बिहारमधील राजकीय उलथापालथ

Submitted by टवणे सर on 26 July, 2017 - 14:48

बिहारमध्ये जद(यु), राजद आणि काँग्रेस यांचे महागठबंधन नितिश कुमारांच्या राजीनाम्यानंतर तुटलेल आहे. ताज्या बातम्यांनुसार बिहारमध्ये पुन्हा भाजपा आणि जद(यु)चे आघाडी सरकार येईल असे दिसते.
काँग्रेस पक्षासाठी हा अजून एक पराभव आहे. आता त्यांचे राज्य असलेले कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल वगळता बाकी महत्त्वाचे मोठे राज्य नाही. यामध्येदेखील राज्यसभा, लोकसभा जागांच्या वजनानुसार कर्नाटक महत्त्वाचे, पंजाब/हिमाचल तुलनेने लहान आहेत.
मा. राहुल गांधींनी स्वतः प्रयत्न करून जोडलेल्या महागठबंधनाची हार कुणामुळे झाली हा प्रश्न उभा राहील. लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेतच.

भारतभर भाजपा हा एकमेव प्रबळ पक्ष राहिलेला असताना विरोधी पक्षांची अजून पिछेहाट होते हे पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी हे चांगले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याला सी एम पोर्टॅबिलिटी म्हणतात Happy
सी एम तोच फक्त पक्ष बदलला....
नवीन Submitted by स्वामी चावटानन्द on 28 July, 2017 - 01:1३

Happy

झालं ते चांगलच झालं. लालू आणि कं ची जागा तुरुंगात आहे सत्तेत नाही.. गेले अनेक वर्षे निव्वळ जातीय राजकारण करून सर्वच पक्षांनी स्वता:ची पोळी भाजली पण बिहार चा मात्र अक्षरशः कोळसा केला. नितीश काही फार शुध्द स्वच्छ आहेत असे नाहीत.. पण काळाची पावले व भविष्याची गरज ओळखून त्यांनी राजकीय निर्णय घेतला आहे. त्याचा झालाच तर फायदा बिहार च्या जनतेला होईल.
असो. राजकारणात कुणिही शत्रू नसतो हेच खरे. Happy

आता गुजरात आणि बंगाल मधून कॉ, क, त्रू, ईत्यादी पिलावळ संपवली की भारताचा 'सबका विकास' व्हायला वेळ लागणार नाही...

तेव्हा पुढील नंबर कुणाचा लागतोय बघुया.
(बिहारी एक वेळ समर्थन देईल पण अती अहंकारी व स्वमग्न आणि अवास्तव अभिमान रक्तात असणार्‍या बंगाल जनतेला ही ऊपरती कधी होईल देव जाणे... )

नितिशकुमार यान्ना तत्व, भ्रष्टाचार, किव्वा जातियवाद याच्याशी काही देणे घेणे नाही आहे. २०१३ मधे त्यान्नी संधीसाधू आहोत हे दाखवले. त्यान्च्या दुर्दैवाने भाजपासोबत फारकत घेण्याची त्यान्ची खेळी फसली, फासे मनासारखे पडले नाही, आणि मोदी पन्तप्रधान झाले. कसाबसा ३-४ वर्ष धिर धरला.

ज्या कारणासाठी त्यान्नी भाजपाची साथ सोडली होती ते कारण आहे तिथेच आहे. लालू यादव आणि परिवार काल, आज होता तसाच (भ्रष्टाचारी) आहे, त्यात काहीच बदल झालेला नाही. २०१३ मधे भाजपा नेतृत्व जातियवादाचा तिटकारा वाटला, पण भ्रष्टाचार्‍यान्शी जवळीक केली. आज २०१७ मधे त्यान्चा उलट प्रवास सुरु झाला. नितीशकुमार निव्वळ सन्धिसाधू आहेत. सत्तेसाठी काय वाट्टेल ते.... भ्रष्टाचार, जातियवाद विरोध निव्वळ गप्पा आहेत.

{{{ नितीशकुमार निव्वळ सन्धिसाधू आहेत. सत्तेसाठी काय वाट्टेल ते.... भ्रष्टाचार, जातियवाद विरोध निव्वळ गप्पा आहेत. }}}

हे असं काही विशिष्ट लोकांना २०१३ मध्ये वाटलं नाही. हा साक्षात्कार त्यांना जुलै २०१७ मध्येच झाला.

>>नितिशकुमार यान्ना तत्व, भ्रष्टाचार, किव्वा जातियवाद याच्याशी काही देणे घेणे नाही आहे<<

हे एकदम कालपरवाच लक्षात आलेलं दिसतंय

<<हे एकदम कालपरवाच लक्षात आलेलं दिसतंय>>
---- नाही २०१३ मधे त्यान्नी भाजपाची साथ सोडल्यावरही असेच मत होते... ज्या कारणासाठी २०१३ मधे त्यान्न्नी भाजपाची साथ सोडली ते कारण घडताना ते केन्द्रात मन्त्री होते... त्यावेळी त्यान्नी मन्त्रीपद भोगले, पण मोदी पप्र साठी उमेदवार जाहिर झाल्यावर, हे बिथरले, ह्यान्ना अचानक भाजपा (मोदी) जातियवादी वाटले.... साथ सोडली आणि भ्रष्टाचार्‍यान्ना जवळ केले. ह्यान्च्या दुर्दैवाने फासे चुकले आणि मोदी प प्र झाले. नाईलाजाने २०१७ परतावे लागले. सत्ता टिकवणे महत्वाचे. भ्रष्टाचार या बाजारगप्पा.

२०१३ लालू यान्ची साथे घेताना लालू (परिवार) काय स्वच्छ होता असा नितिशकुमार यान्चा समज होता ? मग अचानक २०१७ मधे ते भ्रष्टाचारी आहेत हा शोध कसा लागला?

<<<~२०१३ लालू यान्ची साथे घेताना लालू (परिवार) काय स्वच्छ होता असा नितिशकुमार यान्चा समज होता ? ~>>>>
>>2013 ला नितिशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला ! व ती जवाबदारी मांझी यांच्यावर सोपवली !! नंतरच्या निवडणुकीत लालुयांची साथ घ्यायला लागली 2015 साली !!

आवाज दो (2) हम एक है!!

ही खरे तर भारतातल्या समाजवादी पक्षांची व चळवळीची खरी घोषणा. जनता दलाचे किती तुकडे झाले, किती पुन्हा जुळले व पुन्हा फाटले हे अगदी राजकारण जगणाऱ्या माणसाच्या पण लक्षात राहणार नाही. त्यावर आलेला हा आजचा रिपोर्ताज
http://indianexpress.com/article/explained/janata-divided-family-splitti...

माझी खात्री आहे की यात दोन चार तुकडे नमूद करायचे राहून गेले असणार आहेत.

त.टी. समाजवादी राजकारणाचा मुळीच पंखा नसल्याने हे वाचताना मला विशेष आनंद (गुदगुल्या) झाल्या. गेल्या 30 वर्षात फूट न पडलेला एकच पक्ष भारतात दिसतो आहे. संघटन महत्वाचे का ते कळते (ते संघटन योग्य अयोग्य याबाबत हा भाग दुसरा आहे)

Pages