मायबोली आणि त्याच एखाद मोबाइल अ‍ॅप....

Submitted by morpankhis on 14 July, 2016 - 14:51

मायबोलीचा एक नियमीत वाचक म्हणुन मला आणि माझ्या बहुतेक सह-मायबोलीकराना ही अस वाटतय की मायबोलीचा एकादा मोबाइल अ‍ॅप हवा..मायबोली प्रशासनाला एक वाचक म्हणुन हि विनन्ती..

काही कल्पना... (फीचर्स)
१) अ‍ॅप मध्ये लॉगीन करता याव..
२) एखाद्या धाग्याला "नोटिफीकेशन सबस्क्राइब" करता याव..म्हणजे कोणि प्रतीक्रिया दिल्यास फोनवर पुश नोटिफीकेशन याव...

आजुन कोणाला काही कल्पना सुचत असतील तर शेअर करव्यात..

...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मायबोली अ‍ॅप .. +७८६ ..
माझ्या ऑफिसमध्येही मागे एकाने मायबोलीबाबत उत्सुकता दाखवत पहिला प्रश्न हाच विचारला होता की, मायबोलीचे अ‍ॅप आहे का? मी नाही बोलताच पुन्हा मायबोलीबद्दल कधीच काहीच विचारले नाही. जर अ‍ॅप असते तर मायबोलीची सदस्य संख्या आज किमान एकने नक्कीच वाढली असती.
पण खरेच शक्य आहे का माबोचे मोबाईल युजर फ्रेंडली अ‍ॅप बनवणे?

या बद्दल काम सुरु आहे. नक्कीच तुम्हाला कुठल्या सुविधा यात असायला हव्यात हे कळले तर कुठल्या सुविधांवर आधी लक्ष घालायचे हे ठरवायला मदत होईल.

हय रे पट्ठे , होऊन जाऊदे , वेबमास्तर आगे बढो हम तुम्हारे साथ है.
मायबोली चॅट सुरु करता येईल का ?

ग्रेट!

लेख वाचतांना फक्त आणि फक्त लेखच समोर राहील असं हवं. बाकी पोस्ट्स आणि जाहीराती शक्यतो नकोतच. असल्याच तरी स्क्रीनच्या बॉटमला असल्या तर वरच्या वर लेख स्क्रॉल करायला आणि वाचायला अडथळा येत नाही.

पुश नोटिफिकेशन्स असतील तर फारच मस्त होईल.

उदाहरणादाखल टीम-बिएच्पीचं मोबाईल अ‍ॅप पाहा. (ही जाहीरात नाहीये).

webmaster : आभार..

१) "नोटिफीकेशन सबस्क्राइब" आणि पुश नोटिफीकेशन.. हे अगोदर हव.. कारण कोणी रिप्लाय दिलाय हे पाहयला सारख रीफ्रेश कराव लागत वेब साइटवर..

२) फोन वर मोठा रिप्लाय नाही पण लहान स्माइलीज ची लिस्ट हवी..त्यातुन सिलेक्ट करुन लगेच रिप्लाय करता याव.. ( मला आजुन ते हसुण लोळन स्माइली नाही येत.. Lol )

३) धागा फेवरेट लीस्ट मध्ये अ‍ॅड करायची सोय हवी (म्हणजे मागे जरी गेला तरी केव्हा ही उघडता येइल)...

कल्पना चांगली आहे.

कधी कधी दिवसेंदिवस माबो वर यायला वेळ मिळत नाही. चांगले लेख मिस होतात किंवा शोधून वाचावे लागतात.

मला लगेच सुचलेल्या कल्पना:-

माझे सदस्यत्व मध्ये एक सबस्क्रिप्शन इनबॉक्स हवा. सदस्यांना काही लेखक फॉलो करायची सुविधा असावी. सदस्य ज्या लेखकांना फॉलो करत आहे. त्या लेखकाने कोणतेही लेखन केले तर त्याची लिंक सबस्क्रिप्शन इनबॉक्स मध्ये यावी.

