Submitted by चाफा on 7 November, 2007 - 22:23
मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००७ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरुर कळवा.
-संपादक मंडळ
विशेषांक लेखन:
शेअर करा
कथा प्रतिसाद
लांडगा आला रे आला चांगली जमलीये सुरुवातीपासुनच आपण आपले टेंन्शनमधे याचा प्लान फसतो की काय


एक दिवस मस्तच झालीये सगळ्या वर्णनामुळे आणि वातावरणनिर्मीतीमुळे.
दोन शेवटची शैली मला आवडली. असं एकेकजण काय काय करत आहेत हे वाचताना हल्ली खूप सार्या कथा असलेले जे सिनेमे निघतात त्यांची आठवण आली.
तीन पत्त्यांचा तमाशा : हातात जेवणाचं ताट घेऊन ही कथा वाचायची दुर्बुद्धी कुठुन झाली मला ? वातावरणनिर्मिती फारच चांगली जमलिये
सारीपाट : मस्तय आपली सगळी छान छान स्टोरी विथ हॅपी एन्डींग.
घरचा पाहुणा : ही पण आपली छोटीशी आणि छान जमलिये कथा.
कथा विभाग संपला ...
दाद ३
हलके फुलके
हास्य कथा- अजय, धमाल आली वाचताना. मस्तच. टोपीविक्या आणि माकडा.न्ची गोष्ट.न
मॅच - असा विचारच नव्हता केला कधी अगदी पटलं. बडबडी, झकास.
पिकनिक- आवडली.
चित्रे-व्यंगचित्रे - छानच आहेत.
ब्यूरोक्रसी-लोपा, मस्तच.
आज रांधण्यात- मिल्या, अरे विडंबन काव्य इतकं चपखल, इतकं चपखल की विचारू नकोस. समश्लोकी अनुवाद वगैरे असतात ना, तसलं.
मूळ गाण्यात 'ज्यास त्यास रंग रंग रंग लागले' मिल्याच.न 'ज्यास त्यास गॅस गॅस गॅस जाहले'.. अरे काय हे! मी हे कॊफी पिताना वाचलं, बावळटासारखं. मग काय? फवारा!
मुन्नाभाई- भन्नाट! म्हणजे काय भन्नाटच. जियो! जाम हसले.
पडद्यामगे-मृण्मयी, मस्तच. तुझं पडद्यामागचं रणकंदन छानच. मला आमच्या शाळेच्या गॅदरिंगची आठवण झाली. हिमगौरी आणि विठोबा झकास.
अजून कविता आणि इंद्रधनुष्य वाचायचय, चवीने!
साठा उत्तरी...
लांडगा आला रे - जेवढी उत्कंठा ताणली गेली त्यामानाने शेवट पटकन झाला असं वाटलं. कदाचित तेच गरजेचंही असेल.
दोन शेवट - ठिक. नुसतंच वर्णन होतं. पण काय म्हणायचंय हे नीटसं कळलं नाही. आयुष्याची क्षणभंगुरता अधोरेखित करायची असावी असाही विचार आला. पण ते तेवढं strongly आलं नाही असं वाटलं. शैली आवडली (साप्ताहिक सकाळ मधल्या प्रदीपच्या कथेचीही शैली छानच होती.) पण शैलीची ताकद वापरली गेली नाही असं वाटलं.
अबोली - थोडी obvious आहे पण मस्त फ्लो आहे. मला आवडली.
एक दिवस - माझं सुरूवातीला नावांच्यात confusion झालं. कुणाचं नक्की कोण कळलं नाही. पण नंतरचा फ्लो खूपच मस्त आहे.
तीन पत्त्यांचा तमाशा - खिळवून ठेवलं. शेवट अस्वस्थ करणारा. पण मूळ कथा शेवटच्या अर्ध्या भागात आली आधीचा अर्धा भाग नुसताच वातावरणनिर्मिती मधे गेला असं वाटलं कथा संपल्यावर. आवडली
सुखात्मे - केवळ fantastic. विषय, आशय, शैली सगळंच लाजवाब. कधी येऊ शिकवणीला?
