आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच मर्यादित फोकस ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.
काही वेळा खूप तपशीलात न शिरता सीन असतो. फक्त एका रॅण्ड्म गाडीच्या टपावरून. तेथे काही गोची असण्याची शक्यता कमी असते. काही जुन्या गाण्यांमधे डब्याच्या आतले सीन्स आहेत. ते डबे समोरासमोर सीट्स असलेले असावेत त्या काळी. त्या गाण्यांतही खूप डीटेल्स मुळात नसतात. शोले मधला सीन व इतरही अनेक चित्रपटातील सीन्स आहेत ज्यात सहजपणे काही गोची दिसत नाही. शोले मधे त्या मालगाडीच्या ट्रेलर मधे सीन ओपन होतो. तेव्हा ती गाडी पुढे चाललेली असते. मग हल्ला झाल्यावर थांबते व डाकू उलटी न्यायला लावतात. नंतर धर्मेन्द्र इंजिनात गेल्यावर पुन्हा मूळ दिशेला नेउ लागतो. मधे हे सगळे ट्रेलर मधून बाहेर पडून डाकूंशी लढतात. गाडीला वेगवेगळ्या प्रकारच्या वॅगन्स आहेत. पण कोण नक्की कसा कोठे जातो याच्या विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही, कारण सीन अत्यंत वेगवान आणि थरारक आहे. यातील चुका काढायच्या झाल्या तर सीन सेकंदासेकंदाला पॉज करून बाजूला गाडीचे चित्र काढून त्यावर ते प्लॉट करावे लागेल.
सुदैवाने इतर दिग्दर्शक इतका त्रास करून घेत नाहीत
प्राचीन काळापासून आपल्या पब्लिकला काही सीन्स चा अर्थ माहीत असतो. पडद्यावर दोन फुले आपटली की काय झाले हे उघड असते. तसेच एखाद्या खेड्यापाड्यात सुरूवात झाल्यावर १५-२० मिनीटांनी एक रॅण्डम आगगाडी फुल पडद्यावर दाखवली म्हणजे नायक मुंबईला गेला हे ही पब्लिक ला कळते. मग त्या आगगाडीचा सीन प्रत्यक्ष बंगाल मधला का असेना.
कधी कधी एरव्ही चांगल्या सीन मधे रेल्वे तपशीलांकडे दुर्लक्ष केल्याने गोची जाणवते. उदा: 'आप की कसम' मधले 'जिंदगी के सफर मे' हे अतिशय सुंदर गाणे. या गाण्याचे चित्रीकरण खरे तर खूप सुरेख आहे. अतिशय उदास खिन्न वातावरण आणि किशोर चा जबरी आवाज. एका कडव्यात त्याला मुमताज आठवते तेव्हा तिच्या बाजूला एकदम फुललेली फुले आणि हिरवेगार सीन्स तर याच्या बाजूला एकदम पतझड वाले सीन्स सगळे मस्त जमले आहे.
पण हा त्या गाडीत येउन बसतो आणि ती गाडी निघते. तेथे दिसणारा फाटा बहुधा कल्याणजवळचा आहे जेथे एक मार्ग कर्जत कडे आणि दुसरा कसार्याकडे जातो. पुढे बोगदेही दिसतात. पण ते इग्नोर केले तरी क्लिअरली दिसते की तो इलेक्ट्रिफाइड ट्रॅक आहे. मात्र इतर सीन्स मधे कोळश्याच्या इंजिनात ते कोळसे घालतात ते सीन्स आहेत. तसेच गाडी निघते तेव्हा टीपिकल स्टीम इंजिन सुरू होताना चाकाजवळ येणारी वाफ, सहसा फक्त स्टीम इंजिनांच्या चाकांना असणारे ते कनेक्टिंग रॉड्स वगैरे दिसतात. त्या इंजिनाच्या आगीतून त्यांना काही "डायरेक्शन" दाखवायचे होते का माहीत नाही पण बाकी सुंदर चित्रीकरण, आवाज, संगीत सगळेच जमून आलेल्या या गाण्यात हे विसंगत वाटते.
