माझे मुंबईतील मोठ्ठे घर !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 July, 2017 - 17:06

आजोबांचे बालपण दहा बाय बाराच्या चाळीतल्या खोलीत गेले. स्वत:च्या हिंमतीवर त्यांनी चाळीत एकाच्या दोन खोल्या केल्या. पण सोबत फॅमिली प्लानिंग न जमल्याने त्या दोन खोल्यात एकूण आठ जणांचे बिर्‍हाड थाटावे लागले. माझ्या वडिलांच्या नशिबी फिरून पुन्हा खांद्यावर टॉवेल घेऊन मोरीबाहेर ताटकळणे आले. अश्याच एका सकाळी कडूलिंबाची काठी चघळताना त्यांनी ठरवले, हे घर जेवढ्या स्क्वेअरफीटचे आहे तितक्याच स्क्वेअरमीटरचे आपल्या मुलाचे स्वत:चे प्रायव्हेट बाथरूम बनवायचे. त्या नशीबवान मुलाला जन्म देणारी बाई, म्हणजे माझी आई त्यांना भेटलीही नव्हती तेव्हाची ही गोष्ट. जेव्हा भेटली तेव्हा त्यांनी छोटेसे का होईना स्वत:चे एक वेगळे घर घेतले आणि आपला स्वतंत्र संसार थाटला. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ते आपला संकल्प पुर्ण करण्यास उत्पन्नातील एक मोठी रक्कम बाजूला काढून ठेवत होते. आणि जेव्हा मी एकवीस वर्षांचा झालो, तेव्हा त्यांनी एका आलिशान घराच्या चाव्या माझ्या हाती ठेवल्या!

वाडवडिलांची पुण्याई म्हणा किंवा आणखी काही, दक्षिण मुंबईच्या मध्यवर्ती भागात, शेजारपाजारच्या मध्यमवर्गीय लोकांच्या केवळ स्वप्नातच असावे ईतके मोठे घर, आजच्या तारखेला मी माझे म्हणू शकतो. एक दूरवर नजर जाईल ईतकी जागा आज माझा हक्काचा निवारा आहे. म्हणजे बघा हं, सकाळी उठल्यावर ड्रेसिंग टेबलला खोचलेला ब्रश मी माझ्या दातात खुपसतो आणि तसाच अर्धवट झोपेत चालायला सुरुवात करतो. सवयीने लेफ्ट राईट वळले जाते. चांगला बत्तीस वेळा चावून चावून ब्रश करतो. होईहोईस्तोवर माझे फिरते शौचालय येते. तिथे माझा धावता कमोड असतो. त्यावर बसून कळ दाबतो. पोटातली नाही हां, ती निसर्गाने आधीच दाबली असते. तर, कमोडची कळ दाबतो. ते स्वत:भोवताली एक गिरकी घेत वार्‍याच्या वेगाने पळू लागते. मी त्यावर बसून मोबाईलवर व्हॉटसप कम फेसबूक चेक करत आपला कार्यभाग उरकून घेतो. होईहोईस्तोवर बाथरूम आले असते. मी कमोडवरून टुणकन ऊडी मारतो ते थेट बाथटबमध्ये पडतो. बाथरूम तसे फार काही मोठे नाही. पण कधी मूड आलाच तर तिथे कोपर्‍यात एक नाचण्यासाठी छोटासा स्टेज उभारला आहे. थोडीशी म्युजिक सिस्टमही आहे. कारण जसे बाथरूम सिंगर असतात, तसा मी बाथरूम डान्सर आहे. बाथरूममधून बाहेर पडल्यावर मी अंग पुसत पुसत कपाटात शिरतो...

जसे घराला पुढचा आणि मागचा असे दोन दरवाजे असतात, तसेच आमच्या कपाटालाही दोन दरवाजे आहेत. मी ईथून शिरतो आणि कपडे करत करत तिथून बाहेर पडतो. एक छानसे ड्रेसिंग टेबल कपाटातच मध्यभागी बनवून घेतले आहे. त्यामुळे केस विंचरणे, शर्ट ईन करणे ईत्यादी प्रकार मी कपाटातच ऊरकून बाहेर पडतो. बाहेर पडायची वेळ साधारण ठरलेली आहे. पण तरीही मला नाश्ता गरमागरम लागत असल्याने कपाटाचा मागचा दरवाजा उघडताच एक अलार्म किचनमध्ये वाजतो आणि पाचच मिनिटांत माझा ब्रेकफास्ट डायनिंग रूममध्ये रेडी असतो. डायनिंग रूमचा घेर आजवर कधी मोजायचा प्रयत्न केला नाही. पण सभोवताली एक जॉगिंग ट्रॅक आखला आहे. नाश्ता हजर व्हायला जो पाच मिनिटांचा वेळ वर नमूद केला आहे, त्यावेळेत मी एक फेरी मारून घेतो. तेवढाच व्यायाम होतो. परीणामी सडकून भूक लागते आणि न्याहारीवर तुटून पडतो. स्विमिंग पूलजवळ असलेल्या बेसिनवर चूळ मारतो आणि ऑफिसला निघतो. कितीही मोह झाला तरी स्विमिंग पूलचा वापर फक्त सुट्टीच्या दिवशीच पोहायला करायचा हा घरचा नियम मोडायला मन धजावत नाही.

