बिहारमधील राजकीय उलथापालथ

Submitted by टवणे सर on 26 July, 2017 - 14:48

बिहारमध्ये जद(यु), राजद आणि काँग्रेस यांचे महागठबंधन नितिश कुमारांच्या राजीनाम्यानंतर तुटलेल आहे. ताज्या बातम्यांनुसार बिहारमध्ये पुन्हा भाजपा आणि जद(यु)चे आघाडी सरकार येईल असे दिसते.
काँग्रेस पक्षासाठी हा अजून एक पराभव आहे. आता त्यांचे राज्य असलेले कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल वगळता बाकी महत्त्वाचे मोठे राज्य नाही. यामध्येदेखील राज्यसभा, लोकसभा जागांच्या वजनानुसार कर्नाटक महत्त्वाचे, पंजाब/हिमाचल तुलनेने लहान आहेत.
मा. राहुल गांधींनी स्वतः प्रयत्न करून जोडलेल्या महागठबंधनाची हार कुणामुळे झाली हा प्रश्न उभा राहील. लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेतच.

भारतभर भाजपा हा एकमेव प्रबळ पक्ष राहिलेला असताना विरोधी पक्षांची अजून पिछेहाट होते हे पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी हे चांगले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिहारमधील महागठबंधन मॉडेल हे २०१९च्या निवडणुकांसाठी टेम्प्लेट म्हणून वापरण्याबद्दल बराच गाजावाजा झालेला आहे. आता ह्या टेम्प्लेटचे ट्रम्पेट करून नितीशने वाजवले आहे. तेव्हा २०१९च्या निवडणुका जिंकण्याच्या दिशेने भाजपाने मोठी खेळी केलेली आहे.

सर,
निवडणुकांआधी नितिश कुमारांचे भाजपशी बिनसण्यात आणि आता पुन्हा सूत जुळण्यात 'लालू अँड सन्स' च्या कारनाम्यांशिवाय अजून काय घडलं-बिघडलं असं वाटतं?
महागठबंधन होण्यात प्रियांका फॅक्टरचा ही मोठा गाजावाजा झाला होता म्हणजे त्यालाही दणका बसला असे समजायचे का आता जे २०१९ च्या दृष्टीने अजून वाईट आहे.

https://youtu.be/-5XbvRMdVAM

विरोधी पक्षांची अजून पिछेहाट होते हे पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी हे चांगले नाही.

हा हा... टण्या.. मास्टर स्ट्रोक

मुळात परत एकदा भाजपेचे समर्थन. असे टोप्याबदलु पक्ष हवेत कशाला? २ महिन्याने परत कुणाशीतरी युती करु शकतात नितिशकुमार.

विरोधी पक्षांची अजून पिछेहाट होते हे पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी हे चांगले नाही>> खरय!!

>>निवडणुकांआधी नितिश कुमारांचे भाजपशी बिनसण्यात आणि आता पुन्हा सूत जुळण्यात 'लालू अँड सन्स' च्या कारनाम्यांशिवाय अजून काय घडलं-बिघडलं असं वाटतं?<<

माझे २ पैसे :

नितिश कुमारांना बिहारमध्ये "सुराज्य" आणुन सगळ्या देशाला उदाहरण दाखवुन द्यायचं होतं कि गठबंधनात लायक, अनुभवी नेते नसतानाहि मी चांगलं काम करु शकतो, वगैरे. आणि मग याच पुण्याईवर पुढे पंतप्रधानपदाचा दावेदार होणे सहज शक्य आहे, वगैरे.

बट हि अंडर एस्टिमेटेड पॉवर ऑफ लालु क्लॅन अँड काँगेस लिडरशीप वाज गुड फॉर नथिंग... Happy

लालुपुत्राने त्यांची हि मनिषा धुळीला लावल्यावर त्यांना कळुन चुकलं कि लालु अँड कं. स्वतः बुडणारच पण आपल्यालाहि घेऊन बुडणार. आपलं मुख्यमंत्रीपद राखुन लालुपुत्राचा राजीनामा मागण्या ऐवजी आपणंच राजीनाम दिला तर आपली क्रेडिबिलिटी अबाधित राहिलंच त्याच बरोबर लोकांची सहानुभुती हि मिळेल, जी पुढे कामाला येईल. बिहार निवडणुकां नंतर इतर राज्यांत निवडुन आलेली बिजेपीची सरकारं हा हि फॅक्टर विचारात घेण्यासारखा आहे. राजकारणात इफ यु कँट बीट देम, जॉइन देम या उक्ती बरोबरच कधी-कधी एक पाउल पुढे टाकण्याकरता दोन पाउलं मागे यावं लागतं. आज नितिश कुमारांवर ती वेळ आलेली आहे...

