प्रतिशोध भाग-९

Submitted by कविता९८ on 8 September, 2017 - 03:41

(पुढचा भाग जरा मोठा आणि शेवटचा असल्याने हा भाग मुद्दाम लहान लिहिला आहे.)

भाग ८- https://www.maayboli.com/node/63785?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C7880406050

प्रतिशोध
भाग - ९

प्रसंग १
स्थळ: काव्याचं घर

"काव्या , गौरव जेवण तयार आहे,
किती वेळ गप्पा मारणार आहात?"
जवळपास 3 तास गप्पा मारत असलेल्या दोघा बहिण-भावांना आईने आवाज देऊन बाहेर बोलावलं.

"मम्मी पप्पा नाही आले अजून?"
आईला ताटं वाढताना मदत करताना काव्याने विचारलं.

"उशीर होणार आहे त्यांना,
तेच बोलले जेऊन घ्या."

"आई,खूप महिन्यानंतर तुझ्या हातच जेवणावर ताव मारणार."
गौरव बोलला.

"पोटभर जेव,सर्व तुझ्या आवडीच बनवल आहे
आणि काय रे सकाळपासून बघतेय..
काव्या आणि तुझ काय चालू आहे??"

"मम्मी काही नाही ग,
इतक्या महिन्यांनंतर भेटतेय दादाला मग लवकर सोडणार कस त्याला.
लग्न झालं की हा मग वहिनीलाच वेळ देणार ना..
तु तुझ्या सुनेसाठी शोधमोहीम सुरू कर."
विषय बदलत हसून काव्या बोलली.

तेवढ्यात गौरवचा फोन वाजला.
"हा बोल"
"ठिक आहे,
उद्या या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू
आणि मीडीयाला पण कळवा हे उद्या.
चल भेटू उद्या."

"काय रे गौरव,
कसला सोक्षमोक्ष?"
आईने विचारलं.

"काही नाही ग,
दादा इथे येऊन पण काम करतोय."
काव्या शांत पणे बोलली पण तिच्या मनात काहीतरी चालू होतं..

जेवण झाल्यानंतर काव्या आणि गौरव दोघं शतपावली करायला जातो अस सांगून निघाले..
काव्याने चालता चालता गौरवला विचारले
"दादा,

अजूनही समजत नाही की नक्की कोण
गुन्हेगार आहे.
स्वरा गायब आहे ,
हे तू मला सांगितलं पण कुठून गायब झाली, कोणी केलं,का केलं हे नाही सांगितलं.
तू सर्व अर्धवट सांगितलं.
स्वराला गायब कोणी केलं?
कस्तुरीला कोणी मारलं आणि का मारलं??"

"समजेल ग उद्या..
ही केस सॉल्व्ह होत आली आहे..
हे आपण कस्तुरी साठी करतोय एवढ लक्षात ठेव.
आतापर्यंत आपण जे काही नाटक केल ते चांगल्यासाठीच ना.
पण एवढ करून सुध्दा यातील मुख्य सुत्रधार कोण तेच समजत नव्हत.
"मग आता तरी समजलं का कोणी मारलं ते तुझ्या लाडक्या कस्तुरीला..
दा तुझ्या खूप जवळची होती ना?"

"हो , एवढ्या जवळ की आता तिला ज्यांनी मारलं त्यांना फासापर्यंत पोहचवूनच राहणार..."

"दादा सॉरी रे,
त्या ग्रुप सोबत राहून पण मी जास्त माहिती जमा करू शकली नाही.
तुला एक सांगू..
त्यादिवशी मला काहीतरी भास झाला तेव्हा कसली सॉलिड घाबरली होती.
तू माझ्यावर पाळत ठेवायला माणूस का नेमला होता?
मी स्वतः च रक्षण करू शकते ."

"ते गरजेच होत काव्या,
आपल्याला तेव्हा माहित नव्हत की नक्की गुन्हेगार कोण?
सावध राहण गरजेचं होतं."

"मला तर कुमार वरच संशय आहे.
स्वराला गायब करण्यात आणि कस्तुरीला मारण्यात त्याचाच हात आहे."

"अजूनही काही सांगू शकत नाही.
चल आता घरी जायूया.
उद्या लवकर उठून ठरवल्याप्रमाणे करायच आहे सर्व."

"चला दादासाहेब."