तरीही ठीक आहे. ट्रॅक इलेक्ट्रिफाइड असला तरी ७० च्या दशकात स्टीम इंजिने अनेक ठिकाणी वापरात होती (नंतरही होती). मध्य रेल्वेने खूप लौकर बदलली. विशेषतः मुंबईजवळ प्रवासी गाड्यांना इलेक्ट्रिकच बहुतांश वापरत. पण इथे इंजिन दाखवलेलेच नाही. त्यामुळे शक्ती सामंता ला बेनेफिट ऑफ डाउट
अशा गोच्या तुम्हाला अनेक ठिकाणी जरा खोलात गेलात तर सापडतीलः
- रा.वन मधला लोकलचा सीन. धमाल आहे. पण ती गाडी बांद्रा स्टेशनवर आहे - असे आवर्जून स्क्रीनवर येते. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर. प्रत्यक्षात गाडी पाहिलीत तर मध्य रेल्वेची आहे. एक दोन सीन्स मधे तर फेक लोकल आहे. कशावर तरी लोकलच्या इंजिनाचे डेकोरेशन आहे. आता मध्य रेल्वेबद्दल मुंबईकर म्हणतील ती हार्बर लाइन ची असेल बान्द्र्याला असेल तर. होल्ड युअर ऑब्जेक्शन जरा थांबा. पुढे ती गाडी मस्तपैकी भायखळा स्टेशनातून जाते. हे हार्बर लाइन वर येतच नाही, कारण ती लाइन सॅण्डहर्स्ट रोडवरून च वरती उचलली आहे. लेको तुम्ही जर मध्य रेल्वेची लोकल वापरली आहे, तो ट्रॅक वापरला आहे तर स्टेशनची नावे वेस्टर्न ची कशाला?
- रजनीच्या पिक्चर मधे लॉजिक शोधायचा प्रयत्नच मुळात विनोदी आहे. पण तरी हा एक सीन बघा, 'शिवाजी- द बॉस'. इथे नीट पाहिलेत तर त्याचा पाय तेथे अडकायची शक्यता दिसत नाही. कारण ट्रॅक स्विच तेथे गॅप सोडेल. का ते पुढच्या काही सीन्स मधे जे लिहीले आहे त्यावरून बघा
- आमिर च्या गुलाम मधल्या त्या १०:१० की दौड सीन मधे हे गृहीत धरलेले आहे की त्या येणार्या लोकल्स चा वेग रोज सेम असतो. अगदी रात्रीची वेळ धरली तरी हे खरे नाही हे लोकल्स ने प्रवास करणार्यांना पटेल. लोकलचा वेग कमीजास्त असू शकतो असे धरले तर त्या सीन मधल्या कौशल्याला काही अर्थ नाही.
असे फुटकळ बरेच आहेत. पण काही यापेक्षा मोठे ब्लूपर्स असलेले सीन्सः
जब वी मेट
हा ही एक सुंदर चित्रपट. गाणी एकदम मस्त. पण सुरूवातीला असलेल्या ट्रेन चेस मधे इतका गोंधळ घातला आहे! त्यात काही गोष्टी आवर्जून चुकीच्या दाखवायचे कारणही कळत नाही. पहिले म्हणजे ट्रेनचे जे लाँग शॉट्स आहेत त्यात ती चक्क मॉडेल ट्रेन वाटते. इथे दुसराही एक ब्लूपर आहे. ज्या टॅक्सी मधे ते बसतात, त्यात बसतानाच्या सीन मधे पुढे फ्लॅप आहे. मग वरतून घेतलेल्या अँगल्स मधून जे सीन्स आहेत त्यात ती फ्लॅप नाही. मग रतलाम ला पोहोचतात तेव्हा ती फ्लॅप परत आलेली आहे
आता रतलाम. हे पश्चिम रेल्वेवरचे मोठे जंक्शन आहे. राजधानी एक्सप्रेस चे जे फक्त ३-४ स्टॉप्स आहेत त्यात हे आहे. या पिक्चर मधे ते अगदीच लहान गावचे स्टेशन वाटते. मग तेथे गाडी येते. इथे आणखी विनोद आहे. ती गाडी म्हणे - "पंजाब मेल". तीही मुंबई हून दिल्लीला चाललेली. इथे दोन गोच्या आहेत. एक म्हणजे "मुंबई" असे ढोबळ सहसा म्हणत नाहीत. मुंबई व दिल्लीचे चे कोणते टर्मिनस ते सांगतात. तरी ठीक आहे सांगितले असेल. पण दुसरे म्हणजे ही ट्रेन मुंबई-फिरोजपुर अशी जाते. फार जुनी आणि फेमस गाडी आहे. पहिल्यांदा त्याच्याही पुढे जायची पेशावरपर्यंत. मग फाळणीनंतर फिरोजपूर पर्यंत केली. करीनाला दिल्लीला जायचे आहे म्हणून मधल्या स्टेशन वर फक्त दिल्लीपर्यंतची अनाउन्समेण्ट करणार नाहीत
पण खरा विनोद आणखी बेसिक आहे. पंजाब मेल ही मध्य रेल्वेची गाडी आहे. मुंबईहून दिल्लीला दोन वेगळे मार्ग आहेत. एक मध्य रेल्वेचा - जो कसारा, इगतपुरी, भुसावळ, भोपाळ वगैरेहून जातो. दुसरा पश्चिम रेल्वेचा - जो बडोदा, रतलाम वगैरे वरून जातो. पंजाब मेल यातील पहिल्या रूट ने जाते. म्हणजे ती रतलाम वरून मुळातच जात नाही!
