अभिप्राय तुमचे

Submitted by चाफा on 7 November, 2007 - 22:23

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००७ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरुर कळवा.
-संपादक मंडळ

विशेषांक लेखन: 

abhishruti,
"चाय..." आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद Happy
संदीप

अतिशय सुरेख मांडणी, आणि तितकेच सुरेख साहित्य ... जे जे वाचले ते सगळे आवडले.

अभिनंदन आणि धन्यवाद !!

किती दिवसांनी दिवाळी अंकातले उरलेले भाग वाचायला फुरसत मिळालीये.
इंद्रधनुष्य
खेळ सात सुरांचा- छानच लिहिलयस अभिश्रुती. कधी कधी असले कार्यक्रम म्हणजे चित्रापेक्षा फ्रेम अवजड असला प्रकार असतो. काळ बदलतो तसा खेळ बदलतो, खेळाडू बदलतात, परिक्षक आणि प्रेक्षकही बदलतात.... बदलत नाही ती जादू-सात सूरांची.
सात ठिपके सात ओळी-जेलो, अतिशय सुंदर कल्पना आणि सुंदर अविष्कार. रांगोळीतल्या ठिपक्यांचं रांगोळीतलं स्थान.... किती चपखल उपमा... तुमचं अजून वाचायल आवडेल.
आभळा- सुदीर्घ गज़ल. अनेकानेक शेर... नुसते वाचत रहावेत. प्रसाद, अतिशय ताकदीचं लिहिलय!
पियानोवरची सात गाणी- काय मस्तं कल्पना आहे! शिवाय त्याला दृश्यांची जोड. ट्युलिप, सुंदर लिहिलय. (तुमचा ब्लॉगही वाचते मी.... अगदी नियमीत नाही, पण जमेल तसा. अतिशय मनाला भिडणारं लिहिता. तुम्ही लिहित रहाणारच.... बघायलाच नको!)
प्यार दिवाना- माझं आवडतं.
दोस्त दोस्त ना रहा - मुकेश फारसा आवडीचा गायक नाही.... पण राजकपूर आवडीचा. त्याचा अभिनय लाजवाब आहे इथे....
चलो इकबार फिरसे... काय मस्तं लिहिलयस.... पियानोही पात्रात धरलाय्-अगदी अगदी खर!
बचपनके दिन... नूतन... अहाहा! (सुजाता-ह्या लेखानंतर परत एकदा काढून बघितला)
आपके हसीन रुख पे.... यातलं 'मेरा दिल' वरची रफीची हरकत फक्त जीवघेणी!
एकच सुधारणा सुचवते- मनोजकुमारच्या किंवा राजेंद्रकुमारच्या हातात बाजाच्या पेटी ऐवजी बुलबुलतरंग द्यावा... खिळ्याने ठोकून एक वाटी बसवलेला Happy

अंक जरा उशीरानेच बघतेय, आत्ता फक्त दिवाळीअंकाचे दर्शन घेतलय. खुपच देखणा आणि सुमधुर झालाय अंक. मुखपृष्ठावरची बासरीची कल्पना मस्तच. आता हळु हळु लिखाण वाचुन प्रतिक्रीया देते.

मी आज अन्क वाचला प्रथम ! खूप छान आहे......... चाय रेम मस्त आहे... मी घरात असलो की चहाचा कप घेऊन अन्गणात येऊन बसतो... त्याची आठवण झाली... बाकी अन्क हळूहळू वाचेन..

केदार जोशी यांचा १९४७ हा लेख आवडला. त्यांचा हा लेख मी आमच्या "महायज्ञ" ह्या नुकत्याच सुरु केलेल्या मराठी मासिकात छापू शकतो का ? केदार जोशी यांची परवानगी मिळेल का ? त्यांचा email id मिळाल्यास आनंद होईल. लेख खूप छान पद्धतीने लिहिलेला असल्याने वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी खात्री वाटते. कृपया अभिप्राय कळवावा
राहुल रतुनावर
कार्यकारी संपादक
महायज्ञ मासिक
पुणे

राहुल तुम्ही केदारच्या विचारपुस मध्ये तुमचा निरोप लिहु शकता किंवा ह्या लिंक वरुन संपर्क वर क्लिक करुन तुम्ही त्याला ईमेल ही पाठवु शकता .
http://www.maayboli.com/user/26

Pages