महाभारत सैन्य रचना

Submitted by अविनाश जोशी on 3 November, 2017 - 02:17

महाभारत सैन्य रचना
कौरव आणि पांडव यांच्या झालेल्या महायुद्धात कौरवांची अकरा अक्षौहिणी तर पांडवांची सात अक्षौहिणी अशी एकंदर आठरा अक्षौहिणी सेना होती. अक्षोहिणीची रचना खालील प्रमाणे असायची..
सगळ्यात छोटा भाग पट्टी म्हणून ओळखला जायचा. एका पट्टीत एक हत्ती, एक रथ, तीन घोडे आणि पाच पायदळाचे सैनिक असायचे. हत्तीचा माहूत आणि योद्धा, रथाचा सारथी आणि योद्धा , तीन घोडेस्वार योद्ध्ये आणि पाच पायदळाचे योध्ये असे एका पट्टीत १२ जण असायचे.
सेनामुख = ३ पट्टी
गुल्म = ३ सेनामुख
गण = ३ गुल्म
वाहिनी = ३ गण
पृथना = ३ वाहिनी
चमू = ३ पृथना
अनीकिनी = ३ चमू
अक्षौहिणी = १० अनीकिनी
अशा तऱ्हेने एका अक्षौहिणीत २१,८७० हत्ती, २१,८७० रथ, ६५,६१० घोडे, आणि १०९३५० पायदळाचे सैनिक असे एकूण सैनिक २,६२,४४० असतील.
थोडक्यात कौरवांकडे २८,८६,८४० सैन्य असेल.
तर पांडवांकडे १८,३७,०८० एवढे सैन्य असेल.
या तुलनेत सध्याची भारतीय सैन्याची रचना बघितली तर ती खालील प्रमाणे असते...
सगळ्यात छोटे युनिट Section आहे.
Section = १० ते १२ माणसं = १ पट्टी
प्लाटून = ४ Sections
कंपनी = ४ प्लॅटून्स
बटालियन = ४ कंपनी
ब्रिगेड = बटालियन (वेगवेगळ्या बटालियन पण अंदाजे ३००० सैनिक + सपोर्ट संख्या)
डिव्हिजन = ३ ते ४ ब्रिगेड
कॉर्पस = ३ ते ४ डिव्हिजन
अर्थातच हि रचना सोपी नाही कारण सध्याच्या सैन्यात असलेल्या बऱ्याच पैलूमुळे संख्या आणि रचना बऱ्याच गुंतागुंतीची होते.
सध्या भारतीय सैन्याची संख्या १२,२०,०१० खडे सैन्य आणि ९, ९०,९६० एवढे राखीव सैन्य आहे. याशिवाय वेगवेगळी चिलखती वाहने, वाहतूक वाहने आणि १३६ विमाने पायदळाकडे आहेत
महाभारत दृष्ट्या विचार करता हे सैन्य जवळ जवळ पांडवाच्या सैन्य एवढे आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही पक्षांचे मिळून अंदाजे 40 लाख able body सैन्य,
त्यांची सप्लाय चेन (अन्न, पाण्याची सोय, मेंटेनन्स, संदेशवहन नोकर चाकर) चालवणारे लोक अंदाजे 2 लाख
मागे राहिलेली मुले आणि वृद्ध मंडळी 5 लाख धरू
बायका 40 लाख

1 करोड च्या आसपास लोक इकडेच झाले,
भारत पाक अफगाणिस्तान मिळून तेव्हा साधारण लोकसंख्या किती असेल?

त्यातही भारत पूर्ण नाहीच, फक्त आर्यावर्त, नर्मदेच्या दक्षिणेकडील एकही व्यक्ती महाभारतात नव्हता. म्हणजे निम्मा भारत

मजाक मजाक में कितने सारे लोग आ गये. Happy

जोक्स अपार्ट. कौरव पांडवांचे सैन्य ह्या अलायड फोर्सेस होत्या. त्यामुळे त्यांचे स्वतःचे खरे सैन्यबळ फार कमी असेल. इतके राजे लोक्स दोन्हीकडून गोळा झाले याचा अर्थ फारच मोठे राजकारण म्हटले पाहिजे. महाभारतातल्या ह्या राजकीय बाजूवर कोणी सखोल अभ्यास केलाय का?

