खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने

Submitted by संयोजक on 27 August, 2017 - 23:58

खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

तिसरा विषय :
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

तिसरा क्लू :
बांगडीचा एक प्रकार
_ _ डी

Group content visibility: 
Use group defaults

मी देते
पुरूष वापरत, नावाचे पशुखाद्याशी साम्य

मी एक दोन किंवा तीन अक्षरी वस्तू. आजकाल मला प्लॅस्टिकपासून बनवतात. पूर्वी बहुतेकवेळेला मी हस्तिदंती असे.
बहुतेक सगळ्यांच्याच पर्सेस मध्ये आणि पाकीटांमध्ये असते.

योकु , कंगवा/फणी.
काय चाललंय काय? पुढचा क्लु कोणी द्यायचा ते ठरवा.

मी देते
पुरूष वापरत, नावाचे पशुखाद्याशी साम्य
Submitted by अवनी on 28 August, 2017 - 17:23

>>>>

He sutal ka?

Pages