लेखनाच्या कॉपी-राईट्स संदर्भात...

Submitted by अपूर्व जांभेकर on 28 October, 2017 - 07:09

माझ्या सर्व लेखक मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार!

मी मायबोलीचा नवीन सदस्य असून माझ्या कथा इथे सादर करू इच्छितो. माझा प्रश्न किंवा शंका अशी आहे कि, मायबोलीवर पूर्वीपासून सादर होत असलेल्या कथांचे/लेखांचे/कवितांचे कॉपी-राईट्स त्या-त्या लेखकांच्या नावावर आहेत का? असे विचारण्याचे कारण एवढेच, कि तसे असल्यास, मी सुद्धा माझ्या लेखन साहित्याचे आधी कॉपी राईट्स मिळवून मगच येथे सादर करेन. पण, जर अशी अट नसली आणि सादर केलेल्या साहित्याचा गैरवापर झाल्याचे आढळले तर मायबोली व्यवस्थापन ह्याला जबाबदार असेल कि ती सर्वस्वी माझी जबाबदारी असेल?

माझा दुसरा प्रश्न असा आहे कि, लेखन साहित्याचे कॉपी-राईट् करण्यास मायबोली व्यवस्थापन काही मदत करते का?

अपेक्षा करतो, माझ्या शंकांचं निरसन करण्यास तुम्ही नक्की मदत कराल आणि अनायासे, औपचारिकपणे का होईना,
तुमच्यापैकी काहींशी गप्पाही मारता येतील!
प्रतिसादांच्या नव्हे, तर गप्पा मारण्याच्या प्रतीक्षेत...

अपूर्व.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा तुम्ही चुकीच्या विभागात तयार केलात.
मदत समिती,admin,webmaster यांना विचारालात तर तुमच्या शंकांचे निरसन होईल.

तुमच्यापैकी काहींशी गप्पाही मारता येतील!प्रतिसादांच्या नव्हे, तर गप्पा मारण्याच्या प्रतीक्षेत...>>>
त्यासाठी सुध्दा दुसरे विभाग आहेत.

वर राहुल यांनी दिलेल्या दोन्ही दुव्यांमुळे , मायबोलीचे धोरण पुरेसे स्पष्ट व्हावे. सुरवातीपासून मायबोलीवरच्या लेखनाचे प्रताधिकार लेखकाकडेच राहतील असे धोरण आपण स्वीकारले आहे , त्यात काही बदल नाही. मायबोलीवर लेखन प्रकाशित करून तुम्ही मायबोलीला त्या लेखनाचा/कलाकृतीचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

>अशी अट नसली आणि सादर केलेल्या साहित्याचा गैरवापर झाल्याचे आढळले तर मायबोली व्यवस्थापन ह्याला जबाबदार असेल कि ती सर्वस्वी माझी जबाबदारी असेल?
माझ्या माहितीप्रमाणे कुठलेही प्रकाशन अशी सरसकट जबाबदारी घेत नाही. पण असा गैरवापर झाला, तर केस बाय केय बेसीस योग्य ती कायदेशीर कारवाई करायचा निर्णय ते प्रकाशन घेऊ शकते आणि काही प्रकाशकांनी तो घेतलाही आहे. मायबोली ही असा निर्णय घेऊ शकते.

>माझा दुसरा प्रश्न असा आहे कि, लेखन साहित्याचे कॉपी-राईट् करण्यास मायबोली व्यवस्थापन काही मदत करते का?
नाही. त्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ पाहता सहसा असे कॉपी-राईट्स महत्वाच्या आणि मोठ्या लेखनासाठी घेतले जातात. उदा. नाटकाची किंवा चित्रपटाची संहिता . पण तुम्हाला तुमच्या लेखनाचे कॉपी-राईट्स घायचे असतील तर त्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात. बहुतेक देशांमधे असे लेखन प्रसिद्ध झाले की आपोआप ते कॉपी-राईट् मिळतात, वेगळे घ्यायची गरज नसते.