उरलेल्या पोळींचे लाडु

Submitted by friend१६ on 28 August, 2017 - 23:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उरलेल्या पोळीं

गुळाचा किस घेवुन किंवा आपला अख्खा गुळ तुकडा ही चालेल

2चम्मच तुप

ड्रायफ्रुट

क्रमवार पाककृती: 

उरलेल्या पोळींचे मिक्सरला लावुन बारिक चुरा करून घ्या. ब्रेड क्रम्स बनवतो तसा.

पँन मध्ये गुळाचा किस घेवुन किंवा आपला अख्खा गुळ तुकडा ही चालेल,टाकुन त्यात 2चम्मच तुप टाकुन एकतारी पाक बनवणे.

पाक झाला कि लगेचपोळीचा चुरा टाकुन पुन्हा एकदा हालवुन घ्या

मग त्यात ड्रायफ्रुट टाकुन सगळे मिश्रण एकजीव करून त्यात मस्त छोटे छोटे लाडू वळवुन घ्या.

(अंजिरचे मस्त छोटे छोटे पीस करून टाकले कि अजुन मस्त चव येते व तोडांत मस्त क्रम्स पण लागतात.

अधिक टिपा: 

Hya paddatine yetil laddu,he laddu 1week changale rahatat

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.ऑफिसमधे मैत्रिण आणायची. मैत्रिणीची आई यात सुंठ पावडर घालायची.वरुन किसलेले सुके खोबरे.त्या सुंठीच्या स्वादासाठी तो लाडू सर्वांना आवडायचा.

आम्ही ह्याला चुरम्याचे लाडू म्हणतो☺️
फक्त पोळी ताजीच असते, शिळी नाही अन १६ सोमवारच्या उपासाला नैवेद्य म्हणून हेच लाडू असतात, ड्रायफ्रूट शिवाय

मला खूप खूप आवडतात हे लाडू, मस्तच असतात, अन तूप घालताना कंजूशी करायची नाही बिलकुल, अगदी सढळ हाताने घालायचे

१६ सोमवारच्या उपासाला नैवेद्य म्हणून हेच लाडू असतात,
>>
आणि अगदी सत्यनारायण पुजेच्या प्रसादासारखंच पुजेद्सिवाय इतर दिवशी केले की सेम टेस्ट येत नाही आजिबात
काय कारण असेल काय माहीत