प्रिये !

Submitted by सेन्साय on 4 October, 2017 - 23:37

.

.

प्रिये ! चंदन म्हणावं का गं तुला
अखंड सहवास सोबतीला
भीत अवचित पारखलो ह्या श्वासाला
सचित्त तुझ्यासंगे पुढील प्रवासाला

प्रिये ! गुलाब म्हणावं का गं तुला
मुलायम स्पर्श गंधित पसरलेला
नकळत दुरावलो ह्या स्वर्गसुखाला
अस्तित्व खुलवत मम स्मारकाला

प्रिये ! चंद्र म्हणावं का गं तुला
नितळ प्रसन्न आश्वासक शितलतेला
त्रिमितीपार वाहता हे पञ्चप्राण
स्मृति नक्षत्र अलगद पांघरलेला

प्रिये ! काय म्हणु गं तुला
सामगान तुझं अस्तित्व
अविरत कवटाळलेले माझ्या मनाला
शब्दकोष हरवले सारे तुला शोधताना....

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामगान तुझं अस्तित्व
अविरत कवटाळलेले माझ्या मनाला
शब्दकोष हरवले सारे तुला शोधताना.... >>> मस्तच अंबज्ञ छान लिहिलय Happy

मस्तच.!
प्रिये ! काय म्हणु गं तुला
सामगान तुझं अस्तित्व
अविरत कवटाळलेले माझ्या मनाला
शब्दकोष हरवले सारे तुला शोधताना.... सुंदर.!