मायबोलीवर मराठी का नाही!

Submitted by zakki on गुरु., 12/20/2007 - 16:32.
मायबोलीवर सुद्ध म्हराटीमंदी बोलायचा फतवा काढाया हवा... नाहीतर मायबोलीला "सायबाची बोली" म्हणायची येळ यायाला टैम नाय

असे आज Gsumit यांनी लिहीले आहे.

मायबोलीवर मराठी न लिहिण्याची कारणे:

मराठीत लिहायला कित्ती वेळ लागतो! मराठीत लिहिणे कठिण आहे! मी लहानपणापासून इंग्रजीतच शिकलो. (म्हणून मी इथे येऊन तुमच्या बोकांडी पण इंग्रजी मारणार!!)

आमच्या संगणकात मराठीची सोयच नाही हो.

अहो विनोद महत्वाचा की भाषा? भावना महत्वाच्या की भाषा?

भाषा कशाला बघता, आमचे विचार समजावून घ्या.

का तुम्हाला इंग्रजी समजत नाही का? अहो, मी काय म्हणतो आहे ते मराठीत सांगूनहि कळण्याइतकी अक्कल तुम्हाला नाहीये.
तुम्ही कोण आम्हाला सांगणार मराठीत लिहा म्हणून? आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे.

पूर्वी संस्कृत, प्राकृत अश्या भाषा होत्या. त्या आता कुणि बोलत नाही. तसेच मराठीचे होणार. अहो हे कालचक्र आहे.

मराठी म्हणजे कुठली मराठी? ज्ञानेश्वरांची, की शिवाजीची, की पेशव्यांची, की पुणेरी, की नागपुरी?

इतर भाषा वापरून आपली भाषा समृद्ध होते.

अहो, गेली कित्येक वर्षे पुण्यात अमराठी लोक येत आहेत. त्यांना समजायला नको का आपण काय बोलतो ते?

अहो बंगलोरला सगळे कानडीच बोलतात, म्हणून आम्हाला पण कानडी शिकावेच लागते.

(आता बंगलोरच्या लोकांना का नाही वाटत की यांना कानडी समजत नाही तर आपण मराठीत किंवा हिंदीत किंवा इंग्रजीत बोलावे?, कारण मराठी लोकांना भाषेच्या अभिमानापेक्षा आपल्या "हुच्च" विचारांचा जास्त अभिमान आहे. ते सगळ्यांना सांगणे महत्वाचे आहे. मराठी नसे ना का?)

तर Gsumit, अश्या अनेक कारणांमुळे मायबोलीवर मराठी बोलण्याचा फतवा काढणे शक्य नाही. तेंव्हा हा विषय इथेच थांबवावा.

Login or register to post comments


मराठीचा वापर हा माझाही कळीचा विषय. पुण्यात आल्यावर जाणवलेला सर्वात मोठा आणि धक्कादायक बदल म्हणजे सर्वत्र आता संभाषण हिंदीत सुरू होते. पोलिस म्हणू नका, रिक्षावाले म्हणू नका, ब्यांका, पोस्ट, अगदी वडेवाला जोशीसुद्धा आता सुरुवात हिंदीत करतो हे साक्षात अनुभवलं. नूमविसारख्या शाळेत शिकलेले माझे मित्र 'संडेला भेटू' म्हणतात, 'टेररिस्ट्सना कॅप्चर केलं' जातं, वजडी म्हणजे काय असं विचारल्यावर वेटर 'म्हणजे आतडी...intestine' असं शेपूटयुक्त उत्तर देतो... शहर बहुरंगी बहुढंगी होणे साहजिक आहे, ते आता होणारच. इतर कुठल्याच भाषेशी माझे वैर मुळीच नाही, उलट भाषा या प्रकारात मला अतिशय रस आहे.... किंबहुना, त्यामुळेच तुमचा मराठीचा आग्रह मला पटतो.



फास्ट लिहिता येते हो.. म्हणून लिहितो आम्ही इंग्रजीत... इथे वेळ आहे कुणाला...?

