मित्रा (भक्ता) बघ जमतंय काय??

Submitted by अक्षय. on 25 September, 2017 - 06:33

मित्रा (भक्ता) बघ जमतंय काय??
तू आईबापाची सेवा कर
तुझी मुलं तुझी करतील
नोकर नाही पण हक्काचा
माणूस मिळेल
मित्रा (भक्ता) बघ जमतंय काय??

ऐश्वर्या, संगीता कशाला हवेत
आहे तिला कतरीना म्हण
इच्छा तुझी पूर्ण होईल
मित्रा (भक्ता) बघ जमतंय काय ??

सकाळी श्रीमंता सारखा
संध्याकाळी भिकार्यासारखा जेव
तुझ्यामधल्या मला उपाशी चुकूनही ठेऊ नकोस
तुला काही कमी पडणार नाही
मित्रा(भक्ता) बघ जमतंय काय ?

तुला कळलं ह्यात आंनद आहे
कष्टाशिवाय आयुष्याला मजा नाही
सुख सुख म्हणजे काय असतं
हांतरुणात पडताच आलेली गोड झोप
ती मिळाली की आणखी काय पाहिजे
मित्रा बघ जमतंय का ?
_अक्षय
कट्टा नेहमीच काहीना काही शिकवत असतो. वाचक, लेखक, कवींच्या ह्या कॉम्बोपॅक मध्ये सतत जुगलबंदी होत असते. आज सकाळी पंडितजी यांनी केलेल्या https://www.maayboli.com/node/63994 ह्या कवितेला उत्तर म्हणून ही कविता केलेली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल, पंडितजी, अंबज्ञजी, बी.एस., सचिनजी,प्रणय., कावेरि, ऋन्मेश, नीलम बुचडे आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पंडितजी तुम्हाला स्पेशल धन्यवाद.
देव आणि भक्त - दोघांनाही हात जोडून नमस्कार >>+१

खूप छान हा Happy

भक्ताने प्रश्न विचारले देव धावून आले.