रोहिंग्या मुसलमान (बातमी)

Submitted by माहिती मॅन on 20 September, 2017 - 18:03

खूप दिवस रोहिंग्या मुसलमान यांच्या बद्दल टीव्हीवर बघत होतो, पण नेमकी बातमी कळत नव्हती, म्हणून या बातमी बद्दल वाचायला, बघायला सुरुवात केली, माझ्या सारखे अजून कोणीही असतील, तर कदाचित त्यांच्यासाठी खालील माहिती उपयोगी असू शकते.
इथे माझे वैयक्तिक मत द्यायचे नसून, बातमी सोप्या शब्दात मांडायची आहे

रोहिंग्या मुसलमान कोण आहेत?
म्यानमार देशातून निर्वासित झालेले मुस्लिम बांधव, त्यांना भारतात आश्रय हवा आहे.

म्यानमार मधून निर्वासित का झाले?
कारण रखाइन बुद्ध लोकांनी रोहिंग्या मुसलमान लोकांवर वारंवार प्राणघातक हल्ले केले.

हा तंटा कसा सुरु झाला?
१) दुसऱ्या महायुद्धायच्या वेळी जपान व बुद्ध लोक, हे इंग्रज व रोहिंग्या मुसलमान यांच्या विरोधात लढले.
२) इंग्रज व रोहिंग्या मुसलमान हरले, १९४८ ला म्यानमार स्वतंत्र झाला.
३) १९४८ ला आलेल्या नवीन म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमान यांना नागरिकत्व नाकारले.

भारतातली आत्ताची परिस्थिती
१) भारतीय सुप्रीम कोर्टमध्ये, प्रशांत भूषण, कपिल सिब्बल आणि अजून काही वकील रोहिंग्या मुसलमान यांच्या बाजूने लढत आहेत, भारतात सुमारे ४०, ००० रोहिंग्या मुसलमान यांना सामावून घ्यावे अशी त्यांची भूमिका आहे.
२) भारतीय सरकार याच्या विरोधात आहे

मला अजून वेगळ्या विविध विषयांवर, सोप्या शब्दात बातमी सांगायची आहे, या फक्त बातम्या असतील (ओन्ली फॅक्टस) त्यात वैयक्तिक मत अजिबात नसेल, तुम्हाला जर अशा बातम्या वाचायला आवडणार असतील, तर प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा
धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

40000 रोहिंग्यां पैकी जे जम्मू मध्ये रहात आहेत, आत्ताच इंसिडेंट होण्या आधीच, त्यांना आता डिपोर्ट करण्यची भाषा केल्या मुळे हे लोक कश्मीर मध्ये पळाले आहेत.जम्मू चे लोक त्यांना डिपोर्ट करा असे म्हणत आहेत, कश्मीर मधले मात्र त्यांना सपोर्ट करत आहेत सो तिथे त्यांना सेफ वाटत आहे.

https://www.google.co.in/amp/m.hindustantimes.com/india-news/i-can-do-no...
(
Haroon Rashid is one of these refugees, who arrived in Jammu in 2012. But his stay in the winter capital of the state was equally tumultuous after radical voices said they were not happy with the Rohingyas living there.

Last year, the 50-year-old fled Jammu as well after the clamour for their deportation grew in the Hindu majority region. He along with his wife and four children took refuge in Khimber, where a religious seminary Darul Uloom Bilaliya has spared three buildings for some 17 Rohingya families.

Rashid had not settled properly in Kashmir yet that the latest violence erupted in his home state of Rakhine.

“My uncle and cousin were killed by Buddhists. Now, I am not able to contact my sister. She has gone missing after the latest violence. We are being killed and nobody seems to care,” Rashid said.

The 17 families comprising some 70 members, including 30 children, arrived in Kashmir in the past one year after a sense of fear gripped them in Jammu where they had started arriving in 2009.

The continuing turmoil in the Kashmir valley has inflamed religious tensions in Jammu and Rohingyas are bearing the brunt of it. Jammu Chamber of Commerce and Industry even threatened that if the state government does not deport the Rohingyas, “we will identify and kill them”.

Noor Hussain came to Kashmir along with his wife and two children six months ago.
“Here everybody is good to us, our Muslim brothers. They tell us that whosoever tries to harm us they will protect us. It gives a sense of satisfaction. It is not like Jammu,” the 26-year-old said.

