देवा ऐकतोयस ना??

Submitted by mr.pandit on 25 September, 2017 - 06:20

देवा ऐकतोयस ना??

जास्त् काही नाही देवा
फक्त् थोडच मागतोय
गाडी,बंगला अन सेवेला नोकर
एवढच तर द्यायला सांगतोय
पण तु ऐकतोयस ना??

आधी संगीता नंतर ऐश्वर्या
मला सोडुन निघुन गेली
आता कतरिना मिळावी
एवढच तर म्हणतोय ना
देवा ऐकतोयस ना??

एकजण म्हणाला देव हळवा असतो
तपश्चर्ये ला लगेच भुलणारा असतो
म्हणुन मी हि तपश्चर्या करतोय ना
तीन ऐवजी दोन वेळाच जेवतोय ना
पण तु हे बघतोयस ना??

देवा आता खरच हद्द झाली
माझी सहनशक्ती संपत आली
मी इतका विनवण्या करतोय पण
एकतरी मागणी मान्य् करतोयस का??
देवा ऐकतोयस का???

देवा तुम्ही काही आमचे ऐकत नाही
शांत बसुन राहण्यातही अर्थ् नाही
विचार करुन मला कळुन चुकलंय
कष्टाशिवाय माणसाला पर्याय नाही.
देवा ऐकतोयस ना..

-निखिल २५/०९/२०१७

देवाचे उत्तर
https://www.maayboli.com/node/63996

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच!
देवाचे उत्तर Lol

वाह वाह.. जियो... पंडितजी आणि अक्षय

बा द वे... अर्धी कविता वाचली मला वाटलं सल्लू चे आत्मकथन आहे की काय .. संगीता, ऐश्वर्या, कतरीना.. हा हा

@ राहुल @अंबज्ञ @च्रप्स @सचिनजी @प्रणय @अक्षय @मेघा @ऋन्मेष
प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद Happy