पेट्रोल का भाव खातय?

Submitted by माहिती मॅन on 23 September, 2017 - 12:07

पेट्रोलची किंमत वाढत आहे, पण पेट्रोलवर किती, काय टॅक्स लावतात हे अजिबात माहित नव्हते, मग ते शोधायला सुरुवात केली, बऱ्याच ठिकाणावरून, बघून ही माहिती समजवून घेतली, या किंमती नॉन ब्रँडेड पेट्रोलच्या आहेत, किंमती अगदी ०.४७ अशा स्वरूपात मुद्दामून नमूद केल्या नाहीत, हे टॅक्स बरेच किचकट वाटत होते, ते सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

किती रुपयाला क्रूड (कच्चे) ऑइल मिळते?
१) ३३०० ते ३४०० रुपये पर बॅरल (२३ सप्टेंबर २०१७)
२) एक बॅरल म्हणजे १५९ लिटर्स
३) २१ ते २२ रुपये एका लिटर मागे

  • वाहतूक, रिफायनरी अंदाजे खर्च = ९ ते १० रुपये एका लिटर मागे
  • केंद्र सरकारचा EXCISE ड्युटी (कर) = २१ ते २२ रुपये एका लिटर मागे
  • महाराष्ट राज्य सरकारचा VAT/ सेल्स टॅक्स (कर) = २३ ते २४ रुपये एका लिटर मागे
  • पेट्रोल पम्प्स डीलरचे कमिशन = ३ ते ४ रुपये एका लिटर मागे
  • एकूण किंमत = ७७ ते ८१ एका लिटर मागे (मुंबई व उपनगर मर्यादित)

काही ठळक मुद्दे:
१) पेट्रोल, डिझेलवर GST लागू नाही.
2) पेट्रोलवर जरी जास्तीत जास्त टक्क्याने GST लावला तर पेट्रोलची किंमत, एका लिटर मागे, ५१ ते ५२ रुपये होऊ शकते.
3) केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात EXCISE ड्युटी कमी केली नाही.
४) प्रत्येक राज्यात पेट्रोलवरचा VAT/ सेल्स टॅक्स हा वेगवेगळा आहे.
५)) मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये देशातील सर्वात जास्त, २६ टक्के VAT/ सेल्स टॅक्स आहे.

विरोधकांची बाजू:
१) क्रूड (कच्चे) ऑइलचे भाव कमी असताना, सरकारने पेट्रोलचे भाव कमी का केले नाहीत?
२) पेट्रोलवर GST का लागू केला नाही?

सरकारची बाजू:
१) सरकार पेट्रोलवरचा टॅक्स कमी करू शकत नाही, कारण सरकारला महसुलाची गरज आहे.

संदर्भ:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://factly.in/the-central-government-collects-more-tax-on-petrol-tha...

त्या whatsapp forward चा fact check

As per the latest information available on PPAC (Petroleum Planning & Analysis Cell) regarding the price buildup of liter petrol in any HPCL Petrol bunks in Delhi, the price of liter petrol to dealers as of 01 July 2021 was Rs. 39.33 and the dealer commission was Rs. 3.82 per liter. While the central excise duty stands at Rs. 32.90, the state tax, which is 30% in Delhi amounts to Rs. 22.82.

The tax breakup for petrol on Tuesday showed basic cost as Rs34.33 per litre, while Maharashtra VAT/surcharge was Rs28.06 and Centre’s excise duty was Rs33.64. Dealer commission was Rs3.68 for every litre, oil industry sources said.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/in-mumbai-2-more-hikes-to-rs-100/litre-for-petrol/articleshow/82956760.cms

रुन्मेषनी इथे फेक फॉरवर्ड्स पाठवण्यापेक्षा बियारच्या किंमती विषयी काळजी करावी.

हे आकडे खरे आहेत ना, तुमच्यावर विश्वास ठेवून लिंक ढकलू का जिथून हे फॉर्वर्ड आलेले तिथे. मला ते ईंग्लिश फार वाचले जात नाही.

The tax breakup for petrol on Tuesday showed basic cost as Rs34.33 per litre, while Maharashtra VAT/surcharge was Rs28.06 and Centre’s excise duty was Rs33.64. Dealer commission was Rs3.68 for every litre, oil industry sources said.
Diesel also went to an all-time high of Rs91.57 per litre here. Its basic cost is Rs36.44, VAT/surcharge is Rs19.78, while Central excise duty is Rs32.90 and dealer commission Rs2.45, sources said. Activists said the Centre and state must roll back excise duty and VAT to give relief to consumers.

TimesofIndia ची लिंक पण दिलेली आहे प्रतिसादात. त्यावर जाऊन आकडे बघू शकता. आणि हो अजून काही व्हाट्सअप्प फॉरवर्ड ढकलायच्या आधी थोडी फॅक्ट चेक करा. इथे एक वैनी आहेत ते व्हाट्सअप्प वर आलेलं सगळं इथे डकवतात आणि नंतर १० वेळा माफी मागतात.