थोडेसे अवांतर होईल, पण एखादे मायबोलीचे वर्षाविहार आमच्या घरच्या स्विमिंगपूल मध्ये डुंबून केले तरी माझी हरकत नाही. जमल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी माझी स्टडी रूम वापरू शकता. तसेही मी तिथे शेवटचा अभ्यास कधी केला आठवत नाही, निदान ती रूम माबोकरांच्या तरी कामात येईल. आशा करतो की तिथे तुम्ही अगदीच मॅरेथॉन, ट्रायथलॉन वगैरे स्पर्धा घेणार नाहीत. पण शंभर मीटर धावणे आणि चमचागोटी जमून जाईल ईतपत जागा आहे.

लोकांकडे होम थिएटर असते. आमच्याकडे होम स्टेडियम आहे. लाईव्ह क्रिकेट बघताना अगदी तसाच फील यावा म्हणून खुर्च्यांची अरेंजमेंट स्टेडियम सारखी केली आहे. अर्थात खुर्च्यांची संख्या फार नाही. तरी पन्नासेक जण एकाच वेळेस आपापल्या गर्लफ्रेंड सोबत सामना बघू शकतात ईतकी बैठक आहे. पण तेवढ्या खुर्च्या पुरतात. कारण माझे मित्र मोजकेच आहेत.

घरात नैऋत्य की आग्नेय अश्या एका तिरकस दिशेला एक पूजा रूम आहे. एकेकाळी तिथे गेल्याचे आठवतेय. मात्र ज्या दिवशी मी माझ्यातले नास्तिकत्व ओळखले, तेव्हापासून जिथवर अगरबत्तीचा धूर पोहोचतो, त्या हद्दीत जाणे टाळतो.

एक क्रिडारूम आहे. ईनडोअर गेम्स म्हणजेच कॅरम, बुद्धीबळ, सापशिडी ते ब्रिटीशांचा ल्युडो ईत्यादी गेम्स तिथे खेळले जातात. जेव्हा काका-मामा-आत्यांची पोरे म्हणजेच माझ्या भावंडांनी घर गजबजून जाते, तेव्हा खरी त्या रूमला शोभा येते. मी देखील तेव्हाच फक्त त्या क्रिडारूम मध्ये जातो. अन्यथा मला माझी किडारूमच जास्त आवडते. किडारूम म्हणजे त्या रूममध्ये किडे नाहीत. तर ते माझ्यात आहेत. तिथे ते बाहेर येतात ईतकेच.

त्या रूममध्ये फक्त एक बेड, एक टेबल आणि माझा लॅपटॉप आहे. पण मी तिथे का बोलतोय, ईथे बोलायला हवे ना. कारण आताचा लेखही मी या रूममधूनच लिहितोय. माझी वेगळी अशी बेडरूम आहे. पण बरेचदा मी किडे करता करता ईथेच झोपून जातो. सकाळी डोळा उघडतो तेव्हा जाणीव होते, घर मोठे झाले की माणसं लांब जातात. एकेकाळी मी छोट्याश्या हॉलमध्ये जेमतेम सोफ्यात, मांडीवर लॅपटॉप घेऊन बसलेलो असायचो. आई जवळच किचनमध्ये काम करत असायची. तिथूनच बसल्याबसल्या तिच्याशी दिवसभराच्या गप्पा मारायचो. तळलेल्या म्हावरयाचा वास तिथूनच थेट नाकात शिरायचा. त्याने ठसका लागला की दुसरयाच क्षणाला पाठीवर आईचा हात फिरायचा. ते छोटं घर तेवढं., तो मायेचा हात तेवढा., आजही मिस करतो..

पण या सर्वात एक गोष्ट मात्र समजली. जेव्हा आईवडिल आपल्या मुलांसाठी घर बनवतात, तेव्हा ते त्यांच्यासाठी 'मन्नत' असते. पण जेव्हा ते स्वत: मुलांबरोबर त्या घरात राहतात, तेव्हा ते मुलांसाठी 'जन्नत' होते !

