चिबुड रसायना(नागपंचमी / जन्माष्टमी खास)

Submitted by देवीका on 27 July, 2017 - 16:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हा खास कोकणातला प्रकार आहे. घरीच उगवलेले चिबुड घेवून बनवतात. ह्याची तुलना त्या बाजारी मेलन किंवा कँटालप बरोबर न केलेलीच बरी. पण अगदीच मिळाला नाही तर टस्कन कँटालप बरा त्यातल्या त्यात.
चिबुड अतिशय चविष्ट, खास केशरी रंग आणि गोड रसाळ असा हा प्रकार असतो.

एक मोठे आकाराचे पिकलेले चिबुड,
१ वाटी घट्ट नारळाचे दूध,
पाव वाटी घरीच कुटलेले जाडे लाल पोहे( बाजारी घेवु शकता पण ती चव नाही),
चवीनुसार गूळ( चिबुड खूप गोड असतो पण पोह्याला बरोबरी म्हणून गूळ टाकायचा.)
वेलची पूड, केशराच्या चार पाच काड्या, एखादंच लवंग असे एकत्रित करून चिमटीभर,

क्रमवार पाककृती: 

१) नारळाच्य घट्ट दूधात वेलची केशर लवंग पूड टाकून घ्यावे. मग त्यातच आवडीनुसार्/गोडीनुसार गूळ विरघळून बाजूला ठेवावे
२) जाडे पोहे जरासेच पाण्याखाली निथळून घ्यावे, भिजत ठेवू नये. किंचितसेच मीठ शिवरावे.
३) हे पोहे आता नारळाच्या दूधात भिजवावे.
४) चिबुडाच्या मध्यम आकाराच्या एकसारख्या फोडी करून वरील मिश्रणात टाकावे. आणि थंडगार करून नैवेद्य दाखवावा आणि खावे.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

कधी कधी आम्ही उरलेले वाटून पॉप्सीकल बनवतो. मस्त लागते.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिबुड वगळून बाकीचा पदार्थ खायला मी आनंदाने तयार आहे. लाल पोहे तर असेच खाल्ले तरी चवदार लागतात, नारळ दूध व गुळासोबत भन्नाट लागेल.

रसदार गोड चिबुड मात्र अजून भेटायचा आहे. मला नेमके भुसभुशीत, अगोड चिबुडच भेटलेले आहेत, त्यामुळे चिबुड नकोच वाटते.

चिबुडाची माहिती. हे फळ कोकण गोवा पट्टयाबाहेरही दिसते पण या पट्ट्यात जास्त लोकप्रिय आहे.

Description/Taste
The Chibud melon is a medium to large sized and oblong shaped melon. Its exterior skin has a goldenrod colored background with cream colored dappled stripes that run the length of the fruit with some melons displaying patches of green. Chibud melon has a white flesh with a slight orange tint around the collection of seeds in the center of the fruit. Its flesh is sweet with a tender and juicy texture. When ripe it will have a musky aroma, similar to that of a classic muskmelon.
Seasons/Availability
Chibud melons are available in the summer and fall months.
Current Facts
The Chibud melon is an Indian variety melon and is botanically classified as Cucumis melo. Also known as a Mash melon and by the English as Chiber the Chibud melon is one of the larger sized melons available in India.
Applications
Chibud melons are used typically in fresh, uncooked preparations. It can be used pureed or cut into chunks and added to lassis, juices and other beverages. It can be enjoyed fresh halved or sliced as is or can combined with other ingredients to make salads or sweet preparations. The flavor and texture of Chibud melon pairs well with coconut milk, jaggery, rice, lime, black pepper, cardamom, cinnamon, banana, mango, muskmelon and coconut meat.
Ethnic/Cultural Info
Chibud melon is commonly utilized in India in a sweet regional dish known as rasayana which is served on Navaratri, a festival celebrating the Hindu deity Durga. Navaratri translates in Hindi to mean “nine nights” which is the duration of the festival. For many abstaining from specific foods such as meat, certain grains, onion and alcohol is a part of Navaratri and the combination of melon, coconut milk and cardamom found in rasayana help provide energy during these times of fasting. Chibud melon is also used in a dish known as Chibud-phov which is a flattened rice mixed with coconut milk, jaggery and melon.
Geography/History
The Chibud melon is best known in its native Goa, India. It is available from Indian markets during the monsoon season.

चिबुड म्हणजे खरबुज का?>> नाही.

मस्त लागेल हे. करुन पाहणार नक्कीच. Happy

आमच्याकडे चिबुडाचे बारीक तुकडे घट्ट दही आणि थोडीच साखर मिसळून खातात. ते पण फार यम्मी लागत. Happy

इंटरेस्टिंग रेसिपी.. आमच्याकडे गणपतीत चिबडाची कोशिंबीर करतात. इतर वेळी नुसत्या फोडी साखर मीठ लावून खातात.

चिबुड हे खरबूज अजिबात नाही. चिबडाचा गर मेलन वर्गीय असला तरी साल काकडीसारखीच पातळ असते.

चिबुड असे असतात. लिंक मध्ये समर आणि फॉल म्हटलंय पण कोकणात तरी पावसाळ्यातच येतात हे चिबुड.

कोकणात गणपतीच्या नैवेद्याच्या जेवणात खमंग काकडीसाठी मोठ्या हातभर लांबीच्या काकड्या (त्यांना तवसं म्हणतात) , कोशिंबिरीसाठी चिबुड आणि भाजीसाठी लाल/काळे भोपळे हि मुख्य खरेदी असते. ह्या सगळ्यांचे वेल डोंगराळ भागात येतात, तिथुन बायका ते विकायला खाली गावात आणतात.

