Submitted by चाफा on 7 November, 2007 - 22:23
मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००७ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरुर कळवा.
-संपादक मंडळ
विशेषांक लेखन:
शेअर करा
मागिल पानावरुन..
असामी, लांडगा......... जमेश, बाकी टेक्निकल आपल्याला माहीत नाही
हवाहवाई, शेवट.......... बढीया
PSG, संघमित्रा ...... कथा एकदम भावल्या मनाला !
दिवाळी अन्क २००७
दोन शेवटः अपेक्शाभन्ग
घरचा पाहुणा: मस्त
अवगुन्ठनः छान उतरलीये
विषबाधा: सुन्दर कल्पना व रचना
असे आसावे: वाह! क्या बात है!
कटः खास दाद टच! खल्लास!
मुन्नाभाई: एकदम भन्नाट जमलिये भट्टी
आभाळा: गझल आवडली पण बरेच शेर repeat वाटतात
पियानोची सात गाणी: my favorite from this HDA. प्रत्त्येक गाण्यातील पडद्यावरील टिपलेले बारकावे आणि मान्डणी केवळ अप्रतिम. जिवन्त "चित्री" करण.
एकन्दर अन्क छान जमलाय. सर्व चित्र व चित्रकारानी तो अधिक आकर्षक बनवलाय.
खल्लास !
मिल्या, आज रांधण्यात.................... ! मुन्नाभाई ............ खल्लास रे ! एकदम आवडेश.
लोपमुद्रा .............. जबरीच दोस्त !
आजुन पुढे वाचन चालु आहे............
चाफ्फा ( आशिष )
अप्रतिम मुखपृष्ठ !
मुखपृष्ठ - खास म्हणजे एकदम खासच !
बासरी - अगदि मनभरून एकली, अभिजित.. खूपच सुरेख !
सावरिया - प्रयोग हिट है यार.. सुपर डुपर हिट है...
वैभवा - शब्दांसाठी ... जियो !!
स्वाती - आवाज अन सुरासाठी... जियो !!
विवेक - संगीत अप्रतिमच !
अंक चाळलाच होता फक्त पण मुखपृष्ठ, बासरी, सावरिया मुळे हा प्रतिसाद !!
मस्तच!!
मुखपृष्ठ मस्तच...
मिल्यानी लिहीलेलं मुन्नाभाई... आणि 'करी' दोन्ही सहीच ..
बाकी वाचुन व्हायचय..
सुंदर!!!!!!
दिवाळी अंकची मांडणी सुंदर!!!!!!.............बासरी सुरेल.........अजून अंक पूर्ण वाचला नाही.....
पुनम आबोली खुप आवडली..........
संपादक मंडळचे अगदी मनापासून अभिनंदन.
अजून काय वाचल
मिल्या, एक मुखाने बोला जबरी जमली आहे.
अजय, बोधकथा झकास.
ट्युलिप, पियानो अतिशय सुरेख. खूप आवडल.
सावरिया-स्वाती, खूपच छान आवाज आहे तुझा.
तबला, पेटी कोणी वाजवली आहे?
माझ्या बरोबर-भट्टी नीट जमली नसली तरी छान आहे.
सतीश माढेकर, आंखो देखा हाल आवडला.
श्वना सुरेख प्रमोद.
छानच
सगळा अंक छानच जमून आलाय. अजून पुर्ण वाचायचा आहे. पण बासरी, स्वातीचे गाणे, सावनीची मुलाखत आवडली. मागच्या वेळी ती आमच्या कडे राहिली होती त्यामुळे ती खरच अजून जमिनीवर पाय ठेवून आहे हे अगदी पटल.
बाकी कथांमधे फक्त सारिपाट वाचून झालिये. ती आवडली. बाकिचे प्रतिसाद नंतर.
अंक सध्या
अंक सध्या तरि वरवर चाळलाय.. सादरिकरण नि सजावट नेहमिप्रमाणेच अतिशय सुंदर..
चित्र फारच छान..
मुखपृष्टावर यंदा पाठमोरि बाई थोडिफार वळलि तर..
देखणा अंक
यंदाचा दिवाळी अंक अतिशय देखणा झाला आहे. मुखपृष्ठ तर खासच जमलं आहे. अंकातली इतर चित्रे आणि रंगसंगती सुद्धा एकदम छान आहे. संपादक मंडळ आणि दिवाळी अंकावर मेहनत घेणारे इतर, तुम्हाला सलाम.
