"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रागिणी ही काटेकोर प्लॅन करून तो अमलात आणणारी थंड डोक्याची व्यक्ती नाहीय तर थोडी भिरभिरलेली, तिच्या माणसांना संपवणार्यांना कसेही करून संपवायचेच हा एक कलमी कार्यक्रम घेऊन प्रसंग येईल तसा निर्णय घेणारी एक व्यक्ती आहे, जिने या आधी असले काहीही केले नाहीय. या उलट तिच्या समोरचे लोक थंड डोक्याचे, पूर्ण प्लॅन करून तो अंमलात आणणारे आहेत. या गेममधल्या दोन्ही पार्ट्या समान पातळीवर नाहीयेत, हेच मला वैशिष्ट्य वाटते या मालिकेचे. मुक्ताने खरेच कमाल केलीय. हल्ली हल्ली तिचा अभिनय खूप एकसुरी वाटायला लागलेला. पण रुद्रम हा खूपच सुखद धक्का आहे.

मला तर तो शेजारचा मुलगा आणि त्याचे बाबा पहिल्यापासूनच संशयास्पद वाटतात.... मे बी ज्या गोष्टी साठी त्यांच्या
घरात चोरी झाली ती माहिती मिळवण्यासाठी यांना नेमल असावं... शेजारी राहतात म्हणजे मुक्ताच्या घरी सहज वावरता येईल म्हणून... आणि कधी कधी तर वंदना गुप्तेवर पण डाऊट येतो बाबा... तीच तर नाही ना मास्टर माईंड..

चोरी रागिणीच्या घरी झाली, अपघात घडला त्याच रात्री. चोरी लॅपटॉपसाठी झाली, बाकी सामान नुसते उचकपाचक करून बघण्यात आले. आबा वर चोरांचे लक्ष गेले नसावे Happy

रागिणी नंतर ते स्वतःचे घर विकून आईच्या घरी राहायला आली. ह्या सर्व घटना घडून 2 वर्षे झालीत. या सर्व काळात रागिणी बधिरावस्थेत आहे, कोणाला भेटत नाही, कुठे जात येत नाही. आईच्या तगाद्यावे कंटाळून ती डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू करते. तिचे आयुष्य बदलले ते छाया भेटायला आली त्या पासून. फारतर महिना 2 महिने झाले असतील हे सगळे सुरू होऊन. यात चंदूदादांनी तिची शिकवणी घेतलेले दिवस पण टाकायला हरकत नाही.

रागिणीची आई आणि शेजारच्या मुलाचे वडील यांचं लग्न लावून देण्याचा अंदाज >>> Biggrin
एकता कपूर मालिका + बिनडोक मराठी मालिका यांचा एकत्रित परिणाम Rofl

ललिता-प्रीति>> Lol खरंच. सुहासचे बाबा नि रागिणीच्या आईच्या लग्नाचं वाचून माझं पण ऑऽऽऽ झालं.

आजचा भाग सॉलिड इंटरेस्टिंग होणारे, मराठी मालिका बघायला कधी नव्हे ते मजा येत्ये, मुक्ताची काळजीही वाटत्ये. वरच्या सगळ्या तर्कांना मम >> स रा "आबा" म्हणणण, शेजारचा मुलगा मदत करतोय \ निरूपद्रवी आहे का ते अजून क्लीअर न होणे.

रागिणीची आई आणि शेजारच्या मुलाचे वडील यांचं लग्न लावून देण्याचा अंदाज >>> हे चक्क माझ्याही मनात आलेलं Uhoh Lol

रागिणीची आई आणि शेजारच्या मुलाचे वडील यांचं लग्न लावून देण्याचा अंदाज >>> काहीही आहे हे
एकता कपूर मालिका + बिनडोक मराठी मालिका यांचा एकत्रित परिणाम> नैतर काय

रागिणीची आई आणि शेजारच्या मुलाचे वडील यांचं लग्न लावून देण्याचा अंदाज >>> काहीही आहे हे
एकता कपूर मालिका + बिनडोक मराठी मालिका यांचा एकत्रित परिणाम> नैतर काय>>>>>>

वेल, एक वृद्ध स्त्री व वृद्ध पुरुष ज्यांचे जोडीदार गेलेत व ज्यांना आधाराची गरज आहे असे दिसतेय, त्यांनी तो आधार एकमेकात शोधला तर ते खूपच चुकीचे आहे का? वृद्धांनी असा आधार शोधायला हवा हे ज्यांना वाटतेय त्यांच्या डोक्यावर बिनडोक मालिकांचा प्रभाव आहे? आपल्या आजच्या समाजात जिथे मुले आता स्वतःचे आयुष्य आई वडलांपासून वेगळे जगू इच्छितात तिथे त्या एकाकी आईवडलांनी हा पर्याय निवडला तर आजही आपण त्यांना डोक्यावर बिनडोक मालिकांचा परिणाम झालाय असे म्हणणार आहोत का?

इथे वर गुन्हेगार हस्तक म्हणून आईवरही संशय घेऊन झालाय, त्यात चुकीचे नाही कारण अशा नाट्यात कोणीही हस्तक असू शकतो, पण तेव्हा कोणी डोक्यावर मालिकांचा प्रभाव किंवा too much who done it चा प्रभाव म्हटले नाही. पहिल्यापासून मालिका बघणार्यांना आई हस्तक नाहीये हे कळते. तेच दोन एकाकी वृध्द दाखवलेत आणि पाहणाऱ्याच्या डोक्यात त्यांच्या विवाहाचा विचार आला तर मात्र डोक्यावर मालिकांचा परिणाम? कमाल आहे.

मुक्ता सगळं खरं सांगून टाकते, त्या नर्सला धमकावलं तिला खरं सांगितलं, अभिनय फार छान जमलाय तिला. आजच्या भागाची उत्सुकता आहे.