निधी,
आम्ही सुद्धा दही, थोडीच साखर आणि वेलची टाकून खातो.
-----------
पुण्यात एकदा एकाने विकत ठेवलेले आणले तर मेले (चिबुड) पांणचत आणि पचपचीत होत. मग समजले चिबुड म्हणून फसवून खरबुजाचे हाय्ब्रिड असे काहीतरी होते.
आमच्यावर कोकणातल्या नातेवाईकांनी कृपा केलीच तर मिळायचे आणि ते झकास लागते,
तेव्हा कोणी कोकणातलाच नातेवाईक किंव मित्र शोधा..

देवीका, हा रसायना प्रकार खूप लहानपणी एकदाच खालेल्ला आठवतोय , ते ही कोकणातच नातेवाईकांकडे. आता असलेली पिढी कोणी बोलवत सुद्धा नाहीत आणि आम्ही जाणं कठीणच.. Sad

धन्यवाद सर्वांना. चिबुड म्हणजे बिलकुल खरबुज नाही.

मॅगी, अगदी बरोबर, कोकणात हे सहसा जूनच्या सुरुवातीला ते सप्टेंबर उशीरापर्यंत धरतात.

चिबुडाच्या बर्‍याच जाती आहेत रत्नागिरी ते गोव्यापर्यंत. आमचा घरचा चिबुड हा लाबुंडका आणि साल चकचकीत पातळ असते बाहेरून. त्यामुळे वरच्या लिंकमधील फोटोसारखा दिसत नाही. एक सुगंध आणि गोडवा असतो पिकल्यावर. त्यामुळे वेलची लागतेच जोडीला त्याची बहारी वाढवायला.
आमच्याकडे ( गोव्याला) ह्याचे पदार्थ नागपंचमी, जन्माष्टमी, गणपतीत केलेली खास कोशींबरी, नवरात्रीत रसायना असतेच. रसायना शक्तीवर्धक आहे. वेलचीने पचन होते.
घरीच मागच्या अंगणात किंवा शेतात मळे असतात, त्यामुळे तवसं, लाल भोपळा, चिबुड, हळद , खाजरा अळू, वडीचा अळू असे बाजू बाजूलाच लावतात. इतर भाज्यांचे मांडव जसे पडवळ, पावट्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा वगैरे...
आणि त्यामुळे घारगे, रसायना, पातोळी, अळू वडी, अळू फदफदं असे असतेच तीन चार महीने.

चिबुड आणि खरबूज यांची तुलना करू नये. हुकुमावरून. Proud
चिबडची (असंच म्हणतात बोली भाषेत.) कोशिंबीर किंवा नुसत्या फोडी साखर-मीठ भुरभुरवून हेच खाल्लंय. रसायना नवीन पदार्थ आहे माझ्यासाठी. पण घडेल की नाही माहिती नाही कारण चिबुड त्यात जायच्या आत पोटातच जाणार नक्की! Wink

मी काकडी, चिबूडाच्या फोडी घातलेले दहीपोहे दहीहंडीच्या प्रसादात खाल्ले आहे पण असे नारळाचे दूध घातलेले कधी खाल्ले नाहीये. आमच्याकडे कातकरी स्त्रीया पावसाळ्यात चिबुड विकायला आणायच्या. आम्ही नुसते साखर-मीठ घालून खायचो.

बाकी काही असो पण चिबुड हे नाव एकुन अ‍ॅपेटाइट राहत नाही पदार्थ खायचा.. म्हणजे कोणी विचारल चिबुड खाणार? तर त्यावर मी तरी " i am fine thanks for asking "हेच म्हणु शकेल.( कोकणातुन आलेल असल्याने त्यापुढे आग्रह ही होणार नाहिच! smiley16.gif)

फूट म्हणून एक काकडी सारखा जाड , भगवा , मउ , उग्र वास असणारा प्रकार असतो

ते आणि चिबड एकच का

की हे वेगळे

हे वेगळे असावे नक्कीच. कारण उग्र वास तर अजिबातच नसतो.
मला ह्या मौसमात मिळाले नाही, पण तुम्ही लिंक पाहिले तर कळेल की ते कँटालूप प्रकारातले आहे.

आमच्या मदतनीस ताई, गावाहून खरबुज आणून देतात आम्हाला आणि त्यांच्याकडे त्याला चिबुड म्हणतात. त्या नेरळ कर्जत भागातल्या आहेत.

IMG_20210131_084716.jpg
चिबूड.
कोकणात गावी गणपतीच्या दिवसांत आरती झाली की चिबूडावर साखर पेरून, ते प्रसाद म्हणून देतात.
तुमच्या विडिओ ची लिंक गावच्या मावशीला पाठवली आहे...
Happy

इथे चिबूड भेटला तर मम्मीला ट्राय करायला सांगेन..

छान पारंपरिक पाकृ.
चिबूड,टरबूज हे प्रकारच आवडत नसल्याने करणे व्हायचे नाही.तरीही एक पारंपरिक पाकृ म्हणून छान आहे.
व्हिडिओ मस्तच आहे.

मी यंदा गावीच होते त्यामुळे चांगले चिबुड खायला मिळाले. पण हे रेसिपी आठवली नाही. आता पुढच्या वेळी आठवून करेन.

चिबडाचा फोटो दिला ते बरे केले. इतक्या लोकांचा गोंधळ होतो चिबडात. चिबुड ही बहुतेक कोकण पेशल जात असावी...