अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा : फेसबुकसाठीचे रेडिमेड स्टेट्स : र।हुल

Submitted by र।हुल on 26 August, 2017 - 12:54

लक्ष द्या! लक्ष द्या!! लक्ष द्या!!!

●तुमच्या मित्रांच्या फ्रेंडलिस्टीत १७६० पोरी न् तुम्हाला एकच मिळण्याची मारामार?

●तुमच्या फोटोला ती लाईक करत नाही? ऑनलाइन असूनही रिप्लाय देत नाही?

●तुम्हाला ऑनलाइन समजून घेणारा चांगला मित्र हवाय?

●राजकारणात येण्यासाठी ओळख बनवायचीय?

●हटके बर्थडे विशेस हवेत?

●लोकांचं लक्ष वेधून घ्यायचंय?

●तुमच्या उत्पादनाची ऑनलाइन जाहीरात करायचीय?

या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर, तुम्हाला हवेत जरा हटके आणि वाचताच मोहिनी घालणारे खास स्टेट्स!

#एंटे लंटाईन दंटेतेस कंटाय?
#अंटामचा कंटट्टा लंटैय भंटारी!
# ऐंजरफे, बंजरफघतोस कांजरफाय मुंजरफुजरा कंजरफर.

यांसारख्या रेडिमेड स्टेट्स साठी―

सादर आहे,
बाबा बंगाली फेसबुक स्टेट्सवाले!

खास मंत्रांकीत असलेले 'सिद्ध' केलेले तय्यार स्टेट्स आम्ही आपल्याला वाजवी दरात उपलब्ध करून देत आहोत.
आमच्या वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करा, आपली समस्या सांगा आणि मिळवा दररोज हवे तितके हवे तसे स्टेट्स! चार्जेस फक्त ₹३०/महिना.

त्वरा करा. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिपावलीनिमीत्त २०% सवलत. आपल्या मायबोलीकरांना* आणखी विशेष सूट.

भेट द्या,
यूव्हीडब्लू.बाबाबंगालीफेसबुकस्टेट्सवाले.कॉम

Email―
bπbfsw@₹ahulmail.com

[*नियम व अटी लागू]

adv.no. 19921320

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या मित्रांच्या फ्रेंडलिस्टीत १७६० पोरी न् तुम्हाला एकच मिळण्याची मारामार?
>>>>

बस्स हा एक प्रश्न सुटला की आणखी काही नको Happy

मस्त