आजोबांचे बालपण दहा बाय बाराच्या चाळीतल्या खोलीत गेले. स्वत:च्या हिंमतीवर त्यांनी चाळीत एकाच्या दोन खोल्या केल्या. पण सोबत फॅमिली प्लानिंग न जमल्याने त्या दोन खोल्यात एकूण आठ जणांचे बिर्हाड थाटावे लागले. माझ्या वडिलांच्या नशिबी फिरून पुन्हा खांद्यावर टॉवेल घेऊन मोरीबाहेर ताटकळणे आले. अश्याच एका सकाळी कडूलिंबाची काठी चघळताना त्यांनी ठरवले, हे घर जेवढ्या स्क्वेअरफीटचे आहे तितक्याच स्क्वेअरमीटरचे आपल्या मुलाचे स्वत:चे प्रायव्हेट बाथरूम बनवायचे. त्या नशीबवान मुलाला जन्म देणारी बाई, म्हणजे माझी आई त्यांना भेटलीही नव्हती तेव्हाची ही गोष्ट. जेव्हा भेटली तेव्हा त्यांनी छोटेसे का होईना स्वत:चे एक वेगळे घर घेतले आणि आपला स्वतंत्र संसार थाटला. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ते आपला संकल्प पुर्ण करण्यास उत्पन्नातील एक मोठी रक्कम बाजूला काढून ठेवत होते. आणि जेव्हा मी एकवीस वर्षांचा झालो, तेव्हा त्यांनी एका आलिशान घराच्या चाव्या माझ्या हाती ठेवल्या!
वाडवडिलांची पुण्याई म्हणा किंवा आणखी काही, दक्षिण मुंबईच्या मध्यवर्ती भागात, शेजारपाजारच्या मध्यमवर्गीय लोकांच्या केवळ स्वप्नातच असावे ईतके मोठे घर, आजच्या तारखेला मी माझे म्हणू शकतो. एक दूरवर नजर जाईल ईतकी जागा आज माझा हक्काचा निवारा आहे. म्हणजे बघा हं, सकाळी उठल्यावर ड्रेसिंग टेबलला खोचलेला ब्रश मी माझ्या दातात खुपसतो आणि तसाच अर्धवट झोपेत चालायला सुरुवात करतो. सवयीने लेफ्ट राईट वळले जाते. चांगला बत्तीस वेळा चावून चावून ब्रश करतो. होईहोईस्तोवर माझे फिरते शौचालय येते. तिथे माझा धावता कमोड असतो. त्यावर बसून कळ दाबतो. पोटातली नाही हां, ती निसर्गाने आधीच दाबली असते. तर, कमोडची कळ दाबतो. ते स्वत:भोवताली एक गिरकी घेत वार्याच्या वेगाने पळू लागते. मी त्यावर बसून मोबाईलवर व्हॉटसप कम फेसबूक चेक करत आपला कार्यभाग उरकून घेतो. होईहोईस्तोवर बाथरूम आले असते. मी कमोडवरून टुणकन ऊडी मारतो ते थेट बाथटबमध्ये पडतो. बाथरूम तसे फार काही मोठे नाही. पण कधी मूड आलाच तर तिथे कोपर्यात एक नाचण्यासाठी छोटासा स्टेज उभारला आहे. थोडीशी म्युजिक सिस्टमही आहे. कारण जसे बाथरूम सिंगर असतात, तसा मी बाथरूम डान्सर आहे. बाथरूममधून बाहेर पडल्यावर मी अंग पुसत पुसत कपाटात शिरतो...
जसे घराला पुढचा आणि मागचा असे दोन दरवाजे असतात, तसेच आमच्या कपाटालाही दोन दरवाजे आहेत. मी ईथून शिरतो आणि कपडे करत करत तिथून बाहेर पडतो. एक छानसे ड्रेसिंग टेबल कपाटातच मध्यभागी बनवून घेतले आहे. त्यामुळे केस विंचरणे, शर्ट ईन करणे ईत्यादी प्रकार मी कपाटातच ऊरकून बाहेर पडतो. बाहेर पडायची वेळ साधारण ठरलेली आहे. पण तरीही मला नाश्ता गरमागरम लागत असल्याने कपाटाचा मागचा दरवाजा उघडताच एक अलार्म किचनमध्ये वाजतो आणि पाचच मिनिटांत माझा ब्रेकफास्ट डायनिंग रूममध्ये रेडी असतो. डायनिंग रूमचा घेर आजवर कधी मोजायचा प्रयत्न केला नाही. पण सभोवताली एक जॉगिंग ट्रॅक आखला आहे. नाश्ता हजर व्हायला जो पाच मिनिटांचा वेळ वर नमूद केला आहे, त्यावेळेत मी एक फेरी मारून घेतो. तेवढाच व्यायाम होतो. परीणामी सडकून भूक लागते आणि न्याहारीवर तुटून पडतो. स्विमिंग पूलजवळ असलेल्या बेसिनवर चूळ मारतो आणि ऑफिसला निघतो. कितीही मोह झाला तरी स्विमिंग पूलचा वापर फक्त सुट्टीच्या दिवशीच पोहायला करायचा हा घरचा नियम मोडायला मन धजावत नाही.
