Submitted by कुणी दिवाणा on 23 September, 2017 - 12:22
मुकेपणाचा जरी जन्मभर आव घेत होतो
नसेल ठाउक तुला,तुझे मी नाव घेत होतो
वळणांवळणांवर विश्रांती उगा बहाने
नसेल ठाउक तुला, पुन्ह्यांदा डाव घेत होतो
कूठे जायचे पुसणार्या वाटांनी वेडे केले
नसेल ठाउक तुला, दिशांचा ठाव घेत होतो
मढ्यापूढे रडणार्यांच्या थव्यात सामिल झालो
नसेल ठाउक तुला, प्रितीचा भाव घेत होतो
बघुन बिंब ओंजळीत माझे असा हरवलेलो नसेल ठाउक तुला,तुझा पेहराव घेत होतो
बाजारु भावाने र्हदये विकणार्या प्रेमाचे
नसेल ठाउक तुला, विकत ते गाव घेत होतो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा मस्त गझल.. आवडली.
व्वा मस्त गझल.. आवडली.
प्रत्येक शेरानंतर एक ओळ रिकामी सोडावी असं वाटतं, बदल कराल का?
धन्यवाद! आपल्या सुचवलेल्या
धन्यवाद! आपण सुचवलेल्या बदलाचे स्वागत आहे.