वास्तविक त्या चेस सीन मधे तसे काही अतर्क्य नाही. मग रेल्वेच्या डीटेल्स च्या बाबतीत इतक्या ढोबळ चुका का आहेत कल्पना नाही. पंजाब मेल च्या जागी राजधानी एक्सप्रेस म्हणून काम झाले असते - जी मुळात दिल्लीपर्यंतच जाते आणि रतलामला थांबते ही!
यादों की बारात
सलीम जावेद च्या स्क्रिप्ट मधे असा फ्लॉ फार क्वचित सापडेल. या पिक्चरच्या शेवटी अजितच्या मागे धरम लागतो. तो व इम्तियाज धावताना रेल्वे रूळांवरून धावतात व मधे सिग्नल पडतो, रूळ सरकतात व अजितचा पाय त्यात अडकतो असा तो सीन आहे. यात सर्वात ढोबळ दिसणारी गोची म्हणजे नंतर येणारी जी गाडी आहे तिला जे इंजिन आहे ते शंटिंग करता वापरले जाणारे आहे - म्हणजे तुम्हाल स्टेशन मधे कधी थोडे डबे इकडून तिकडे नेणे वगैरे करताना तसे इंजिन अजूनही दिसेल. कधी यार्ड मधली गाडी प्लॅटफॉर्म वर लावताना वापरतात. हे इंजिन फार वेगात जात नाही. यात दाखवलेले अंतर आहे तेवढ्या दुरून माणसे दिसली तर ते आणखी हळू करून सहसा थांबवतील.
पण मोठी गोची पुढे आहे. अजित जसा उभा आहे त्या संदर्भाने पाहिले तर त्याच्या समोरून येणारा तो ट्रॅक आहे तो तसाच सरळ अजितच्या मागे जातो व समोरूनच त्याच्या डाव्या बाजूने एक साइड लाइन येउन मिळते - तेथे प्लॅटफॉर्म आहे. आता अजितचा पाय अडकला कारण तो रूळ सरकला आणी मेन लाइन ला चिकटला. हे केव्हा करतील? जर बाजूच्या साइड लाइन वरून गाडी येणार असेल तर तिला मेन लाइन वर घ्यायला. पण इथे गाडी येते ती तर थेट समोरून येते. म्हणजे तिला लाइन क्लिअर द्यायला तो रूळ तसा चिकटणारच नाही! तेथे गॅपच हवी. किंबहुना स्विच पोझिशन तशी असेल तर ती यात दाखवलेली गाडी तेथे अडकेल किंवा घसरेल.
बाकी ते स्टेशन वगैरे दिसते त्यावरून हा स्विच कोठूनतरी रिमोटली न होता स्टेशनजवळून कोणीतरी मॅन्युअलीच केलेला असण्याची शक्यता जास्त होती. इतक्या लोकांत कोणीच तेथे धावत जाउन का ती गाडी थांबवू शकत नाहीत माहीत नाही
तूफान
अमिताभच्या "तूफान" मधे असाच गोंधळ आहे. केतन देसाई यांनी मनमोहन देसाई लॉजिक वापरायचा प्रयत्न केला पण तो आधीचा स्पार्क यात नव्हता. यातील क्लायमॅक्स मधे कमल कपूर चा पाय अमिताभ मुद्दाम अडकवतो. इथे सीन यादों की बारात सारखाच आहे. पण प्रत्यक्षात गाडी त्याच्या जवळ येताच अमिताभ पुन्हा त्याला मोकळा करतो व तो उडी मारतो. आता रूळ तेथे न चिकटल्याने गाडी तेथून सरळ पुढे जायला हवी. पण पुढच्याच सीन मधे ती वळून गेलेली दिसते - जी तो रूळ चिकटला असता तेथे, तरच गेली असती
बाकी यात त्या कमल कपूर ला ती गाडी त्याच ट्रॅक वरून जाणार आहे हे माहीत असते, अमिताभला ती सगळी स्विच सिस्टीम माहीत असते, तो तो स्विच हलवेपर्यंत या रूट वरून एक रॅण्डम गाडी चाललेली आहे हे रेल्वेवाल्यांच्या लक्षात येत नाही वगैरे अचाट लॉजिक सोडून देऊ. हा शैतान सिंग म्हणे बिकानेर वरून उधमपूर हवाईअड्ड्याकडे निघालेला असतो - बिकानेर जवळच कोठेतरी कोकण असावे. कारण तेथे नागोठण्याजवळ असलेले "भिसे टनेल" सुद्धा स्पष्ट दिसते
पूर्वी पेण, रोहा वगैरे भागात रेल्वे ट्रॅफिक नसल्याने तेथील ट्रॅक्स शूटिंग करता वापरत. तेच इथे वापरलेले दिसतात.
वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई
इथे अजय देवगणचा तो सीन आहे ज्यात एक ट्रक इकडून तिकडे नेण्याकरता तो आख्खा ट्रॅकच उपसून काढतो. यात उल्हासनगर स्टेशन दाखवले आहे. तेथे एक डिझेल इंजिन वाली गाडी उभी आहे. तेथून सिंगल ट्रॅक जाताना दिसतो. आता उल्हासनगर म्हणजे कल्याणजवळ. ते गेली अनेक दशके इलेक्ट्रिफाइड ट्रॅक वर आहे. त्यामुळे यातली कथा ६० च्या दशकातील असली तरी चुकीचा आहे तो सीन. तसेच तेथील ट्रॅक्स सुद्धा किमान दुहेरी आहेत अनेक वर्षे. आणि पूर्वी सहसा पॅसेंजर गाड्यांना तेथे डिझेल इंजिने लावत नसत, गेल्या काही वर्षांत लावू लागले. आणि माझ्या आठवणीत उल्हासनगर ला थांबणारी थ्रू ट्रेन पाहिली नाही. कारण कल्याण जवळच आहे.
दुसरे म्हणजे आख्खे रूळ काढण्यापेक्षा तेथे ८-१० पोती माती टाकून किंवा काही लाकडी फळ्या लावून जरा लेव्हल तयार करून ट्रक का नेत नाहीत कल्पना नाही. तसेही तेथे रस्ता ऑलरेडी होता असे त्या शॉट मधे दिसते. कदाचित रीटेक्स मुळे तयार झाला असावा
द बर्निंग ट्रेन
यात तर ब्लूपर्स ची रेलचेल आहे. फार पूर्वी या पिक्चर वर लिहीलेले आहे जुन्या मायबोलीवर. मला सर्वात गंमत वाटली तो भाग म्हणजे या गाडीतून रीतसर उतरणार्यांपेक्षा दारातून थेट वरती टपावर जाणारे, खिडक्यांच्या गजाला धरून इकडे तिकडे जाणारे आणि वेळोवेळी खाली फेकले गेलेले असेच जास्त असतील धर्मेन्द्र प्लॅटफॉर्मवरून बाइकवरून येउन गाडी पकडतो गार्डाच्या डब्याचे दार धरून तेव्हा तो गाडीच्या उजव्या बाजूने पकडतो. मात्र मग अचानक डाव्या बाजूने गार्डाचे दार ठोठावतो. तेथे धावत्या गाडीच्या दारात बाहेर उभ्या असलेल्या त्याला तो गार्ड आत न घेता "अरे जाओ यहाँसे" ही म्हणतो. तेथे पुढच्या लंब्याचौड्या संवादांआधी धरम ने "कोठे?" असे विचारावे असे मला वाटले होते
या गाडीचे सर्व डबे आतून जोडलेले असूनही कोठेही जायचे म्हंटले की हे हीरो लोक असतील तेथून थेट टपावर जाउनच पुढे जातात. मधे एकदा तर एक 'Not to be loose shunted' लिहीलेली वॅगन सुद्ध दिसते. असा ज्वालाग्राही पदार्थ असलेली वॅगन नव्या सुपर एक्स्प्रेस च्या पहिल्या ट्रिपलाच ट्रेनच्या डब्यांमधे लावून टाकणे हे सेफ्टी प्रोटोकॉल प्रमाणेच असावे मात्र ती वॅगन एरव्ही दिसत नाही.
इंजिन मधला बॉम्ब फुटतो त्यानंतर एक दोन स्टेशन्स मधून ती गाडी जाताना तेथील सिग्नलमन ला गाडी फार जोरात जात आहे, ड्रायव्हर ने सिग्नल दिला नाही वगैरे तपशील दिसतात. पण इंजिनातून धूर येत होता हे दिसत नाही. तो धूर पुढच्या स्टेशन - रतलाम- पर्यंत गायब होतो. बहुधा दिवाळीचा बॉम्ब असावा.
बाकी गमती त्या लेखात मिळतील
ही मधेच वॅगन लावायची पद्धत गाडीत हीरो लोक असले की वापरत असावेत. कारण मोहब्बतें मधेही उदय चोप्राच्या एण्ट्रीला एक ओपन वॅगन होती पॅसेंजर गाडीच्या मधेच.
कभी हाँ कभी ना
हे सर्वात धमालः
शाहरूख आणि दीपक तिजोरी गाणे गात गात गोव्याच्या वास्को स्टेशन वर येत आहेत. तिकडे एकदम घरी येताना उत्सुक वगैरे दिसणारी सुचित्रा कृष्णमुर्ती गाडीत आहे, अगदी पाच मिनीटात उतरणार अशा थाटात. म्हणजे गाडी हे गाणे संपता संपता वास्को ला पोहोचणार असावी.
