तो,ती आणि अबोल प्रेम

Submitted by mr.pandit on 9 September, 2017 - 08:13

त्याने 'तुझ्यावर प्रेम आहे' म्हटल
तर ती खळखळुन हसते
हो किंवा नाही काहीही सांगत नाही
फक्त्त् थोडी अबोल होते

ती अबोल झाली की
त्याच्याही जीवाची तगमग होते
त्याची होणारी तगमग पाहुन
ती पुन्हा खळखळुन हसते.

त्याच्या या प्रेमापुढे नेहमी
अस्वस्थ् उदास होते ती
तिचही आहे प्रेम् त्याच्यावर्
पण सांगत नाही ती

तिच्या अशा वागण्याने
तो ही हतबल निराश होतो
आता थांबायला हव आपण
अस वाटुनही पुन्हा अडकतो

याचा शेवट कसा होईल
हे न त्याला माहीत् न् तिलाही
पण खुप प्रेम आहे तुझ्यावर
हे सांगायचय् कधीचे तिलाही
- निखिल ०९/०९/२०१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!! Happy
शीर्षक पण भारीये..दोन्हीचं कॉम्बो..

सुंदर !!!!

Happy
शेवटच्या कडव्यात "हे सांगायचय् त्यालाही अन तिलाही" च्या ऐवजी "हे सांगायचय् तिलाही"असं हवं का? कारण, " तुझ्यावर प्रेम आहे'" असं त्याने
म्हटल्याचं पहिल्याच कडव्यात आहे!

धन्यवाद राहुल Happy
अनंतयात्रीजी बदल केला आहे प्रसंगानुरुप सुचली म्हणुन लिहिली Happy चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद्

खुप छान...

स्पेशली हे कडवं खुप आवडलं.

"तिच्या अशा वागणयाने
तो ही हतबल निराश होतो
आता थांबायला हवं आपण
असं वाटूनही पुन्हा अडकतो.."

मस्त.. आवडली....अस वाटतंय की तो एकदम सिरीयस आहे प्रेमात...आणि ती?? प्रेम असलं तरी अजून त्याच्या इतका सिरिअसपणा आलेला नाही...मग बहुदा वेळ गेल्यावर तिला कदाचित जाणीव होईल...