Submitted by चाफा on 7 November, 2007 - 22:23
मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००७ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरुर कळवा.
-संपादक मंडळ
विशेषांक लेखन:
शेअर करा
अंक आवडला
दिवाळी अंक आज वाचायला जरा फुरसत मिळालि. जितके वाचले तितके.
लांडगा आला रे ) असामी सुरेख जमलि आहे.
सुखात्मे ) स्वातिजी एकदम सुंदरच.
अद्भुताचा प्रवास ) अजुक्काजी खुपच छान
कट ) दाद कट छानच शिजवलात.:)
आमचिही पिकनिक ) चाफ्फ्या हा तुझा स्वानुभव का रे ? कि प्रवासवर्णन?
बाकी आजुन वाचणे आहे .
र्ह्स्व -१
अंक हळुहळु वाचतोय. हेम्स यांची कविता खूप आवडली. बोरकर आणि इंदिरा संतांच्या काही कवितांची आठवण करून देणारी. पण बांधणीत तांत्रिक दृष्टया किंचीत बदल केला तर अजून जास्त छान वाटेल, असे वाटले,म्हणून सुचवतोय. उदा. बोरकरांच्या या ओळीचं मीटर पहा
निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याच्या कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे
पटले तर घ्या नाही तर सोडून द्या आणि लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमा करा.
-र्हस्व बी
असे असावे
भरून यावे माथ्यावरती
जलद थबकलेले ते थोडे
नयनातील अश्रूत सुटावे
गहन घनाचे अवघड कोडे
बहरातील फुलांची छाया
पानगळीवर व्हावी नक्षी
टपटपत्या फुलांत मिळाव्या
बरस क्षणांच्या अक्षय साक्षी
हलकासा जरी तरंग तरी हा
भरून यावे, भारून जावे
अंगावरल्या रोमांचांनी
कवितेला मग कवेत घ्यावे!
अभिप्राय
मला सगळा अंक वाचायला वेळ नाही मिळालाय पण नीलूचं चित्र आणि व्यंगचित्रही सुरेखच....
इतका सुंदर अंक काढल्याबद्दल संपादक मंडळींचही अभिनंदनः)
माऊडी
सनई
मोठ्ठी माफी मागते. नीटपणे वाचलच नाहीये की ती बासरी एक मायबोलीकर वाजवतोय म्हणून.
अभिजीत, छान वाजवलीये बासरी. दिवाळी अंकात, खुद्द मायबोलीकराच्या कलाकृतीची जागा दुसरी कोणतीही कलाकॄती घेऊ शकत नाही!
१९४७ मागच्या खर्या प्रेरणांचा शोध घ्यायला हवाच आहे
दिवाळी अंक चाळला. विषयांतील वैविध्य पाहून उत्सुकता वाढली.
अज्जुकाचा अद्भुताचा प्रवास संस्मरणीय वाटला.
केदार जोशींचा १९४७ वरचा लेख बरीच मेहनत घेऊन लिहिल्याचे जाणवते.
मात्र, १९४७ मागच्या खर्या प्रेरणांचा अजूनही शोध घ्यायला हवाच आहे.
माझा समज असा झालेला आहे की, इंग्रजांना सोयीचे होते म्हणून,
एतद्देशियांतील विघटनवादी, स्वार्थी पुढार्यांना हाताशी धरून लाखो भारतवासियांना
निष्कासित करण्याचा तत्कालीन इंग्रज साम्राज्यकर्त्यांचा कट म्हणजे फाळणी.
दुसर्या महायुद्धातील युद्धगुन्हेगारांना ज्याप्रमाणे शिक्षा देण्यात आल्या, त्याप्रमाणे
फाळणीच्या गुन्हेगारांना आपण शिक्षा देऊ शकू तो सुदिन लवकरच येवो.
झुलेलाल ह्यांची कहाणी हृदयस्पर्शी वाटली. त्यातील लोपामुद्राचे रेखाटनही.
इतर मजकूर अजून वाचलेला नाही. वाचेन तसतसे अभिप्राय लिहेन.
मात्र, संपादकमंडळाने अपरिमित कष्ट घेऊन सुरेख अंक वाचकांस सादर केला,
ते मंडळ ह्यास्तव ते अभिनंदनास पात्र आहे.
इथे डायल अप जोडणीद्वारे श्राव्य भाग ऐकतांना मात्र निराशाच पदरी पडली.
सुश्राव्य संगीतास मुकल्याची भावना झाली.
