मि मराठि शूध्धलेखन शीकावे का?

Submitted by अनन्त्_यात्री on 12 September, 2017 - 04:52

[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही Happy ]

वॉट्सअ‍ॅप व आंतरजालावरील सर्व मराठी संस्थळांवरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्‍याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते.

शुद्धलेखनाच्या अभावाला कारणे बरीच असतील (उदा. लेखक शुद्धलेखनाविषयी अनभिज्ञ असणे, शुद्धलेखनाविषयी तिरस्कार असणे, मराठी टंकनातील बारकावे माहित नसणे, मराठी स्पेल-चेकची सुविधा उपलब्ध नसणे वगैरे...) पण तरीही असे लेखन वाचताना वाचकाचा रसभंग तर होतोच पण पुढे पुढे वाचकही अशुद्धलेखनाबाबत बेफिकिर व अ-संवेदनशील बनत जातो.

सोशल मिडियावरच्या सध्याच्या मराठी लेखनात वारंवार अशुद्ध लिहिल्या जाणार्‍या शब्दांची जंत्री फार मोठी आहे, पण वानगीदाखल काही नमुने देत आहे:

मि, हि, तु, हीला, तूला, खुप, चुक, ईतर, ईथले, ईतके, ईकडे, वैगरे, ईत्यादी.... ( मी, ही, तू, हिला, तुला, खूप, चूक, इतर, इथले, इतके, इकडे, वगैरे, इत्यादि.... च्या ऐवजी).

माझे आणखी एक निरीक्षण असे आहे की मराठी शुद्धलेखनाबाबत अनास्था दाखविणारे अनेक जण इंग्लिश लिहिताना मात्र स्पेलिंग बद्दल काटेकोर असतात.

भविष्यात लिखित मराठी भाषेचे स्वरूप व अवस्था काय असेल ते भाषाशास्त्रज्ञ कदाचित सांगू शकतील, पण शुद्धलेखनाबद्दल मराठी लेखक/वाचक असेच बेपर्वा राहिले तर प्रमाणित मराठी लेखन तेव्हा नामशेष झाले असण्याची शक्यता बरीच आहे.

Group content visibility: 
Use group defaults

किस्ना मी मागच्या पानावर सिमिलर माहिती टाकली आहे. वाचलीस का?>>>
दक्षिणा, वाचली आणि त्याला पुरक म्हणूनच मी जरा बैजवार लिहले! Happy

बिनडोकांचा अड्डा ? बिनडोकाञ्चा अड्डा ? बिनडोक्ञाचा अड्डा? बिनडोञ्काचा अड्डा?

जसे उच्चार करता तसे टाईप करा!

बिनडोकाञ्चा अड्डा ह्यात च च्या आधी ञ चा उच्चार आहे आणि च ला जोडला जातो क हे आकारासह पुर्ण व्यञ्जन आहे. त्यामुळे 'बिनडोकाञ्चा' हा शब्द योग्य.

thanku

अर्थाचा अनर्थ होत नसेल तेव्हा शुद्ध लिखाणाबद्दल आग्रह धरणे जरूरी नाही असे माझे मत आहे. किंबहुना त्यामुळे निरर्थक भिंती निर्माण होतात.
आणि , आणी असे लिहिल्याने काही फरक पडत नाही. एकदा असा फरक पडत नाही असे ठरले तर उलट भाषा जिवंत रहायला नक्कीच मदत होईल. नाहीतर आहे संस्कृत मार्ग.

आमच्या ह्या विदर्भातल्या आहेत. त्या मी 'आली', मी 'जेवली' असे म्हणतात. मला कळत, (कळतं, कळते) ती आली, ती जेवली. मग मी पण मुकाट्याने जेऊन मी 'जेवला' अस म्हणतो. हाकानाका. Happy

खरं तर विदर्भी अस्सल भाषेत स्त्रीया सुद्धा 'मी गेलो', 'मी जेवलो' असे म्हणतात. ती मात्र 'आली / गेली'.

वर्‍हाडी भाषेत स्त्रिया जी क्रियापदं वापरतात ते कोणत्या भागातून आहेत त्यावर अवलंबून आहे. आलो, गेलो, गेली, आली, जेवली, बसली हे सगळेच वापरले जाते.

---------------

बरं ते जाऊद्या... ह्या धाग्याचे शिर्षक मुद्दाम स्वरभान खराब करुन लिहिले आहे ते कळते आहे. पण मूळ वाक्य मराठी आहे का?

मी मराठी शुद्धलेखन शिकावे का? >>> कोणती भाषा आहे ही? इंग्रजी वाटते मला. शुड आय लर्न मराठी शुद्धलेखन?

मराठीत लिहा ना, शुद्ध मराठीत. कोणत्याही बोलीभाषेत चालेल. पण शिर्षकाचा अनुवाद मराठीत करा बॉ कोनतरी...