{Jammu Chamber of Commerce and Industry even threatened that if the state government does not deport the Rohingyas, “we will identify and kill them”.}
हे असं म्हटलं असेल तर भयंकर आहे. आता हे लोक रोहिंंग्या म्हणून दुसऱ्या कोणाला मारणारच नाहीत कशावरून

मुळात हे रोहिंग्या आधीच आत येऊन जम्मूत (आणि भारतात इतर ठिकाणी) रहात होते, तेव्हा कोणाचा विशेष लक्ष गेलेले दिसत नाहीं ह्यांच्याकड़े. जेव्हा म्यानमार सरकार ने मोठ्या प्रमाणात मारायला सुरुआत केली आणि हे लोक मोठ्या प्रमाणात घुसू लागलेत मग ह्यांना समजलेले दिसतेय, इथे 40000 रोहिंग्या आहेत, ह्यांना डिपोर्ट करा, हे मी नंतरच ऐकू लागले.म्हणजे ही गोष्ट जहाली नसती तर...

दुहेरी तुम्ही झाला/झाली/झाले ऐवजी आवर्जून जहाला/ जहाली /जहाली असे का लिहिताय बरे? कवी आहात का ? ते ' तसले '?

नाहीं नाहीं.. मला देवनागरीत लिहायची सवय नाही म्हणून, मराठी कीबोर्ड यूज़ करायची सवय नाही. मला मराठी इंग्लिश मध्ये लिहायची सवय आहे.ह्या कीबोर्ड वर 'zhale' टाइप केले तर कन्वर्ट करून 'जहाले ' दखावते आहे. 'ण' चे जोडाक्षर शब्द इंग्रजीत टाइप केला तर कन्वर्ट करून 'न' मध्ये दखावते. सो anane टाइप केले तर 'आनने' दिसते आहे. पण मी मराठी अक्षरांचा कीबोर्ड लवकरच वापरायला शिकते आहे. सॉरी.

CNN, BBC, आणि आमच्याकडे बातम्यात हिन्सेच्या बातम्या आणि निर्वासित लोकान्चे होणारे हाल यान्च्या हृदयद्रावक कहाण्या बाहेर येत आहेत. लहानग्यान्च्या होणार्‍या हालाची चित्रे तर बघवत नाही.

२५ऑगस्टला अनेक पोलिस चौकीवर हल्ला केला, १२-१५ सुरक्षा रक्षकान्ना मारले हे प्रमुख कारण म्यानमार सरकार देत आहे. काही लोकान्च्या अविचारी हिन्सेमुळे लाखो निरपराधी लोकान्ना शिक्षा होत आहे.

काल कराची मध्ये धर्मांध सुन्नी नी पाच शिया लोकांची हत्या केली.
आज ट्विटर वर शिया जीनो साईड चा ट्रेंड चालू आहे , आणि कराची मध्ये धर्मांध सुन्नी रस्त्यावर येवून शिया विरोधात दंगल सुदृष परिस्थिती निर्माण केली आहे .....
त्या बद्दल महान पत्रकार शेखर गुप्ता यांनी ट्विट करून निषेध नोंदवला !!!!!
https://twitter.com/ShekharGupta/status/792371760754667521?s=19

सर्व धर्मातले धर्मांध वाईटच. कधी धर्म, कधी देश, कधी भाषा अंध्यत्व विविध प्रकारचे असते.

म्यानमारमधील बहुसंख्य बौद्ध धर्मीय राष्ट्रीय सैन्याने केलेल्या पाशवी अत्याचारांची कहाणी आता गुन्हेगारांच्या तोंडून येत आहे. सेब्रेनिकाच्या हत्याकांडाची आठवण करून देणारे हे हत्याकांड आहे.
https://www.economist.com/asia/2020/09/12/two-burmese-soldiers-confess-t...

भारत हा बहु धर्मीय देश आहे सर्व धर्माच्या लोकांचा भारताच्या विकासात हात आहे ..
भारत हा बहुधर्मीय च राहणार ते बदलता येणार नाहीं.
मुस्लिम हे ह्या देशाचे मालक च आहेत जेवढे हिंदू आणि बाकी धर्मीय आहेत.
हिंदू मुस्लिम मध्ये भांडण लावायचे उद्योग राजकीय पक्षांनी बंद करावेत.

Pages