महाभारत सैन्य रचना

Submitted by अविनाश जोशी on 3 November, 2017 - 02:17

महाभारत सैन्य रचना
कौरव आणि पांडव यांच्या झालेल्या महायुद्धात कौरवांची अकरा अक्षौहिणी तर पांडवांची सात अक्षौहिणी अशी एकंदर आठरा अक्षौहिणी सेना होती. अक्षोहिणीची रचना खालील प्रमाणे असायची..
सगळ्यात छोटा भाग पट्टी म्हणून ओळखला जायचा. एका पट्टीत एक हत्ती, एक रथ, तीन घोडे आणि पाच पायदळाचे सैनिक असायचे. हत्तीचा माहूत आणि योद्धा, रथाचा सारथी आणि योद्धा , तीन घोडेस्वार योद्ध्ये आणि पाच पायदळाचे योध्ये असे एका पट्टीत १२ जण असायचे.
सेनामुख = ३ पट्टी
गुल्म = ३ सेनामुख
गण = ३ गुल्म
वाहिनी = ३ गण
पृथना = ३ वाहिनी
चमू = ३ पृथना
अनीकिनी = ३ चमू
अक्षौहिणी = १० अनीकिनी
अशा तऱ्हेने एका अक्षौहिणीत २१,८७० हत्ती, २१,८७० रथ, ६५,६१० घोडे, आणि १०९३५० पायदळाचे सैनिक असे एकूण सैनिक २,६२,४४० असतील.
थोडक्यात कौरवांकडे २८,८६,८४० सैन्य असेल.
तर पांडवांकडे १८,३७,०८० एवढे सैन्य असेल.
या तुलनेत सध्याची भारतीय सैन्याची रचना बघितली तर ती खालील प्रमाणे असते...
सगळ्यात छोटे युनिट Section आहे.
Section = १० ते १२ माणसं = १ पट्टी
प्लाटून = ४ Sections
कंपनी = ४ प्लॅटून्स
बटालियन = ४ कंपनी
ब्रिगेड = बटालियन (वेगवेगळ्या बटालियन पण अंदाजे ३००० सैनिक + सपोर्ट संख्या)
डिव्हिजन = ३ ते ४ ब्रिगेड
कॉर्पस = ३ ते ४ डिव्हिजन
अर्थातच हि रचना सोपी नाही कारण सध्याच्या सैन्यात असलेल्या बऱ्याच पैलूमुळे संख्या आणि रचना बऱ्याच गुंतागुंतीची होते.
सध्या भारतीय सैन्याची संख्या १२,२०,०१० खडे सैन्य आणि ९, ९०,९६० एवढे राखीव सैन्य आहे. याशिवाय वेगवेगळी चिलखती वाहने, वाहतूक वाहने आणि १३६ विमाने पायदळाकडे आहेत
महाभारत दृष्ट्या विचार करता हे सैन्य जवळ जवळ पांडवाच्या सैन्य एवढे आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छ्या, अर्जुनाने नुसता बाण सोडुन सूर्य झाकोळला यावर यांचा विश्वास आहे पण हत्ती-घोड्यांची लीद कशी साफ झाली असेल यावर नाहि... Proud

>>हे कधी झाले म्हणे?<<

बिंगो!

हे झालंच नाहि, (कृष्णाने सूर्यावर सुदर्शन चक्र फेक्लं याचे पुरावे नाहित,) पण स्पष्टिकरण मात्र मात्र हत्ती-घोड्यांच्या लीद सफाइचं हवं; बरोबर? Happy

कृष्णाने सुदर्शन फेकलं?
कृष्णाने मायेचा वापर करुन सूर्य झाकोळला?
कि सूर्यग्रहण होतं?

या तीनपैकी काहीतरी महाभारत या मूळ ग्रंथांच्या स्लोकात आहे. पण अर्जूनाने सुर्य झाकोळायला काही केले (बाण मारला वगैरे) हे अजिबात नाही.

राज भाऊ,
सगळ्या गोष्टीचे स्पष्टीकरण मागत बसलो तर दिवस अपुरा पडेल,
त्यामुळे फक्त धागा रिलेटेड गोष्टींचे स्पष्टीकरण करतोय,
याचेच स्पष्टीकरण का त्याचे का नाही चा खेळ खेळायला हा पोलिटिकल धागा नव्हे,

राज, महाभारत या महाकाव्यात अमूक इतके हत्ती अन अमूक इतके घोडे होते वगैरे लिहिले तर कशाला कोण वाद घालेल. महाभारत काव्यातले हत्ती मंतरलेले होते ज्याने ते मलमूत्रविसर्जन करत नसत असे लिहिले तरी हरकत नाही.

