Submitted by संयोजक on 25 August, 2017 - 22:23
कविकल्पना - २ - काहीतरी कारण असावं लागतं
तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'
दुसरे शीर्षक :
".. काहीतरी कारण असावं लागतं!"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निर्गुणाच्या रुपा तू,
निर्गुणाच्या रुपा तू,
सगुण झाला आहेस
निराकार तू चैतन्या,
साकार झाला आहेस
तुझ्या भेटीला आता
कष्टावं लागत नाही
अर्धोन्मीलित नेत्रांना,
भ्रूमध्यात स्थिरावण्या
आता कारण लागत नाही
मस्त कविन, स्वरूप (लाजली
मस्त कविन, स्वरूप (लाजली कविता फार मस्त.)
मस्तच सर्वांच्या
मस्तच सर्वांच्या
आकलनापलीकडे घडतात,
आकलनापलीकडे घडतात,
अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात अकारण.
पण त्याच दुसऱ्यांना उलगडून सांगताना,
काहीतरी कारण असावं लागतं.
कां अचानक अशीं, पानं पडावीं
कां अचानक अशीं, पानं पडावीं गळून
कातळावरचं कलम , कां लाजावं मोहरून
मृदगंध दबलेला, यावाच कां दरवळून
हिरवळीची हौस, यावी सॄष्टीची उफाळून
ॠतुंच्या या वारकर्याना, पडलाय कधीं हा प्रश्न
व्हायला असं, काहीतरी कारण असावं लागतं ?
व्वा! सुंदर रचना भाऊ नमसकर जी
व्वा! सुंदर रचना भाऊ नमसकर जी !
खुप छान, कविन.
खुप छान, कविन.
खुप छान, कविन.
.
धन्यवाद आशूडी!
धन्यवाद आशूडी!
सर्वच कविता छान!
सर्वच कविता छान!
माझ्यासारख्या गद्य व्यक्तीने
सुग्रास ताट पुढे आल्यावर
'जाणिजे यज्ञकर्म' आठवून
उदरभरण करावं लागतं...
माझ्यासारख्या गद्य व्यक्तीने
पद्याकडे पाहायला...
काहीतरी कारण असावं लागतं
पण, स्वतःशी बोलायला, निवांत
पण, स्वतःशी बोलायला, निवांत बसायलाही
काहीतरी कारण असायला लागतं?>>>> अप्रतिम
रविवार संध्याकाळची निळाई
रविवार संध्याकाळची निळाई
नेहमीचीच
सोमवार सकाळची घाई,
ती पण नेहमीचीच,
डबा, फोन, जिमचे कपडे , पेनमधे शाई
तेही नेहेमीचंच
रोज मला उशीर करते ताई
ही तक्रार पण तीच
मग गजराच्या आधीच उठून , वेळे वर तयार कशीकाय जोडगोळी ?
नव्या वर्षाचा पहिला दिवस !!
दिलखुलास 'हो' म्हण किंवा चक्क
दिलखुलास 'हो' म्हण किंवा चक्क 'नकार' दे
ते तू एक 'चांगला मित्र' वगैरेचे घोळ नको
आवडतोस किंवा आवडत नाहीस इतकेच पुरे
बाकी काढीव कारणांचे खेळ नको!
स्वरुप मस्तच
स्वरुप मस्तच
मस्त !!!!! सगळ्या कविता
मस्त !!!!! सगळ्या कविता आवडल्या !!!!
सर्वच कविता सुरेख!
सर्वच कविता सुरेख!
कारवी, तुम्ही सुद्धा कविता करता! खूपच छान!
सर्वांच्याच कविता सुंदर!
सर्वांच्याच कविता सुंदर!
काही काही फारच छान!
Pages