एकच प्रॉब्लेम आहे. सुचित्रा कृष्णमुर्ती ज्या गाडीत आहे ती गाडी गाणे चालू असताना कसारा घाटात आहे. तेथेही ती गाडी किमान तीनदा इंजिनांचे मॉडेल बदलते - कारण वरकरणी सारखी दिसली, तरी ही तीन वेगवेगळी इंजिने आहेत. हे WCM-5 , हे बहुधा WCM-1, आणि हे WCM-2 त्यातही इंजिने फक्त मुंबई-पुणे व मुंबई-इगतपुरी या मर्यादित रूटपर्यंतच वापरली जाणारी डीसी ट्रॅक्शन वाली इंजिने आहेत. त्यामुळे ही गाडी गोव्याच्या आसपाससुद्धा असू शकत नाही. मधे एकदा आपल्याला कसारा घाटातील १२४ किमीचा मार्करही दिसतो. गाडी नक्की कोठे चालली आहे माहीत नाही पण कोणत्याही दिशेला असली तरी तेथून त्या काळात वास्को ला जायला १२-१४ तास लागतील. अजून एक छोटासा प्रॉब्लेम. ही ब्रॉडगेज गाडी अशीच्या अशी वास्कोला जाउ शकत नाही. मधे मिरज किंवा कोठेतरी या सर्व लोकांना मीटर गेजच्या गाडीत बसावे लागणार आहे (सर्व मार्ग ब्रॉडगेज होणे हे बरेच नंतर झाले). मग ती पुढे जाईल. तोपर्यंत हे दोघे गाणे गात बसणार असे दिसते. नाहीतर इतका वेळ स्टेशन वर येउन बसणार. पण काहीतरी चमत्कार असावा. कारण गाणे संपता संपता तिची गाडी आपोआप वास्को जवळ येते. आता ती गाडी छानपैकी मीटर गेज झालेली आहे तसे इंजिन बदलून . शाहरूख त्या गाडीच्या शेजारच्या रोडवरून उरलेले कडवे म्हणत चालला आहे. आणि लगेच रिपीट चमत्कार! गाडी त्यानंतर दोन मिनीटांत वास्को स्टेशनात शिरताना पुन्हा तेवढ्यात एक नवीनच इलेक्ट्रिक इंजिन लावून पुन्हा ब्रॉडगेज झालेली आहे!
गाण्यात हीरो व हीरॉइन कपडे बदलतात वगैरे आपण पाहिले आहे. इथे गाडी इंजिनेच नव्हे तर गेजही बदलते!
बाकी असंख्य असतील. सापडले की लिहीन. तुम्हीपण लिहा
ज्यांना माहीत नाही त्यांना शीर्षकाचा संदर्भः बीबीसीआय आणि जीआयपी या पूर्वीच्या खाजगी रेल्वे कंपन्या. आता पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे साधारण तेच भाग कव्हर करतात. आणि तो याचा डबा तिकडे जोडण्याचा संदर्भ
>> गाण्यात हीरो व हीरॉइन कपडे
>> गाण्यात हीरो व हीरॉइन कपडे बदलतात वगैरे आपण पाहिले आहे. इथे गाडी इंजिनेच नव्हे तर गेजही बदलते! Happy
बरेचसे ब्लूपर्स रेल्वे गीक्स ना फक्त समजतील असे असल्याने मला बहुदा कधीच खटकायचे नाहीत
पण एक शेरा मात्र खटकला. जब वुइ मेट मध्ये ते ज्या डब्यात असतात तो सामान्य ३ टियर दाखवला आहे. रतलाम ला थांबणारी दिल्ली पर्यंत जाणारीच गाडी हवी असेल तर पश्चिम एक्प्रेस वापरायला हवी होती ना, राजधानी ऐवजी?
फारच टेक्निकल अनलिसिस फा,
फारच टेक्निकल अनलिसिस फा,
प्यार तो होना ही था मधला ब्लुपर
1) मुंबई वरून गोव्याला जाणारी ट्रेन via पंजाब जाते
2)गाडीत टॉयलेट असताना काजोल स्टेशन वर टॉयलेट ला जाते.
फा हा लेख आवडण्यासाठी तु
फा हा लेख आवडण्यासाठी तु लिहिलेले सगळे ब्लूपर्स आधी मन लावून पहावे लागतील.