एम पी ३ डाऊनलोड करून ऐकता येण्याची सोय, पुढे मागे, (किमान कालांतराने)
करता आली तर पाहावी, ही विनंती.
- नरेंद्र गोळे
सावरिया...
Collaborative effort छानच जमलाय तुमचा.. आता पुढच्या वेळी आणि कुण्या देशातुन तुमच्या गाण्याबरोबर Video सुद्धा येउद्या
डाऊनलोडची सोय आहे
गोळे काका,
"स्वर-चित्रे" विभागातील तीनहि audio files डाऊनलोड करता येतील. काव्याच्या खाली तशी लिंक दिली आहे.
~बडबडी
सोड 'मैत्री' अपयशाची
सुधीर, तू आमच्याशी मैत्री केल्याचे आठवते.
आता तू म्हणतोस ती अपयशाशी होती.
जरी न आम्ही देऊ शकतो खातरी तुजला 'यशा'ची |
रे 'सुधीरा' सोड रे सोड, सोड मैत्री अपयशाची ||
- नरेंद्र गोळे
व्यंगचित्राखालील ओळी
संपादकानी ही उणिव माझ्या लक्षात आणुन दिली होती पण काही कारणांमुळे मी ते दुरुस्त नाही करु शकलो त्याबद्दल दीलगीरी..
खरच की!
तात्काळ प्रतिसाद दिल्याखातर कौतुक करावेसे वाटते.
खरच त्या फाईल्सकडे मी बघितलेच नव्हते. आता बघतो.
- नरेंद्र गोळे
कमनीय बांध्याचे मुखपृष्ठ आवडले!
कमनीय बांध्याचे मुखपृष्ठ आवडले!
इर्दगिर्द पुरेशी जागा सोडली असती तर आणखीही प्रशस्त वाटले असते.
रेखाटन सुंदरच आहे. सुरेख.
- नरेंद्र गोळे
गैरसमज दूर करा
सावनी शेंडेची मुलाखत आवडली. तिची अशी पहिलीच मुलाखत वाचनात आली. बेला बद्दल सा रे ग म च्या निमित्ताने बरीच माहिती मिळाली होती. पण सावनीबद्दल प्रथमच एवढं वाचलं.
एक गैरसमज आहे. 'खयाल' हा शब्द बर्याच ठिकाणी 'ख्याल' असा वाचला आहे. मला शास्त्रीय संगितातलं ओ की ठो कळत नही. त्यामूळे तो शब्द नक्की कसा आहे ते कोणीतरी सांगा........
अतिशय सुंदर अंक
अतिशय सुंदर अंक! मुखपृष्ठ, बासरीची धुन व स्वाती आंबोळे यांचे गीत अतिशय आवडले.
जगभर पसरलेल्या मराठी बांधवांना आपले कलागुण प्रसिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोलीच्या संयोजकांना धन्यवाद!
- सतीश माढेकर
ख्याल...
>>एक गैरसमज आहे. 'खयाल' हा शब्द बर्याच ठिकाणी 'ख्याल' असा वाचला आहे. मला शास्त्रीय संगितातलं ओ की ठो कळत नही. त्यामूळे तो शब्द नक्की कसा आहे ते कोणीतरी सांगा........>>
"ख्याल" हा फारसी शब्द आहे. ख्याल म्हणजे विचार. एखाद्या रागाचे स्वरूप आपल्या विचारांनी आणि प्रतिभाशक्तीने रसिकांसमोर उभे करणे म्हणजे "ख्याल गायन". ख्यालाच्या बंदिशीत शब्द फार कमी असतात. यात कलाकाराला स्वत:ची किमया दाखवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रदान केलेले असते. जो ख्याल विलंबित अथवा मध्य विलंबित लयीत गातात त्यास "बडा ख्याल" आणि दृत लयीत किंवा मध्य लयीत गायल्या जाणा-या ख्यालास "छोटा ख्याल" असे म्हणतात.
ख्यालात मुख्यत्वेकरून शृंगाररस आढळून येतो. तत्कालीन राजकीय परिस्थिती त्यास कारणीभूत ठरते. मुसलमान राजवटीच्या अंतिम पर्वात ख्यालगायनाचा आरंभ झाला. या काळात देशात शांतता व सुबत्ता होती. लोक ऐषोआरामात जीवन जगत होते.
ख्याल गायकी नावारूपास आणण्यात न्यामत खॉं (सदारंग) यांचा सिंहाचा वाटा आहे. धृपद-धमार या कर्मठ व नियमांनी जखडलेल्या गायकीने कंटाळलेल्या रसिकांना व कलाकारांना ख्याल गायकी म्हणजे वरदान वाटले.