"खूप दिवसानंतर तुला हसताना बघतोय."

"हो का,
लवकर गुन्हेगार पकड म्हणजे अजून खूष होईन मी."

"Acting चांगली करतेस हा पण.."

"हमम"

"काय हमम.
तू खरच सियालच्या प्रेमात पडली का?"

"माहित नाही दादा.
कस्तुरीच्या सर्वात जवळ तोच होता म्हणून मी पण त्याच्या जवळ गेली.
मला हे प्रकरण माहित होत पण नेहमी वाटायचं की त्याने स्वतःहून विषय काढायला हवा.
पण नाही ..
म्हणून तर जास्त माहिती जमा करता आली नाही. तो एक मित्राच्याच रोल मध्ये फिट आहे सध्या.."

"तुझं सियालपुराण ना पूर्ण रात्र चालू राहणार.
चल आता."

एवढं बोलून गौरव बिल्डींगच्या दिशेने चालू लागला.
आणि काव्या फोनमध्ये बघत बघत गौरवच्या मागे चालू लागली.

अंतिम भाग- https://www.maayboli.com/node/63831?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C2942068196

Group content visibility: 
Use group defaults

मस्त...आज मी पहिली Happy
पुढचा भाग वीकेंड ला देणार का :-(..आता दोन दिवस विचार करण्यात जाणार आमचे...मस्त सस्पेन्स ठेवलाय.काहीही अंदाज येत नाहिये पुढे काय याचा.

मस्त.....>>धन्यवाद dabbu

काव्या नि कस्तुरी जुळ्या आहेत की काय?? उत्सुकता खूप ताणली गेलीय, लवकर पोस्टा बरं पुढचा भाग!>>>
रविवारी तुमच्या उत्सुकतेला पूर्ण विराम मिळेल Happy

संस्पेंस तर राखलाय! संवाद मस्त जमलेयंत.
शेवट काय करायचा आहे हे कथा लिहायला सुरूवात केली तेव्हाच ठरवलेलं आहे/होतं की जसं लिखाण होत गेलं तशी बदलत चाललीये कथा?
शेवटच्या भागासाठी शुभेच्छा!

<<काव्या नि कस्तुरी जुळ्या आहेत की काय??>> कस्तुरीवर गौरवचं जिवापाड प्रेम होतं. आणि मला सियाल आणि अनूचा संशय येतोय त्यांना कस्तुरीच्या खुन्यांबद्दल समजलं आणि ते बदला घेण्यासाठी हे सगळं करत आहेत. पुढचा भाग लवकर येऊदेत.

शेवट काय करायचा आहे हे कथा लिहायला सुरूवात केली तेव्हाच ठरवलेलं आहे/होतं की जसं लिखाण होतगेलं तशी बदलत चाललीये कथा?>>
भयकथा म्हणून लिहणार होती,
नंतर विचार बदलला.

पुढचा भाग लवकर येऊदेत.>>
Happy कथेला योग्य शेवट द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

पुढचा भाग कधी????>>
VB दी पोस्ट केली ,पण तुम्ही गायब.

भयकथा म्हणून लिहणार होती, >>>
याआधीही 'अनाहूत' भयकथा म्हणून लिहीणार होतीस पण ती 'गोडकथा' झाली.
प्रतिशोध मध्येपण भूत आणलं पण पुढं वेगळं वळण दिलंस!
एक थरकाप उडविणारी भयकथा तुझ्या लेखणीतून नक्की वाचायला मिळावी ही अपेक्षा....तु लिहीताना संवादयोजना भारी करतेस, भयकथा वाचायला मजा येईल. Happy

याआधीही 'अनाहूत' भयकथा म्हणून लिहीणार होतीस पण ती 'गोडकथा' झाली.प्रतिशोध मध्येपण भूत आणलं पण पुढं वेगळं वळण दिलंस!एक थरकाप उडविणारी भयकथा तुझ्या लेखणीतून नक्की वाचायला मिळावी ही अपेक्षा....तु लिहीताना संवादयोजना भारी करतेस, भयकथा वाचायला मजा येईल.
>>>
प्रयत्न करेन. Happy

कऊ आहे ग मी ईथेच, पण आता ऊद्या पुर्ण कथा परत एकदा वाचुन अभीप्राय देईन
>>>>ओके दी