चॉकलेटचा फराळ

Submitted by सेन्साय on 10 October, 2017 - 23:37

.

.

मी चिवडा केला नाही,
मी चकली केली नाही.
मी लाडूसुद्धा वळला नाही.
कशाला उगीच वजन वाढवणे
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला

नको तेलाचेे तळणे
अनारसे आणि बोरे
नको ते लाटणे
शंकरपाळी आणि करंजे
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला

भवताली इतके मॉल चाले,
सर्व रेडीमेड फुड स्टॉल चाले
ते विस्फारुन बघताना,
काय घ्यावे बरं तेही न कळे
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला

अव्यक्त फार मी आहे
व्हाट्सअप शुभेच्छा भारी आहे
जमलेच तर इमेल ग्रीटिंगही आहे
नको मला कोणाकडे जायला
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला

आलात की सेल्फी काढायला हवी
फेसबुकला एकतरी टैग हवी
ऑनलाईन भेट पाठवलीय छान
थोरा मोठ्यांचा राखलाय मान
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला

― अंबज्ञ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त !
Cadbury Chocolate कंपनी ला पाठवून द्या .. जिंगल म्हणून Happy

छान...