(संगीत अलंकार किरण फाटक यांच्या "संगीत निबंधावली" या पुस्तकातून वरील माहिती उद्धृत केली आहे.)
सनई
मोठ्या मनाची दाद,
अभिप्राय आणि प्रोत्साहनाबद्दल मी आपला आभारी आहे:-)
दाद आणि ट्यू....
दाद आणि ट्यू.. जबरी आणि अप्रतिम!
दाद २
माझिया मनीचे-
प्रेम वरदान-श्रुती, सु.न्दरच. प्रेमाची व्याख्या पटली.
सैनिक- आवडला
रेशमाच्या रेघा- काजं-बटणं इतपत (आणी हो! हूक आणी लूकही) जमतं त्यामुळे असलं काहीही उच्चच! लेख आणि नमुने छान आहेत
प्रवासवर्णन- आवडलं
श्वना- असे बाले गडी बघितलेत. आवडलं.
चाय- कषेयपेयपानाची समग्र कथा! मस्तय! सवाईच्या चहाची आठवण देऊन काळजाचा एक टाका उसवलात.
बरसात- झुलेलाल, पुन्हा एकदा तुमच्या वेगळ्याच शैलीची झलक. खूप आवडली!
जिज्ञासा-कौतुक करावं तितकं थोड आहे. प्रेरणादायी लिखाण आहे.
लांडगा- उपमा मस्तच आहे.
१९४७-आवडला खूपच.
अजून वाचतेच आहे. अधाशासारखा चाळला की मग स्वस्थपणे कसरीसारखा हळू हळू चावून... आपलं वाचणं चालू आहे.
मी दररोज
मी दररोज एक एक कथा वाचतोय. तन्या बेडेकरची कथा छान आहे. श्रध्दा द्रविडची कथा सुरुवातिला ठिक आहे पण शेवट काही तितकासा पटला नाहि. सुपरमॉम नी पण छान लिहिलय.बाकी जसाजसा अंक पुढे वाचत जाईल तसे तसे अभिप्राय लिहिन
मस्तच
मस्त झालाय अंक. जेवढे वाचले त्यातले आवडलेले.
सावरिया सुंदर.
कथांमधल्या सगळ्याच त्या त्या लेखकाचा ठसा सांगणार्या.पूनम, सुमॉ, विनय,स्वाती नेहेमीप्रमाणेच उत्सुकतेने वाचायला घेतल्या आणि अपेक्षा पूर्ण.
असामी रुपांतरित गोष्टींची एक वेगळीच गम्मत असते ती बरोब्बर साधलीयस.
लेखांमधे चाय रेम, श्वना आवडले.
अद्भुताचा प्रवास मधले फोटोज छान.
मिनोती तुझा लेख वाचून या मनीचे त्या मनी झाले. डिझाईन्स मस्त आहेत. अगदी मनापासून लिहीलेय. बाकी लेख वाचायचे राहिलेत.
हलके फुलके मधे अजय, बडबडी, दाद, लोपामुद्रा,मृण्मयी यांचे लिखाण आवडले. मृणमयी अगदी ग्यादरिंगची आठवण आली.
विठोबा आणि गोपी मिल्या आज रांधण्यात दंग सही.
कवितांमधे हेम्स (डायरी), जयावी, पमा, प्रदीप, प्रमोद, वैभव यांच्या कविता आवडल्या.
चित्रं नेहेमीप्रमाणेच सुरेख. निलू माझ्या गोष्टीला अगदी समर्पक(जवळजवळ माझ्या कल्पनेतलेच) चित्र काढलेस गं.
सुरेखच आलीत एकूण चित्रं.
आज हलके फुलके
सगळ्यात आधी हलके फुलके वाचले. नेहमीची सवय ना.




तर
अजयच्या हास्य बोध कथा आवडल्या. त्यातील टोपि विक्याची कथा म्हणजे बॉल मैदानाबाहेर फेकुन देणारा षटकार आहे.
बडबडीची मॅचची उपमा आवडली. बर्याच ठिकाणी खळखळुन हसलो.
चाफ्याची पिकनिक भन्नाटच आहे. त्यातला "ड्युटि" सारखा विनोद तर क्लासच. जोरजोरात येणार हसु दाबताना तोंडातुन फिस्स फुस्स असले आवाज बाहेर येत होते नुसते.