फारच कष्ट घेतले आहेस लिहायला
पण झालाय खुसखुशित, फक्त फार रिलेट करू शकले नाही कारण वर नमूद केलेले सिनेमे पाहिले असले तरिही तु सांगितलेले सिन्स फार मन लावून नाही पाहिलेले
आम्ही गुलाम मुवीचा नेमका वर
आम्ही गुलाम मुवीचा नेमका वर वर्णन केलेला सीन शुटिंग चालु अस्ताना पाहिला आहे. सानपाडा कार शेड मध्ये झालय शुटींग.! रात्री ११ च्या पुढे.. ट्रेन ईतकी स्लो होती की लहान मुलंही त्यातून चढ उतर करतील सहज.! तेव्हा राणीला कुणी ओळखतही नव्हतं..!
बाकी लेख छान आणि अभ्यासपूर्ण.!
जबरदस्त अभ्यास केल्याचे
जबरदस्त अभ्यास केल्याचे जाणवतेय.
हा धागा उघडुन एकेक सीन पाहावा लागेल आता.
फारच टेक्निकल अनलिसिस फा,
फारच टेक्निकल अनलिसिस फा, >>+१
प्यार तो होना ही था मधला ब्लुपर
1) मुंबई वरून गोव्याला जाणारी ट्रेन via पंजाब जाते
2)गाडीत टॉयलेट असताना काजोल स्टेशन वर टॉयलेट ला जाते.>>
दुसर्या प्रश्नाच उत्तर आहे. कारण तो एका हॉलीवुड मुव्हीचा कॉपी आहे आणि त्या मुव्ही मध्ये हिरोईण स्टेशन वर टॉयलेटला जाते. त्यात पण फ्रान्स ची रेल्वे दाखवली आहे. फ्रान्समध्ये सगळ्या लांब पल्याच्या गाड्यात टॉयलेट असते तरीदेखिल हिरोईण ला स्टेशनवरच्या टॉयलेट मध्ये जायचे असते.
लेख फारच आवडला.
लेख फारच आवडला.
टिपीकल भारतीय प्रेक्षक इतके लक्ष देऊन चित्रपटचा प्रत्येक सीन पाहत नाहीत (अर्थात तुम्ही ह्याला अपवाद आहात) हे येतील दिग्दर्शकांना माहित असल्याने ते अश्या लहान-मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करत असावेत.
बाकी लेखाच्या शेवटी ती Great Indian Peninsula Railway ची विकीलींक तुम्ही दिली आहे, त्यात दिलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग, ब्रिटीश काळात किती तरी वेगळे होते.
उदा.
Nassuek (Nashik),
Ahmednuggur (Ahmednagar)
Oomrawutty (Amravati)
Padusdhurree (Palasdhari)
Campoolie (Khopoli)
Callian (Kalyan)
आमच्यासारख्या
आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी २४ फ्रेम प्रति सेकंद च्या वेगाने चित्रपट बनवले जातात.
फा यांच्यासाठी २४०० फ्रेम प्रति सेकंद च्या स्पेश्यल वेगाने बनवले तर असले भयंकर लेख वाचावे लागणार नाहीत आम्हा पामरांना....
आपकी पारखी नजर और निरमा सुपर!
गाण्यात हीरो व हीरॉइन कपडे
गाण्यात हीरो व हीरॉइन कपडे बदलतात वगैरे आपण पाहिले आहे. इथे गाडी इंजिनेच नव्हे तर गेजही बदलते! <<<<< मस्त जमलंय हे!
यात तो 'परदेस'वाला ब्लूपरसुद्धा ऍड करायला हवा.
अरे मस्त जमलाय लेख फा! आता
अरे मस्त जमलाय लेख फा! आता पुढे कधी पिच्चर डायरेक्शन मध्ये गेलो अने रेल्वे बिल्वे चे सीन असले तर तुला कन्सलटंट म्हणून संपर्क करेनच. असं डिटेल्स कडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे हे माझ्या लक्षात येत नाही नेमकं. म्हणजे असं की, किती लोकांना खरंतर लक्षात येतील ह्या गोष्टी, शेवटी पिकचर चालला असं म्हणून एखादा दिग्दर्शक स्वतःची पाठ थोपटून घेइल सुद्धा, पण एक प्रॉडक्ट म्हणून आपण खराब क्वालिटी प्रेक्षकाच्या गळ्यात मारली असं फिलींग येत असावं का? किंवा यावं असं मला वाटतं.
आता काल परवाच याहू वर हा लेख वाचला.
https://www.yahoo.com/movies/mvps-horror-griffin-dunne-talks-drinking-te...
ह्यात प्रॅक्टिकल मॅजिक आणि अमेरिकन वेअरवुल्फ इन लंडन, ह्या सिनेमांबाबत काही मुद्दे आहेत. त्यात वेअरवुल्फ इन लंडन ह्या सिनेमाबद्दल बोलताना ग्रिफिन डन्न रिच प्रॉडक्शन वॅल्युज, ह्या बद्दल बोलतो. तो म्हणतो "But it was pretty effective. I think that one of the lasting things about that movie, why it’s still so popular: Without people quite knowing it, they’re looking at a very low-tech movie with very high emotional production values."
