मायबोली आणि प्रेम

Submitted by mr.pandit on 20 September, 2017 - 03:21

मायबोली वर झाली भेट
विपु मुळे झाली ओळख
जितक्या लवकर जुळल प्रेम
तितक्याच लवकर झाल ब्रेकअप

प्रेमावरची तुमची कविता
खरच खुप भारी होती
तिने पहिल्यांदा केलेली ही विपु
मी अजुन जपुन ठेवली होती

गप्पांच्या धाग्यावर आमची प्रिती
वाहत्या पानासारखी वाहत गेली
भारंभार निघणाऱ्या धाग्यासारखी
दिवसेंदिवस अजुन वाढत गेली

मी लिहिलेल्या प्रत्येक कवितेला
ती हमखास प्रतिसाद द्यायची
मी दिलेल्या धन्यवादामुळे
तिची विपुही भरुन वाहायची

अचानक एक दिवस तिच्यात
संपादित केल्यासारखा बदल झाला
चालु घडामोडी वर होतो तसा
आमच्यात जोरदार वाद झाला

रागाच्या भरात मी उगाचच
वेताळांच्या धाग्यावर वाद घातले
कैच्याकै प्रतिसाद असे म्हणुन
तिने आगीत अजुन तेल ओतले

आता ती प्रतिसाद देत नाही
म्हणुन मी ही धागा काढत नाही.
तिच्या नावावर टिचकी मारताच येत
हे पान पहायची परवानगी नाही.
- निखिल २०-०९-२०१७

Group content visibility: 
Use group defaults

"धागे"दोरे धुंडाळताना
आज अचानक मला कळले
ती "ती "नसून "तो"होता
अन सारेच मुसळ केरात गेले Happy

@राहुल @सायुरी @अंबज्ञ @अक्षय सर्वांचे खुप धन्यवाद
Submitted by अनन्त्_यात्री on 20 September, 2017 - 15:46 >> Lol हे पण चालल असत खुप धन्यवाद प्रतिसादाबद्दल

Submitted by अनन्त्_यात्री on 20 September, 2017 - 15:46
"धागे"दोरे धुंडाळताना
आज अचानक मला कळले
ती "ती "नसून "तो"होता
अन सारेच मुसळ केरात गेले

Rofl

वा. मस्तच जमलीये..
धागे"दोरे धुंडाळताना
आज अचानक मला कळले
ती "ती "नसून "तो"होता
अन सारेच मुसळ केरात गेले
Happy

Rofl मस्त आहे.
अनन्त यात्री तुमचा प्रतिसाद पण मस्त आहे Lol

आज वाचली,
मस्तेय.

तिच्या नावावर टिचकी मारताच येत
हे पान पहायची परवानगी नाही. >>> Lol

खूप छान..... छान...छान.............
मा - य - बो - ली
मारवा मंजिरी
यदा कदा ही सुन्दरी
बोले मुक्यापरी
लीला सुगंधाची
मालती गुच्छे लोबंले
यथेच्छ डुलले
बोल अबोलीचे घुमले
लीला ऋतुराजाची
मागील दारा टपोरा मोगरा
यशगाना देई हांकारा
बोलावी तगरा पुष्पवृंद सारा
लीला हसर्‍या प्राजक्ताची
माकंद मोहरला
यथाकाळ फुले गुलमोहोराला
बोगनवेल ' बागेश्री ' दाराला
लीला माळ्याची ..लीला भगवंताची..
माळेसाठी फुले सज्ज झाली
यत्ने धाग्याने गुंफिली
बोच सुईची नुरली
लीला सुबक हस्तकलेची ..( भगवंतासाठी )
विषय: काव्यलेखन

मी एकदा टाकलेली कविता . प्रत्येक कडव्यात प्रत्येक ओळीचे आद्याक्षर मा -य-बो-ली असे आहे

अप्रतिम अगदी
भारी जमलय
प्रतिकियेबद्दल धन्यवाद Happy