दोडक्याची चटणी

Submitted by तृप्ती आवटी on 5 October, 2017 - 18:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चार कोवळी दोडकी
उडदाची डाळ मुठभर
एक मोठा चमचा भरून धणे
चार-पाच सुक्या लाल मिरच्या
१ मसाल्याचा चमचा मेथी दाणे
२-३ बुटुक चिंच
अर्धा चमचा हळद
फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी

क्रमवार पाककृती: 

IMG_7543.JPG

दोडक्यांच्या शिरा काढून घ्याव्यात. एका दोडक्याच्या ओबड-धोबड फोडी कराव्यात. बाकी दोडक्यांच्या फोटोत दाखवल्यात तशा पाठी सोलाव्यात. साल आणि थोडा गर पण निघाला पाहिजे. हा सगळा माल एका कढईत तेल, पाणी काही न घालता घ्यावा. हळद आणि चिंचेची बुटकं यातच घालावीत. मंद आचेवर झाकण लावून शिजायला ठेवावे.

IMG_7536.JPG

सालं आणि थोडा गर असं सोलल्यावर उरलेल्या दोडक्यांची भाजी करता येते.

IMG_7537.JPG

दुसर्‍या कढईत तेल गरम करून हिंग, मोहरी फोडणी करावी. त्यात मेथी दाणे, धणे, मिरच्या आणि उडदाची डाळ घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावे. गार करायला ठेवावे.

फोडी शिजल्या की त्या पण गार करून घ्याव्यात. दोन्ही कढयांतले जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. चटणी तयार आहे.

IMG_7494.JPG

वाढणी/प्रमाण: 
५-६ लोकं जेवायला असतील तर बाकी पदार्थांसोबत पुरते
अधिक टिपा: 

काही घरांमध्ये चटणी झाली की वरून लसणाची चरचरीत फोडणी करून घालतात.
या चटणीसाठी कोवळी दोडकीच घ्यावीत. मी वेलीकडे लक्ष न दिल्यानं एक चांगलंच वाढलं आहे. दोडकी घरच्या बागेतली आहेत हे त्यानिमित्तानं समजलं असेलच Happy

माहितीचा स्रोत: 
सौदिन्डियन मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वा! वेगळीच दिसतेय रेसिपी. मला वाटले दोडक्याच्या शिरांची चटणी असेल.
ही मस्त आणि आळश्यांना करायला सोपी दिसतेय! Happy

मस्त आहे रेसिपी. आमच्याकडे तीळ पण भाजून वाटतात यातच. कोवळी आणि फ्रेश दोडकी असली तर फार भारी लागते चटणी.

मस्त रेसिपी!

आमचे येथे शिरा परतून त्यात तीळ, मिरच्या, मीठ, साखर आणि लिंबू घालून वाटतात.
मला शिरा चिरून मीठ/मिरची/लसणीसोबत फोडणीवर खरपुस परतून (न वाटता) खायलाही आवडतात.

अरे वा!

एका मैत्रिणीकडे खाल्ली होती तेव्हा प्रचंड आवडली होती. आलं नाही का ह्या रेसिपीप्रमाणे? (त्यात होतं).

छान दिसत्येय. तीळ/ भाजलेलं खोबरं घालून खाल्लेली आहे मला वाटतं.
बोस्टनला खाल्ली असशील सशल Happy ... आता आलं आलं की हा जोक मारण्याशिवाय गत्यंतर नाही. Proud

तेलंग णा आंध्रा साइडला अश्या चटण्या असतात. मला पण शिरांची चटणी माहीत आहे. कोव ळी दोडकी शोधली पाहिजेत.

मी मिसलं हे. चांगली वाटतेय. करून पाहातो. वरून लाल केलेल्या लसणाची फोडणी जास्त चांगली लागेल.
टोटल तीन दोडक्यांच्या साली आणि त्या तीनातला एक संपूर्ण दोडका हे प्रमाण ना...

योकोबा, एका दोडक्याचा गर आणि चार दोडक्यांच्या साली. एखादं कमी जास्त झालं तरी चालेल मग त्या प्रमाणात इतर जिन्नस घाल.

अमा, हो, ही रेसिपी गोदावरी खोरं नेटिवनं दिली आहे.