वेल, एक वृद्ध स्त्री व वृद्ध पुरुष ज्यांचे जोडीदार गेलेत व ज्यांना आधाराची गरज आहे असे दिसतेय, त्यांनी तो आधार एकमेकात शोधला तर ते खूपच चुकीचे आहे का? वृद्धांनी असा आधार शोधायला हवा हे ज्यांना वाटतेय त्यांच्या डोक्यावर बिनडोक मालिकांचा प्रभाव आहे? आपल्या आजच्या समाजात जिथे मुले आता स्वतःचे आयुष्य आई वडलांपासून वेगळे जगू इच्छितात तिथे त्या एकाकी आईवडलांनी हा पर्याय निवडला तर आजही आपण त्यांना डोक्यावर बिनडोक मालिकांचा परिणाम झालाय असे म्हणणार आहोत का?>>>>>>>>>>>> फारफेच्ड अ‍ॅज युज्वल.

ही सिरीयल ज्या काही विषयावर आहे त्याच विषयाशी प्रामाणिक रहावी, हे लग्न बिग्न काही न दाखवता इतकीच माफक अपेक्षा आहे हो आमची.

वृद्धांनी असा आधार शोधायला हवा हे जेव्हा रीयल लाईफ मधे असेल तेव्हा माझी मतं वेगळी असतील हे मी तुम्हाला सांगणं खरंच गरजेचं नाहीये खरंतर.
साधना, तुम्ही कथा, सिरीयली वैगेरे फारच पर्सनल लेवल वर घेताससं दिसतंय.

पोलिस तिथे पोचेसतोवर मुक्ता काम ऊरकुन निघुन गेली असणार.. >>>>>> होप सो !! नर्स तरी ह्या वेळी अगदी जबाबदार नागरीक बनली, आधी काहीतरी भानगडी करताना गप्प होती Happy

ही सिरीयल ज्या काही विषयावर आहे त्याच विषयाशी प्रामाणिक रहावी, हे लग्न बिग्न काही न दाखवता इतकीच माफक अपेक्षा आहे हो आमची.
>> हे पण बरोबर आहे. आणि अगदी शेवटच्या एपिसोडमध्ये हॅपी एंडिंग दाखवायची म्हणून दाखवणार असतील तर रागिणी आणि सुहास यांचं लग्न दाखवून ते दोघे एका घरात राहून आईबाबांची काळजी घेताहेत असं दाखवता येईल. आईबाबांनी लग्न केलं तर ते बहिणभाऊ होतील ना? Wink

पोलिस तिथे पोचेसतोवर मुक्ता काम ऊरकुन निघुन गेली असणार.. >>>>>> होप सो !! >> +१ असंच व्हावं. तिची काळजी वाटते फार.

पण तिने त्या नर्सला खरं सांगायला नको होतं. तिची भीड चेपल्यानेच ती पोलिसांकडे गेली. नाहीतर किमान नवरा आणि बाळासाठी गप्प बसली असती. मग थोडे दिवसांनी धीर आला असता तरी तोपर्यंत जरा थंड झालं असतं हे प्रकरण. आत्ता इतका ज्वलंत मामला असताना तिची भीती जाणे हे रागिणीसाठी धोकादायक आहे.

सस्मित +१, सिरीयलचा तो विषयच नाहीये..
आजच्या एपि विषयी लगेच बोलायचा खुप मोह होतोय..
पण आवरते, परदेशस्थां साठी.. Happy

हो.

हो ना, काल अगदी बघवत नव्हतं टी व्ही कडे, नुसती उत्सुकता.

ती मिताली जगताप आहे का ? ती आधी बघितल्यासारखी वाटते आहे.

वादळवाटमधली संतोष जुवेकरची बायको >>>>> बायको म्हणजे लग्न झालेलं नसतं ना, सं जु हा नीलम शिर्के चा भाऊ असतो का ? टकलू माणसाचा मुलगा ?

इतक्या मालिका बघून कोणाचं कोण आणि काय गोष्ट ह्याचा घोळ होतो.....

हातातल्या सुरीवर रक्त पाहिल्यावरचे मुक्ताचे हावभाव आणि घरी आल्यावर `कसंतरीच वाटतंय' म्हणत रडण्याचा सीन - दोन्हीही अफाट !

माझी जाम टरकली होती. मुक्ता बराच वेळ सुरीकडे बघत बसली होती. असं वाटलं की आता पोलीस येऊन तिला पकडतात की काय? (अर्थात असं झालं असतं तर सिरीयल इथेच संपली असती.. तरीसुद्धा भिती वाटली).

नंतरही तिने शांत राहण्याच्या ऐवजी त्या न्यूज चॅनल वाल्याला उगाच थोड्या सटल हिंट्स पण दिल्या. आणि घरी येऊन आईला सुद्धा बोलली. मला वाटतं.. तिच्या हॉस्पिटलमध्ये शिरण्यापासून ती जाईपर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज जरी पाहिलं तरी तिला पकडणं सोप्पंय. आणि पोलिसाला हे सुचणार नाही (तिला आत शिरल्यापासून बाहेर पडेपर्यंत ट्रेस करणं) असं वाटत नाही.

रागिणी नवखी आहे हे मान्य आहे. पण त्यामुळे तिने खूप चुका केल्या आहेत हे सगळं करताना.

तुका म्हणे त्यातल्या त्यात तिला ते मोबाईल अनलॉक करून घ्यायचं सुचलं खरं. पण जेव्हा जेव्हा तो फोन स्विच ऑन आहे तेव्हा तेव्हा ती आणि तिचं लोकेशन ट्रेस होऊ शकतं. सो रिस्की आहे खूप.

Pages