घरचा पाहुणा - ठिक. विनय देसाईंकडून अपेक्षित नव्हती. तुमच्याकडून खूप वरच्या क्लासची अपेक्षा आहे.
disclaimer - ही फक्त माझी मते आहेत. कदाचित जगातल्या प्रत्येकाचे मत माझ्यापेक्षा वेगळे असू शकते. आणि मी सोडून सगळ्यांचे बरोबर असू शकते. पण सध्या मला जे पटतेय ते लिहिलेय.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
धन्यवाद
गोळे काका तुमच्याशी मैत्री करायची असेलतर अपयशाची मैत्री सोडावीच लागेल.
सुधीर
सुंदर अंक
खूप सुंदर अंक...
पूनम, संघमित्रा, सुमॉ सुंदर कथा.. श्रद्धा, नूरजहाँ पण छान.. unpredictable...
माझ्या बरोबर आणि सावरिया दोन्ही खूप आवडल्या...
कट आणि मुन्नाभाई मस्तच... खूप हसले...
-मेग्गी
माझिया मनीचे
अभिश्रुति छान मांडला आहे विचार.
अज्जुक अद्भुताची सफर खरोखर अद्भुत. फोटोंमुळे खरोखर अनुभवता आली.
जिज्ञासा
सौ.स्वाती दिक्षीत यांनी सुरु केलेल्या जिज्ञासा या प्रकल्पाबद्दल वाचुन खुप आनंद झाला. तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात.समाजकार्यात तुम्हाला यश मिळत राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
माढेकरांनी लिहिलेला लेख छान आहे. असे बरेच लोक आढळतात जे स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्याला खड्ड्यात ओढतात.
चित्रेंचा 'चाय' हा लेखही आवडला. आम्हाला खांडेकरांचा 'संकल्प' नावाचा धडा होता ज्यात त्यांनी या फारशा लिहिण्यासारख्या विषयावर अतिशय छान लिहिले होते. 'चाय' हा लेखही तसाच आहे. फारस काही लिहिण्यासारख नसणार्या विषयावरही छान लिहिले आहे
माझिया मनीचे...
प्रेम वरदान... छान होतं. पण जरा जड होतं...
अद्भुताचा प्रवास... ok types... वर्णनापे़क्षा फोटो जास्त आवडले.. अज्जुका, तुमची कथा वाचायला पण आवडलं असतं...
सैनिक.. very touching.. परवाच अशाच आशयाचा एक लेख एका दिवाळी अंकात वाचला. त्यामुळे हा लेख आणखिनच आवडला..
परिचय.. मस्त.. माझ्या वाचायच्या पुस्तकांच्या यादीत एक चांगली भर पडली.. ह्यात मधे मधे थोडी पुस्तकातली वाक्य दिली असती तर अजून मजा आली..
रेशमाच्या रेघांनी.. छान आहे लेख..
१९४७.. एक उत्तम माहितीपर लेख.. खरच ह्यातलं आधी कहिच माहित नव्हतं.. तुमच्या कडे अजून अशी माहिती असेल तर जरूर लिहा.. वाचायला आवडेल..
लांडगा आणि बकरा.. मस्त लिहिलय.. खरच हे चेन बिझनेस वाले असाच त्रास देतात.. लांडगा आणि बकर्याची उपमा मस्त..
चाय रेम्..चांगला झालाय लेख..
जिज्ञासा.. तुमच्या लेखाचं आणि त्यापेक्षाही कार्याचं कोतूक करावं तेव्हडं कमी आहे..
बरसात.. अतिशय सुंदर लेख.. एकदम चित्रमय आहे.. एकदम पटलं सगळ..
बाकीचे वाचून झालं की लिहिनच पुढे...
नि:शब्दातले शब्दात..
माझिया मनीचे हा विभाग पूर्ण वाचून झाला नाहीये त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया नंतर देते.
नि:शब्दातले शब्दात..
