दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह Sad

श्रध्दांजली.
संतूरची ओळख पूर्ण जगाला करून देणारा एक उमदा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला.
त्यांचे अनेक कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिले. असा योग आता पुन्हा येणार नाही, याची हळहळ वाटते.

युपीतील शालेय पोषण आहारात जेवण म्हणून मीठ भाकरी वाढण्याचा प्रकार उघडकीस आणणारे स्थानिक पत्रकार पवन जयस्वाल यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली _/\_

KK

हम रहें या ना रहें कल
कल याद आएँगे ये पल
पल, ये हैं प्यार के पल
चल, आ मेरे संग चल
चल, सोचें क्या
छोटी सी है ज़िंदगी
कल मिल जाए
तो होगी ख़ुशनसीबी

‘सुहाना- प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे ९२ व्या वर्षी निधन
_/\_
'मसाला' हा चित्रपट गिरीश कुलकर्णी आणि अमृता सुभाष अभिनित, त्यांच्या जीवनावर होता. खूप छान चित्रपट. त्यामुळेच पहिल्यांदा त्यांच्याविषयी कळले.

प्रदीप भिडे गेले _/\_
'नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ म्हणून पूर्वी दूरदर्शन 'सह्याद्री' वरून भारदस्त आवाजात बातम्या द्यायचे

प्रदीप भिडे Sad
लहानपणापासून ऐकलेला, घरातला असावा तितका ओळखीचा आवाज.

Pages