दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad RIP

श्रीदेवीच्या निधनाने चित्रपट सृष्टीत न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.अभिनयाचे विविध शेड्स दाखवणारी यशस्वी अभिनेत्री गमवल्याने वाईट वाटत आहे.

आजची सकाळ अत्यंत दु:खद बातमी घेऊन आली. Sad

इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से
अपने दिल को कैसे हम आझाद करेंगे
ये मौसम चले गए तो हम फरीयाद करेंगे
ये लम्हे, ये पल हम बरसो याद करेंगे . . .

भावपूर्ण श्रद्धांजली.

Tribute to Sridevi

स्टीफ़न हॉकिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ______/\______
एवढा असाध्य आजार सोबत असताना , त्याची तमा न बाळगता, किती संसोधन केलं . कमाल आहे.

नेटवरून साभार :

एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.

स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.

१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.

दक्षिण आफ्रीकेचा क्रिकेटर आणि फिल्डींगमध्ये साक्षात जाँटी र्‍होड्सचा आदर्श असलेल्या कॉलीन ब्लँडचे कॅन्सरने निधन.
श्रद्धांजली!

Arun Datey... Jagnyawar shatda prem karayla shikwlet... Bhawpurn Shradhdhanjali _/\_

Pages