शब्दकला - चांगली आहे. मीटरचा वसा घेतलाच आहेत त्यामुळे.. २ वळणांशी अडकायला झालं 'कधी आडवळणाची तर्हा' आणि 'कधी सळसळती तरुणाई,'
असे असावे - खासच!! हेम्स गं!! मी तुझी जन्मभराची फॅन आहे. पण अजूनही माझ्याकडे पहिल्या क्रमांकावर 'कड्यावर झाड' च आहे.
डायरी - काळजाचा ठाव घेणे याचा अर्थ जिथे उमजतो ती खरी कविता.. तसंच झालंय..
अवगुंठन - उफ्फ!! त्रास दिलास.
मैत्री - शेवटचा झटका छान आहे.
धृवतारा - काही काही कल्पना छान आहेत.
गझल (नितिन भट) - हं.. चांगली आहे.
प्रश्न - अरे वा! मस्तच की.
गझल (प्रमोद खराडे) -
'गाव हे सारे जरी अंधारलेले
सूर्य हो तू, तूच तू तेजाळ आता'
क्या बात है!!
हळवेपण - नवीन आहे विचार. आवडली कविता.
वैभव जोशी - मी काय अभिप्राय देणार!! वाहवा वाहवा!! यापलिकडे?
कवितांच्या विभागाबद्दल एक तक्रार.. विभाग अपूर्ण आहे. पेशव्याची कविता कुठेय? पीक्याची कविता कुठेय? कहा गये वो लोग?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सर्वांचे मनापासून आभार
"सांवरिया" वर केलेल्या कौतुकाच्या बरसातीने मी भारावून गेलो आहे. असाच लोभ असू द्यावा. यापुढच्या मायबोलीच्या प्रत्येक दिवाळी अंकासाठी एक गाणं तयार करायचं असा संकल्प सोडलाय खरा, पाहू कसं जमतंय ते.
मनात असून देखील हाती घेतलेल्या एका मोठ्या उपक्रमामुळे दिवाळी अंक निवांतपणे अथपासून इतिपर्यंत वाचून काढता आला नाहिये.
पण अंक वरवर चाळून झालाय. व्यक्तिगत अभिप्राय सवडीने देईनच.
संपादक मंडळाने या कलाकृतीचा स्वीकार करुन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल धन्यवाद. पण दिवाळी अंकाचं संपूर्ण स्वरुपच देखणं आहे. त्याबद्दल पडद्यामागच्या व पुढच्या सर्वांचं मनापासून कौतुक.
पियानोवरची सात गाणी
अतिशय सुन्दर लेख. वाचताना पियानोचा आवाज मनात घुमत होता.
अप्रतिम दिवाळी अंक
दिवाळी अंक सगळा पाहून, वाचून आणि ऐकुनसुध्दा झाला... एक नावीन्यपुर्ण दर्जेदार अंक वाचल्याचं समाधान मिळालं. अंकाला हातभार लावलेल्या सर्वांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन...
दिवाळी अंक आवडला
सर्व वाचकांचे आणि आवर्जून प्रतिक्रिया देणार्यांचे मनापासून आभार!
दिवाळी अंक वाचायला आणि हो ऐकायला खूप मजा येतेय आणि मी अगदी चवीचवीने त्याचा आस्वाद घेतेय त्यामुळे मला प्रतिक्रिया द्यायला वेळ लागतोय. अगदी मुद्देसुद प्रतिक्रिया देण्याएव्हढी मी प्रतिभावंत समीक्षक किंवा महान लेखक नाही. तरी साध्या सोप्या शब्दात सांगते - जेव्हढ वाचलय तेव्हढ्यावर!
वैभव - कविता भावल्या, पुन्हा पुन्हा का... - प्रदीप काळजाला भिडलं! अवगुंठन - उत्तम expression!
पियानोवरची सात गाणी - जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी केलीस.
पिकनिक - वाचताना आठवणीत नेऊन सोडलस, जिज्ञासा - उल्लेखनीय उपक्रम. सैनिक - very sensitive topic!
बरसात - मनात बरसलं!
सुखात्मे - अप्रतिम (सुरुवातीला 'कथा' च्या कथानकावर जाणार असं उगाचंच वाटल),
दाद - तुझा 'कट' एकदम चविष्ट!
