२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २१ वर्षे पुर्ण झाली. गेल्या २१ वर्षात आपण अनेक उपक्रम केले. पण एका वेगळ्या उपक्रमाबद्दल आपण गेल्या गणेशोत्सवात एक कल्पना मांडली होती.

मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस्‌ अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.

या उपक्रमाला गेल्या वर्षी भरपूर प्रतिसाद मिळाला. त्याचंच मूर्त स्वरूप म्हणजे मायबोली क्रियेटीव्ह कॉमन्स http://www.maayboli.cc ही साईट आजपासून सुरु होते आहे.

मायबोली.सीसी या साईटवरची सगळी प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहेत. अनेक मायबोलीकर छायाचित्रकारांच्या देणगीमुळेच हा प्रकल्प उभा राहिला आहे. त्या त्या फोटोखाली तो देण्यार्‍याचे नाव आणि प्रोफाईलची लिंक दिली आहे. ही प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहे आणि कुणाचीही परवानगी न देता विनामूल्य ही प्रकाशचित्रे वापरता येतील अशी स्प्ष्ट सूचना प्रत्येक पानावर खाली आहे. कायदेशीर दृष्ट्या हि सगळी cc-0 (creative commons 0 ) या परवान्याशी संलग्न आहेत.

या प्रकल्पाचे काम अजून संपले नाही. तुम्ही दोन प्रकारे मदत करू शकता.
१) तुमच्या माहितीत काही व्यावसायिक मराठी प्रकाशचित्रकार असतील तर त्यांना त्यांचे एक तरी प्रकाशचित्र प्रताधिकारमुक्त करून या प्रकल्पासाठी देणगी द्यायला सांगा. त्यांचे नाव देणगीदार म्हणून प्रकाशचित्राखाली नक्कीच असेल. मराठी आणि भारतीय संस्कृतीशी निगडीत आणखी प्रकाशचित्रे हवी आहेत. प्रकाशचित्रांबरोबर रेखाचित्रेही (illustrations, cliparts) चालतील.

२)गेल्या वर्षीची अनेक आणि या वर्षी आलेली प्रकाशचित्रे तिथे जोडायची आहेत. आपल्याला या साठी अजून काही स्वयंसेवक हवे आहेत. हे काम घरबसल्या, ऑनलाईन , जितका शक्य असेल तितका वेळ देऊन करता येण्यासारखे आहे. तुम्हाला ही मदत करणे शक्य असेल तर कृपया या पानावर खाली प्रतिसादात लिहा. पण हे मोबाईलवर करण्यासारखे नाही. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप लागेल.

मायबोलीच्या २१ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, मायबोलीकरांकडून सगळ्या जगाला आपण ही भेट अर्पण करतो आहोत.

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन टीम मायबोली,
दुर्दैवाने 95% वेळ मी मोबाईल वरून नेट एक्सेस करतो,
त्यामुळे इच्छा असून सुद्धा मला मदत करता येणार नाही

अभिनंदन मायबोली मागच्या सर्व टिम चे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
क्रमांक २ साठी मला हातभार लावायला आवडेल.

अभिनंदन मायबोली अ‍ॅडमिन-टीम!
मी करू शकेन मदत #२ करता. >>> +१
मी पण माझा शनिवार आणि रविवार मधील काही वेळ देउ शकेन.

अभिनंदन!
#२ साठी मदत करू शकेन.

मी काढलेले ४ फोटो तिथे बघून खूपच आनंद झाला.
मी जमेल तशी मदत करायला तयार आहे. घरातला डेस्कटॉप लिनक्स वर चालतो. त्याने कामात अडथळा येणार नाही ही अपेक्षा आहे.

अभिनंदन मायबोली टीम . छान काम झालेय.
तिथे मी काढलेला एक फोटो पाहून मस्त वाटलं Happy

वेळ मिळेल तसा दुसर्‍या कामासाठी मदत करता येईल.. >>>>+१

अभिनंदन !
मी मदत करायला तयार आहे.

अभिनंदन मायबोलीचे .
माझा एक फोटो ( टॉवर ब्रिज, लंडन ) तिथे पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला . कॅमेरा कसा धरायचा इथपासून माझी तयारी होती म्हणून खूप छान वाटतय.
Actually, माझी # 2 साठी काम करण्याची इच्छा आहे पण मला जमेल की नाही या बद्दल शंका आहे .

अभिनंदन !
मी देखील जवळपास मोबाईलवरच असल्याने या मदतीचे जमणे कठीण आहे.
उपक्रमासाठी शुभेच्छा !

अरे वाह चांगलं आहे की.
मी माबोवर जे काही फोटो डकवले आहेत ते सर्व प्रताधिकार मुक्त आहेत असे जाहीर करतो. व्यक्तिगत फोटो सोडून अन्य कुठलेही फोटो मायबोली ला वापरण्याचे अधिकार देत आहे.
मायबोलीने इतक्या वर्षात जे भरभरून दिले त्याची किंचित परतफेड.

मायबोलीच्या या उपक्रमाचे स्वागत.
१) दिलेला फोटो कुणाला वापरायचा असेल तर लिंक कुठे आहे?
उदाहरणार्थ ढोलपथक/अरुंधती कुलकर्णी
ढोलपथक या शब्दामागची लिंक:http://www.maayboli.cc/taxonomy/term/69 ही
Image tag मध्ये चालत नाही.

२) विकि क्रिएटिव कॅामन्स वर एक प्रयोग म्हणून मी चार फोटो मोबाइलमधूनच दिले.
प्रत्येक फोटोला तीन लिंक्स असतात.
*१ तो फोटो स्वत:च्याच विकिलेखासाठी वापरण्यास,
*२ विकिवरच्याच एडिटरला त्याच्या लेखासाठी,
*३ विकिसोडून इतर वेबसाइटवर फोटो देण्यासाठीची तिसरी एचटीएमेल इमिज टॅगमध्ये देण्यासाठी.

विकिवर इंग्रजी तसेच मराठी लेखनही वाढत आहे तर शिर्षक कसे द्यावे हा प्रश्न पडला - सर्चमध्ये ते फोटो यावे यासाठी.

हेच मुद्दे लिंक आणि टॅग्जबद्दल मायबोली क्रिएटिव कॅामन्स साइटबद्दल थोडे माहिती करून द्या.

हंपि, बदामिचे फोटो टाकेन.

Mast!

मस्त! मस्त! Happy
मी काम करू शकेल. वीकडेज मध्ये इएसटी वेळेला उपलब्ध असेल मी.

Pages