मूग डाळीचा हलवा

Submitted by प्रीतीसंगम on 21 September, 2017 - 12:26
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी मूग डाळ
१/२ कप खवा
३/४ कप गरम दूध
३/४ - १ कप गरम पाणी
३/४ वाटी साजूक तूप
३/४ वाटी साखर
१/२ टिस्पून वेलची पूड
५-६ बदाम

क्रमवार पाककृती: 


१) मूग डाळ मंद आचेवर गुलाबी-लालसर रंग येईपर्यंत भाजावी. डाळ एकसारखी भाजली गेली पाहिजे.
२) डाळ कोमट झाली की मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी.
३) खवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
४)आता कढईत तूप गरम करून भरडलेली मुगडाळ त्यात परतून घ्यावी. केशरी रंग येईपर्यंत परतावे.
५)नंतर गरम दूध थोडे थोडे घालून परतावे व मंद आचेवर वाफ काढावी.
६) नंतर गरम पाण्याचा हबका मारून परतत राहावे. डाळीचा रवा पूर्ण शिजेपर्यंत वाफ काढावी.
७) डाळीचा राव फुलून आला की त्यात खवा, साखर आणि वेलचीपूड घालावी.सर्व नीट मिक्स करून एक वाफ काढावी
८) गरमागरम हलवा बदामाचे काप किंवा किस घालून सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

आपल्या आवडीप्रमाणे शिरा बनवतानाच काजू,बदाम,मनुके इत्यादी घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सिनफुल पदार्थ आहे.परवाच खाल्ला होता.त्यामुळे खाणार आणि बनवणार नाही.
पण तुमचा रेसिपी फोटो फार जबरदस्त आलाय.

Pages