लांडगा/बकरा - खरा अनुभव - आम्ही भुताला घाबरत नाही एव्हढे Amway च्या लोकाना घाबरायचो.
सावनी शेंडेच गाणं dowlload केलय आणि रोज एकदा तरी ऐकते, सावरिया - Good result of Team Effort!
१९४७ - केदार मलाही मनापासून असचं वाटतं. चाssय रेम - समस्त चाय पिणार्यांना आवडायलाच पाहिजे असे.
मुन्नाभाई - वाचून ह ह पू , खासकरून 'अंजनीच्या सुता' च विडम्बन! हास्यकथा - छान! २१०७ पण छान!
बरचंस नीट वाचायचय अजून!
एकंदरीत 'दिवाळी अंक' उत्तरोत्तर प्रगती करतोय.
माझिया मनीचे
सैनिक : मस्तच. फार आवडला. कुठल्याही पदकांपेक्षा सुखरुप घरी परत येणं खरचच मोलाचं वाटत असणार
परिचयमधला स्टिव्ह वॉ खरोखर प्रेरणादायी
रेशमाच्या रेघांनी वाचताना मला पण माझी आई आणि शेजारच्या मामी दुपारच्या वेळी भरतकाम बसलेल्या पुन्हा एकदा दिसल्या कित्येक वर्षांनी. मी अर्धवट सोडून दिलेल्या एका स्वेटरची आठवण पण टोचुन गेली. मिनोती अगं पण तू तुझं भरतकाम टाकत जा गं इतर कला मधे आम्हाला फार आवडेल बघायला. शिकायला आणि प्रत्यक्ष करायलाही आवडेल तु शिकवणार असलिस तर. गहू, साखळी आणि उलटी टिप एवढंच काय ते लक्षात आहे आज या घडीला बाकी मोती टाका, लोकरीमधल्या क्रोशामधल्या आवडणार्या विणी साफ विसरलेय अगदी.
दिवाळी अंक
दिवाळी अंक अगदी फराळासारखाच हळूहळू पण चवीने वाचतेय.
मिनोती, तुझं रेशमाच्या रेघांनी वाचलं नि आईची फार आठवण आली. माझी आईपण सतत काहीतरी विणत नाहीतर भरतकाम करत बसलेली दिसते. आज पंचाहत्तराव्या वर्षीसुद्धा ती या वेळी माझ्याकडे आली तेव्हा माझा नि माझ्या लेकीचा प्रत्येक कपडा कपाटातून बाहेर काढून त्यावर भरतकाम नाहीतर क्रोशाचे प्रयोग ती सतत करत होती. अगदी माझ्या नि माझ्या मुलीच्या जीन्स वर सुद्धा. पण खरंच हे कपडे इतके सुंदर नि वेगळे दिसतात ना. सगळीकडे अगदी अमेरिकन लोक पण विचारतात कुठे घेतले म्हणून. माझ्या एका ट्राऊजर वर तर इतकं सुरेख केलं तिने भरतकाम की माझी एक मैत्रीण जी सलवार कमीजशिवाय इतर कपडे वापरत नाही तिनेसुद्धा सांगितलं की 'हा तुझा ड्रेस मी घालणार आहे.'
सुरेख लिहिलंयस. पार भूतकाळात फिरवून आणलंस.
आपला अंक
आपला अंक खरंच चांगला झालाय. त्याबद्दल सगळ्या मायबोलीकरांचे अभिनंदन. अंकासाठी ज्यांनी वेळ काढून साहित्य दिले त्या मायबोलीकरांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. प्रत्येक विभाग दर्जेदार झाला आहे. मायबोलीकरांनी उत्तम साहित्य देऊन आपली जबाबदारी पार पाडल्यानंतरही अंक प्रेझेन्ट करण्यामागे भरपूर कष्ट लागतात. त्याबद्दल संपादक मंडळ आणि मदत केलेल्या सर्वांचे आभार!
मायबोलीवरुन मागवलेले इतर दिवाळी अंक वाचायला लागल्यावर तुलना झाल्याशिवाय रहात नाही. काही अंक तर ठराविक साच्यातून काढल्यासारखे आहेत. इतकं वैविध्यपूर्ण, चांगलं साहित्य असलेला दुसरा दिवाळी अंक अजून पाहिला नाही.