मी ऑफिसमधून ऍक्सेस करत असल्यामूळे ऑडीओ सिस्टीम बंद आहे. त्यामुळे श्रवणीयतेबद्दल काहीच कॉमेंट्स नाहीत.
इन्द्रधनुष्य विभागाची प्रस्तावना अजिबात आवडली नाही. ट्युलिपचा लेख अप्रतिम जमलाय. जेलोची कथा पण आवडली. बाकी नेहमीचे यशस्वी कलाकार म्हणजे PSG, अज्जुका, मिल्या, चाफ्फा, बडबडी, लोपामुद्रा HDA मध्ये पण चमकताहेत. सन्मीची कथा आणि सु. मॉ. ची कथा विशेष आवडल्या. प्रमोद देव, झुलेलाल आणि इतर अजून वाचून व्हायचे आहेत. बाकी कॉमेंट्स नन्तर.....................
सावरिया
स्वाती मस्तच आहे तुझा आवाज ... छान गातेस गं !
स्वाती, वैभव आणि विवेक मस्त जमलंय सावरिया, अभिनंदन
पियानो Songs.
अंक सुंदर दिसतोय.
!
अत्ता तरी फक्त ट्युलिप ची पियानो ची गाणी वाचून झालीयेत , As always एकदम झकास
उत्तम सुरवात
आज फक्त सुरवात केली आहे अंक बघायला... पण मुखपृष्ठ बघताच प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरु शकत नाही.. मुखपृष्ठ सुरेखच झाले आहे.. आणि layout पण मस्तच आहे...
मस्त.. वाह वाह
Design खुपच छान आहे. Font मोठा आहे त्यामुळे वाचायला एकदम सोपे झाले आहे.
धन्यवाद.
'सावरिया'च्या कौतुकासाठी मनापासून धन्यवाद, दोस्त्स.
आधी वैभवची रचना, आणि त्याला विवेकने बांधलेली इतकी सुंदर चाल - याला आपण न्याय देऊ शकू की नाही याचं खूप टेन्शन आलं होतं.
तुम्हाला ते आवडलं याचं समाधान आहेच, पण माझ्या गाण्यात सुधारणेला खूपच वाव आहे याचीही मला पूर्ण कल्पना आहे.
शिवाय त्याच विभागात सावनी शेंडे यांच्या इतक्या अप्रतिम गायनाचीही क्लिप पाहून वाटणारा संकोच शब्दांत सांगण्यापलिकडचा आहे. खरंतर ती क्लिप तिथे असताना तुम्ही सगळयांनी माझं गाणं ऐकलंत हेच खूप आहे माझ्यासाठी.
या कौतुकाचे खरे मानकरी वैभव आणि विवेक आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार.
बाकी अंक जमेल तसा वाचत आहे, आणि प्रतिक्रिया लिहीनच.
सुरेख आहे हा अंक
मुखपृष्ठ बघितले की "वाह!" अशी दाद आपसूकच निघते.
अंक पूर्णपणे वाचून झालेला नाही पण तरीसुद्धा
स्वाती - सुरेल आवाज आहे गं तुझा !!
वैभव, विवेक तुमचेही अभिनंदन.
This song grows on you. संपले तरी अजून ऐकावे असे वाटत रहाते. अजून ऐकता, अजूनच आवडते.
मजा आली सावरिया ऐकताना.
अंक जसजसा वाचतोय तसतशा प्रतिक्रीया देत राहीन.
संपादक मंडळ व अंकास हातभार लावणार्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन व आभार
चाय...
फरेंड,
'चाय...' आवडले वाचून आनंद झाला.
एकदम बरोबर ओळखलंस..मी गरवारेमधे होतो
- संदीप
करेक्ट!
well said nakul.. this song grows on you.. सावरिया अगणित वेळा ऐकलं असेल मी आत्तापर्यंत.. आणि अजूनही ते ऐकायला तितकंच आवडतं
वैभवच्या अप्रतिम ओळी, विवेकची अतिशय गोड चाल आणि स्वातीचा चपखल आवाज! परफेक्ट टीमवर्कचा नमुना आहे 'सावरिया'!
अभिनंदन आणि धन्यवाद!!
एकूण दिवाळी अंकाची भट्टी मस्तच जमुन आलीय... कथा, कविता, सुरेल श्रवणीय गाणी, मांड्णी, लेआउट सर्व सर्वच..
यासाठी सर्वप्रथम सगळ्या संपादक मंड्ळींचे, सहाय्यक मंड्ळींचे, कलाकार, लेखक, कवी, गायक मंड्ळींचे मन:पूर्वक अभिनंदन!!!!!!!!
