प्रतिशोध भाग-१०

Submitted by कविता९८ on 10 September, 2017 - 08:50

प्रतिशोध
भाग १०
अंतिम भाग

याआधीचे भाग
भाग १-https://www.maayboli.com/node/60196?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C4391190163

भाग २-
https://www.maayboli.com/node/60227?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C7043475760

भाग ३-https://www.maayboli.com/node/63056?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C6383116919

भाग ४-https://www.maayboli.com/node/63448?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C3427356645

भाग ५-https://www.maayboli.com/node/63455?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C8512677730

भाग ६-https://www.maayboli.com/node/63504?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C1914884605

भाग ७-https://www.maayboli.com/node/63777?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C3296921582

भाग ८-https://www.maayboli.com/node/63785?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C5323191599

भाग ९- https://www.maayboli.com/node/63805#new?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C5654691335

प्रतिशोध
भाग-१०

"काव्या लवकर उठ हे बघ न्यूज ला काय दाखवत आहेत."
काव्याची आई तिला उठवत बोलत होती.

"काय ग मम्मी ,
दादा ला सांग बघायला..
त्याला सर्व माहिती हवी ना.."
काव्या डोक्यावर पांघरुण ओढत बोलली.

"काव्या, गप उठ..
तुझ्या कॉलेज बद्दल दाखवत आहेत."

"काय???"
जवळपास ओरडतच काव्या उठली.
आणि हॉल कडे पळाली.
समोर चालू असलेली बातमी बघून काव्याला काहीच समजत नव्हतं.

"काव्या, काय प्रकार आहे हा?"
काव्याच्या पाठीवर हात ठेवून आई विचारू लागली.

"मम्मी दादा कुठे आहे??"

"नीट बघ TV
दिसेल आता.
तुला याबद्दल काही माहित नव्हत ??
काल हा कॉल वर याबाबतच बोलत होता वाटतं."

"मम्मी मी पटकन आवरते आणि आताच तिथे जाते."
आई काही बोलायच्या आधी काव्या तिथून निघाली.
एरवी आंघोळीला एक तास घालवणारी काव्या खूप लवकर तयार होऊन निघाली सुध्दा..
"काव्या थांब,
नीट जा..
आणि तिथे पोहचली की कॉल कर समजल."
एवढ बोलत तिची आई तिला लिफ्ट पर्यंत सोडायला गेली.
आणि पुन्हा घरी येऊन 'ती' बातमी बघू लागली.
काव्या तिथे पोहचेपर्यंत गौरवला कॉल करायचा प्रयत्न करत होती पण तो कॉल उचलतच नव्हता.
शेवटी ती कॉलेजच्या इथे पोहचली..
"आम्ही काहीही केलेलं नाही,
सोडा आम्हाला."
ते ओरडत होते पण पोलिसांच्या तावडीतून त्यांची सुटका होणे शक्य नव्हते.

"सर तुम्ही नुकतच सांगितल की या कॉलेज मध्ये गैरप्रकार चालू आहेत.
पण नक्की कोणते गैरप्रकार आणि कोणत्या कोणत्या मोठ्या माणसांचा यात सहभाग आहे हे अजूनही स्पष्ट केलेलं नाही."
पत्रकार गौरव ला प्रश्न करू लागली.
ज्या प्रश्नाचे उत्तर ऐकायला सर्वच आतुर होते.
आणि ही आतुरता स्वाभाविक होती.
अचानक पहाटेच सर्व channels ना एक मोठी बातमीच्या बाईट साठी वी.एस.पी कॉलेज मध्ये बोलवण्यात आलेलं.
"तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल.
तुम्हाला माहित असेलच काही महिन्याआधी एका पक्षातील मोठा कार्यकर्ता महिलांच्या देहविक्री प्रकरणात जोडलेला आहे ही बातमी आली होती.इथे उपस्थित प्रत्येक वाहिनीने ही बातमी लोकांपर्यंत पोहचवली होती. पण तो पक्ष कोणता आणि कार्यकर्ता कोणता हा महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित होता.
हे कॉलेज चालवणारे आणि समाजविकास पार्टीचे कार्यकर्ता माननीय निखिल पोतदार साहेब.
दवे आण त्याला मिडीयाच्या समोर."

तर हेच ते मा.कार्यकर्ता आणि हो एकटे नाही,यांच्या सोबत अजुन बरीच नावे आहेत."

"सर तुम्हाला ही माहिती कशी आणि कुठून मिळाली ?"