तसे जरी म्हणले तरी साधारण लोकसंख्येचा प्रमाणत लढाऊ सैन्य असते आणि प्राचीन काळापासून थोड्या फार फरकाने ते तसेच आहे.
जर लढाऊ सैन्य ४० लक्ष असेल तर त्या पटीत लोकसंख्या असायला हवी त्यामुळे अक्षोहिनी ची व्यप्ती बरोबर वाटत नाही

मला वाटते तेव्हा लोकसंख्या असेल तितकी. युद्धात मारले गेल्यावर पुन्हा कमी झाली असेल.

मला टेंशन कम उत्सुकता आहे ते ईतकी लाखो माणसे समोरासमोर येत हाणामारी कशी करत असतील.

आणखी एक टेक्निकल कम प्रॅक्टीकल शंका - एका पट्टीत अमुकतमुक हत्ती आणि घोडे आणि रथ असे म्हटलेय खरे. पण या जनावरांची संख्या त्या रेशिओमध्ये नसल्यास काय करत असतील. म्हणजे तुम्हाला हत्ती नाहीये, एकच घोडा आहे, तो देखील बिनरथाचा तर करा एडजस्ट असे करत असतील का? कारण काही झाले तरी जनावरांचे सोंग आणता येत नाही.

तके राजे लोक्स दोन्हीकडून गोळा झाले याचा अर्थ फारच मोठे राजकारण म्हटले पाहिजे.
>>>>

नाईलाज को क्या ईलाज.
कौरव पांडवांची चालत असणार. त्यामुळे दोघांपैकी एकाच्या बाजूने सामील व्हा. दोघांनाही नाही बोलायचा पर्यायच नसणार कोणत्याही राजाकडे. तसे केले तर कोणीही जिंकेल तो त्या राजाची बॅन्ड वाजवणारच.

तसेच या लोकांनी ईथून तिथून राजकन्या पळवून ईतकी लग्ने करून ठेवली होती. मग जावईबापूंच्या मदतीला जायलांच हवं Happy

आशु, साधारण मध्ययुगीन काळापर्यंत प्रोफेशनल लढाऊ सैन्य फार कमी असे. तुम्ही म्हणताय तसेच गुणोत्तर. पण प्रत्यक्ष लढाईच्या वेळेला समाजाच्या सर्व कष्टकरी वर्गातून लढायला माणसे उभी केली जात. ग्रीस, प्रशियन, भारतीय कथांमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. आपल्याकडे क्षत्रिय हे शांतीकाळात शेती वगैरे करायचे. परराज्यांवर चढाई करण्याचेही काही सिझन असायचे म्हणे. दोन्ही पार्टी हे नियम पाळायच्या. तेव्हा कष्टकरी वर्गात जे लढाईतंत्रात निपुण असत ते अशा घोषित लढाईत पराक्रम गाजवायला जात. मग त्यांना काही गाव वगैरे बक्षिसं मिळे.

एकूण माझं म्हणणं असं की लोकसंख्येच्या (पुरष फक्त) ७०-८० टक्के लोक मोठ्या लढायांमध्ये सामील होत असावीत. यात व्यूहरचनेचा भाग असेल. जसे प्रोफेशनल्स ना केव्हा वापरायचे, आधी कि नंतर. सैन्याचा आकार मोठा दाखवायचा इत्यादी.

पांडवांची काहीच चलती नव्हती हो,
बिचारे आधी विराटाकडे आणि द्रुपदाकडे राहत होते.
कौरवांच्या तुलनेत राजनैतिक बळ खूपच कमी होते त्यांचे,
अर्जुनाचे संबंध होते मणिपूर वगैरे राज्यांशी, पण ती तितकी पॉवरबाज राज्ये नसावीत, अगदीच कुंतल देश असावा बहुबळीतला Wink

>>>> लढाईच्या वेळेला समाजाच्या सर्व कष्टकरी वर्गातून लढायला माणसे उभी केली >>>
हे आपल्याकडे पण होते की. शिलेदार आणि बारगिर.
बारगिराला पगार असायचा घोडा सरकारातून मिळायचा
शिलेदार स्वतः चा घोडा घेऊन फ्रीलांस करायचा.
(हो ना??की उलटे होते?)

सिम्बा, आपल्याकडचंच सांगतोय. मध्ययुगीन काळापर्यंत. शिवाजींच्या काळापर्यंत साधारण हेच होते. नंतर फ्रेंच पोर्तुगिज इंग्रजांनी फौजेच्या प्रोफेशनलपणात कैच्याकै बदल घडवलते.