आणि आता... मुखपृष्ठाच्या कौतुकासाठी सर्वांचे आणि विशेष करुन संपादक मंडळींचे मनापासून धन्यवाद नि आभार :):)
अभिजित बासरीची धुन एकून प्रसन्न वाटले.
'सावरीया' अगदी लाजवाब!!!.. वैभव नेहमी प्रमाणे तुझे अप्रतिम शब्द, स्वाती तुझा सुरेल आवाज, नि विवेकचे संगीत सगळच मस्त.
स्वाती, सावनी शेंडे तर गातेच अप्रतिम पण एक मायबोलीकरीण पण तितकी अप्रतिम गाते ही कौतुकाची गोष्ट आहे:)
पूनम ची 'अबोली', दाद ची 'कट', संघमित्राची 'एक दिवस' आवडल्या.:)
दिवाळी अंक
नीलु, मुखपृष्ट खुप सुरेख आलेय .पहिले पान उघडताच सुरेख बासरीची धुन आणि प्रसन्न चित्र पाहुन खुप छान वाटते.
कथा विभागात असामीचा अनुवाद आवडला .संघमित्राची एक दिवस अप्रतीम आहे. सुमाची सारीपट भावली. सुखात्मे मधला आईबद्दलचा डायरीतला भाग मनाला स्पर्शुन गेला . कविता विभागात धृवतारा फार आवडली , हेम्स्ची टपटप्त्या फुलात मिळाल्या बरसण्याच्या साक्षी जयाची अवगुंट्।अन मस्त , पमाचे प्रश्न छाने . कविता विभागात तर स्गळे तर दिग्गजच आहेत. त्यामुळे प्रशच नाही. विषबाधा अप्रतीम सुंदर आहे. छान आहेत कविता. हलके फुलके तले मिल्याचे मुन्नाभाई मस्त आहे. चाफाचे पिकनिकमधले "जाड्या " हे पहिलेच वाक्य वाचले आणि खल्लास. चाय....रम.. सुरेख आहे. लांडगा आणि बकरा धडाच घ्यायला हवा. प्रवास वरण्न तर मस्त .अज्जुका चा प्रवास खास, देवगिरी, प्रेम वरदान खरय..!! १९४७ शेवटची ओळ सोडली तर लेख आवडला.तीन पत्त्या.न्चा तमाशा पण .. ठाव घेउन गेला...
अनामिकाच्या सैनिकाला सलाम!!!! नुरजहा या गुढकथेत you should avoid cliche. जिड्नासा बद्दल काय म्हणु ? काळजी आणि काळजाचा प्रश्न आहे. प्रगती होउ दे.. !!!
पियानोची गाणी आवडली. ६०च्या दशकात्ले सिनेमे माझा आवडीचा कारय्क्रम आहे. अजुनही रात्री एक पर्यन्त एकटी (कारण इतरांना बोअर होते)दुरदर्शवर हे सिनेमे बघते. अजुन खुप खुप गाणी आहेत .
बाकि अंकाबद्दल तर रंगसंगती आणि ले आउट खुप छान .
सपादक मंडळाचे सुंदर अंक हाती दिल्याबद्दल आभार!!!!
अप्रतिम अंक..
संपादक चाफा आणि चमूचे मनापासून अभिनंदन इतका सुरेख देखणा अंक वाचायला दिल्याबद्दल. भरपूर साहित्य वाचायला आहे आणि सगळच उत्तम दिसतय. अजून खूपच कमी अंक वाचून झालाय म्हणजे फक्त दिवाळी संवाद मधील अर्चना जोगळेकर आणि सावनी शेण्ड्येंची मुलाखत वाचून झाली आणि दोन्ही मुलाखती अगदी खुललेल्या आहेत. छान प्रश्नोत्तरे झालीत. खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही पैलूंचा समन्वय मुलाखतीत उत्तम झाला आहे.
कथांपैकी सन्मी, पूनम, हवा-हवाई, असामी आणि श्रद्धाच्या वाचून झाल्या आणि आवडल्या. जेलोची गोष्टही खूप आवडली. अज्जूकाचं प्रवासवर्णन आणि सोबतचे फोटो अप्रतीम.
बाकी सगळाच अंक कधी वाचतेय असं झालय.
स्वातीच्या सावरीया बद्दल काय बोलणार? अतिशय प्रसन्न वाटतं ते ऐकून आणि पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं.