थोडेसे अवांतर होईल, पण एखादे मायबोलीचे वर्षाविहार आमच्या घरच्या स्विमिंगपूल मध्ये डुंबून केले तरी माझी हरकत नाही. जमल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी माझी स्टडी रूम वापरू शकता. तसेही मी तिथे शेवटचा अभ्यास कधी केला आठवत नाही, निदान ती रूम माबोकरांच्या तरी कामात येईल. आशा करतो की तिथे तुम्ही अगदीच मॅरेथॉन, ट्रायथलॉन वगैरे स्पर्धा घेणार नाहीत. पण शंभर मीटर धावणे आणि चमचागोटी जमून जाईल ईतपत जागा आहे.
लोकांकडे होम थिएटर असते. आमच्याकडे होम स्टेडियम आहे. लाईव्ह क्रिकेट बघताना अगदी तसाच फील यावा म्हणून खुर्च्यांची अरेंजमेंट स्टेडियम सारखी केली आहे. अर्थात खुर्च्यांची संख्या फार नाही. तरी पन्नासेक जण एकाच वेळेस आपापल्या गर्लफ्रेंड सोबत सामना बघू शकतात ईतकी बैठक आहे. पण तेवढ्या खुर्च्या पुरतात. कारण माझे मित्र मोजकेच आहेत.
घरात नैऋत्य की आग्नेय अश्या एका तिरकस दिशेला एक पूजा रूम आहे. एकेकाळी तिथे गेल्याचे आठवतेय. मात्र ज्या दिवशी मी माझ्यातले नास्तिकत्व ओळखले, तेव्हापासून जिथवर अगरबत्तीचा धूर पोहोचतो, त्या हद्दीत जाणे टाळतो.
एक क्रिडारूम आहे. ईनडोअर गेम्स म्हणजेच कॅरम, बुद्धीबळ, सापशिडी ते ब्रिटीशांचा ल्युडो ईत्यादी गेम्स तिथे खेळले जातात. जेव्हा काका-मामा-आत्यांची पोरे म्हणजेच माझ्या भावंडांनी घर गजबजून जाते, तेव्हा खरी त्या रूमला शोभा येते. मी देखील तेव्हाच फक्त त्या क्रिडारूम मध्ये जातो. अन्यथा मला माझी किडारूमच जास्त आवडते. किडारूम म्हणजे त्या रूममध्ये किडे नाहीत. तर ते माझ्यात आहेत. तिथे ते बाहेर येतात ईतकेच.
त्या रूममध्ये फक्त एक बेड, एक टेबल आणि माझा लॅपटॉप आहे. पण मी तिथे का बोलतोय, ईथे बोलायला हवे ना. कारण आताचा लेखही मी या रूममधूनच लिहितोय. माझी वेगळी अशी बेडरूम आहे. पण बरेचदा मी किडे करता करता ईथेच झोपून जातो. सकाळी डोळा उघडतो तेव्हा जाणीव होते, घर मोठे झाले की माणसं लांब जातात. एकेकाळी मी छोट्याश्या हॉलमध्ये जेमतेम सोफ्यात, मांडीवर लॅपटॉप घेऊन बसलेलो असायचो. आई जवळच किचनमध्ये काम करत असायची. तिथूनच बसल्याबसल्या तिच्याशी दिवसभराच्या गप्पा मारायचो. तळलेल्या म्हावरयाचा वास तिथूनच थेट नाकात शिरायचा. त्याने ठसका लागला की दुसरयाच क्षणाला पाठीवर आईचा हात फिरायचा. ते छोटं घर तेवढं., तो मायेचा हात तेवढा., आजही मिस करतो..
पण या सर्वात एक गोष्ट मात्र समजली. जेव्हा आईवडिल आपल्या मुलांसाठी घर बनवतात, तेव्हा ते त्यांच्यासाठी 'मन्नत' असते. पण जेव्हा ते स्वत: मुलांबरोबर त्या घरात राहतात, तेव्हा ते मुलांसाठी 'जन्नत' होते !