"याच कॉलेजच्या एका स्टूडेण्टने आम्हाला मदत केली.
पुरावे हे न्यायालयात सादर केले जातील. नंतर प्रत्येक वाहिनी कडे पुराव्यांची प्रत दिली जाईल जेणेकरून ते प्रत्येक नागरीकापर्यंत पोहचले जातील व प्रत्येक जण अशा लोकांपासून सावध राहू शकतील.
"आणि हे जे विद्यार्थी आहेत ते कोण
त्यांचा या प्रकरणासोबत काय संबंध?"
"सियाल कदम आणि अनुराधा सावंत ,
याच कॉलेजच्या एका मुलीची हत्या केली यांनी आणि सोबतच या पोतदारला मुली पुरवण्याच काम सुध्दा यांनीच केले."
एवढ बोलून गौरव त्यांच्याकडे रागात बघू लागला.

"फक्त एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही,
याच कॉलेजच्या अजून काही विद्यार्थ्यांनी सुद्धा एक हत्या केली फक्त हत्याच नाही तर त्यांनी तिच्यावर बलात्कार करून तिला मारलं आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
या दोन मुली कोण ही माहिती सध्या आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही.
त्यांचे मृतदेहांचा तपास लागल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल."
गौरवच बोलणं संपत न संपत तेवढ्यात हवालदार कुमार, सँडी,बबलु,श्री यांना घेऊन आली.
त्यांनी स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला.

पुढे यांच्यावर कारवाई कशी होणार आणि इत्यादी माहिती इन्स्पेक्टर शिंदे नी दिली आणि थोड्यावेळाने आरोपीना घेऊन गेले..
त्याबरोबर पत्रकार मंडळीही पांगली
गौरव सर्वात शेवटी निघाला कारण पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याने बाहेर काव्याला बघितलं होत ,
पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तर मिळाली होती पण काव्या...
हे प्रकरण सुरू झाल्यापासून तिच्या मनात फक्त फक्त प्रश्न होते.
गौरव तिच्या जवळ जाऊन उभा राहिला.
"काय होतं हे दादा,
सियाल??
तो का कस्तुरीला मारेल??
आणि त्याने कस्तुरीला मारलं तर कुमारने स्वरा मारलं यात काहीच लॉजिक नाही."

