ध्रुवीय दिवस व रात्र

Submitted by अविनाश जोशी on 5 October, 2017 - 01:36

उत्तर ध्रुवावर सूर्य उन्हाळ्यात सतत क्षितिजावर असतो आणि हिवाळ्यात सतत क्षितिजाखाली असतो.
उत्तर ध्रुवावर सूर्योदय मार्च equinox आधी आहे (सुमारे 20 मार्च); ध्रुवावर जेव्हा तापमान वाढायला लागते त्या वेळेला सूर्य क्षितिजापासून वर वर फेऱ्या मारू लागतो. सूर्योदयाच्या वेळेला त्याची फेरी क्षितिजावरून गोल असते. व हळू हळू उन्हाळ्याच्या उच्चतम तापमान (सुमारे 21 जून) जवळपास 23 अंश ° उंचीच्या उच्चतम बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी सूर्याला तीन महिने लागतात.
त्यानंतर तापमान खाली येण्यास सुरुवात होते, तेव्हा सूर्याच्या फेऱ्या खाली येण्यास सुरवात होते. सप्टेंबर equinox च्या नंतर (23 सप्टेंबर) सूर्य क्षितिजाखाली जाण्यास सुरवात होते. व सूर्यास्त होतो. जेव्हा उत्तर ध्रुवावर सूर्यास्त होतो त्यावेळेस दक्षिण ध्रुवावर सूर्योदय होऊ लागतो. म्हणून उत्तर आणि दक्षिण ध्रुव पृथ्वीवरील सूर्योदय आणि सूर्यास्त वर्षातून एकदाच होतो.
सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळेला असणारा संधी प्रकाश माणसांच्या दृष्टीने दोन दोन आठवड्यांचा असतो. तर खगोल शास्त्रीय दृष्ट्या आठ आठवड्याचा असतो. हे परिणाम पृथ्वीच्या अक्षाच्या कलण्यामुळे आणि सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरण्यामुळे होते . सूर्य जवळ जवळ स्थिर असतो. पृथ्वी फिरताना तिच्या कलण्यामुळे होणार परिणाम वर्षातून एकदाच होऊ शकतो.
उत्तर ध्रुवावरची वेळ हा सुद्धा गंमतीदार प्रकार आहे. बाकी ठिकाणी वेळ रेखांशावर ठरते (longitude) पण ध्रुवबिंदूवर सर्वच रेखांश एकत्र येतात त्यामुळे रेखांशावर वेळ ठरवता येत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी ठिकाणी वेळ रेखांशावर ठरते (longitude) पण ध्रुवबिंदूवर सर्वच रेखांश एकत्र येतात त्यामुळे रेखांशावर वेळ ठरवता येत नाही.
>>
अरेच्चा! ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. ध्रुवीय प्रदेशासाठी वेगळा टाईम झोन असतो का?

ध्रुवीय प्रदेशासाठी वेगळा टाईम झोन असतो का?>>>.>>>
नाही . तिथे जाणारे GMT तरी वापरतात किंवा स्वतःच्या देशाची वेळ वापरतात

तुमच्या लेखात तुम्ही उत्तर ध्रुवावर दिवाळी साजरी करायचं कारण ६ महिन्यांची रात्र संपून दिवस सुरु होणे हे लिहिलंय. ह्यात वेगळं म्हणताय.
की ३००० वर्षांपूर्वी तुम्ही म्हणताय तशीच परिस्थिती होती आणि आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्यात फरक पडलाय?

त्यात फरक पडलाय?>>>
हा लेख ६ महिन्यांच्या दिवस रात्र समजण्याकरता आहे, तुमच्या प्रश्नाचे उत्तर वेगळ्या लेखात देत आहे

<<< सूर्य क्षितिजापासून वर वर फेऱ्या मारू लागतो.>>>
मी तर ऐकले होते की सूर्य फक्त कर्कवृत्त ते मकरवृत्त या दोन अक्षांशातच फेर्‍या मारतो.
इकडे आम्ही कर्कवृत्ताच्या बरेच वर आहोत तर आम्हाला सूर्य नेहेमी दक्षिणेलाच दिसतो, म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दक्षिणेकडूनच जातो, उत्तरेकडे कधी दिसत नाही.

उत्तर धृवावर आणि त्याच्या जवळच्या भागात सूर्य उदय आणि अस्त या बद्दल इथे फोटो, चित्रे आणि व्यवस्थित माहिती आहे
https://www.pmel.noaa.gov/arctic-zone/gallery_np_seasons.html