दाद चा कट मस्तच शिजलाय. खबरदारी म्हणुन मी दिवसा जास्त लोक हापिसात असताना वाचलच नाहि. उशीरा बरेच लोक घरि गेल्यावर वाचायला घेतल आणि मी घेतलेल्या निर्णयाचा मलच आनंद झाला. अप्रतिम आहे वर्णन शैली दादची.
सायकल शुमाकर सारखे अनेक हास्य फुलबाजे आहेत. आता एकच इच्छा आहे. तिने एक वेगवेगळ्या मुड मधील कथासंग्रह काढावा आणि त्याचा पहिला खरेदिदार व्हायला मी हसतमुखाने तयार आहे.
मिल्याचा आज रांधण्यात मस्त आहे. माझ नाव घालुन गुणगुणुन पाहिल. अगदी चपखल आहे की.
आणि मुन्नाभाइ मस्त आहे.फक्त त्यात क्रिकेट का घुसल ते नाय कळाल.
त्यातील विडंबन आज आमच्या कडे मेल वर पोहोचल रे मिल्या.
लोपाला वातावरण निर्मिति मस्त जमली आहे.
GS गजानन आणि विनय सी यांची व्यंगचित्रे आवडली.
मृण्मयी याची कथा आहे छानच पण अजुन खुलु शकली असती.
"सावरीया" नी खरच वेड लावलं आहे!
सावरीया नी खरच वेड लावलं आहे.
विशेषत: काजरेकर यांचे स्वर्गीय संगीत.
अर्थातच आशयघन काव्य आणि कमालीची बहारदार पेशकश अतिशय आवडली.
सारे रसायनच वेड लावणारे झाले आहे.
मायबोलीच्या मुकुटात आणखी एक मोरपीस लागले आहे.
सर्व सहभागी व्यक्तींचे मन:पूर्वक अभिनंदन!
- नरेंद्र गोळे
सुखात्मे
स्वातीजी,
सुखात्मे आवडला. विशेषत: डायरी मधील काही नोंदी. अरुण साधुंची ह्याच शैलीतील एक कथा होती, बहुदा मुक्ती ह्या कथासंग्रहामध्ये. अर्थात कथा अजुन डार्क करता आली असती. दस्तोयव्हस्कीच्या कथांसारखी.
शंतनू
आभार!!!
कौतुकासाठी सर्व मायबोलीकरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!!!
मस्त अंक
वा!! छानच झालाय अंक. अजून पूर्ण वाचला नाहीये पण कल्पना येतच आहे मांडणीवरूनच... संपादक मंडळ, मायबोली प्रशासक ( नुकतेच मनोगत वर जाउन आलो त्याचा परीणाम :)) आणि त्यांना मदत केलेल्या सर्वांचेच खूप कौतुक आहे की त्यांनि इतकी मेहनत घेउन इतका वाचनीय, प्रे़क्षणीय आणि श्रवणीय अंक आपल्या हाती दिला आहे..
सर्वात प्रथम 'सावरीया' ऐकले... काय लिहू? सर्वांनी आधी लिहिले आहेच. मस्त भट्टी जमली आहे... वैभवचे अचूक शब्द, विवेकचे मधुर संगीत आणि स्वातीचा मंजूळ आवाज.. क्या बात हैं!
मुखपॄष्ठ पण मस्त आहे आणि बासरीही छान...
अजून फक्त दाद चा 'कट' आणि ट्यु चा 'पियानो' वाचलाय.
एखादा छोटा विषय घेउन त्याला खुसखुशीत पणे खुलविण्याची तुझी हातोटी जबरदस्त आहे.
दाद तू म्हणजे तर मायबोलीची मंगला गोडबोले आहेस...
ट्यु : निवडलेली गाणी आवडली आणि त्यानुरुप तू केलेले अचूक वर्णन ही सुंदर. त्याकाळातले बारकावे मस्त टिपले आहेस.
---------
माझ्या विडंबन आणि लेखाचे कौतुक केल्याबद्दल सर्वांचे खूप सारे आभार.. खास आभार फ आणि नीलू चे. त्यांनी इतकी समर्पक चित्रे काढली आहेत ना की लिखाणाची खुमारी वाढलीय... विशेषतः संजय दत्तचे व्यंगचित्र अप्रतिम ...
पण मायबोलीकर अभिप्राय देण्यात कंजुस्पणा का करत आहेत. इतक्या कमी comments कश्या इथे?