मला शोधायला बोअर होते फॅक्ट. ईथे लगेच खरे खोटे करून मिळेल म्हणून चिपकवली पोस्ट. मोबाईलवरून बातमी कॉपी पेस्ट होत नव्हती म्हणून वर पोस्ट टाकली. आणि ती मोबाईलवरून कॉपी पेस्ट करून त्या व्हॉटसपग्रूपात ढकलली.
मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही. जिथे एखाद्या पक्षाचे भक्त दिसतील त्यांची मजा घेत फिरतो. माझी निष्ठा देशावर आहे. मी एक सामान्य माणूस आहे आणि मला महागाई नकोय Happy

All the Petrol Pump should have board like this:

Basic Rate: *35.50*
Central Govt Tax *19.50*
State Govt Tax *41.55*
Distributor *6.50* ------------
Total. *103.05*

Then public will understand who is responsible.
share it with your groups & friends.

Wa/forward

____

हे खोटे आहे, केंद्राचा कर जास्ती आहे

बर.... दोघांचा कराचा वाटा अगदी सारखा आहे असे जरी म्हणले तरी मग राज्याने रस्त्यावर आंदोलने करण्यापेक्षा राज्याचा कर कमी करुन चांगला पायंडा पाडावा ना!
मागच्या वेळी फडणवीसांनी राज्याचा कर कमी करुन पेट्रोल पाच रुपयानी स्वस्त केलेले, या सरकारने कुठेही राज्यसरकारच्या करात सवलत दिलेली आठवत नाही!!

म्हणजे नसेल करायचा कर कमी तर राहूदे पण मग मग ते बैलगाडीवर वगैरे चढून तमाशे करु नयेत Wink

मोदी मुख्यमंत्री होता मग तेंव्हा का तो केंद्राच्या नावाने बोंबलत होता ? त्याने कधी राज्याचा कर 0 केला का ?

मोडीभक्तांनीदेखील खोटे फॉरवर्ड करू नयेत

खोटे बोला पण रेटून बोला हा भाजपचा गुरूमंत्र आहे.

इंधन दर वाढायची कारणे -
हिवाळ्यात युरोपात यांचा खप जास्त असल्याने किंमत जास्त. आता उन्हाळा संपला तरी खप कमी झाला नाही.
फुक्कट लशी देण्यासाठी सरकारला पैसा हवाय. बजेटमध्ये जे ३५००० करोड आहेत ते "फुकट लशीसाठी मोदींचे लाख लाख आभार" अशी होर्डिंग्ज जागोजागी लावण्यासाठी.

हाहाहा!
असूदे असूदे!

थोडक्यात नावडतीचे मीठ अळणी आहे ते आलय लक्षात Wink

२०१४-१५ पासून केंद्राने पेट्रो उत्पादनांवर गोळा केलेली एक्साइज ड्युटी
2014-15 2015-16 2016-17 2017-18 2018-19 2019-20 2020-21 (P)
99,068 178,477 242,691 229,716 214,369 223,057 371,726

महाराष्ट्राने गोळा केलेला व्हॅट
19,795 19,417 23,160 25,256 27,191 26,791 25,430
एक्साइज जवळपास तिप्पट झालाय तर व्हॅट २८% नी वाढलाय.

टोपी पडली असेल त्याची रस्त्यात वाऱ्याने >>
मागे टोपी घालणारा मस्त हसतोय.
बाईकचा लेफ्ट इंडिकेटर तुटलाय.>>
सरकारने डावीकडे वळणारे रस्ते बंद केल्याने डावीकडचा इंडिकेटर काढून टाकला असेल.

मे २०१४ मध्ये पेट्रोल वर १०.३९ रु प्रति लिटर एक्साइज लागत होता. मे २०२१ मध्ये ३२.९० रु. लागतो. तिप्पट झालाय.
तेच राज्ये लावीत असलेला व्हॅट दुप्पटही झालेला नाही.
डिझेलच्या बाबतीत सेंट्रल एक्साइज मे २०१४ मध्ये ४.५० रु प्रति लिटर होता तो आता ३१.८० रु झालाय. म्हणजे सात पट झालाय. इथेही व्हॅट दुप्पटही झालेला नाहीए.

केंद्राने करोनोचे नियम कुठल्याही परिस्थितीत शिथील करू नये अशी तंबी सर्व राज्य सरकारांना दिली आहे त्यामुळे संघ,भाजपा, हिंदुराष्ट्र प्रेमी व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन न करता आपल्या केंद्रीय बापा विरोधात दिल्ली येथे जाऊन आंदोलन करावे.

#TAXCHOR
पाटील जयंत

https://www.facebook.com/100001057153894/posts/4450820344963160/?sfnsn=w...

**

Pages