>>विरोधी पक्षांची अजून पिछेहाट होते हे पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी हे चांगले नाही.<<

अगदी आभाळ कोसळल्या सारखी परिस्थिती उद्भवणार नाहि. एकहाती सत्ता मिळाल्यावर त्याचा दुरुपयोग करण्याइतके आजकालचे नेते मुर्ख नाहित. पांच वर्षांनंतर त्यांना परत जनते समोर जायचं आहे...

एकहाती सत्ता मिळाल्यावर त्याचा दुरुपयोग करण्याइतके आजकालचे नेते मुर्ख नाहित. पांच वर्षांनंतर त्यांना परत जनते समोर जायचं आहे...>>>>>
तुमचा आशावाद पाहून बरे वाटले ,

>>तुमचा आशावाद पाहून बरे वाटले ,<<

वेल, तुम्हि त्याला आशावाद म्हणा पण मी त्याला मचुअर्ड लोकशाहिची ताकद समजतो...

>>विरोधी पक्षांची अजून पिछेहाट होते हे पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी हे चांगले नाही.<<

४७ नन्तर अनेक वर्षे विरोधी पक्ष म्हणावा असं काही नव्हतंच म्हणे. आता पराभूत का होईना ,पण विरोधी पक्ष तरी आहेत. मला स्वतःला द्विपक्षीय पध्द्त आवडेल आणि त्यासाठी एक मजबूत विपक्ष हवाच. लालू स्टाइल राजकारणाचा प्रभाव ओसरला तर तिथे काँग्रेस पुन्हा बळकट होउदे या शुभेच्छा!

एकहाती सत्ता मिळाल्यावर त्याचा दुरुपयोग करण्याइतके आजकालचे नेते मुर्ख नाहित. पांच वर्षांनंतर त्यांना परत जनते समोर जायचं आहे...>>>>> तसे झाले तर उत्तमच. काळच ठरवेल याचे उत्तर.

>>विरोधी पक्षांची अजून पिछेहाट होते हे पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी हे चांगले नाही.<<

लोकशाही साठी बळकट विरोधीपक्ष असावा !! हे सर्व थोतांड आहे !!

६५ वर्षांत कॉंग्रेसने विरोधी पःक्षाला कधीही संधीच दिली नाही ! कॉंग्रेस पक्षाचा संबंध देश स्वातंत्र मिळण्यात झाला असल्याने गांधीजींच्या आग्रहा विरुद्ध कॉंग्रेस पक्ष विसर्जित केला गेला नाही.

नितीशकुमारांचा मोदींना व्यक्तिशः विरोध असल्याने त्यांनी भाजप बरोबरची युती मोडली होती. गेल्या ३ वर्षांच्या अनुभवावरून त्यांचे मोदींबद्दलचे मत बदललेले दिसते. दोन स्वच्छ व्यक्तिमत्वे जवळ आल्याने बिहारचे आणि देशाचे भलेच होईल. पण बिहार हे लोकसभेच्या दृष्टीने खूप महत्वाचे राज्य आहे. भाजपाच्या पूर्ण बहुमतासाठी अत्यावश्यक. नितीशकुमारांनी दिल्लीची आस सोडली नसल्यास ही युती टिकणे कठीण.

कॉग्रेसला घरघर लागणे व लालूसारख्यांबरोबर फरफटत जायला लागणे हे देशाचे दुर्दैव आहे. मी स्वतः कॉग्रेसचा २०१४ च्या आधी पर्यंत मतदार होतो. त्यामुळे काँग्रेसची दयनीय परिस्थिती व त्याला कारणीभूत असलेले दिशाहीन नेतॄत्व पाहून वाईट वाटते. लवकर नेतृत्वात आमूलाग्र बदल करून निदान २०२४ च्या तयारीला लागावे हे उत्तम.