माझ्या पियानोच्या लेखामधे ऍप्रोपिएट पिक्चर क्लीप्स टाकली आहेत त्यामुळे लेखाचा लेआउट खूप देखणा दिसतोय. संपादक मंडळाच्या ह्या कलात्मक कामगीरीबद्दल मनापासून आभार.
अभिप्राय
यंदाच्या दिवाळी अंकातलं सगळंच गद्य/पद्य लिखाण मनोरंजक आहे, पण तरी त्यातल्या त्यात मला आवडलेलं नमूद केल्याशिवाय राहवत नाही.
१. साठां उत्तरी

> एक दिवस : सन्मीच्या भाषाशैलीमुळे वाचायला छान वाटते.
> अबोली : नेटकी आणि सकारात्मक.
> दोन शेवट : हा आकृतीबंध अभिनव वाटला. कथेची मजा त्यातच आहे.
> नूरजहान : 'धूम ३' साठी वापरता येईल.
> तीन पत्त्यांचा तमाशा : शंतनू, तुमची 'शब्दचित्र' रंगवायची हातोटी याही कथेत दिसून येते आहे. (वर्णनं माझ्या palateला जरा बीभत्सतेकडे झुकणारी वाटली मात्र.)
> घरचा पाहुणा : 'सावधान' कथा.
२. माझिया मनींचे
> १९४७ : खूप आवडला.
> जिज्ञासा : प्रेरणादायी आणि अभिनंदनीय
> सैनिक : विचारप्रवर्तक
> रेशमाच्या रेघांनी : आपल्यातील कलागुण ओळखून ते जोपासायला सांगणारा लेख आवडला. सोबतचे नमूनेही सुंदर आहेत.
> स्टीव्ह वॉ च्या आत्मचरित्राची ओळख वाचनीय आहे.
> प्रवासवर्णन माहितीपर आहे.
३. निःशब्दातले शब्दांत
> 'अजूनही विचार कर' आणि 'विषबधा' दोन्ही अप्रतिम.
४. हलके फुलके
> ब्युरॉक्रसी (लोपा) : बेष्ट! आणि सत्यघटनेवर आधारित आहे म्हणजे कहरच!!
> पिकनिक (चाफ्फा), मुन्नाभाई आणि विडंबन (मिल्या) मस्त.
> कट (दाद) सफाईदार. काही विनोद खास! ('रस्त्याइतका तरी वळू की नको?' वाचून जाम हसले.)
५. इंद्रधनुष्य
> पियानोवरच्या गाण्यांचा लेख झकास. आवडता विषय.
> सात ठिपके.. : नकळत्या वयात होणाया मैत्रीबाबतचा analysis पटला आणि आवडला.
> शब्दकोडं खूप दिवसांनी सोडवलं. मजा आली.
६. संवाद
> सावनी शेंडे यांची मुलाखत बेष्ट! फार छान विचार मांडले आहेत.
७. स्वरचित्रे
> सावनी शेंडे यांचा सोहोनी अतिशय आनंद देऊन गेला.
इतका देखणा आणि वाचनीय अंक काढल्याबद्दल संपादक मंडळ आणि त्यांच्या सल्लागार / सहाय्यकांचं अभिनंदन!
सावरिया...
सावरिया अप्रतिम जमलंय. विवेक, वैभव, स्वाती...धन्यवाद !!
मुखपृष्ठ आणि बासरी खूपच सुरेख.
ट्युलिप, विनय, मिल्या, अज्जुका - लेख खूप आवडले :)... बाकी अंक जमेल तसा वाचतोय.
दाद १
अंक वाचणं अजून चालूच आहे. त्यामुळे जसा होईल तशा दादा, दादी... (हे 'दाद' चं बहुवचन नसाव.. पण छान वाटतय).
एकूणच अंक बहू वाचनीय आणि श्रवणीयही झालाय- देखणा! संपादक मंडळी, अंकासाठी झटलेल्या सगळ्यांनाच मनापासून आभार. इतका परिपूर्णं अंक! व्वा!
मुखपृषठ- नीलू, अप्रतिम. ती तरुणी, तिच्या हातातला दिवा आणि त्यायोगे मागे पडलेली तिच्या सावलीची झलक.... सुंदर!
बासरी- भूप! आवडली, खरच! पण अगदी अगदी मनातलं सांगू? मला इथे शहनाई आणि ती सुद्धा एखादा सकाळचा खास राग.... खानसाहेबांची तोडी!
साठा उत्तरी
अबोली- सुंदर कथा.
लांडगा-असामी, आवडली.
दोन शेवट- वेगळीच शैली... मस्तय.
नूरजहा-श्रद्धा, छानय. खूप दिवसांनी वाचली असली.
