवस्था केली होती, याचा महाभारतात थेट उल्लेख नसला, तरी तिथे मातीत चर खणून, त्यावर लाकडाच्या फळ्या टाकून तशी व्यवस्था त्यांना करणे शक्य होते. सरोवरांमुळे स्नानासाठीही पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध होते. युद्धाच्या शेवटच्या दिवशी युधिष्ठीराने सुगंधी द्रव्यांनी युक्त अशा शंभर कलशांमधून ओतलेल्या गरम पाण्याने स्नान केल्याचाही महाभारतात (विदर्भ मराठवाडा प्रकाशनाच्या आवृत्तीत) उल्लेख आहे.
युद्धात मृत पावलेल्यांचे अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मुख्य योद्ध्यांच्या पत्नी आणि इतर नातेवाईक यांनी युद्धभूमीवर येऊन शोक केल्याचाही उल्लेख आहे. मृतांचे दहन करतांना प्रथम राजे आणि मुख्य योद्धे यांच्यासाठी चंदनाच्या लाकडांच्या मोठ्या चिता (बहुधा सामूहिक चिता) रचण्यात आल्या, त्यातच त्यांचे मोडकेतोडके रथ आणि इतर आयुधं गोळा करून, तीही चितेतच सारली गेली आणि मग मृतावशेषांचे शास्त्रोक्त विधीने दहन करण्यात आले. राजांचे इतर अधिकारी आणि सैनिक यांचेही त्यांच्या सैन्यातल्या श्रेणीप्रमाणे विधीपूर्वक दहन करण्यात आले. ज्यांचे कोणीच नातेवाईक युद्धभूमीवर आले नव्हते किंवा ज्यांची ओळख पटणे शक्य नव्हते म्हणून अनाथ असे संबोधले गेलेल्यांचे मृतदेह एकत्र करून त्यांच्या हजारो राशी केल्या गेल्या आणि त्या राशींभोवती पुष्कळ लाकडे रचून आणि भरपूर तेल ओतून त्यांचंही दहन केलं गेलं, असा उल्लेख आहे.
त्यामुळे कुरुक्षेत्रावर रथ आणि शस्त्रं यांचे अवशेष सापडणं शक्य होईल असे वाटत नाही. तसंच सहज सापडणारे मृतांच्या शरीरावरचे सोन्याचे दागिने, रथ आणि शस्त्रांमध्ये वापरले गेलेले मौल्यवान धातू हेही एकतर युधिष्ठीराच्या सेवकांनी गोळा केले असावे किंवा गरीब, निर्धन लोकांनी तिथल्या त्यांना सापडतील त्या वस्तू नंतर गोळा करून नेल्या असाव्यात अशीही शक्यता आहे.
पण मी पहीलाच पार्ट पुरणार आहे
पण मी पहीलाच पार्ट पुरणार आहे.. त्यांचे पण डोक फिरू द्या ' आखिर कट्टप्पाने बाहूबली को क्यो मारा?" >>>>>

वरच्या कित्येक प्रतिसादावर हसु आवरत होते.पण ह्या प्रतिसादाला
दीपगृह>> तुमचे दोन्ही प्रतिसाद छान
दीपगृह , काय सुंदर माहिती
दीपगृह , काय सुंदर माहिती दिली आहे तुम्ही.
आणखी वाचायला आवडेल.
कदाचित हत्तीच्या सोंडेत
कदाचित हत्तीच्या सोंडेत दारूगोळे भरूनही उडवत असावेत. महाभारताच्या वेळी तंत्रज्ञान काय किती विकसित झालेले हे एक कोडेच आहे बाई.
बाकी तेव्हा उंटांना लढवायची पद्धत नव्हती का? बुद्धीबळाचा शोध महाभारताच्या आधीचा की नंतरचा? की तेव्हाचे लोकं नुसते कवड्यांचा जुगारच खेळायचे?
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 नवम्बर, 2017 - 03:47
>>>>>> बाई!!!
जनावरांच्या शेणाच्या दलदलीतच कर्णाच्या रथाचे चाक रुतले असेल का?
अश्विनी, मला बरेचदा बाई
अश्विनी, मला बरेचदा बाई बोलायची सवय आहे. मी कर्क राशीचा आहे ना.
असो,
जनावरांच्या शेणाच्या दलदलीतच कर्णाच्या रथाचे चाक रुतले असेल का?