बिगर भाजपा राज्यसरकारे ही प्रादेशिक पक्षांची आहेत. त्यांना त्यांच्या राज्याबाहेर काहिही बेस नाही. उदा. तृणमूल, कम्युनिस्ट, बिजू जनता दल, अण्णा द्रमुक. मध्य व उत्तर भारतात जवळपास भाजपाची निरंकुश सत्ता आहे. या मोठ्या पट्ट्यात उपस्थित असलेला काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष आहे. भाजपा टीआरएस, टीडीपी, अण्णा द्रमुकशी हात मिळवून दक्षिणेत खुंटा बळकट करेल.
काँग्रेसला आपले ज्येष्ठ नेते (आणि सोनियांचे सर्वात जवळचे सल्लागार) अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून आणताना तोंडाला फेस येणार आहे. गुजरात राज्य निवडणूक निकाल फोरगॉन कन्क्लुजन आहे. काँग्रेसची लढतच नाहिये, वाघेला बाहेर पडलेले आहेत.
अशी एकूण परिस्थिती असताना २०१९मध्ये काही चमत्कार घडेल असे वाटत नाही.

नेतृत्वबदल ही एकमेव गोष्ट काँग्रेसला वाचवू शकते.

नेतृत्वबदल ही एकमेव गोष्ट काँग्रेसला वाचवू शकते.<<

त्यांच्या दुर्दैवाने त्यांनी समांतर पातळीवर कोणाला मोठे होऊ दिले नाही. गांधी - नेहरू घराण्याव्यतिरिक्त त्यांनी कोणाला वर येऊ दिले नाही. त्याची फळे आता भोगत आहेत. दुसर्‍या कोणत्याही 'बिगरगांधीनेहरू' नेत्याला एकमताने पाठिंबा मिळेल असे वाटत नाही.

एकंदरीत भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे.

नेतृत्वबदल ही एकमेव गोष्ट काँग्रेसला वाचवू शकते. >>>कॉन्ग्रेसचा आजवरचा इतिहास पाहता ही अशक्य पातळीची गोष्ट वाटते.

भारतभर भाजपा हा एकमेव प्रबळ पक्ष राहिलेला असताना विरोधी पक्षांची अजून पिछेहाट होते हे पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी हे चांगले नाही.>> त्यामुळे अशी दुबळी झालेली लोकशाही राबवायची गरज नाही हे ही सर्व भारतीयांना थोड्याच दिवसात पटवून देण्यात येईल आणि २०१९च्या निवडणूकांचा खर्च वाचेल.

२०१९ मध्ये काय होईल हे माहिती नाही (म्हणजे संपूर्ण बहुमत वगैरे)
पण नितीश कुमारची ही खेळी बघून त्याचा नजीकच्या भविष्यात सणसणीत पचका व्हावा असे मनापासून वाटते आहे. मग तो भाजपानी केला तरी चालेल (आणि कदाचित तसेच होईल).

नितिशकुमार हे कणाहीन मुख्यमंत्री वाटले.
त्यांनी फक्त स्वप्रतिमा आणि मुख्यमंत्री पद टिकवले.
भाजपा सोबत जाणे ही राजकीय खेळी असतांना उगाच फुकाच्या नीतीमत्तेच्या गोष्टी कशाला कराव्यात?

खरय !

कॉंग्रेज आणि लालू सारख्या घोटाळेबाज व महाभ्रष्टाचारी लोकांशी असलेली युती त्यांनी तोडल्याने, ते आता कणाहीन मुख्यमंत्री होणे सहाजिकच आहे. गेले २० महिने कॉंग्रेज आणि लालू सारख्या घोटाळेबाज व महाभ्रष्टाचारी लोकांबरोबर सत्तेत असताना, नितिश कुमार हे अगदि कार्यक्षम मुख्यमंत्री होते.