महाभारतात वर्णल्याप्रमाणे असे युद्ध कुरुक्षेत्री झाले होते व तिथे इतके सैन्य लढले असे म्हटले की हे वाद सुरू होतात कारण 'फेकने का भी कुछ लिमिट होता है'. आता जर जोशी साहेब म्हणाले की हे कवीकल्पनेतल्या युद्धाचे वर्णन आहे व त्याच्या प्रत्यक्ष जे टोळीयुध्द झाले त्याच्या संबंध नाही तर काय वादाचा मुद्दाच नाही

काहीतरी गणित चुकतेय का?
लोकसंख्या एक कोटी आणि निव्वळ युद्दातले हत्तीच तीन लाख.
जर यांना मद्य पाजले तर काही लाख माणसांचे सैन्य ते असेच भिरकावून देतील.
बरं वर शेणामूताचे हिशोब मांडले आहेत त्यानुसार त्यांनी त्या माणसांना आपल्याच शेणात भिरकावले तरी एकेकाची तिथेच स्मारके उभारली जातील.
काहीतरी चुकतेय, हत्ती एवढे असणे शक्यच नाही. असतेच तर आमच्या राणीबागेत मोजून चार हत्ती कोट्य़वधी मुंबईकरांनी बघायला साखळदंडाला बांधून ठेवले नसते.

वर कोणीतरी लिहिलेय की क्षत्रिय फावल्या वेळात शेती करायचे. ते खरे मानले तर हत्तीच्या मलमूत्रापासून खत बनवायची पद्धत त्यांना ठाऊक असेल. खत बनलेच आहे तर लगे हात शेतीही करत असतील. एवढे योद्धे असताना पाऊसपाण्याचा प्रश्नच नाही. मारला बाण ढगात आणि काढला पाऊस. आणि शेत नांगरायला बैलापेक्षा घोडा कधीही चांगलाच. तुगडुक तुगडुक किती वेगात नांगरून देत असतील विचार करा. मग त्या झटपट शेतीतून पिकणारे अन्नधान्यच सैन्याचे पोट भरायला वापरले जात असेल.

कदाचित तीन लाख हत्तीच्या शेणाचे परिणाम आजही पंजाब-हरियाणात शेती सुपिक असण्याचे कारण असेल.

>>
शेत नांगरायला बैलापेक्षा घोडा कधीही चांगलाच. तुगडुक तुगडुक किती वेगात नांगरून देत असतील विचार करा.
>>
याच लॉजिकने ट्रॅ़क्टरच्या ऐवजी बीएमडब्ल्यु लावली तर फास्ट होईल नाही नांगरट

बीएमडब्ल्यू परवडायला हवी ना. त्यापेक्षा रथ बरा. ना पेट्रोलचा खर्च ना डिझेलचा. घोड्याला हिरवे गाजर दाखवून त्याचा गाढव करायचा.

वर सगळेजण पुराणातल्या वांग्यांच्या भरीताला 'लॉजिक'च्या शेणामूताचा मसाला लावतायेत हे पाहून जाम हसू आले. Wink

या कुरुक्षेत्राजवळ कुठली नदी आहे का? गेला बाजार छोटामोठा समुद्र? पाण्याचा प्रश्न गहन आहे. एवढ्या मलमूत्राचे पडल्या पडल्या काय व्हायचे ते होईल. पण धुवायला प्रत्येकाला एक बादली पाणी रोजच्या रोज हवेच ना..

एक प्रश्न आणखी पडलाय. देशभरातून तीन लाख हत्ती कुरुक्षेत्र परीसरात जमायला किती दिवस लागले असतील? तेवढे दिवस जे आधी पोहोचले त्यांनी युद्ध सुरू केले की सर्व पोहोचले ना याची खात्री करूनच मग शंख फुंकला?

सैनिकांनी फावल्या वेळात खेळयला बुद्धीबळाचे सेट नेले असतील व संजय ने त्यातलेही हत्ती मोजले असतील.

सैनिकांनी फावल्या वेळात खेळयला बुद्धीबळाचे सेट नेले असतील व संजय ने त्यातलेही हत्ती मोजले असतील.>> हे लॉजिक पटतंय...त्यांच्याकडे द्यूत होते म्हणजे बुद्धीबळही असणारच!