भाषेचा लहेजा आणि शुद्धता यात गल्लत होतेय का?
मी आली, जेवली... ही अशुद्धता+लहेजा आहे. स्त्रियांनी मी आले, जेवले असे बोलले पाहिजे हे शुद्ध आणि प्रमाणबद्ध मराठी सांगते पण त्या त्या भागाची भाषा त्या त्या कम्युनिटिच्या सोयीने बदलते.
कोल्हापूरात पण स्त्रिया आलो गेलो करतात.

मराठी माध्यमात शिकून काहीही फायदा नसल्याने आता कमी मुलेच मराठी माध्यमात जातात . त्यामुळेच सर्व मराठी माध्यमांचे वाचक कमी कमी होत आहेत . आणि तसे पण बर्याच लोकांच्या कामावर मराठीत लिहिण्याची पाळी येत नाही . म्हणजे शुद्ध लिहून काही फायदा नाही . त्यात आपण संस्तलावर अजून नियम टाकले तर आलेले हौशी लोक सुध्धा पळून जातील

शुद्ध आणि प्रमाणबद्ध मराठी
>> कोण ठरवते हे?

मी आले/जेवले > मी आली आहे, जेवली आहे चा अपभ्रंश आहे. अपभ्रंश शुद्ध कसा ठरतो?

(टीपः मला वाद घालायचा नाहीये, प्रामाणिक शंका आहे.)

अनुच्चारित अनुस्वार - मी साधारण १९५० च्या सुमारास मराठी व्याकरण शिकलो तेंव्हा नपुंसक दाखवण्यासाठी अनुच्चारित अनुस्वार वापरत असत. जसे तें कुत्रं. ते कुत्र नव्हे. तीं कुत्रीं म्हणजे तें कुत्रं हे अनेकवचन पण ती कुत्री म्हणजे एकच कुत्री.
पण मी अमेरिकेत आलो असे पाहून मराठी व्याकरणातून अनुच्चारित अनुस्वार काढून टाकले म्हणे नि र्‍हस्व दीर्घाचे हि नियम बदलले म्हणे.

तसे मायबोली येईस्तवर मराठी वाचण्याचा योग आला नाही नि त्यानंतर शुद्धलेखन हा प्रकार आता अस्तित्वातच नाही असे वाटू लागले. नि इथे बरीच वर्षे मराठीत इतके इंग्रजी, हिंदी शब्द का वापरतात असा प्रश्न पडला होता पण आता आजकलकी नयी मराठी इज लाईक दॅट ओन्ली असे कळले. कदाचित लाई़क मधली इ र्‍ह्स्व का दीर्घ, ओन्ली मधली ली र्‍हस्व का दीर्घ असे प्रश्न आजकाल उद्भवतच नसावेत.

तसे इंग्रजी स्पेलिंग नि व्याकरण अमेरिकेतून, मी येण्यापूर्वीच, नाहिसे झाले होते याचा प्रत्यय एक दोन वर्षात आला.

बोली भाषेत शुद्ध काय नि अशुद्ध काय? बोली म्हणजे जशी बोलली जाते तशी, नि दर बारा मैलावर मराठी बदलते म्हणे.
पाणी बरोबर का पानी, की पानि? कारण बहुसंख्य लोक पानी म्हणतात, किंवा म्हन्त्यात. मग प्रमाण भाषा कोणती? कमी लोक बोलतात ती की जास्त लोक बोलतात ती?
आता प्रश्न असा की मायबोलीवर लिहिताना प्रमाणबद्ध मराठी असावे अशी अपेक्षा आहे का?

इथे मराठी भाषेच्या शुद्धाशुद्धते बद्दल बरेचदा वाद झाले आहेत, पण निष्कर्ष काही नाही - ये रे माझ्या मागल्या, कारण प्रमाण मराठी काय हे कोण ठरवणार?
कदाचित एकवेळ सावरकर मोठे का गांधी हे ठरेल पण मराठी प्रमाण भाषा? मराठी बाणाच असा की दुसरा काही म्हणेल त्याला विरोध. सगळे बुद्धिवादी ना!

स्पेलिंग चुकले तर अर्थ बदलू शकतो तसेच शुद्धलेखन चुकले तर अर्थ बदलू शकतो, पण फार थोड्या लोकांना त्याचा त्रास होतो, बाकीचे मजेत असतात!

दक्षिणा :
भाषेचा लहेजा आणि शुद्धता यात गल्लत होतेय का?
मी आली, जेवली... ही अशुद्धता+लहेजा आहे. स्त्रियांनी मी आले, जेवले असे बोलले पाहिजे हे शुद्ध आणि प्रमाणबद्ध मराठी सांगते
>>>>>>>>>>

मी नम्रपणे आपल्या या मताशी असहमत आहे.. भाषा शुद्ध वा अशुद्ध असते हा एक मोठा गैरसमज आहे..
भाषे मधील ३ घटकांपैकी शब्दसंग्रह या एक घटकाच्या उच्चाराला जर भाषा शुद्धता समजत असु तर ते चुकीच ठरेल..
"मी जेवली" वा "मी जेवले" हे दोन्ही प्रमाणबद्ध मराठी आहे.. ते कसे ते आपण पाहु.