'परदेसाई' विनय देसाई



माझ्याकडे वेळ आहे. देवनागरी लिहिता पण येतं. पण मराठीत काय ल्याहायचं? श्शी!! कित्ती कंट्री वाटतं! हिंदी इंग्लिशला बघा कशी ग्रेस अन स्टाईल आहे! आपली मराठी भाषा काय कंडम माणसं बोलतात! त्यातून अमेरिकेत आल्यापासून तर इंग्लिश सोडून मराठी भाषेत स्पिकिंग अन रायटिंग जमतच नाही! मराठी स्पिकिंग पॉप्युलेशनचं ब्रदरहुड किंवा सिस्टरहुड कसं स्ट्रॉन्ग हवं, एकेमेकांना सांभाळुन घेणारं! ते सोडून काय आपलं एक्सारखं "मराठीत ल्याहा! मराठीत वाचा!" गेट्स सो डिफिक्ल्ट यु नो!
-मृण्मयी



वोव... क्आय पान प्रतीसाद आहे... मान्ले तुमस्नि!! वेल आतआ सम्ज्ले असेल च मरआती लिहिने किति कथीन आहे!!!!



हल्ली सगळीच संस्कृती(?) बदलत्ये. अगदी दुकान, शाळा, रहाणीमान सगळच.
पण म्हणून भाषा बदलावी हे न पटणारं आहे.
बागेत, रस्त्यांत, अगदी भाजी बाजारातही हल्ली बर्‍याच आया आणि वडीलही (यातले बहूतेकजण मराठीतून शिकलेले असावेत) आपापल्या सन आणि डॉटर्सशी ओढून ताणून इंग्लिश मधेच बोलत असतात, (चुकून मराठी शब्द तोंडून गेलातर स्वत:च्याच थोबाडीतही देतील अशी भिती वाटते). चुकून मुलं मराठीत बोलायची अशी भितीही असावी त्यांच्या मनात. बर काही मुलं मराठीही समजत नाही आणि इंग्रजीही नाही अशा वयाची असतात. त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही. हे सगळं पहाताना हसू आल्यावाचून रहात नाही.
एकदा एका मॉल सदृष्य दुकानात एक माता तिथे बागडणार्‍या तिच्या बाळाला अशीच ओरडत होती "डोन्ट टेक, पुट दॅट, पुट दॅट बटर हं" पोर काही या पुट पुटी कडे लक्षही देईना. शेवटी जोरात ओरडली"अरे पुटरे". कशाला हा अट्टाहास. मराठीतून बोलावंकी.



ओन्लि कुलदिप इज रायिट, उ न्ओ , आय टओटाल्लि अग्री, थिस सिते हस त्रिएद तो मके त्य्पेइन्ग एअस्य बुत स्तिल्ल वे हवे लोन्ग वय तो गो

संजय



मला आता खरच वाटायला लागलय की मी पुण्याला गेले तर माझे मराठी बिघडेल इतकी भाषांची सरमिसळ होतेय तिथे बोलतांना.
स्लार्टी तुम्हाला जाणवलेला धक्का मला पण प्रचंड जाणवला. सगळे जण संभाषणाची सुरुवात हिंदी नाहीतर इंग्रजीत करत होते. अगदी PMT चा कंडक्टरपण नो चेंज सांगतो चिल्लर साठी.
दुकानदार शंभर रुपये म्हणत नव्हते (हंड्रेड रुपीज) असे म्हणत होते. शनिवार-रविवार ऐवजी saturday-sunday, शेजार्‍यांना नेबर असे कितीतरी शब्द अगदी रुढ झालेले दिसले.
कुणीही एकच भाषा धड बोलत नव्हते ह्याच जास्त वाईट वाटले, सगळा धेडगुजरी कारभार. अरेरे



कुलदीप व संजय, तुमचे बरोबर आहे. प्रशासकांनी मायबोलीवर मराठी लिहीणे सोपे यासाठी 'देवनागरी' बटन दिले, पण मुलखाचा आळस(laziness), ढोंगीपणा(pretense), मुर्दाडपणा(insensitivity), निर्लज्जपणा(shamelessness), माज(arrogance), मग्रुरी(another level of arrogance) इ.इ. साठी बटन देणे याला अजून वेळ आहे, त्यामुळे अजून बराच पल्ला गाठायचा आहे (= still a long way to go).