शिलेदार म्हणजे फ्रीलान्सर्स. स्वतःचा घोडा आणि तलवार-भाला-आयुध असणारे. फ्रीलान्सर हा शब्द मूळ अर्थाने सैनिकीच आहे. लान्स म्हणजे भाला, लान्सर म्हणजे भालकरी. फ्री-लान्सर म्हणजे कोणत्याही बाजूने लढायला उपलब्ध असलेले प्रोफेशनल लढाऊ सैनिक. ते इतर कामे करत नसत. लढाई हेच त्यांचे मूळ उत्पन्नाचे साधन असे.

पण फ्रीलान्सर ची मूळ कल्पना आपल्याकडे नव्हती. आपल्याकडे देवदेशधर्म वगैरेच्या नावाखाली लढाइ केली जात असे ना.

महाभारत युद्ध काळात कुरुक्षेत्रात एवढे लाखो हत्ती, घोडे, माणसे मेली त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट कशी केली?
मोडके रथ, मेलेल्या सैनिकांच्या तलवारी, गदा, सोडलेले बाण यांचे अवशेष सापडले का?
इतक्या हत्तींना, घोड्यांना चारा कुठून आणायचे?
माणसांसाठी धान्य कुठून आणले?
युद्धापूर्वी कुरुक्षेत्र परिसरात हे एवढे लाखो सैनिक प्रातःविधी कसे उरकायचे? म्हणजे सांडपाणी, मैला वाहून न्यायला काही व्यवस्था होती का? त्याबाबत महाभारतात काही लिहीले आहे का?
जसे हडप्पा संस्कृतीत गटारे सापडली तसे काही अवशेष सापडलेत का?
या एवढ्या सैन्याला पाणी पुरवठा कसा होत होता? त्यासाठी धरणे बांधली होती का? पाईपलाईन होती का? की तहान लागली की अर्जुन जमिनीत बाण मारुन पाणी काढायचा? आणि सैनिक ते पाणी प्यायचे?
जर असे होत असेल तर "तहान लागली की विहीर खोदणे" हा वाक्प्रचार तयार झाला काय? Wink

मला टेंशन कम उत्सुकता आहे ते ईतकी लाखो माणसे समोरासमोर येत हाणामारी कशी करत असतील.>>>>> + मलाही.

लढाई करताना ड्रेस कोड वैगेरे असायचा का? म्हणजे इंडीया टीमला ब्लु तर पाकिस्तानला ग्रीन वेगेरे सारखं.
कारण लाखो लोकांत मारामारी करताना आपण आपल्या माणसाला मारतोय की शत्रुच्या ते कसं कळत असेल?

भैरप्पांच्या पर्व मध्ये या मुद्द्याला स्पर्श केलाय
मृत सैनिक, जनवरे यामुळे पसरणारी दुर्गंधी, जीवनावश्यक गोष्टींची झालेली टंचाई या बद्दल गोष्टीच्या ओघात उल्लेख येतात
पण काही झाले तरी ती कादंबरी आहे,
मला वाटते नागरी सुविधांच्या बाबतीत महाभारत कालीन युद्धाच्या सगळ्यात जवळ जाणारी सिच्युअशन आपल्या पानिपत युद्धात आली असेल.

If you look at Kurukhsetra, I would wonder how these many soldiers (around 40 lacs) adjusted in that area. I think they have to make human pyramids to only stand (forget war) at the place which is shown as 'Yudhbhoomi' Happy

मंदार, असे का वाटते? कुरुक्षेत्र तर सपाट भूमी आहे. आणि ३०-३५ लाख म्हणजे पुण्याइतकं.

नाना - हा मुद्दा मान्य आहेच. की शेतकरी हेच लढायला पाठवले जात. पण मुळात तितकी लोकसंख्या तरी हवी ना. त्या काळी एक करोड म्हणजे खूप जास्त झाले.

तीच गोष्ट हत्तींची १८ अक्षौहिणी म्हणजे ३ लाख ९२ हजार हत्ती पाहिजेत. हे फक्त युद्धासाठी वापरलेले हत्ती. याखेरीज सामान वाहून नेण्यासाठीचे वेगळे. इतके हत्ती होते तरी का..