माझ विश्लेषण खालील प्रमाणे आहे.. ( मला ज्या काही ५ भाषा येतात त्या वरुन)

भाषे मध्ये मुख्यते ३ घटक आहेत.. आणि ते प्रमाणबद्ध कसे आहेत ते पाहु..
१. मराठी व्यकरण :
२. मराठी शब्दसंग्रह :
३. मराठी लिपी :

१. मराठी व्यकरण : मराठी व्यकरणाच प्रमाणीकरन केव्हाच झाल आहे. मराठी व्यकरणाची प्रमाणबद्धता कोणी बदलत नाही.
२. मराठी शब्दसंग्रह : भाषे मधील शब्दसंग्रह हा प्रवाही असतो.. त्याचे उच्चार काळा नुरुप बदलतात. ( काही उ. दा पोस्ट करतो )
गेल्या शतकातील शब्दसंग्रह व आताचा यात खुप बदल झाला आहे. आणि तो होतच असतो.
नवीन शब्द येतात व जुने लोप पावतात. कारण भाषा व शब्दसंग्रह हा प्रवाही असतो
शब्दसंग्रह वा शब्दाचे उच्चार यालाच आपण शुद्ध वा प्रमाण मराठी म्हणत असु तर ते साफ चुकिच ठरेल..
३. मराठी लिपी : मोडी मराठी लिपी होती ती इंग्रजानी मुंबई प्रांताचा कारभार पाहतान (गुजरात व महाराष्ट्र ) बदलली व "बाळबोध देवनागरी" केली. मोडी वा बाळबोध देवनागरी प्रमाणीत लिपी आहेत.

टि.प : गुजरात वेगळा झाल्यवर त्यानी त्यांची लिपी परत आणाली व जिवंत ठेवली. आपण मोडी लिपीला परत वापरात नाही आणाली.

>>क ते घ ही घशातुन उच्चारली जाणारी अक्षरे त्याच्या आधी अनुस्वार असेल तर 'ङ'वापरला जातो
च ते झ ही जिभेने उच्चारली जाणारी त्या आधी अनुस्वार असेल तर 'ञ'वापरला जातो
ट ते ढ ही ताल्य अक्षरे ह्या आधी अनुस्वार असेल तर 'ण'वापरला जातो
त ते ध ही दन्त्य अक्षरे ह्या आधी अनुस्वार असेल तर 'न'वापरला जातो.
प ते भ ही ओष्ठ्य अक्षरे त्या आधी अनुस्वार असेल तर 'म'वापरला जातो..<<

हे इंटरेस्टिंग आहे. पाङ्घरुणातल्या माञराच्या उत्कण्ठेमुळे उन्दिर भाम्बावला... प्रयत्न बरोबर आहे का? Happy

मोरपंखीस, धन्यवाद माझ्या ज्ञानात भर पडली Happy
मी आपल्या माझ्या माझ्या कपॅसिटीत माझं मत माण्डायचा प्रयत्न करत होते Happy

मराठी आंतरजालावर पहिल्यांदा केल्या जाईल , बघल्या जाईल असे वाचले होते .तेव्हा गंमत वाटली होती कारण इथे येईपर्यत अश्या बोलींचा संबंधच आला नव्हता.इथे वाचूनच ती विदर्भातील बोली आहे असे कळले . मराठी भाषा किती प्रकारे बोलतात हे कळले .

मला बेसिकली प्रॉब्लेम व्हाट्स अप वा तत्सम साधनांवर मिंग्लिश लिहिण्या बाबतीत आहे.व्हाट्स गृपात मारे लोक दे दणादण राजकरण पोस्ट्स / पालकत्व पोस्ट्स /रेसिप्या इत्यादी मिंग्लिशमध्ये टाकतात.ते वाचायचंच जीवावर येतं .अरे एक तर इंग्लिश मध्ये तरी लिहा किंवा मराठीत तरी लिहा.स्मार्टफोनवर गुगल इंडिक app वापरून मराठी लिहिणं इतकं कठीण का जावं लोकांना ?बाकी दुनियाभरची apps वापरत असतात. मग हेच app वापरायला इतकं कठीण का जात ?

ही पोस्ट गुगल इंडिक app वापरून लिहिलेली आहे.या app चा पोस्टकर्तीशी काहीही संबंध नाही .

पण तो इंग्रजी qwerty आहे ना. मला देवनागरी अक्षरे मराठी typewriter सारखी असलेल्या android keyboard ची सवय होती. हे अजूनही भिरभिरतय. पण इंडिक च्या क ख ग घ keyboard पेक्षा मग इंग्रजी ते देवनागरी परवडतय, म्हणजे सवय करतेय.

Pages