लो-टेक असून सुद्धा, प्रेक्षकाचा व्युविंग अँगल, इमोशनल स्टेट बरोब ताडून अशा प्रकारे सीन तयार केला गेला की अगदी खरं वाटावं. इथे प्रेक्षकाची दिशाभूल किंवा त्याला मुर्ख समजून तू उदाहरणं दिले आहेत तसे टाकणे टाकून लो क्वालिटि प्रॉडक्ट गळ्यात मारण्यापेक्षा, विचार करुन, मेहनत करुन लो टेक असून सुद्धा उच्च प्रतिचं प्रॉडक्ट तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. इथे मला वाटतं, टॅलेंट, स्किल आणि एथिक्स ह्याचा कस लागत असावा.
परत एकदा, वेगळा आणि मस्त लेख!
_/\_ धन्य आहेस फा!! तू
_/\_ धन्य आहेस फा!! तू लिहिलं नसतंस तर हे काहीही कधी लक्षात आलं नसतं अजिबात
धन्य आहेस फा!! तू लिहिलं
धन्य आहेस फा!! तू लिहिलं नसतंस तर हे काहीही कधी लक्षात आलं नसतं अजिबात>>>>> +१!!! एग्जॅक्टली राईट! एकदम कच्चा लिंबू प्रेक्षक बघा रेल्वे बाबतीत आपण!
कुणी बर्निंग ट्रेन ला टर्निंग
कुणी बर्निंग ट्रेन ला टर्निंग ब्रेन म्हणायचं का?
लेख खुमासदार आहे फारएंड साहेब..
हहपुवा..
फा , मान गये उस्ताद !! काय
फा , मान गये उस्ताद !! काय पण गाड्या पळवल्या आहेत.
शोलेचा सीन एकदम आवडीचा आहे. बर्निंग ट्रेन खरंचच हस्यास्पद आहे. त्यात मात्र चेन्नाई एस्कप्रेस राहिली वाटतं आणि दिलवाले दुल्हनिया पण
गाडी स्टेशनात असताना
गाडी स्टेशनात असताना त्यातल्या टॅाइलेटमध्ये जायचे नसते हाच संदेश दिला आहे. आता नवीन बंद टाक्या डब्यातल्या जुन्या टॅाइलेट्सना जोडत आहेत. पण सर्वच डब्यांचे झालेले नाहीत.
जायपी चा डबा रे आणि, जी आय
जायपी चा डबा रे आणि, जी आय पी फारच शुद्ध लिहिलंस
>>> धन्य आहेस फा!! तू लिहिलं
>>> धन्य आहेस फा!! तू लिहिलं नसतंस तर हे काहीही कधी लक्षात आलं नसतं अजिबात
+१
लेख सावकाशीने वाचेन पण हेडर
लेख सावकाशीने वाचेन पण हेडर मी सारखंच "बीसीसीआयला" असं वाचतेय.
बहुतेक फारएण्ड आणि क्रिकेटचं कनेक्शन डोक्यात कायम बसल्यामुळे असावं.
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो.
श्र - परदेस कसा विसरलो कोणास ठाउक. अॅड करतो आता
काहे विसरा परदेस, फा?
काहे विसरा परदेस, फा? लेख अजून वाचायचा आहे. वाचल्यावर लिहितोच.
फा, ब्रॉडगेज ईतका मोठ्ठा आणी
फा, ब्रॉडगेज ईतका मोठ्ठा आणी ईंजिनाच्या शिट्टीईतका जोरदार दंडवत घ्यावा...
अवांतर :
अवांतर :
चित्रपटातील ब्लुपर्स (अ आणि अ विषयावर धागा आहे बहुतेक) प्रमाणेच नो-नॉन्सेंस चित्रपटांवर एखादा धागा असावा असं वाटतं (कॉलिंग धागापटु ऋन्म्या). मराठी-हिंदीत कहि मोजके, हाताच्या बोटावर मोजता येतील असे चित्रपट आहेत. हॉलिवुड मध्ये तर भारंभार (कपोला, फिंच, नोलन, टॅरँटिनो टु नेम अ फ्यु) आहेत. यातल्याच एकाचा चित्रपट बघण्याचा योग आला म्हणुन हे अवांतर...
चित्रपटाचं नांव "दि हेटफुल एट", दिग्दर्शक टॅरँटिनो (नेफिवर) आहे. संथ कथानक असलेला चित्रपट असुनहि जवळजवळ तीन तास खिळवुन ठेवतो. मला स्वतःला चित्रपट पहात असताना बारीक-सारीक प्रश्न पडत जातात आणि त्या प्रश्नांची खुबीने केलेली उकल बघुन दिग्दर्शकाला आवर्जुन दाद द्याविशी वाटते. या चित्रपटात असे बरेच प्रसंग आहेत; उदाहरणादाखल दरवाज्यावर फळकुट असण्याचा/मारण्याचा प्रसंग द्यावासा वाटतो. चित्रपट जमल्यास अवश्य बघा...