भारतीय इतिहासात चंद्रगुप्ताने सर्वप्रथम संपूर्ण भारतखंडावर एकछत्री राज्य केले. त्याच्याकडे ६ लाख पायदळ, ३० हजार घोडेस्वार आणि ९ हजार हत्ती होते. मौर्य साम्राज्याची एकूण लोकसंख्या साधारण साठेक लाख होती. अडिच हजार वर्षांआधी हे साम्राज्य अफगाणिस्तान ते ब्रह्मदेशापर्यंत पसरले होते. इतिहासातला हा हायेस्ट रेकॉर्डेड एविडन्स आहे.

आणखीन एक बेसिक शंका: शुन्याचा शोध जर आर्यभटाने चौथ्या शतकात लावला तर हे ईतके मोठे आकडे मोजले कसे?

बाकी लोकसंख्या, हत्तींची संख्या, घोड्यांची संख्या, लॉजिस्टीक्स, सप्लाय चेन वगैरे शंका आहेतच.

फेफ - तो शोध म्हणजे शून्य या संख्येचा नव्हे. शून्य या कल्पनेचा. घन आणि ऋण संख्यांच्या मधे असलेली काहीच व्हॅल्यू नसलेली संख्या असा. बाकी वापर आधीपासूनच असावा.

शुन्याचा शोध जर आर्यभटाने चौथ्या शतकात लावला तर हे ईतके मोठे आकडे मोजले कसे?
>>
मोठे आकडे मोजायला शुन्य या 'संख्येची' वा चिन्हाची गरज नाही. उदा रोमन संख्यालिपी. पण अश्या संख्यालिपीत किती मोठी संख्या लिहिता येईल यावर मर्यादा असते.

धृतराष्ट्राने एकावर दोन शून्याचा शोध लावला आणि तुम्हाला आर्यभट्टाच्या एका शून्याचे कौतुक पडलेय Happy

फा, टवणे सर, ऋन्मेष - चला त्या निमित्ताने, 'शून्य पे चर्चा' घडली. Wink ह्यालाच शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणत असावेत. Happy

आमच्या गणिताचे मास्तर नेहमी म्हणायचे, गाढवांनो तुम्हाला महाभारतात भारतावर किती शून्य येतात हे तरी ठाऊक आहे का?
आज त्याचा अर्थ कळला !

का पट्टीत एक हत्ती, एक रथ, तीन घोडे आणि पाच पायदळाचे सैनिक असायचे.
>>
हे तीन घोडे जर घोडेस्वारांसाठी असतील तर रथ कोण ओढायचे? बैल?

आणि हत्तीवर तर राजा वगैरे बसतात. ते बहुतकरून शोभेसाठी - अगदे युद्धात देखील. इतके हजारो लाखो हत्ती घेऊन युद्धात योद्धा काय करणार. तलवार/गदा बिनमाकामाची हत्तीवर बसले की. फार फार तर स्वत:च्या माहुतालाच मारता येईल. धनुष्य घेऊनच लढायचे तर घोड्यावर अधिक कार्यक्षमतेने लढता येते कारण घोडा तुम्हाला मोबिलिटी देतो. काय बझूका होत्या काय हत्तीवर बसणार्‍यांकडे?

हत्ती सरळ रेषेत चालतो आणि वाटेत येणार्‍या जाणार्‍यांना चिरडायचे काम करतो. त्यावर कोण्या योद्धाने बसायची गरज नाही. कोणीतरी हत्ती ऑपरेट करणारा माहूत बसवला की झाले.
कदाचित हत्तीच्या सोंडेत दारूगोळे भरूनही उडवत असावेत. महाभारताच्या वेळी तंत्रज्ञान काय किती विकसित झालेले हे एक कोडेच आहे बाई.

बाकी तेव्हा उंटांना लढवायची पद्धत नव्हती का? बुद्धीबळाचा शोध महाभारताच्या आधीचा की नंतरचा? की तेव्हाचे लोकं नुसते कवड्यांचा जुगारच खेळायचे?

सर, हत्तींचा युद्धात उपयोग व्हायचा, परिणामकारक व्हायचा.
तेव्हा सगळी युद्धे मैदानी असत, मोबिलिटी विथ टेक्टिकल हाईट विथ स्टेबिलिटी साठी हत्ती बेस्ट. भारी पडणारे हीरो सैनिक टिपून भाल्याने व धनुष्य बाण वापरून उडवणे सोपे असे.

प्रत्येक घटकाचे आपले असे स्वतंत्र फायदे तोटे होते. अगदी युजलेस गोष्ट वापरून सिकंदर ला हरवणे भारतीयांना कसे शक्य झाले असते?

जर मी चुकत नसेल तर सुर्यास्तानंतर युद्ध करायचे नाही आणि हत्तीच्या कंबरेखाली वार करायचा नाही असाही तेव्हा नियम होता बहुतेक.

Pages