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे लब्बाडा ! कधी येऊन गेलास माझ्या घरी? निदान माझ्या घरी आल्यावर कॉल तरी करायचा सॅटेलाईट फोनवर. बुलेट ट्रेनने माझे सुपुर्ण घर दाखवले असते की तुला. घरावर १०० लेख नक्कीच टाकता आले असते . धांदरट कुठला!

पेस्ट गिळुन मग काय दिवसभर बुडबुडे काढत फिरता का?
>>>>>
नाही! पेस्ट गिळून तोंडातून बुदबुदे काढणे आणि सिगारेट पिऊन धुराचे लोट सोडणे हे तात्विकदृष्ट्या एकच झाले.
सर्वात बेस्ट म्हणजे आपल्या शरीरावर सोडून द्यावे, त्याला आपली गरज समजते, काय ठेवायचे आणि काय नाही हे समजते.

बाकी तुझं घर बघायला आवडेल मला.
>>>>>
नक्कीच. केव्हाही. आणि कोणीही या. अगदी अम्रेरीकेहून आलात तरी चालेन. माझे नाव माहीत आहे ना, मग पत्ता सांगायचीही गरज नाही. एसटीने मुंबई सेंट्रलला उतरलात तर तिथून कुठल्याही नंबरची बस पकडा. तिचा कुठला ना कुठला स्टॉप आमच्या घराच्या एखाद्या दरवाज्याजवळ असेलच.

लेख वाचून विश्वनाथ सिनेमातला प्रेमनाथचा संवाद आठवला.
>>>>
कोणता? जली को आग बुझी को राख कहते है.... नाही तो तर शत्रूचा ना? मग प्रेमचा कोणता? जो शीशेकी घरों मे रहते है .. वोह पत्थर दिल वाले होते है?

नाही. प्रेमनाथ आणि व्हिलन कंपनीची गँग स्मगलिंग करत असते. विश्वनाथ सरकारी वकील असतो. पुढे प्रेमनाथच्या षडयंत्रामुळे विश्वनाथ उध्वस्त होतो. मग दाढी वगैरे वाढवून गॉगल लावून विश्वनाथ एका बदललेल्या रुपात येतो. येताच प्रेमनाथला झटका देत तो त्याचा स्मगल्ड मालाचा ट्रक स्वतःच्या ताब्यात घेतो. तेव्हा व्हिलन मंडळी चिडतात त्यावर प्रेमनाथ उत्तरतो, "अरे यह मत सोचो की हमारे एक ट्रक मालका नुकसान हुआं| यह देखो की एक कानून का रखवाला वकील हमारे जैसा स्मगलर बन गया|"

आज या डायलॉगची आठवण येण्याचे कारण म्हणजे नेहमी दारुविरोध करणारा एक जंण स्वतःच दोन पेग मारुन लिहायला बसला आहे ह्याची खात्री हा लेख वाचून झाली.

"अरे यह मत सोचो की हमारे एक ट्रक मालका नुकसान हुआं| यह देखो की एक कानून का रखवाला वकील हमारे जैसा स्मगलर बन गया|"
नेहमी दारुविरोध करणारा एक जंण स्वतःच दोन पेग मारुन लिहायला बसला आहे ह्याची खात्री हा लेख वाचून झाली.
>>>>

हा हा हा... भारी डायलॉग.. आणि भारी स्पष्टी आहे..
फक्त पहिल्या डायलॉगमध्ये हमारे जैसा आहे Wink

लेख वाचुन मला मकरंद अनासपुरे आठवला
>>>>
हा हा ... हो, मक्या म्हणे.. त्यासारखेच किंचित अशुद्ध शैलीत लिहीले असते तर त्याच्या टोनमध्ये वाचायला मजा आली असती हा लेख Happy

राहुल कुठाय ? या सोमवारची कहाणी नाही आली अजून.
"उतू नये , मातू नये , घेतला वसा टाकू नये "
>>>> Lol
थापांचा वसा ॥ घेऊ कसा
नको पडायला नियतीचा
उलटाच फासा ॥
म्हणून माझा पास Lol

अरे धागा काय तुम्ही बोलता काय..
बाकी काही लिहा वा नका लिहू.. कोणी हॅरी मेट सेजलचे परीक्षण तेवढे पाहिल्या पाहिल्या लिहा...