- ऋन्मेष
ऋन्मेश तुम्ही खोट नाही
ऋन्मेश तुम्ही खोट नाही बोललात सगळ्च खोट आहे या लेखात...वाचतानाही काहिही मज्जा नाही आली...
काल्पनिक कथा+ बोरिंग कथा कशी लिहावी याच उदाहरण आहे खरतर हा लेख..पण त्यातही इतक फेकलय कि त्यावर चर्चा करण्याऐवजी लोकांनी इग्नोर केला हा लेख+ तुमच्या पोस्टी ज्यामधे लॉजिक नसून त्याही फेकल्यात ...म्हणुन अजून १०० नाही झाले..पण आता होईल अस वाटतय...
या लेखात काहि च खर वाटण्यासारख नाही..तुम्ही एकदा वाचा तुम्हालातरी खर वाटतय का सांगा...
खोटं कशाला म्हणतात, खोटे कसे
खोटं कशाला म्हणतात, खोटे कसे असते आणि खोटे कसे दिसून येते.. याचे प्रात्यक्षिक म्हणून हा लेख लिहिलेला..
आता पुन्हा कधीतरी याच विषयावर सत्यकथन लिहूया
खोटं कशाला म्हणतात, खोटे कसे
खोटं कशाला म्हणतात, खोटे कसे असते आणि खोटे कसे दिसून येते.. याचे प्रात्यक्षिक म्हणून हा लेख लिहिलेला.. >>>
उत्तर द्यायला काहिच सुचेना ..म्हणून हा प्रतिसाद दिलाय ना ..
आता पुन्हा कधीतरी याच विषयावर सत्यकथन लिहूया >>>> हो हो नक्की लिहा...
मी कधी वविला जाईन अस वातत नाही..पण या लेखातला एक पॅरा वाचून ठरवल होत जर तुमच्या घरी ववि आयोजित केली तर नक्की हजेरी लावायची ,आणि तुमच्याकडून आईस्क्रिम ची राहिलेली पार्टि घ्यायची ...पण सगळ फुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
खोटं कशाला म्हणतात, खोटे कसे
खोटं कशाला म्हणतात, खोटे कसे असते आणि खोटे कसे दिसून येते.. याचे प्रात्यक्षिक म्हणून हा लेख लिहिलेला.. >>> >>>>>
कोणाला टार्गेट करून
उत्तर द्यायला काहिच सुचेना .
उत्तर द्यायला काहिच सुचेना ..म्हणून हा प्रतिसाद दिलाय ना ..

हळदीला बोलवणार आहेस का रे
हळदीला बोलवणार आहेस का रे आम्हाला सगळ्याना ?
हळदीला बोलवणार आहेस का रे
हळदीला बोलवणार आहेस का रे आम्हाला सगळ्याना ? >>>>

किती तो आटापिटा शंभरी
किती तो आटापिटा शंभरी गाठण्याचा २३ प्रतिसाद धागाकर्त्याचेच ............
खोटं कशाला म्हणतात, खोटे कसे
खोटं कशाला म्हणतात, खोटे कसे असते आणि खोटे कसे दिसून येते.. याचे प्रात्यक्षिक म्हणून हा लेख लिहिलेला.
पूर्वीचा ऋन्मेष नाही राहिला आता.
त्याचे पूर्वीचे एक्स्क्यूजेस जास्त विश्वास ठेवण्याजोगे असायचे.
पूर्वीचा ऋन्मेष नाही राहिला
पूर्वीचा ऋन्मेष नाही राहिला आता>>>>>>
आता मी भारतातला माणूस झोपायला जाईन आणि अमेरीकेतला डॉलरवर कामाला ठेवलेला येईल.. उगाच नाही माझे धागेही रात्रीचे तीन चार वाजता निघतात.. आणि लगेच पहाटे सातच्या ठोक्याला आलेल्या प्रतिसादांना धन्यवाद म्हणून रिप्लाय असतो
>>>>>>>
हा धागा दुसर्याने काढला असेल तर
हळदीला बोलवणार आहेस का रे
हळदीला बोलवणार आहेस का रे आम्हाला सगळ्याना ?
>>>>>
मध्येच हळदी कुठे आठवली.. माझ्या आयुष्यात काय आता एक तेच घडायचे बाकी आहे का
पण या हळदीवरून आठवले.. मी दारूचे कधीच समर्थन करत नाही. आणि माझे मित्र हळदी = दारू या समीकरणाला मानणारे आहेत. त्यामुळे माझ्या हळदीला मी खूप धर्मसंकटात येणार आहे. मित्र की तत्व ! फ्रेण्डईन्नीड इझ फ्रेण्डीनडीन.. टूबी और नॉट्टूबी !