आरे फार कठीण लेख आहे रे...
आरे फार कठीण लेख आहे रे... म्हणजे निरीक्षण वाईज.. कसे जमते हे..
मला ते एक डीडीएलजे मध्ये काजोल ईथून न चढता तिथूनच का चढायला जाते हेच एक माहीत आहे.. ते सुद्धा वायरल झाल्याने, स्वत: नाही शोधलेले.. काजोल शाहरूखला पडद्यावर बघायचे सोडून लोकं ट्रेना कसल्या बघतात असेही वाटायचे.. पण तू तर अश्या सार्या फिल्मी किड्यांचा बाप आहेस __/\__
सशल - 'राजधानी' बद्दल गुड
सशल - 'राजधानी' बद्दल गुड कॅच! सुरूवातीला ते ज्या डब्यात चढतात तो जनरल डबा आहे. म्हणजे ती राजधानी असू शकत नाही. पश्चिम एक्सप्रेस असू शकेल. पण इम्तियाज अली ने घातलेला एक गोंधळ म्हणजे शाहीद व्हीटीला गाडीत चढताना दाखवला आहे. यातली कोणतीच तेथून निघणार नाही - मुंबई सेण्ट्रल वरून निघेल. पंजाब मेल व्हीटीहून निघेल पण रतलाम हून जाणार नाही.
अजून एक लक्षात आले ते म्हणजे रतलाम ला जेव्हा करीना पुन्हा बाहेर पडते तेव्हा तेथील सीन मधे बॅकग्राउण्डला "मला लागली कुणाची उचकी" सुरू आहे. तेव्हा हे शूटिंग महाराष्ट्रातल्या किंवा जवळच्या एखाद्या छोट्या स्टेशनचे असावे.
वास्तविक ते सुरूवातीचे करीनाचे सीन्स खूप चांगले आहेत. पण इम्तियाज ने इतर बाबतीत उत्तम दिग्दर्शन (करीना चे बोलणे शाहीद ला ऐकू न येणे ई.) करताना रेल्वेच्या बाबतीत आळशीपणा केला आहे. शाहीद कपूर मॉडेल ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या करणार असतो असे दिसते तो शॉट खरा घेणे किती सोपे होते. एकजण नुसता कोणत्याही गाडीच्या दारात उभा केला असता तरी तासाभरात क्रॉस होणार्या अनेक गाड्या आल्या असत्या त्यात.
फा, तू गप्प पिक्चर दाखवतात
फा, तू गप्प पिक्चर दाखवतात तसा बघायचा सोडून किडे का करतोस रे?
हे त्या रतलाम सीनच्या
हे त्या रतलाम सीनच्या आसपासच्या सीनची इन्सायडर स्टोरी
https://youtu.be/o0r_UQuhrIg
अभ्यास अभ्यास म्हणतात तो हाच
अभ्यास अभ्यास म्हणतात तो हाच .....
चित्रपट पहाताना एवढे निरीक्षण
चित्रपट पहाताना एवढे निरीक्षण __/\____/\____/\__
मस्त आहे लेख. पण हे सगळे सीन्स परत बघावे लागतील.
फा, तू गप्प पिक्चर दाखवतात
फा, तू गप्प पिक्चर दाखवतात तसा बघायचा सोडून किडे का करतोस रे?
खरेच आहे ते. आता कुर्बानी मधले "क्या देखते हो" गाणे बघताना आपल्यासारख्या पामरांचे लक्ष झीनत अमान ( व महिलांचे लक्ष फिरोझ खान) सोडून कुठे जाणार नाही. पण तिथेही हा सूर्य पश्चिमेकडे कसा उगवला? खारे वारे व मतलई वारे यांची गफलत, अशा चुका काढत असतो.
"क्या देखते हो? " विचारणारी बावळट झीनत,
"सूरत तुम्हारी" असे म्हणणारा खोटारडा फिरोझ.
हे सोडून भौगोलिक चुका काढत बसणारा फारेंड !
कस्ला मस्त अभ्यास आहे!!!!!!
कस्ला मस्त अभ्यास आहे!!!!!!
मला रेल्वेची आवड असल्यामुळे लहानपणीच खटकलेला सिन. चित्रपट गुपचुप गुपचुप.
रंजना आणि तिची बहीण शुभांगी रावते गोव्याला जायला रेल्वेने मुंबईहून निघतात आणि शुभांगीला दादरला महेश कोठारे उतरवून घेतो.
८२ साली निव्वळ अशक्य .
अर्थातच तू कभी हां कभी ना मध्ये लिहीलं आहेसच.