त्यामुळे अशी दुबळी झालेली लोकशाही राबवायची गरज नाही हे ही सर्व भारतीयांना थोड्याच दिवसात पटवून देण्यात येईल आणि २०१९च्या निवडणूकांचा खर्च वाचेल.
>>>

जर सक्षम विरोधक नसतील तर कशाला निवडणुका रद्द होतील? आणीबाणी, हुकुमशाही वगैरे तेव्हा येते जेव्हा विरोधक सत्तास्थानाला धोका पोचवू शकतात. किंवा अशी निरंकुश सत्ता आणून फायदा होत असतो. इथे दोन्ही नाहिये. सध्याचे नेते पाहिलेत (एर्दोआन, ड्युटेर्टे, ओर्बान) तर कुणीही हुकुमशाही आणत नाहिये. सगळे इन्डायरेक्टली चालू आहे

Proud

नितीश जिंकले / भाजपे हरले तर पाकिस्तानात फटाके फुटतील , असे भाजपे बोल्ले होते.

एका मंत्र्याने नितीशच्या अंगात बॅरिस्टर जिन्नांचे भूत घुसले आहे , असे विधान केले होते.

Proud
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/nitish-kuma...

@ प्रसाद, तसे नाही. लालूंसोबत सत्तेत गेले तेव्हाही त्यांना लालूंची किर्ती माहीत होतीच ना? नाहीतरी ही सगळी जनता दलाची माणसे आहेत. NDA तून मोदी विरोधामुळे बाहेर पडले. लालू कुटुंबांचे नवे घोटाळे उघडकीला आल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी राजीनामा दिला. भाजपा सोबत युती करून पुन्हा मुख्यमंत्री झाले. हे फक्त उत्तम राजकारणी करू शकतो. ना त्यांनी कुणाचा राजीनामा मागितला ना कुठली कारवाई केली. त्या अर्थाने कणाहीन असा शब्द वापरला. ते कार्यक्शम आहेत की नाही हे बिहारच ठरवेल. त्यांनी सुशिलकुमार मोदींचे नाव जरी पुढे केले असते तरी त्यांची प्रतिमा उजळली असती असे माझे वैयक्तिक मत!

>>ना त्यांनी कुणाचा राजीनामा मागितला ना कुठली कारवाई केली. त्या अर्थाने कणाहीन असा शब्द वापरला. <<

तेजस्वींचा मागीतला होता, पण तेजस्वींचा कणा ताठ असल्याने नीतिशकुमारांना कणा वाकवावा लागला.

शत्रुघ्न सिन्हांचा नेमका रोल काय होता ह्यात. त्यांना सेवरेस स्नेप टाईप रोल देत भाजपानेच आधी नितिश गोटात धाडले होते की नको तेव्हा आततायी पणा केल्याने ते आता तोंडघशी पडले आहेत ?
ईथून पुढे त्यांचे भवितव्य काय आहे, नेमून दिलेले काम केले म्हणून भाजप/नितिश रिवॉर्ड देणार की घरका न घाटका अशी अवस्था होणार त्यांची?

तेजस्वींचा मागीतला होता, पण तेजस्वींचा कणा ताठ असल्याने नीतिशकुमारांना कणा वाकवावा लागला.>>Lol.
ठीक आहे बेफी. मी माझा शब्द मागे घेतो. लवचिक कण्याचे मुख्यमंत्री असे म्हणतो.

नितीशकुमार कालपर्यंत भ्रष्ट होते,आज भाजपसाठी पवित्र झाले.सत्तेसाठी भाजप व संघ परीवार कीती खालच्या स्तरावर जातात याचं हे उदाहरण.
जगभरात फॅसिझम वाढत आहे हे ट्रंप,मोदी यांच्या राजकीय यशावरुन दिसत आहेच.एक वर्तुळ पुर्ण होत आहे.

नितीशकुमार कालपर्यंत भ्रष्ट होते,आज भाजपसाठी पवित्र झाले.
>>>
मला दिसते आहे त्यानुसार अटॅक नेहेमी लालूवर होता, नितीशवर भाजपाने हल्ला केलेला नाहीये. स्मार्ट फॉक्स.

>>>
सत्तेसाठी भाजप व संघ परीवार कीती खालच्या स्तरावर जातात याचं हे उदाहरण.
>>
नितीशनी राजीनामा दिला आणि मग भाजपाने त्यांना पाठिंबा दिला. भ्रष्टयाचाराचे आरोप लालू व मुलावर. आता यात भाजपाने असे काय वेगळे केले आहे ज्याने खालची पातळी गाठली म्हणता येईल? आणि त्यावरुन थेट जागतिक फसीझम Happy

Rahul and Priyanka had invested their personal capital in this alliance. That will prove costly

Pages