अम्म. महाभारत काळाची एक गम्मत वाटतेच की त्याचा नक्की काळ कोणता? सिंधु संस्कृती पाच हजार वर्षांपूर्वीची. आणि त्यानंतरचा माहित असलेला इतिहास साधारण तीनेक हजार वर्षांपासूनचा. आता महाभारत सिंधु संस्कृतीच्या आधी की नंतर? कसेही असले तरी अभ्यासकांच्या मते एकूण भारताची लोकसंख्या बुद्धकाळात एक कोटी वगैरे होती. कलिंग युद्धात अशोकाने लाखाच्या वर माणसे मारली. त्यानंतर साधारण सोळाव्या शतकापर्यंत भारताची लोकसंख्या एक कोटीच्याच आसपास राहिली आहे. इन्डोनेशियापासून अफगाणिस्तान पर्यंत पसरलेल्या आडव्या पट्ट्यातून पन्नासेक लाख लोक उभे केल्या जाऊ शकतील असे थेराटिकली वाटतेही आणि प्रॅक्टिकली वाटत नाहीसुद्धा.

महाभारत हे महाकाव्य आहे असे मानले तर बर्‍याच गोष्टी बढाचढाकर असणारच.

कौरवांच्या सैन्यात खालील राजांचे प्रत्येकी १ अक्षौहिणी सैन्य होते.
भगदत्त
मद्रराज शल्य
माहिष्मतीचा नील (हो हे राज्य खरेच होते)
कृष्णाची नारायणी सेना
जयद्रथ
कंभोज राजा सुदक्षिणा
अवंती मधून विंदा आणि अनुविंदा
कलिंगा
गांधारचा शकुनी (कंदाहार)
त्रिंगतचा सुशर्मा
कौरवांचे भाईबंद
एकूण सैनिक ११ अक्षौहिणी

पांडवाच्या सैन्यात खालील राजांचे प्रत्येकी १ अक्षौहिणी सैन्य होते.
सात्यकी
कुंतिभोज
चेदी राजा धारिष्टकेतू
मगधाचा सहदेव (जरासंधाचा मुलगा)
राजा द्रुपद
मत्स्य राजा विराट
पांडव आणि इतर राजे राक्षस सेनेसह
एकूण सैनिक ७ अक्षौहिणी

या सगळ्या हिशोबात एअरफोर्सबद्दल काहीच माहिती कशी नाही? ब्रह्मास्त्र वगैरे टाकायला पुष्पक विमानं वगैरे लागलीच असतील ना?

तीन लाख ब्याण्णव हजार हत्तींची नुसती शी साफ करणं हासुद्धा मोठा व्याप असेल.

कौरवांच्या सैन्यात खालील राजांचे प्रत्येकी १ अक्षौहिणी सैन्य होते.>>>>>
याने कॉम्प्लिकेशन अजून वाढते,
प्रत्येक राजा आपले 100%सैन्य घेऊन दुसऱ्यांचे युद्ध लढायला येणार नाही, प्रत्येकाने किमान 10% राखीव ठेवले असेल म्हणजे टोटल मिळून 1.8 ते 2 औक्षहणी सैन्य म्हणजे लोकसंख्या काऊंट वाढला.

कौरवांच्या सैन्यात खालील राजांचे प्रत्येकी १ अक्षौहिणी सैन्य होते.>>>>>
याने कॉम्प्लिकेशन अजून वाढते,
प्रत्येक राजा आपले 100%सैन्य घेऊन दुसऱ्यांचे युद्ध लढायला येणार नाही, प्रत्येकाने किमान 10% राखीव ठेवले असेल म्हणजे टोटल मिळून 1.8 ते 2 औक्षहणी सैन्य म्हणजे लोकसंख्या काऊंट वाढला.

युद्धभूमीवर एका ठिकाणाहून दूसर्या ठिकाणी बातमी कशी पोचत असेल ? किती वेळ लागत असेल ?
एवध्या सगळ्या लोकान्ची रोजची आन्हिक कशी आटपत असतील?
गणपतीत ७-८ लोक जरी घरी नविन आले रहायला तर सकाळच्या वेळेला कित्ती गडबड असते Happy

सगळ्या माहितीत एक मोठ्ठी प्रॅक्टिकल अडचण आहे ती पट्टी नामक टिमची रचना. अशी रचना कोणत्याही प्रकारे प्रॅक्टीकल नाही हे सहज लक्षात येते.

तीन लाख ब्याण्णव हजार हत्तींची नुसती शी साफ करणं हासुद्धा मोठा व्याप असेल.
>>>
हे सगळ्यात बरोबर बोललात.

सांगली संस्थानचा एक हत्ती बाजारातून फेरी मारत जायचा. तो पो टाकेल तिथे अक्षरशः शेणाचा डोंगर उभा राहायचा. तीन तीन लाख हत्ती नुसते मुतले तर कुरुक्षेत्रात पार चिखल होऊन दलदल माजली असेल.

Pages