कोणी विपू केली तर पुश नोटिफिकेशन यावे.

लेखन लाईक करायची सुविधा असावी. काही लेख आवडतात पण त्यावर कमेंट करायला वेळ असतोच असे नाही. निदान धागाकर्त्याला आमच्या भावना पोचतील.
माझ्यासाठी नवीन, गृपमध्ये नवीन, माबोवर नवीन शेजारी अजून एक टॅब असावा ज्यात लाईक मिळालेले लेख उतरत्या क्रमाने असतील.

Am I asking too much ? Happy

मोरपंखीस, खूप छान धागा आहे. इथे येणार्‍या सूचना, मूळ लेखात समाविष्टं कराल का? सूचनाकाराच्या नावासह.
अतरंगी, काही सदस्य फॉलो करण्याची सूचना खूप आवडलीये.

>>एखाद्या धाग्याला "नोटिफीकेशन सबस्क्राइब" करता याव..म्हणजे कोणि प्रतीक्रिया दिल्यास फोनवर पुश नोटिफीकेशन याव...<<

पुर्वि अशी सोय होती (असं आठवतंय), आरेसेस फिड्स द्वारे. सर्वर वर ताण नको म्हणुन बहुतेक काढली गेली...

अॅप हवं +१११११

स्माईलीज हव्यात. धागा फेवरिट्स मध्ये एॅड करण्याची सोय हवी.

मायबोली सदस्य संख्या काही हजारांनी नक्कीच वाढेल.

App असायला हवं. मी मायबोली mobile वरूनच access करते. आणि आईलाही तसंच शिकवलं आहे. पण आईला mobile वरून access करणं कठिण पडतंय. तिनेच मला विचारलं, याचं app नाही का? जसं वर्तमानपत्राचं असतं.

व्वा छान कल्पना Happy
माबोवरील बर्‍याच आयडीज्चे लिखाण वाचनीय असते, तसेच अनेक धागे खरे तर दीर्घ कालात संदर्भाकरता उपयुक्त असतात, पण ऐनवेळेस सापडत नाहीत.
१) तर जुन्या माबोवर ट्रीव्ह्युमुळे विशिष्ट आयडीजना फॉलो करता यायचे तसे काहिसे इथे असावे.
२) विशिष्ट धागे फेव्हरिट मधे/ संदर्भाकरता (युजर साईडला लिंक अथवा पुर्ण टेक्ट) राखुन ठेवण्याची काही एक सुविधा असावी. सध्या इथे फक्त दहा ठेवता येतात.
३) विशिष्ट सिलेक्टेड मजकुराची ए४ साईजची पीडीएफ बनविता येणे, प्रिंटींगला/इमेलने पाठवता येणे इत्यादी बाबी शक्य व्हाव्यात.
४) किमान /कमाल साईज मर्यादेतील फोटो अपलोड डायरेक्ट फोनवरुन शक्य व्हावे. सध्याचे नेटमार्फतचे फोटो अपलोड किचकट/वेळखाऊ आहे.
५) सदस्यास, त्याचे फेव्हरिट आयडीजची स्वतंत्र नोंद करता येणे शक्य व्हावे, कुणी कुणाला फेव्हरिटमधे ठेवले आहे ते सर्वांस उघड असावे.
६) विशेष विषयावर पोल्/मतदान घेण्याचि सुविधा असावी

जरा जास्तच मागतो आहे का मी? Proud

ह्या बद्धल मे आधीच विचारले होते की आपण आपली सीते tapatalk मध्ये बघू शकतो का पण
मला काही +ve उत्तर मिळाले नाही
http://www.maayboli.com/node/50665

नवीन ऍप काढल्यास उत्तम !!
माझ्या शुभेच्छा.

दाद | 15 July, 2016 - 04:46 नवीन
मोरपंखीस, खूप छान धागा आहे. इथे येणार्‍या सूचना, मूळ लेखात समाविष्टं कराल का?

>>>
हो नक्कीच करेन..