>>>>>>>
वर आणखी कोणीतरी आपल्या प्रश्नातली शंका व्यक्त केली आहे. जनावरांच्या शेणातच कर्णाचे चाक रुतले. ते देखील हत्तीच्या शेणात. जर मी चुकत नसेल तर कर्णाने एकदा मृगया करताना चुकून एका शौचास बसलेल्या हत्तीला मारले होते. कारण दुरून त्या अवस्थेत बसलेला हत्ती त्याला काळवीट वाटला होता. तेव्हा त्या हत्तीने त्याला मरण्यापूर्वी की धुण्यापूर्वी शाप दिला होता. जे तू मला करू दिले नाहीस तेच तुझ्या मृत्युचे कारण ठरणार आहे. .. आणि तसेच झाले !
म्हणून आमच्याकडे म्हणतात की एकवेळ एखाद्याला जेवताना ताटावरून उठवा पण.....
ए गप रे ! ऋ .
ए गप रे ! ऋ .
दीपगृह , मजा आली वाचताना
.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
-------> तसा काही विशिष्ट उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाही. त्या दलदलीत रक्तामांसाच्या पाटाबरोबर जनावरांचे मलमूत्र मिसळलेले असू शकेल किंवा नसेलही. पण तिथे हत्तीने टाकलेला शेणाचा मोठा पो निश्चित नसेल, कारण तसा पो रथाच्या जवळपास असता, तर एकतर रथाच्या चाकाचे रक्षण करणार्या योद्ध्यांना त्या पोमुळे रथाच्या चाकाचे रक्षण करणे अवघड गेले असते, शिवाय सूतांमध्येच वाढल्याने सूतकर्मात प्रवीण असलेल्या कर्णाने तो पो पाहिल्यावर शल्याचे चांगलेच वाभाडे काढले असते, हे निश्चित!
(त्याकाळी युद्धात लढणार्या मुख्य रथींच्या रथाच्या दोन्हीबाजूंच्या चाकांचे रक्षण करणारे आणि रथाच्या पृष्ठभागाचे रक्षण करणारे योद्धे रथाच्या आजूबाजूला असायचे, त्याशिवाय त्या रथीला आणि सहाय्यक योद्ध्यांना शस्त्रांचा पुरवठा करणारे शस्त्रांनी भरलेले रथ मुख्य रथाच्या पाठीमागे असायचे. पण कर्ण अर्जुन युद्धात त्या दोघांचा शरवर्षाव इतका टीपेला पोहोचला, की त्यानंतर एका टप्प्यावर कर्ण आणि अर्जुनाच्या बरोबर असणारे सर्व सहाय्यक योद्धे आणि आजूबाजूचे इतर सैनिक कर्ण अर्जुनाच्या रथांच्या मागे जाऊन लांब उभे राहिले आणि तो संग्राम लांबूनच पाहत राहिले. )
-------> तेव्हा वाहनांना उंटही जोडले जात असल्याचा उल्लेख आहे, पण उंट सरसकट सर्व ठिकाणी वापरले जात नव्हते.
ज्यांना या संदर्भात अजून काही वाचायचं आहे, त्यांच्यासाठी मी आंतरजालावरच्या महाभारताच्या प्रतीचा दुवा इथे दिला आहे. तशी आदिपर्वापासून महाभारताची सुरूवात होते, पण इथे कोणताही भाग उघडून वाचायला सुरूवात केली, तरी बरीच माहिती मिळेल. प्रत्येक पर्वाच्या सुरूवातीला अनुक्रमणिकाही दिलेली आहे. त्यामुळे हवा तो भाग शोधून वाचणं सोपं जातं. फक्त या महाभारताच्या प्रतीत बराच प्रक्षिप्त (मागून भरणा केलेला) मजकूर असल्याने आणि काही ठिकाणी मूळचा मजकूर गाळलेला असल्याने, ही प्रत संदर्भासाठी फारशी उपयोगी नाही. त्यामानाने मी पूर्वी वाचलेली विदर्भ मराठवाडा प्रकाशनाची प्रत खूप उपयुक्त आहे.
आंतरजालावर महाभारताची संशोधित आवृत्ती उपलब्ध असल्याबद्दल कोणाला माहिती असेल तर इथे जरूर माहिती द्यावी. मलाही ती प्रत संदर्भासाठी वाचायला आवडेल.
<<मी बाहूबलीची डीव्हीडी
<<मी बाहूबलीची डीव्हीडी व्यवस्थित पॅकीग करून जमिनीत खोलवर पुरून ठेवतो म्हणजे 1000-2000 वर्षांनी कोणी उत्खनन केले>>
------- सोबत सन्गणक, १००० वर्षान्ची गॅरेन्टी असलेली चार्ज केलेली बॅटरी पण ठेवा.
ते अतिरथी, महारथी वगैरे
ते अतिरथी, महारथी वगैरे हायरार्कि पण समजवा ना
https://youtu.be/w4OgjwyHFXo
https://youtu.be/w4OgjwyHFXo
Pages