एक दिवस्-सन्मी, आवडली. तुझ्या शैलीमुळे जास्त.
सुखात्मे-स्वाती... जबरदस्त. विषय, शैली, फ्लो सगळच.
सध्ध्या इतकच!
सनई
दाद - सनईबद्दलचं मत अगदी सगळ्यांच्याच मनातलं असेल, संपादक मंडळासहीत. पण कॉपीराईटच्या नियमाचा भंग होऊ नये हा हेतू तर होताच. शिवाय हितगुज दिवाळी अंकासाठी आपल्याच मायबोलीकराचे बासरीवादन वापरण्यात एक वेगळाच आनंदही आहे.
- प्रिया.
अंक छान आहे.
मुखपृष्ठ नवीन प्रकारचे आणि छान आहे.
काही वाचलंय. काही थोडेदिवसांनी वाचेन.
हेम्स तुझ्या कविता नेहमीप्रमाणेच खास.
-नी
देखणा अंक
अंक अतिशय देखणा आहे.
पुर्ण डिजाइन आणि मांडणी आवडली.
मुखपृष्ठावरचे नीलु ताय चे चित्र एकदम झकास आहे.
आता ती परत चित्रापासुन दुर जाणार नाही हीच अपेक्षा.
सध्या एक एक विभाग वाचुन काढेन आणि त्या प्रमाणे प्रतिक्रिया देत जाइन.
अंक चाळलाय फक्त. गाणी वै काहीच ऐकु शकत नाही हापिसात त्यामुळे बाहेरुन एक्सेस करेन त्यावेळीच प्रतिक्रिया देइन त्याबाबत.
संपादकांचे आणि मायबोलीचे खुप खुप आभार. त्यानी खुप मेहनत घेतली असणार.
अभिनंदन !
संपूर्ण अंक वाचला, ऐकू शकलो नाही अजून.
जे आवडले, चांगले वाटले त्याविषयी लिहितो..
साठा उत्तरी
तीन पैशांचा तमाशा : वातावरणनिर्मिती चांगली जमली आहे. (पण मूळ कथासूत्रापेक्षा तीच जास्त प्रभावी झाली आहे की काय असे वाटले. )
सुखात्मे : शैली आवडली.
माझिया मनीचे
श्वना : चांगला उभा केला आहे.
बरसातः झुलेलाल, छान लिहिले आहे.
१९४७ : वेगळ्या विषयावर लिहिले आहे हे आवडले.
इंद्रधनुष्य
'पियानोवरची सात गाणी' हा लेख आवडला.
हलके फुलके
कट : खुसखुशीत शैलीतला लेख, आवडला.
मिल्याचे विडंबन आणि लेख दोन्ही मस्तच.
नीलू आणि इतरांच्या उत्कृष्ट चित्रांनी अंक अगदी देखणा झाला आहे. मुन्नाभाई सारखी चित्र तर फार आवडली.
संपादक मंडळाचेही अभिनंदन.
अंक आवडला
१. संघमित्रा - एक दिवस
२. झुलेलाल - बरसात
३. प्रमोद देव - श्वना
४. स्वाती - सुखात्मे
५. मिल्या - मुन्नाभाई
६. जेलो - सात ठिपके, सात ओळी
७. अजय - व्यंगचित्रं आणि हास्य(बोध) कथा
८. तान्याबेडेकर - तीन पत्त्यांचा तमाशा
९. अनामिक - सैनिक
१०. लोपमुद्रा - ब्युरोक्रसी - बरी कशी?
११. ट्युलिप - पियानोवरची गाणी
हे मनापासून आवडलं ..
शब्दकोडी screen वरच सोडवता आली असती तर बरं झालं असतं ..
कविता मला कळत नाहीत म्हणून मी वाचत नाही त्याबद्दल क्षमस्व ..
सगळाच अंक छान झाला आहे ..
१९४७/व्यंगचित्रे
मुखप्रुष्ठापासूनच अंक डोळ्यात भरतो. माय्बोलीकरांना सुबक अंकाबद्द्ल धन्यवाद.
१९४७ हा जोशींनी चांगला लेख दिलाय. मराठीत वाळींबेंचं १९४७ हे या बाबतीतलं चांगले पुस्तक आहे. आपल्याला खरा ईतिहास शिकविला जात नाही. फ्रान्सची क्रांती, रशियन क्रांती मात्र शिकवितात. लेख चांगला.
२१०७ बाबतची व्यंगचित्राखालील ओळी वाचायला त्रास होतो.
Pages