-लालू
धन्यवाद.."चाय.."
chinya1985,
"चाय.." आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद
मी तुमचा अभिप्राय माझ्या blog वर पोस्ट करेन..आशा आहे तुमची हरकत नाही.
- संदीप (http://www.atakmatak.blogspot.com)
२१ अनुमोदक
लालू
अगदी अगदी सहमत. अनुमोदक!
तुम्हाला उकडीचे २१ अनुमोदक (हळदीच्या पानावरचे) आणि वर साजुक तुपाची धार!
आम्ही लिहिणारे, आपापली बाळे त्यांच्या हाती देऊन निवांत होतो.....
अंक इतका वैविध्यपूर्ण, नीटस आणि देखणा करणार्या चमूचे आभार मानावेत तितके कमी....
अत्यंत देखणा अंक
प्रिया, पूनम, चाफा आणि इतर संपादक वर्ग तुम्ही केलेल्या कष्टामुळेच येवढा सुंदर अंक वाचायला मिळाला. पु.ल. नी रावसाहेब मधे लिहिल्या प्रमाणे - खुप कष्ट घेतले हो तुम्ही खुप कष्ट घेतले.
खुप थोडा वाचुन झालाय पण आता रहावत नाही म्हणुन प्रतिक्रिया देतेच!
स्वातीचे गाणे सुरेख तसेच तिची कथा पण अप्रतीम.
JLO चे मनोगत आवडले.
बडीची कथा मस्त! विनय ची कथा पण आवडली.
टुलिपचा लेख छान आणि त्याचे शुशोभन अप्रतीम!
नीलुच्या चइत्रांबद्दल मी काय बोलू? अप्रतीम.
लोपा, तुझा लेख आणि बाकीच्या ठिकाणची चित्रे अत्यंत सुंदर. दोन शेवट मधले चित्र मी कॉपी करुन घेउ का?
माझिया मनीचे मधले सगळे लेख छानच.
गजा, तु चित्रे काढतोस हे प्रथमच समजले.
सुपर्मॉम - कथा छान.
दोन्ही शब्द्कोडी मस्तच - पहिल्यांदाच शब्द्कोडे घेतले का यावर्षी? मजा आली पण!
PSG, तुझी कथा चांगली आहे पण एक सुचना द्यावी वाटते. तु इंग्लिश शब्दांचा वापर कमी करावास कथा लिहिताना. खुपदा असे वाटतेय की तू इंग्लिश्मधुन विचार करुन कथा लिहिली आहेस. कृपया राग मानु नकोस जे खटकले ते सांगीतले.
शोनू तुझी कथा का नव्हती ग यावर्षी? खुप चुकल्यासारखे वाटले.
माझ्या लेख आवडल्याचे आवर्जुन कळवल्याबद्दल सर्वांचे अत्यंत आभार. आणि एवढ्या दिग्गजांबरोबर माझा लेख घेतल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार.
संपादक मंडळ, अंक काढताना Windows साठी काढु नये कारण मला गाणी, बासरी ऐकण्यासाठी Windows मशीन शोधावे लागले.
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
मॅच चांगल
मॅच चांगल लिहिल आहे.
जरुर
अहो हरकत कसली जरुर पोस्ट करा. फक्त एक करेक्शन आहे. 'खांडेकरांचा 'संकल्प' हा फारसा लिहिण्यासारख नसलेला ' अस लिहायच होत
विनोदी साहीत्य
चाफ्फा यांचे पिकनिक भारी आहे. खुप हसु आलं. मला तर आम्ही मित्र भेटल्यावर होणारी दंगामस्तीच आठवली. नेहमीप्रमाणे दाद यांनी लिहिलेल कट पण भारी आहेच . दाद स्टाईल पण दिसते मधे मधे. एकदम भारी लिहिलय.
पण सगळ्यात आवडल ते म्हणजे मुन्नाभाई चले येरवडा. अप्रतीम लिहिलय. मी तर खुप हसलो. सहिच रे मिल्या!!!!