किती तो आटापिटा शंभरी
किती तो आटापिटा शंभरी गाठण्याचा २३ प्रतिसाद धागाकर्त्याचेच ...........
>>>>>
19 च आहेत हो.. चार वाढवू नका
पूर्वीचा ऋन्मेष नाही राहिला
पूर्वीचा ऋन्मेष नाही राहिला आता.
>>>>>
मी मायबोलीवर आल्यापासून ऐकतोय की पूर्वीची मायबोली राहिली नाही आता..
आता ऋन्मेषही पहिल्यासारखा राहिला नाही..
मी लेखातंही म्हटलंय की आता आमचे घर मोठे असले तरी पहिल्यासारखे राहिले नाही..
तर मग आहे तरी कोण ईथे पहिल्यासारखे?
मूठभर ताण्दूळ त्या माणसाच्या घरून घेऊन या जो पहिल्यासारखाच शेवटपर्यण्त राहिला... मी मायबोली सोडून जाईन
तळलेल्या म्हावरयाचा वास
तळलेल्या म्हावरयाचा वास तिथूनच थेट नाकात शिरायचा
म्हावऱ्या म्हणजे?
ही पोरी साजुक तुपातली तिला
ही पोरी साजुक तुपातली तिला म्हावर्याचा लागलाय नाद.
navrya cha aahe na tithe..?
navrya cha aahe na tithe..?
म्हावरे मच्छी मासे मासोळी...
म्हावरे मच्छी मासे मासोळी... शैक्षणिक भाषेत फिश
त्या गाण्यात पोरी आहे की पोळी आहे? मला वाटते पोळी
ही पोरी साजुक तुपातली >>
ही पोरी साजुक तुपातली >>

पोळी आहे ते. साजुक तुपातील पोळी.
ती मुलगी (पोरी) साजूक तूप
ती मुलगी (पोरी) साजूक तूप खाणार्यातली (म्हणजे शाकाहारी तोही सात्विक शाकाहार) असली तरी तीला आता म्हावर्याचा (मासे) नाद लागलाय...
असं आहे ते.....
मला वाटले पोरी
मला वाटले पोरी
साजुक तुप (लेले) ते म्हावरा (परब) हा बिघडण्याचा प्रवास (रूपक )
धन्यवाद निरू
धन्यवाद निरू
म्हावरे खाणे म्हणजे बिघडने..
म्हावरे खाणे म्हणजे बिघडने..
म्हणजे मे एक रईस बाप की बिगडी हुई औलाद आहे का?
म्हावरे खाणे म्हणजे बिघडने..>
म्हावरे खाणे म्हणजे बिघडने..>> बघ की. हायला मग जगातले किती लोकं बिघडलेलेच असतील. अगदी मी पण बिघडलेलीच आहे असं म्हणायला हवं.
आता पण म्हावरा खावनच इलंय हा हयसर टाईमपास करुक. 
ओह कश्याला जळवत आहात. मी
ओह कश्याला जळवत आहात. मी आजारी असल्याने सूप पिऊन बिछान्यात पडलोय. माझ्या भावना चेकाळू नये म्हणून घरच्यांनीही अंड्याचे कालवण खाऊनच रविवार साजरा केलाय. आणि तुम्ही ईथे विषय कढताहात.
ऋ.. फोटो टाकू का???
ऋ.. फोटो टाकू का???
म्हावरे खाणे म्हणजे बिघडने..
म्हावरे खाणे म्हणजे बिघडने..
म्हणजे मे एक रईस बाप की बिगडी हुई औलाद आहे का?
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 6 August, 2017 - 14:53
निट कंसातले वाचा ते उदाहरण आहे. आणि बिगडे बाप की औलाद असेल तर आपण विक्षिप्त मुलाच्या धाग्यावर ऊपाय मागू. हाकानाका
कबूल ते उदाहरण आहे. पण उदाहरण
कबूल ते उदाहरण आहे. पण उदाहरण द्यायला वापरले याचा अर्थच तो होतो ना?
निधी फोटो टाका की.. फक्त ईथे नको
. यावरून मला आठवले की आजचा मेनू नावाचा धागा मागे काढलेला.. तो आता शोधून वर आणायला हवा. श्रावणात कामाला येईल
ऋन्मेऽऽष, काय झाले तब्येतीला?
ऋन्मेऽऽष, काय झाले तब्येतीला???
<<<कबूल ते उदाहरण आहे. पण
<<<कबूल ते उदाहरण आहे. पण उदाहरण द्यायला वापरले याचा अर्थच तो होतो ना?>>>
अजिबात नाही....
लेले बिघडली म्हणतील....
आणि परब सुधारली म्हणतील...
चला आता 100 लवकर होणार
चला आता 100 लवकर होणार
Pages