--------
http://milindchhatre.blogspot.com
साठा उत्तरी
स्वाती आंबोळेची कथा खुपच अप्रतिम आहे. काही काही लोक असे असतात पण त्यांच्याबद्दल फार लिहिलेले न्नाही . पण त्या डायरीतील ओळी,कविता एकदम छान सगळ डोळ्यासमोर ठेवतात. फारच छान!!
नितांतसुंदर अंक
सुरेख मुखपृष्ठ, सरस, वाचनिय साहित्य... सर्वांचेच हार्दिक अभिनंदन.. आज वाचून झाला पुर्ण...
विशेषतः संपादक मंडळीचे अभिनंदन अन आभार...
कथा-
साठां उत्तरी (कथा) वाचुन संपल्या आज
दोन शेवट - कथेच्या form साठी आवडली
तीन पत्त्यांचा तमाशा - वर्णन आणि एकंदरीत व्यक्तीचित्रणं आवडले.
सुखात्मे - या अंकातली माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कथा
प्रतिसाद
अनामिकच सैनिक हे ललित छान आहे तर स्टीव्ह वॉच्या आत्मचरित्राबद्दलचा लेखही छान आहे. केदार जोशीचा १९४७ हा लेखही खुप माहितीपुर्ण आहे
मजा येतेय वाचायला
मी आपली हळूहळू वाचतीये वेळ मिळेल तसं एकेक.
अबोली : फारच गंभीर आणि ताणपूर्ण वाटलं मला वाचताना. शेवट पॉझिटिव्ह असुनही. पूनमच्या हलक्या फुलक्या कथा वाचायची सवय झालीये.
नूरजहान : मजा आली वाचायला. हलकीफुलकी करमणूक
मॅच : बडे मॅचची उपमा चांगल्या प्रकारे निभावली आहेस अखेरपर्यंत.
आता पुढचं वाचलं की पुन्हा प्रतिक्रीया देईन....
सुंदर अंक..
दिवाळी अंक आल्यापासूनच अभिप्राय लिहायचा होता.. पण काही कारणानी राहूनच जात होतं.. सर्वप्रथम एव्हडा देखणा अंक केल्याबद्दल संपादक मंडळाचे आणि ज्यांनी मदत केली अश्या सर्वांचे अभिनंदन आणि खूप धन्यवाद..
शेवटचा प्रसंग अजून थोडा खुलवायला हवा होता असं वाटतं.. ज्यामुळे गोष्टीला अजून depth आली असती..
खूप सुंदर लिहिलिये.. ह्यावर पुरूषोत्तम करंडकात मस्त प्रायोगिक एकांकिका करता येईल.. !
मुखप्रुष्ठावरची बासरीची धून खूप सुंदर आहे.. एकदम प्रसन्न वाटले.. पण चित्र मात्र मला मागच्या वर्षीचे जास्त आवडले होते..
कथा सगळ्या वाचून झाल्या..
लांडगा.. मस्त आहे एकदम.. dramatic.. आवडली..
दोन शेवट.. story चांगली आहे त्यातली.. पण शैली नाही आवडली.. नुसतं narration च narration आहे... पात्र पण खूप आहेत आणि निट
establish झाली नाहीत असं मला तरी वाटलं.. त्यामूळे कळायला पण खूप वेळ लागला..
अबोली... एकदम psg style.
एक दिवस... एकदम मस्त... वर्णन, वातावरण निर्मिती सगळीच भट्टी छान जमलिये..
तीन पत्त्यांचा... सुंदर लिहिलिये... अंगावर आली खूप...वातावरण निर्मिती एकदम भारी... डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं..
नुरजहान.. ok आहे... ह्या आधी लिहिलेल्या रहस्य कथा जास्त भावल्या होत्या...
सारीपाट.. मस्त जमलिये.. आवडली.. पण सुपरमॉम तुमच्याकडून एखादा वेगळा प्रयोग वाचायला आवडला असता..
सुखात्मे... नाव वाचून एकदम भूत, आत्मे ह्या संदर्भात काही आहे की काय असं वाटलं..
घरचा पाहुणा.. very realistic.. हल्ली असं कुठेही होऊ शकतं.. good one..
खरतरं कथा विभागात दाद आणि शोनू ह्यांच्या कथा न दिसल्याने जरा वाईट च वाटलं होतं.. पण नंतर दाद चे लिखाण दुसर्या विभागात दिसलं.. शोनू ची कथा हितगुज वर लवकरच येईल अशी आशा आहे...
(to be continued..)
Pages