प्रतिशोध भाग-सहा

Submitted by कविता९८ on 17 August, 2017 - 10:34

प्रतिशोध भाग-सहा

:- कुठे आहेस तू??
सर्व ठीक आहे ना??
प्लॅननुसारच चालू आहे ना सर्व??

:-हो,काही काळजी करू नको.

:- ठिक आहे, के
मी येणार आहे तिथे, भेटू आणि मग पुढच ठरवू

:-तु मला टोपणनाव "के"अस काय दिलं,काहीतरी चांगल तरी द्यायच.

:-आता यावरून भांडणार आहेस का तू??भेटून भांडूया ओके ,काळजी घे.

:- ठिक आहे, तू पण काळजी घे.

****
स्थळ : काव्याचे घर

"काव्या , गौरव कुठे चाललात एवढ्या घाईत? मस्त काहीतरी बनवते मी,बसा तुम्ही."

"मम्मी बाहेर जातोय आम्ही, तू बनवून ठेव ना,आल्यावर खाऊ आम्ही."

"आई,येतो आम्ही थोड्या वेळात, आणि हो उगाच काळजी नको करू, मी आहे तिच्या सोबत."एवढं बोलून गौरव काव्याच्या मागे निघाला.

"अग हळू जरा, किती घाई?"

"दा,घाई तर करावीच लागणार ना,
मला कस्तुरी बद्दल सर्व जाणून घ्यायचय.बोलली होती तुला तरी..."

"काव्या , मी गाडी काढतो, थांब जरा."

"का, रिक्षाने जाऊया चल."

"गाडी असताना रिक्षा??एवढी कोणाला घाबरते?नाटक नको करू चल लवकर."

"सियालने कॉल केला तेव्हा होता ना तू समोरच..तुझ्याबद्दलच विचारत होता तो.कोण होता तुझ्यासोबत?
त्याला काय वाटलं असेल रे??"

"सियालपुराण थांबवणार आहेस का आता?"

"तिला कॉल करते एकदा."

काव्या :- "अग आम्ही निघालो आहोत."

स्वरा:- "काव्या मी तुलाच कॉल करणार होती. आपण प्लीज अजून कुठेतरी भेटूया,का ते विचारू नको.
मी...मी तुझ्या घरी येऊ का??
ते जास्त सेफ राहणार."

काव्या:- "ठिक आहे, ये तू,घर माहित आहे ना?"

स्वरा:- "हो,बाय"

काव्या:-"बाय"

"काय झालं ग,दा चल घरी "

"घरी??का??ती घरी येतेय ते तर समजल मला पण बाहेर भेटणार होतो ना."

"माहित नाही , काय झालं
तू चल , ती येईल बरोबर."

****
"कुमार मला वाटतयं की काहीतरी गडबड आहे."

"सँडी, मी खरच तिला बघितलं, ती कस्तुरीच होती.
मी नाही ओळखणार का तिला."

"तु फक्त एक ब्रेसलेट असलेला हात बघितला, हे तूच बोलला?"

"सँडी,कुमारने तर तिला खूप जवळून बघितलं आहे.तो कस विसरेल तिला."
हसतच बबलु बोलला.

"ए,बस
फक्त मी नाही , तुम्ही सर्व होता तेव्हा तिथे.
तिला धमकी दिली तेव्हा म्हणून वाचलो..सियालसाठी पागल होती ती.जस आता ही काव्या आहे."
बेडवर पडलेला कुमार खवळला.

"तेच,ती सियाल मुळे गप्प बसली.
सोड यार,विसर आता.
अनु कुठे गेली आहे ?"

बबलु : "जाताना तर बोलली की काव्याला भेटायला जातेय.सियाल पण नाही म्हणजे नक्की काव्याला समजावयला गेले ते.."

श्री : "सकाळ पासुन बघतोय, अनु आणि सियाल टेंशन मध्ये आहेत.. काहीतरी आहे जे आपल्याला माहित नाही"

कुमार : "आणि अस खूप काही आहे जे त्यांना माहित नाही."

बबलु: "आणि अनुला यातलं काही माहित नाही झालं तर बर..
नाहीतर आपण फसणार."

Group content visibility: 
Use group defaults

चांगली चालली आहे कथा ..पण भाग जरा मोठे टाका ना Sad वाचायला गती मिळेपर्यंत भाग संपतोय देखील .. अगदीच २ -३ मिनिटात वाचून झाली ..

Khup divas jhale tumhi pudhcha bhag taknar aahat ki nahi...itaki vat bghayla lavu nka please...yamule goshtitala interest sampto