सुरेख अंक!
आज पहिल्यांदा मायबोलीचा दिवाळी अंक व्यवस्थित पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पाहिला, ऐकला अन वाचला. इतके दिवस मनाजोगता वेळच मिळत नव्हता असे करायला!!
इतका देखणा अंक उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्यांचे, ज्यांचे या अंकाच्या निर्मिती साठी योगदान आहे त्या सार्यांचे आभार. खूपच सुरेख अंक. सर्वच विभाग नेटके जमलेत. सारे काही दर्जेदार आहे, खूपच आवडला अंक.
अप्रतिम!!
देखणा अंक, श्रवणीय सुरुवात! केवळ अप्रतिम अंक दिल्याबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन!
`अद्भुताच्या प्रवासा'ने माझा कोकण `सिकनेस' बळावला. छानच!
कराडकर अग
कराडकर अग घे की ग चित्र, विचारयचे काय त्यात. मी आत्ता बघितला तुझा मेसेज .!!!:)
माझ्या लेखाला आणि चित्राला दाद दिली आणि उत्साह वाढवला ,सगळ्यांना धन्यवाद !!!
माझ्या लेखाबद्दल!
सव्या, लोपा, संदीप चित्रे, धुरंधर (की दुरंदर?), गोळेसाहेब, मीनू, झुलेलाल
तुमच्या सगळ्यांचे आभार मनापासून. हा लेख माझ्यासाठी जरा वेगळ्या महत्वाचा आहे/होता. असो....
सन्मी, adm,
तुमचे पण आभार पण लेखामधे काय कमतरता वाटतेय की तो ok types किंवा फोटोच बरे असा वाटतोय ते पण कळवलेत तर आवडेल. इथे किंवा इमेल करून कसेही.
संपादक,
PDF कधी मिळणार?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
धन्यवाद.
'सुखात्मे' वरील सर्व प्रतिक्रियांसाठी मनापासून आभारी आहे लोक्स.
हलके फुलके..
हास्य (बोध)कथा : मस्त आहेत..
वेगळ प्रयत्न वाटला.. आवडला...
पण दाद, तुमची कथा किंवा ललिल वाचायला मिळालं असतं तर अधिक आवडलं असतं..

डोळ्यासमोर उभं राहिलं एकदम सगळं चित्र.. 
मॅच : tooooo good.. नावावरून आत असं काही असेल असं वाटलं नव्हतं... मॅच ची concept खूप सही relate केलीये..
आमची(ही) पिकनिक : मस्त..! मित्रांमधले संवाद खूप भारी..
कटः छान..
GPS आणि व्यंगचित्र : मस्त.. !
ब्युरोक्रसी - बरी कशी? : सहीये... खूप आवडलं..
आज रांधण्यात दंग : मस्त जमलय.. पण overall जरा तोचतो पणा आल्यासारखं वाटलं..
मुन्नाभाई चले येरवडा : लई म्हणजे लई च भारी.. विडंबनापेक्षा हे खूप आवड्लं..
पडद्यामागे : मस्त..
अज्जूका, तुमची प्रतिक्रिया वाचली.. नंतर मेल किंवा उत्तर लिहीन नक्की..
धन्यवाद!!!
दरवर्षीप्रमाणे वाचनीय आणि आधीपेक्षा जास्त देखणा अंक दिल्याबद्दल सर्व संपादकांचे, सहाय्यक मंडळाचे मनापासून आभार!
मॅच वाचलेल्या सर्वांना धन्यवाद आणि वाचून इथे प्रतिक्रिया देणार्या सर्वांना विशेष धन्यवाद!
स्वर चित्र ऐकली हो :)
जब्बरदस्तच

खुप छान आहेत सगळी स्वर चित्रे आणि अभिजित ची बासरी सुद्धा.
सावरिया ३ वेळा ऐकलं
मस्त जमलय. जगाच्या तीन टोकावर असलेल्या तीन कलावंतानी समन्वय कसा काय साधला सगळा ह्याची खुप उत्सुकता आहे.
त्याची जन्म कहाणी लेख स्वरुपात वाचायला आवडेल.
Pages