मायबोलीचेही अॅप असावे का???

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 12 September, 2017 - 15:14

कोणे एके काळी केवळ श्रीमंतांची मक्तेदारी असलेला मोबाईल फोन आज अगदी सर्वसामान्य जनतेच्या हातात येऊन स्थिरावला आहे. या बदलासोबतच मोबाईलचे रुपडे आणि त्याची काम करण्याची क्षमता या दोन्हींमध्ये आमुलाग्र बदल घडला आहे. पूर्वी फक्त कॉल करू शकणारा मोबाईल आज तुम्हाला रेडीओ, गाणी ऐकवतो, चित्रपट दाखवतो, तुमच्यासोबत गेम्स खेळतो, फिरायला गेल्यावर तुमचे छायाचित्र/ चलचित्रपट (म्हणजे व्हिडिओ क्लिप हो!) बनवून मित्रमंडळीमध्ये फुशारकी मारायला मदत करतो, भूक लागली असेल तर तुमच्यासाठी चमचमीत पदार्थ आॅर्डर करतो (अर्थात तुमच्या आज्ञेप्रमाणेच), कुठे फिरायला जायचे असेल तर गाडी बोलावतो, घराचे किराणा सामान आॅर्डर करतो व अन्य बरेच काही.

अर्थात ही सारी कामे करण्यासाठी गरज असते ती निरनिराळ्या अॅपची. आजकाल तर असे अॅप्स बनवण्याचे फॅडच निघाले आहे. निवडणूक आली की काढा प्रचारासाठी अॅप (यावरून आता राजकारण नको, प्लीज!), नवीन एखादा business सुरु केला की मार्केटिंगसाठी अॅप, मुलांच्या अभ्यासाचे अॅप, पुन्हा अभ्यासासाठी सकाळी लवकर उठावे आणि अलार्म बंद करून बिछान्यातच लोळू नये म्हणून smart alarm चे अॅप इ.

हे सारे पाहून माझ्या मनात आले, 'आपल्या सर्वांच्या लाडक्या 'मायबोली'चे सुद्धा अॅप का असू नये???' जेणेकरून प्रत्येक वेळी मोबाईलच्या ब्राउजरमध्ये जाऊन बुकमार्क केलेली मायबोलीची साईट उघडावी लागणार नाही. कोणी नवीन धागा काढला की लगेच notification येईल (ऋद्वेष्ट्यांना ऋन्मेषच्या बाबतीतील notifications MUTE करण्याची सोय देता येईल! काळजी नसावी!!!) आपल्या धाग्यावर कोणी प्रतिसाद दिला किंवा आपली कोणी विचारपूस केली की त्याचेही notification मिळेल इ.

तर मंडळी कशी वाटली ही कल्पना???
आपले काय मत आहे या बाबतीत? मायबोली प्रशासनाने असे अॅप बनवायचे मनावर घेतल्यास आपल्याला कोणत्या कोणत्या सुविधा त्यात असाव्यात असे वाटते? खुद्द मायबोली प्रशासनाचे यावर काय मत आहे हेही ऐकायला आवडेल.

(मी अॅप डेव्हलपर नाही, येथे मोबाईलचा screenshot घेऊन त्याला एडीट केले आहे.)

Screenshot_2017-09-08-12-17-06-347_com.whatsapp_2_0.png

(© विशेष सूचना : मायबोलीचा लोगो वापरण्याचे अधिकार मायबोली प्रशासनाकडे अबाधित असून वरील चित्रात केवळ उदाहरणादाखल लोगोचा वापर केला आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users