माझ्या मते ऋन्मेष चा आत्तापर्यंतचा सगळ्यात बकवास धागा आहे हा. पूर्ण फसलाय. पूर्वीचा ऋन्मेष नाही राहिला आता. (हे जुनी मायबोली नाही राहिली आता या धर्तीवर वाचावे)

माझ्या मते ऋन्मेष चा आत्तापर्यंतचा सगळ्यात बकवास धागा आहे हा..
>>>>
म्हणजे मी मायबोलीवरचा माझाच बकवास धाग्याचा रेकॉर्ड तोडला तर.. Wink

घरात घरं ऋन्मेषचं ..
शतक होऊ द्या धाग्याचं ..
धाग्याचं बाई माझ्या धाग्याचं

>>माझ्या मते ऋन्मेष चा आत्तापर्यंतचा सगळ्यात बकवास धागा आहे हा..<<

धाग्याचा क्लास नेहेमीचाच आहे, पण ऋन्मेष किंवा नेहेमीच्या यशस्वी कलाकारांनी इथे अजुन पर्यंत सुतळी बाँब, झालंच तर लवंगी फोडलेली नसल्याने धागा रडत्खडत ५०शी गाठतोय... Happy

सहमत आहे राज, या अपयशाची जबाबदारी मी माझ्या शिरावर घेतो.
लेखात एक दोन ठिकाणी मी खोटी वाटावेत अशी वाक्ये पेरली, पण त्यावर कोणी शंका घ्यायला आलेच नाही.. कुठेतरी नक्कीच कमी पडलो Sad

पण त्यावर कोणी शंका घ्यायला आलेच नाही.. >>>>
शंका घ्यायला खर्याखोट्याची सरमिसळ लागते..येथे त्याची वाणवा आहे. एकालाही धाग्यातलं काहीच खरं वाटलं नाही..नाहीतर तुटून 'पडणारे' नक्की आले असते.

वाडवडिलांची पुण्याई म्हणा किंवा आणखी काही, दक्षिण मुंबईच्या मध्यवर्ती भागात, शेजारपाजारच्या मध्यमवर्गीय लोकांच्या केवळ स्वप्नातच असावे ईतके मोठे घर, आजच्या तारखेला मी माझे म्हणू शकतो.
>>>>
एवढंच फक्त खर वाटतंय लेखामदे.. बाकी अतिशयोक्ती अलंकार.

एकालाही धाग्यातलं काहीच खरं वाटलं नाही..नाहीतर तुटून 'पडणारे' नक्की आले असते.
>>>>>
असं खात्रीपूर्वक कसे सांगत येईल?
कदाचित लोकांना सारेच खरे वाटले असेल..
किंवा मागे मी जसे फ्रिजचे फोटो टाकत पुरावे दिले तसे आताही शंका घेतल्यास मी पुन्हा पुरावे आणेन अशी लोकांना भिती वाटली असावी.

असू शकेल... आणि त्याने 2-3 माणसे ठेवली असतील माबो आणि इतर सोशल साईट्स साठी. त्याच्या आयडी ने लॉगिन करून लिहिणे, कंमेंट्स करणे, बसिकल्य 24 *७ रूनमेश चा वावर असतो माबो वर तो याचमुळे असावा.

व्हाई नॉट....
जे मनाने श्रीमंत असतात ते पैश्यांनी गरीब असतात किंवा व्हायसे वर्सा असा काही रूल नसतो.
ज्याला या देशात ईंग्रजी येत नाही तो काय डोंबल्याचा श्रीमंत असणार असाही काही रूल नाहीये..
ज्याची फक्त एकच गर्लफ्रेंड आहे तो कसला श्रीमंत असणार असाही नियम नक्कीच नाहीये..
मी श्रीमंत असण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.. आजवर दिखावा केला नाही हा माझा मोठेपणा

त्याने 2-3 माणसे ठेवली असतील माबो आणि इतर सोशल साईट्स साठी. त्याच्या आयडी ने लॉगिन करून लिहिणे, कंमेंट्स करणे, बसिकल्य 24 *७ रूनमेश चा वावर असतो माबो वर तो याचमुळे असावा.
>>>>>>
माईंडब्लोईंग... !! डिटेक्टिव च्रप्स.. क्या बात है..
आता मी भारतातला माणूस झोपायला जाईन आणि अमेरीकेतला डॉलरवर कामाला ठेवलेला येईल.. उगाच नाही माझे धागेही रात्रीचे तीन चार वाजता निघतात.. आणि लगेच पहाटे सातच्या ठोक्याला आलेल्या प्रतिसादांना धन्यवाद म्हणून रिप्लाय असतो Happy

Pages