"काव्या
कस्तुरी माझी मानलेली बहिण होती, हा मी हे कधी कोणाला सांगितले नाही.
तुला माहित आहे ना बाबानी एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली होती. तुला आणि आईला फक्त तिच नाव माहित होतं.पण मी तिला भेटलो , तेव्हापासून ती मला भाऊ मानायला लागली.
तिच्या मृत्यूनंतर मला सर्वात आधी कुमार वर शंका आली.
त्यांना माझी ओळख नसली तरी कस्तुरी मला कॉलेजमध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट सांगायची.
बाबांना सांगून मी तुझ admission त्याच कॉलेज मध्ये घेतलं.
स्वतःच्या सख्ख्या बहिणीला अस धोक्यात घालणं चुकीच असलं तरी कायद्याने गुन्हेगाराला अटक करायला पुराव्यांची गरज होती.
आठवत काऊ,तुला जेव्हा मी हे सर्व सांगितल तु न घाबरता तयार झाली.
शोभतेस माझी बहिण...
काव्या हे कॉलेज बाहेरून जेवढ चांगल दिसतय तेवढच कित्येक लोकांनी या कॉलेजला आतून पोखरून काढलयं.
या कॉलेजमधून ज्या मुली बाहेरून येतात , त्यांना टार्गेट केल जात,
एवढच नाही तर अमली पदार्थ सुध्दा सप्लाय केले जातात.
याचे पुरावे कस्तुरीने जमा केले होते.
तिला स्वरावर विश्वास होता म्हणून तिने तिला सर्व सांगितलं.पण कस्तुरीला हे माहितच नव्हत की यात स्वरा सुध्दा गुंतलेली आहे.
स्वराने विचार करून मुद्दाम कुमारला काही सांगून कस्तुरीच्या जवळ पाठवलं.तो आधीच कस्तुरीच्या प्रेमात होता पण ती त्याला भाऊ मानायची.
त्यामुळे मनातून तो चरफडत होता त्याला आयतीच संधी मिळाली.
स्वराने अजून पुरावे तुला कुमारच्या घरी मिळतील अस सांगून कस्तुरीला तिथे पाठवलं.
माझ्या बहिणीला कुस्करून टाकलं ग त्यांनी..
याला श्री,बबलु,सँडीने पण सोबत दिली.
कुमारच्या पप्पांनी नंतर हे प्रकरणच मिटवून टाकलं.कुमारला हे जे गैरप्रकार चालू होते त्यात काही घेणंदेणं नव्हते. पण अनुराधाला होतं.
फक्त अनुच नाही तर यात सियालही सामील होता.
त्यांना जेव्हा समजल की कस्तुरीकडे ते पुरावे होते त्यांनी विचार केलेला की सियाल बरोबर ते कस्तुरीकडून घेईल. पण त्याआधीच कुमारने कस्तुरीला मारलं.त्याला पुरावे,गैरप्रकार बद्दल भनक सुध्दा नव्हती.
ते पुरावे कोणालाच सापडले नाही,
अनुने स्वराला विचारल पण ती सरळ नाही बोलली आणि त्या ग्रुपपासुन लांब झाली. मुळात ते पुरावे स्वराकडेच होते.
आपल्या कडे जेव्हा अनु आणि सियाल आले ,तिथून निघताच त्यांनी स्वराला PCO वरून कॉल करून भेटायला सांगितलं.आणि संधी मिळताच ती जे पुरावे आपल्याला देणार होती ते घेऊन तिला मारून टाकलं.
अस काय बघतेय??
काव्या स्वरा ते पुरावे आपल्याला देऊन आपल्याकडून पैसे घेणार होती.
हे सियालला माहित पडलं.
फक्त हेच नाहीतर कस्तुरीला कुमार कडे पाठवून तिला मारायची योजना स्वराचीच होती हे सुध्दा त्याला समजलं.
अजुन एक म्हणजे अनु आणि सियाल एकमेकांचे मानलेले भाऊ बहिण असल्याचे फक्त भासवत होते.
ते रिलेशनशिपमध्ये होते.
कस्तुरीच्या मृत्यूनंतर हे चालू होतं.
तिच्या आठवणीत म्हणून तो अनुला "के" या कोडवर्डने आवाज द्यायचा.
आपण एवढे महिने फक्त कुमारला दोषी समजत होतो,त्याचा गुन्हा समोर आणायला मुद्दाम कस्तुरीच भूत असल्याच भासवलं तरी उपयोग झाला नाही .
थोडक्यात तो ग्रुपच गुन्हेगार होता फक्त त्यांना आपआपसांतच त्यांचे गुन्हे माहित नव्हते."

"दादा ,सॉरी..
मी चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडली..
चल आता, त्यांना पकडल पण कारवाई अजुन बाकी आहे ना..
आधी घरी जाऊन आईला सांगू सर्व..
आणि तुझ्या बोलण्यावरून मी त्या ग्रुपमध्ये गेली, पण यापुढे ग्रुप निवडताना दहादा विचार करेन."

दोघे बहिण भाऊ घराकडे निघाले.
प्रतिशोध पूर्ण झाला होता..

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीली...
आता पुर्णसुद्धा झाली; अभिनंदन!!
मला मागे वाटलेलं, भुताबिताच्या वळणाने जाणारेय की काय Lol
पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा!!! Happy

मस्तच झाली कथा.!!
शेवट खूप आवडला..
लिहीत रहा..
पू. ले. शु.

शेवट कागदावर लिहून ठेवलेला फक्त टाईप करायचा कंटाळा आलेला.
पण दिलेला शब्द पाळून..
कथा नीट पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

मस्तच झाली कथा.!!
शेवट खूप आवडला..
लिहीत रहा..
पू. ले. शु. >>>+111

छान लिहीली.. पण छोटे भाग अन गॅपमुळे थोडा रसभंग होत होता. बाकी मस्त.. लिहीत रहा..
"भनक" अन इतर हिंदी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द वापरा की. Happy

आता नविन कथा घे लिहायला,>>>
हा

छान जमलीय कथा.>>>
धन्यवाद Happy

मस्त कथा....छान जमलिय>>>
धन्यवाद Happy

पण छोटे भाग अन गॅपमुळे थोडा रसभंग होत होता. बाकी मस्त.. लिहीत रहा.."भनक" अन इतर हिंदी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द वापरा की.>>
पुढच्या वेळी लक्षात ठेवेन.
धन्यवाद
Happy

मस्त जमलिय....>>>धन्यवाद
Happy

आता वाचला फायनल भाग.. छान झालाय पण काही भाग परत वाचावे लागले लिंक लागायला..
पूढील लेखनास शुभेच्छा.. आणखी कथा कादंबऱ्या साठी..