History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.
-



न म स्का र!!

पण मुलखाचा आळस(laziness), ढोंगीपणा(pretense), मुर्दाडपणा(insensitivity>>>???

प्रतीसाद वाचले. "४८ (+) महीने" मायबोलीवर वावर करणार्याना मरातीत लिहीण फारच सोपे जात असेल. मी मोथ्या प्रयासाने हे लिहित आहे.

सुधलेखनाचया कितितरी चुका आहेत! पण आज पासुन मी मराथीतच (शु द्ह ) लिहिन.

आपला विनम्र,
दीपक.



पहिल्या झटक्यात शुद्धच लिहा असं माझं म्हणणं/आग्रह नाही (असलं तरी त्याला काय किंमत!). 'आता कळलंच असेल, मराठीत लिहीणे किती कठिण आहे...' किंवा 'this site has a long way to go' या ढुढ्ढाचार्यी हताश मनोवृत्तीवर माझा आक्षेप आहे (त्यालाही काहीच किंमत नाही). पहिल्यांदाच लिहीले तेव्हा निदान 'अवघड वाटतंय खरं, पण प्रयत्न करतो, सवयीने जमेल' असा यत्नवादी सकारात्मक विचार करायला ४८+ महिने वय असण्याची गरज असते ?? असो. तुम्ही प्रयत्न सुरू केलात याबद्दल तुमचं अभिनंदन. शुद्धलेखन हळूहळू आपोआप जमेल.

  • *** Intaxication: Euphoria after getting an income tax refund, which lasts until you realize that it was your money in the first place. ***



पुन्हा एकदा गैर समज!!
४८+ वय >> असे मी म्हटले नाही! (तुम्ही मायबोली वर माझ्या पेक्सआ जास्त कालावधी व्यतीत केलात हा सरल अर्थ निघ् तो. विपर्यास नको!) स्मित :) (ह् स तो य!!)
आता किमतीबाबत मी बापडा काय बोलणार?? ( चुकले ... लिहि णा र... स्मित ) .. मनोवृत्तीवर माझा आक्षेप आहे (त्यालाही काहीच किंमत >> 'शेवटी ही लोकशाही आहे...
ज्याला जे पटेल तो/ती ते ते करणार...

पुन्हा एकदा
आपला विनम्र,
दीपक.

Happiness is a myth; it was invented to make people buy things....



वय म्हणजे मायबोली वय हो अ ओ, आता काय करायचं (हा तितकासा सरळ अर्थ नसावा स्मित) बाकी तुम्ही माझ्या प्रतिक्रियेमुळे एकदम मराठीत (तेही बर्‍यापैकी शुद्ध) पेटलात, म्हणजे किंमत कळते की तुम्हाला (फारच समजावून सांगावं लागतंय बुवा !!) फिदीफिदी
झक्की, पहा. यांनी मायबोलीवर मराठीत लिहायला सुरुवात केली ते तुमच्या रंगीबेरंगीवर, अन् सुरुवातसुद्धा एकदम टोमणे, शेरे मारत अन् लोकशाहीवर भाष्य करत केली... काय गुण आहे !! फिदीफिदी

  • *** Intaxication: Euphoria after getting an income tax refund, which lasts until you realize that it was your money in the first place. ***



वा! इथ वय कसे समजायच? बर मी बहुतेक (सर्वाथाने स्मित ) तुमच्यापेक्शा लहान आहे! सदर एकेरी उलेख करावा! (विनम्र आवाहन / सुचना :- पुणेरी बोलीत!! स्मित

एक मात्र बर आहे की अकशर बर दिसत इथ!! धन्यवाद :- (सन्गणक/ Admin). बर का slarti काका (आदर अन् प्रेम स्मित ) मी ह्या आधी ही येथे लिखाणाचा (फोल) प्रयत्न केला आहे! स्मित

असो! पुणेरी सन्स्क्रुतीचा विजय असो!!
No Hard feelings!!

दीपक
"Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."



वा वा....

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....