अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा- ताडमाड चुर्ण

Submitted by मंगेश.... on 26 August, 2017 - 08:19

नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी झटपट पटापट उंची वाढवण्यासल्ल्ल्ल्लठी ताडमाड जडीबुटी घेऊन आलोय्. याला ताडमाड असे नाव देंण्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे औषध घेतलेल्या सर्वांना किती ताडामाडा सारखा वाढलायस असे ऐकुन घ्यावे लागते. हे औषध द्रव्य स्वरुपात आहे पण ते चुर्णच आहे.
ह्यातील काही औषधाचा शोध बाबा चमत्कार पे चमत्कार यांनी काही वर्षापुर्वी गोव्यात नारळांच्या झाडांपासुन लावला. नारळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना त्यांच्या तोंडात वरुन एक द्रव पदार्थ् पडला (बाबा झोपलेल्या अवस्थेत ध्यान करतात्. ) . त्याचवेळी त्यांना आपण खुप उंच व शक्तिशाली झालो आहोत असे वाटु लागले.
त्यावेळेपासुन बाबांनी हे औषध प्राशन करायला सुरुवात केली. बाकिच्या जडीबुटिंसाठी बाबा काही दिवस अफ्रिकेच्या जंगलात परिक्रमा करत होते हे त्यांच्या रंगावरुन लक्षात् येते . ही दोन्ही औषध एकत्र करुन बाबांनी अत्यंत प्रभावशाली औषध तयार केले आहे. पण आपल्या भक्तांना मान वर करुन पाहायला लागेल म्हणुन ते या औषधाचा वापर फक्त्त् एनर्जी मिळवण्यासाठी करतात. प्रचंड योगसाधना करुन त्यांनी स्वत्:ची उंची कमी ठेवली आहे.
हे औषध दुधाबरोबर घ्यावे लागत नाही. डायरेक्ट नाक दाबुन प्यावे लागते. हे औषध पिताच तुम्हाला याचे परिणाम जाणवतील.
आमचा पत्ता- चोरआश्रम,चोरनगरी, चोरगल्ली खोली न.420.
अवांतर- ता.क - नवीन आहे चु.भु.द्या.घ्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त !
बाबा झोपलेल्या अवस्थेत ध्यान करतात्.>>> Lol

कडक!!